दलित तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने संताप उसळला; आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले
संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आणत दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. “ही आत्महत्या नसून नियोजित खून आहे,” असा ठाम आरोप करत दोषींवर ॲट्रॉसिटीसह कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ केवळ कुटुंबीयच नव्हे, तर विविध सामाजिक व राजकीय घटकही आक्रमक झाले असून, प्रशासनाविरुद्ध तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. “दलित तरुणांच्या जीवाला किंमत नाही का?” असा संतप्त सवाल उपस्थित करत निष्क्रिय यंत्रणेवर सडकून टीका करण्यात आली.
Raigad News: नेरळ ग्रामपंचायतीत मोठा घोटाळा उघड! 43 अनधिकृत नळजोडण्या समोर, कारवाईचे आदेश
दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र समोर येत आहे. गोरगरीब, दिन-दलित आणि सामान्य नागरिकांचे जगणे असुरक्षित झाले असून, न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. रिपाइंलच्या (आ) स्थानिक नेत्यांनी प्रशासनाला धारेवर धरत “दोषींना तात्काळ अटक न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल,” असा इशारा दिला.
तणावपूर्ण परिस्थिती पाहता अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनीही ठोस पावले उचलण्याची ग्वाही दिल्यावर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.तथापि, मूलभूत प्रश्न अद्याप अनुत्तरितच — ही आत्महत्या की सुनियोजित खून आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाने घेतलेले गंभीर स्वरूप पाहता, प्रशासनाची पुढील भूमिका निर्णायक ठरणार आहे.
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संबंधित घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. काही ठिकाणी निषेध नोंदवण्यात आला असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ही घटना Ambedkar Jayantiच्या पार्श्वभूमीवर घडल्याने सामाजिक वातावरण अधिक संवेदनशील बनले आहे. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सतर्कता बाळगली जात असून, अफवा पसरवू नयेत असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.






