फोटो सौजन्य: iStock
Fast AC charging असलेली वाहने वेळ मोठ्या प्रमाणात वाचवतात. चला आता अशा इलेक्ट्रिक SUVs बद्दल जाणून घेऊया, ज्या घरच्या AC चार्जरवर फक्त 4 ते 9 तासांमध्ये फुल चार्ज होतात.
Hyundai Creta Electric ही भारतातील सर्वात फास्ट AC चार्ज होणाऱ्या EV पैकी एक आहे. यात 42 kWh बॅटरी मिळते, जी 11 kW AC चार्जरद्वारे साधारण 4 तासांमध्ये पूर्ण चार्ज होते. जरी 11 kW चार्जर सर्व व्हेरियंट्समध्ये स्टँडर्ड नसून वेगळे खरेदी करावे लागते, तरीही या कॅटेगरीत ही सर्वात वेगाने चार्ज होणारी इलेक्ट्रिक SUV मानली जाते.
Kawasaki च्या ‘या’ बाईक्स वर छपरफ़ाड डिस्काउंट, कोणत्या मॉडेलवर किती डिस्काउंट? जाणून घ्या
Tata Curvv EV देखील फास्ट चार्जिंग देणाऱ्या प्रमुख इलेक्ट्रिक SUVs मध्ये गणली जाते. यात 45 kWh आणि 55 kWh असे दोन बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत. 45 kWh बॅटरीला फुल चार्ज होण्यासाठी साधारण 6.5 तास लागतात. 55 kWh बॅटरी 7.9 तासांमध्ये पूर्ण चार्ज होते. यातील मोठा फायदा म्हणजे 7.2 kW AC चार्जर सर्व व्हेरियंट्समध्ये Free मिळतो, ज्यामुळे घरच्या चार्जर इंस्टॉलेशनवर अतिरिक्त खर्च येत नाही.
MG Windsor EV आपले आकर्षक डिझाइन आणि चांगली चार्जिंग स्पीड यामुळे ग्राहकांना पसंत पडते.
38 kWh बॅटरी वेरियंटला 7.4 kW चार्जरद्वारे सुमारे 7 तासांमध्ये फुल चार्ज करता येते.
ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल
लोअर वेरियंट्समध्ये वेळ थोडा वाढतो, परंतु साईज आणि फीचर्स पाहता ही SUV मिड-साईज फॅमिलींसाठी उत्तम पर्याय ठरते.
महिंद्राची येणारी BE 06 SUV तिच्या फ्युचरिस्टिक डिझाइन आणि मोठ्या बॅटरीसाठी चर्चेत आहे. 59 kWh बॅटरी वेरियंट 7.2 kW चार्जरने सुमारे 8.7 तासांमध्ये चार्ज होते. मोठ्या 79 kWh बॅटरीमुळे या वेरियंटमध्ये चार्जिंग वेळ अधिक असतो. महिंद्रा 11.2 kW चार्जरचा पर्याय देखील देते, ज्याने 59 kWh मॉडेल फक्त 6 तासांमध्ये फुल चार्ज होते.
MG ZS EV ही भारतातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक SUVs पैकी एक आहे. 50.3 kWh बॅटरी 7.4 kW चार्जरने 8.5 ते 9 तासांमध्ये चार्ज होते. कंपनी घरच्या चार्जरचे इंस्टॉलेशन Free देते, ज्यामुळे एकूण खर्च कमी होतो. फीचर्स, स्पेस आणि चार्जिंग स्पीडच्या बाबतीत ही SUV एक परफेक्ट ऑल-राऊंडर मानली जाते.






