Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cabinet Decision : फडणवीस मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! वंचित शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी; १४ हजार कोटींची तरतूद

वित्त विभागाच्या प्रस्तावानुसार केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७ मधील तरतुदीशी सुसंगतता राखण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक २०२६ मध्येही बदल करण्यात येणार आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 10, 2026 | 11:25 AM
Farmers Loan Waiver, Maharashtra Government,

Farmers Loan Waiver, Maharashtra Government,

Follow Us
Follow Us:
  •  विविध कारणांमुळे या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता सध्याच्या कर्जमाफी योजनेत समाविष्ट केले जाणार
  • अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याची तरतूद
  • महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक २०२६ मध्येही बदल
Farmers News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेपासून ते नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्याच्या प्रक्रियेत बदल आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्जउभारणीच्या अधिकारात वाढ करण्यापर्यंत अनेक निर्णयांना मंजुरी देण्यात आली.

२०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफी योजनांसाठी पात्र असूनही विविध कारणांमुळे या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता सध्याच्या कर्जमाफी योजनेत समाविष्ट केले जाणार आहे. या कर्जमाफीसाठी सुमारे १४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने काही काळापूर्वी अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली होती, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याची तरतूद आहे. मात्र, या योजनेत लावण्यात आलेल्या कडक अटी व निकषांमुळे मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. हीच त्रुटी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

NCP 27th foundation Day: अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा पहिलाच वर्धापन दिन; सुनेत्रा पवार यांची ‘एक्स’वर अत्यंत भावूक पोस्ट

महाविद्यालयांना मान्यता

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. राज्यातील नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता देणे, विद्यमान महाविद्यालयांमध्ये नवीन विद्याशाखा, अभ्यासक्रम, विषय किंवा अतिरिक्त तुकड्यांना मान्यता देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. यामुळे महाविद्यालयाच्या विस्ताराला गती मिळण्याची शक्यता आहे.

 

वस्तू व सेवा करात सुधारणा

वित्त विभागाच्या प्रस्तावानुसार केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७ मधील तरतुदीशी सुसंगतता राखण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक २०२६ मध्येही बदल करण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील जीएसटी कायद्याची अंमलबजावणी अधिक सुसूत्र आणि केंद्राच्या कायद्याशी सुसंगत होणार आहे.

NCP Rajya sabha Candidate: भुजबळांचा पत्ता कट; राष्ट्रवादीकडून बड्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी

मंत्रालयात आता ३३ ऐवजी ४५ विभाग

सर्वसामान्य प्रशासन विभागाच्या प्रस्तावानुसार राज्यातील मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यास मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ३३ प्रशासकीय विभागाची संख्या आता ४५ होणार आहे. यासाठी १३ विभागाची पुनर्रचना करण्यात येणार असून, एकाच विभागाअंतर्गत काम करणारे काही उपविभाग स्वतंत्र विभाग म्हणून कार्यरत होतील. महत्वाची बाब म्हणजे या पुनर्रचनेमुळे कोणतीही नवीन पदनिर्मिती होणार नाही, मात्र विभागांमधील कामकाजाचे अधिक प्रभावी आणि सुसूत्र वाटप होईल. त्यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होण्यास मदत होईल व प्रशासनातील कार्यक्षमता वाडेल

 

Web Title: Maharashtra cabinet decision direct relief for 5 lakh plus farmers govt to spend rs 14000 crore on debt waiver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • Farmers News
  • Loan Waiver
  • maharashtra farmers

संबंधित बातम्या

कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर ! धाराशिवच्या 46046 शेतकऱ्यांना मोठा दिलासा
1

कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर ! धाराशिवच्या 46046 शेतकऱ्यांना मोठा दिलासा

राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला सुरुवात; पहिल्या टप्प्यातील यादी जाहीर, तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांची निवड
2

राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला सुरुवात; पहिल्या टप्प्यातील यादी जाहीर, तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांची निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.