
Mahabaleshwar Forest Department Takes Action Against Illegal Khair Wood Smuggling Satara News
Satara News: मेढा : महाबळेश्वर वन विभागाने तस्करी करणाऱ्यांवर चांगलाच वचक बसवला आहे. महाबळेश्वर (Mahabaleshwar News) वन परिमंडळ अधिकारी सुनील लांडगे व कर्मचारी रात्रीच्या सुमारात गस्त घातल होते. ही गस्त करीत असताना विनापरवाना खैर प्रजातीची लाकडे वाहतूक करताना त्यांना गाडी आढळून आली. महिंद्रा पिकअप MH 08 H 7790 व महिंद्रा स्कार्पियो MH 43 R 0906 या दोन गाड्या विनापरवाना खैरची लाकडांची वाहतूक करताना वन विभागाने पकडली.
या कारवाईवेळी वन विभागाने दोन जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये आरोपी संतोष पांडुरंग पार्टे आणि समीर संतोष पार्टे रा. केळघर ता. जावली जिल्हा सातारा यांना ताब्यात घेतले. सदर आरोपी यांनी गुन्हा कबूल केला असून वन परिमंडळ अधिकारी महाबळेश्वर यांनी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41(2) b अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हे प्रकरणात गाडी व माल किंमत असे अंदाजे 5,50,000/- माल जप्त करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Raj Thackeray यांची भावनिक श्रद्धांजली; आशाताईंची तुलना ‘रेनेसाँस’ कलाकारांशी, म्हणाले “एक युग संपलं…”
विनापरवाना खैर लाकूड तस्करी प्रकरणावर सह वनसंरक्षक सातारा प्रदीप रौंदळ, वन परिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास महाबळेश्वर वन परिमंडळ अधिकारी सुनील लांडगे हे करत आहेत. “महाबळेश्वर वनविभागाच्या कार्यक्षम व सतर्क कारभारामुळे अवैध लाकूड वाहतुकीसारख्या प्रकारांना प्रभावी आळा बसत आहे.” असे मत वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : धाराशिव परत हादरले! दलित तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने संताप उसळला; आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले
भरतगाव व भरतगाववाडी महामार्गावरील पुलाच्या उंचीवरून ग्रामस्थ आक्रमक
पुणे- बंगळूर महामार्गावरील भरतगाव व भरतगाववाडी (ता. सातारा) येथील कमी उंचीच्या पुलामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत आज ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याबाबतच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही या वेळी ग्रामस्थांनी दिला. भरतगाव, भरतगाववाडी येथील ग्रामस्थ तसेच नॅशनल हायवे एथॉरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी महेश पाटोळे, अदानी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे अधिकारी चंद्रकांत गोवे, राजेश खत्री, डीपी जैन कंपनीमधील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. भरतगाव व भरतगाववाडी या दोन्ही गावांना जोडणाऱ्या महामार्गावरील पुलाची उंची वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.
मात्र संबंधित विभागाकडून त्यावर कोणतीही उपाययोजना होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना कळविणार असल्याचे सांगितले. माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी विलास घाडगे, हणमंत शेडगे, पंचायत समितीचे माजी उपसभापती सूर्यकांत पडवळ, माजी सरपंच अशोकराव पाटील, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद इंगळे, आदींनी पुलाची उंची वाढविण्याबाबत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारे काम सुरु करू देणार नसल्याचे नमूद केले. दोन्ही गावच्या ग्रामपंचायतीचे, सोसायटीचे पदाधिकारी, सदस्य, पोलिस पाटील प्रताप शेलार, जयश्री बर्गे तसेच ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.