मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा (12th Board Exam) निकाल आज (दि.21) दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एक परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे. हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
यंदा राज्यामध्ये तब्बल 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. या विद्यार्थांच्या ऑनलाईन निकालानंतर बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी करता येईल. शिक्षण मंडळाकडून जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकात निकालासंदर्भात आणि गुणपडताळणीच्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिकेची पडताळणी देखील करता येणार आहे. त्यासाठीची माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे.
बारावीचा हा निकाल ऑनलाईन माध्यमातून पाहता येणार आहे. त्यासाठी www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकालासोबतच निकालाची संख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahss- cboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
याशिवाय, https://mahresult.nic.in, https://hsc.mahresults.org.in, http://hscresult.mkcl.org, https://mahahsscboard.in, https://results.gov.in या वेबसाईटवरूनही निकाल पाहता येणार आहे.