Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

बरेचदा शेतकरी थेट दुकानदारांकडे जाऊन दुकानदार सांगतील त्या प्रमाणात युरिया, डीएपी, कीटकनाशके खरेदी करतात व शेतात वापरतात. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 01, 2026 | 09:39 PM
“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना
Follow Us
Close
Follow Us:

कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करण्याची गरज
राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना
‘नैसर्गिक शेती’ची क्रांती आणण्यासाठी कृषी विद्यापीठांनी घ्यावा पुढाकार

मुंबई: जागतिक हवामानाचे गंभीर संकट लक्षात घेऊन राज्यातील कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाणांना संस्कारित करून त्यांचे उन्नतीकरण करावे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल अशा प्रकारचे बियाणे निर्माण करावीत असे सांगताना कृषी विद्यापीठांनी राज्यात नैसर्गिक शेतीची क्रांती आणण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी केले.

लोकभवन मुंबई येथून कृषि विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यातील कृषी व पशुविज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंशी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधताना राज्यपाल बोलत होते. बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, ‘पोकरा’चे प्रकल्प संचालक परिमल सिंह, राज्यातील कृषी तसेच पशुविज्ञान विद्यापीठांचे कुलगुरु, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, ‘आत्मा’चे संचालक सुनील बोरकर व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संकरीत बियाणे शेतकऱ्यांसाठी संकट असून ते महाग देखील आहे. त्यांचा वापर केल्यास रासायनिक खते देखील जास्त लागतात. उत्पादित अन्नधान्याला चव नसते व त्याचे पोषणमूल्य देखील कमी असते. त्यामुळे कृषी विद्यापीठांनी पारंपरिक बियाण्यांवर संशोधन करुन त्याचे उन्नतीकरण करावे, असे राज्यपालांनी सांगितले. सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी नैसर्गिक शेतीच्या प्रचार प्रसारासाठी ‘मॉडेल फार्म’ विकसित करावे व शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करावी असे राज्यपालांनी सांगितले. नैसर्गिक शेती ही लोकचळवळ झाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन

नैसर्गिक शेती हे पवित्र असे ईश्वरी कार्य आहे. भावी पिढ्यांच्या अन्नसुरक्षेसाठी जमिनीचा पोत सुधारायचा असेल तर नैसर्गिक शेतीशिवाय गत्यंतर नाही. बरेचदा शेतकरी थेट दुकानदारांकडे जाऊन दुकानदार सांगतील त्या प्रमाणात युरिया, डीएपी, कीटकनाशके खरेदी करतात व शेतात वापरतात. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. या दृष्टीने विद्यापीठांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे असेही राज्यपालांनी सांगितले.

गुजरात मधील चार कृषी विद्यापीठे गेल्या तीन वर्षांपासून नैसर्गिक शेती या विषयावर संशोधन करीत आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांनी त्या विषयावर नव्याने संशोधन सुरु न करता गुजरातमधील संशोधन पुढे न्यावे. त्यांनी तयार केलेल्या संशोधन पत्रिका व पुस्तके राज्यातील विद्यापीठांना उपलब्ध करून देऊ असे राज्यपालांनी सांगितले.

Farmers News : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! धान खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ

आपण अलीकडे गावागावांमध्ये जाऊन लोकांमध्ये नैसर्गिक शेतीबाबत जनजागृती करीत आहोत, असे राज्यपालांनी सांगितले. अशाच एका भेटीमध्ये आणंद जिल्ह्यात २५ गावांमध्ये आज भूमिगत जलस्त्रोतांमध्ये नायट्रेट आढळून आले असून पाणी पिण्यायोग्य राहिले नाही, ही गोष्ट निदर्शनास आली. दूषित पाण्यांमुळे लोकांना गंभीर आजार होत आहेत. या दृष्टीने रसायनांच्या वापराबाबत जागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्याकडे एक गाय असली तरी देखील शेती करता येते हे त्यांना पटवून द्यावे लागेल. महाराष्ट्रात साहिवाल, थारपारकर, कांकरेज, गीर आदी देशी गायींचे संवर्धन केले गेल्यास ते शेतीला वरदान ठरेल व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असेही राज्यपालांनी सांगितले. यावेळी ‘आत्मा’चे संचालक सुनील बोरकर यांनी सादरीकरण केले. आपण महाराष्ट्रात नैसर्गिक शेती विषयावर घेतलेल्या दोन परिसंवादानंतर कृषी विभाग व विद्यापीठांनी हे कार्य सकारात्मक पद्धतीने हाती घेतले याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Maharashtra governor acharya devvrat said that natural farming is a sacred divine work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 09:31 PM

Topics:  

  • Acharya Devvrat
  • Agriculrture News
  • Farmers

संबंधित बातम्या

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन
1

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन

हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याला सव्वा 11 कोटींचा दंड, नेमकं कारण काय?
2

हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याला सव्वा 11 कोटींचा दंड, नेमकं कारण काय?

MPSC News: कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; 827 उमेदवार मुलाखातीस पात्र, तर…
3

MPSC News: कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; 827 उमेदवार मुलाखातीस पात्र, तर…

कदमवाकवस्ती परिसरात अडीच एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचं मोठं नुकसान
4

कदमवाकवस्ती परिसरात अडीच एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचं मोठं नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.