Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Heat Wave:विदर्भात उष्णतेची लाट; मुंबई-ठाण्यासह कोकणाला ‘येलो अलर्ट, ‘ पुढील २ दिवस महत्त्वाचे

विदर्भ क्षेत्रात उष्णतेची लाट सर्वाधिक तीव्र झाली आहे. नागपूरसह अनेक जिल्ह्यांत तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सोमवारी तापमान ३८ ते ४१ अशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 09, 2026 | 10:46 AM
Maharashtra Heat Wave, IMD Weather Forecast, Hot and Humid Weather

Maharashtra Heat Wave, IMD Weather Forecast, Hot and Humid Weather

Follow Us
Close
Follow Us:
  • मार्चच्या सुरुवातीलाच मे महिन्यासारखी भीषण उष्णता
  • राज्यात खऱ्या अर्थाने कडाक्याच्या उन्हाळ्याला सुरुवात
  • नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये कमाल तापमान ३६ ते ३९ अंशांवर
Maharashtra Heat Wave: महाराष्ट्रात मार्चच्या सुरुवातीलाच मे महिन्यासारखी भीषण उष्णता जाणवू लागली आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी येत्या दोन दिवसांसाठी ‘येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यभरात तापमान सामान्यपेक्षा ४ ते ८ अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले जात असून, नागरिकांना कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागत आहे.

कोकण-मुंबईत दमट हवामान:

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामान आहे. कोकणात दमट हवामान राहण्याची शक्यता असून दिवसभर तापमानात चढ-उतार पाहायला मिळतील. राज्यात खऱ्या अर्थाने कडाक्याच्या उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Baramati Politics: संसदेतील बारामतीचा नवा ‘पवार’ पॅटर्न; आजोबा अन् नातू एकाचवेळी राज्यसभेवर

उत्तर महाराष्ट्रात सूर्य तळपला

नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये तापमान सातत्याने वाढत आहे, या जिल्हह्यांत कमाल तापमान ३६ ते ३९ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले आहे. पुढील आठवडचातही तापमान वाढण्याची शक्यता कायम आहे.

मराठवाड्यात मार्चमध्येच कडाका

मराठवाड्याच्या अनेक भागांत मार्चमध्येच तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ ते ४० अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

विदर्भात सर्वाधिक उष्णता

विदर्भ क्षेत्रात उष्णतेची लाट सर्वाधिक तीव्र झाली आहे. नागपूरसह अनेक जिल्ह्यांत तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सोमवारी तापमान ३८ ते ४१ अशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Weather Forecast)

पावसाची शक्यता नाही

हवामान विभागानुसार, राज्याध्या कोणत्याही भागात पावसाची शक्यता नाही. येत्या काही दिवसांत कमाल तापमानात आणखी २ ते ३ अंशांची वाढ होऊ शकते, भीषण उष्णता पाहता नागरिकांना दुपारी घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे, तसेच जास्तीत जास्त पाणी विम्याचे आणि शरीर हज्यड्रेट ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Wardha Crime: राष्ट्रवादीच्या नेत्याकडून ५ वर्ष मुलीवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटोही पाठवले

उष्णतेपासून बचावासाठी आरोग्य सल्ला (Health Advisory)

१. हायड्रेशन: दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या. लिंबू सरबत किंवा ताकाचा वापर वाढवा.
२. वेळ: दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळा.
३. पोशाख: हलक्या रंगाचे आणि सुती कपडे वापरा. बाहेर पडताना डोके झाकून ठेवा.
४. विशेष काळजी: लहान मुले, वृद्ध आणि दीर्घकाळ आजारी असलेल्या व्यक्तींनी उन्हात जाणे टाळावे.

हवामान तज्ज्ञांचे मत: अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकणात आर्द्रता वाढली आहे, तर उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा कडाका वाढला आहे. १२ मार्चनंतर काही भागांत अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Maharashtra heat wave heat wave in vidarbha yellow alert for konkan including mumbai thane next 2 days important

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • Heat Wave in Maharashtra
  • IMD alert of maharashtra
  • summer heat

संबंधित बातम्या

कडाक्याच्या उन्हाळ्यात जेवणात अजिबात करू नका ‘या’ पदार्थांचा समावेश, अन्यथा उद्भवतील पचन आणि पोटाच्या गंभीर समस्या
1

कडाक्याच्या उन्हाळ्यात जेवणात अजिबात करू नका ‘या’ पदार्थांचा समावेश, अन्यथा उद्भवतील पचन आणि पोटाच्या गंभीर समस्या

संभाजीनगरकरांना मोठा दिलासा! आता भर दुपारी वीज गायब होणार नाही; महावितरणने बदलली कामाची वेळ
2

संभाजीनगरकरांना मोठा दिलासा! आता भर दुपारी वीज गायब होणार नाही; महावितरणने बदलली कामाची वेळ

देशभरात वाढलेल्या तापमानाचा मानवी शरीरावर कसा परिणाम होतो? मानवी शरीर किती उष्णता सहन करू शकते, जाणून घ्या सविस्तर
3

देशभरात वाढलेल्या तापमानाचा मानवी शरीरावर कसा परिणाम होतो? मानवी शरीर किती उष्णता सहन करू शकते, जाणून घ्या सविस्तर

वाढत्या उन्हाळ्यात पोट कशामुळे बिघडते? फूड पॉयजनिंगशिवाय असू शकतात ‘ही’ गंभीर कारणे, दुर्लक्ष करणे ठरेल धोक्याचे
4

वाढत्या उन्हाळ्यात पोट कशामुळे बिघडते? फूड पॉयजनिंगशिवाय असू शकतात ‘ही’ गंभीर कारणे, दुर्लक्ष करणे ठरेल धोक्याचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.