Mahadik Group And Mandalik Group Together Political Clashesh In Kolhapur Nrka
महाडिक-मंडलिक गट एकत्र; कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय पेटणार संघर्ष
जिल्ह्यात कट्टर विरोधक महाडिक गट (Mahadik Group) आणि मंडलिक गट (Mandalik Group) एकत्र आला आहे. संजय मंडलिक यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना आपल्याशी चर्चा केली होती, अशी माहिती राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात कट्टर विरोधक महाडिक गट (Mahadik Group) आणि मंडलिक गट (Mandalik Group) एकत्र आला आहे. संजय मंडलिक यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना आपल्याशी चर्चा केली होती, अशी माहिती राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत घरोबा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक समीकरण बदलली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कट्टर विरोधक महाडिक गट आणि मंडलिक गट एकत्र आला आहे. खासदार संजय मंडलिक यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना कट्टर विरोधक खासदार धनंजय महाडिक यांच्याशी चर्चा केली होती, अशी माहिती धनंजय महाडिक यांनी दिली आहे.
माजी मंत्री सतेज पाटील यांनी मंडलिकांना निवडून आणले त्यांनाही हा धक्का होता. मात्र, मंडलिकांनी व्यवस्थित फिल्डिंग लावून निर्णय घेतला होता. प्रवेश करण्याआधी त्यांनी देवेंद्र फडणवीस आपल्याशी चर्चा केल्याची माहिती स्वतः धनंजय महाडिक यांनी दिली. यापुढच्या काळात मंडलिक गटाशी आघाडी होऊ शकते, असेही सूचक वक्तव्य त्यानी केले.
आमचं ठरलंय असं म्हणत राज्यात महाविकास आघाडी होण्याअगोदर कोल्हापूरमध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले. या सगळ्या राजकारणामध्ये २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा मोठा पराभव झाला. त्यानंतर मंडलिक-महाडिक वाद गाजत होता. या दोन्ही शक्तीचा कोल्हापूरमध्ये मोठा प्रभाव आहे.
निवडणुकीनंतर धनंजय महाडिक यांनी भाजपशी घरोबा केला. त्यांना अनपेक्षितपणे राज्यसभेवर संधी मिळाली. त्यामुळे भाजप-शिंदे युतीपुढं कोल्हापूरचा लोकसभेचा उमेदवार कोण? हा प्रश्न निर्माण झाला होता. सुरवातीला उध्दव ठाकरे यांची बाजू घेणाऱ्या संजय मंडलिक यांनी ‘यू-टर्न’ घेत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर आता जिल्ह्यातील राजकारणात हे दोन्ही गट एकत्र आल्याने आता राजकीय रंगत वाढणार आहे.
Web Title: Mahadik group and mandalik group together political clashesh in kolhapur nrka