कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या सभेत जोरदार घोषणाबाजी झाली आहे. महाडिक आणि पाटील गटामध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला प्रचंड गर्दी त्याठिकाणी झाली.गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नेहमीप्रमाणे वादळी ठरली आहे.
विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सभात्या करत समांतर सभा घेण्याचे जाहीर केले आहे. सभेसाठी विरोधकांना सभासदांना बसण्यास जागा न दिल्याने महाडिक गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला.
[read_also content=”प्रशिक्षण देताना श्वान पळून गेल्याने प्रशिक्षकाने घेतला श्वानाचा जीव; प्रशिक्षकावर गुन्हा नोंद https://www.navarashtra.com/maharashtra/the-trainer-took-the-dogs-life-after-the-dog-ran-away-while-training-a-case-has-been-registered-against-the-coach-nrdm-320473.html”]
दरम्यान, या गदारोळातच गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी सर्वसाधारण सभेची प्रस्तावना सादर केली. यावेळी खालीच उभ्या असलेल्या शौमिका महाडिक यांनी न वाचता बोला, सभासदांच्या डोळ्यात डोळे घालून बोला, अशी घोषणाबाजी केली. एकीकडे मंचावर माजी मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासारखे दिग्गज नेते असताना, शौमिका महाडिक त्यांना भिडत होत्या, प्रश्न विचारत होत्या.