महाराष्ट्र बारावी निकाल २०२५ लाईव्ह, Maharashtra HSC Result Live
Maharashtra HSC 12th Result Live : आज बारावीचा निकाल जाहीर होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद सुरु आहे. या पत्रकार परिषदेत या निकालाची वैशिष्ट्ये जाहीर करत आहेत.बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा कोकणचा निकाल ९६.७४ टक्के सर्वाधिक लागला आहे. तर लातूर ८९.४६ टक्के निकाल सर्वात कमी लागला आहे. तुम्ही हा निकाल कुठे आणि कसा पाहणार ते जाणून घ्या एका क्लिकवर…
05 May 2025 01:42 PM (IST)
महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल २०२५ लाईव्ह: महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या निकाल २०२५ मध्ये कला शाखेचा एकूण उत्तीर्णतेचा टक्का ८०.५२% नोंदवला गेला आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी कला शाखेचा निकाल थोडा कमी लागला आहे. मागील वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, २०२२ मध्ये ९०.५१%, २०२३ मध्ये ८४.०५% आणि २०२४ मध्ये ८५.८८% विद्यार्थी यशस्वी झाले होते. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की २०२५ मध्ये कला विद्याशाखेचा उत्तीर्ण होण्याचा टक्का गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी आहे.
05 May 2025 01:07 PM (IST)
आज जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालांवर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी नोंदणी करण्यासाठी २० मे पर्यंत वेळ आहे. बारावी निकाल २०२५ च्या पुनर्मूल्यांकनासाठी नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज करावा लागेल.
05 May 2025 01:01 PM (IST)
महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहेत. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले की, “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या एच.एस.सी. अर्थात बारावी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तमाम विद्यार्थी व विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन! आणि भावी शैक्षणिक वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा!”
05 May 2025 12:55 PM (IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. या पत्रकार परिषदेत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी २०२७-२८ मध्ये दहावी-बारावीचा नवीन अभ्यासक्रम येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे पुढील परीक्षा त्यानुसार घेतल्या जातील.
05 May 2025 12:52 PM (IST)
महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा यावर्षी एकूण १५४ विषयांसाठी घेण्यात आली होती, त्यापैकी १०० टक्के विद्यार्थी ३७ विषयांमध्ये उत्तीर्ण झाले.
05 May 2025 12:51 PM (IST)
१,४९,९३२: ७५% आणि त्याहून अधिक गुण
४,०७,४३८: ६० टक्के ते ७४.९९ टक्के गुण
५८०९०२: ४५% ते ५९.९९% गुण
१६४६०१: ३५ टक्के ते ४४.९९ टक्के गुण
05 May 2025 12:38 PM (IST)
महाराष्ट्र बारावीच्या बारावीच्या निकालात एकाही विद्यार्थ्याला १०० टक्के गुण मिळालेले नाहीत. तब्बल ४,५०० विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
05 May 2025 12:37 PM (IST)
गेल्यावेळी बारावीच्या परीक्षेत अनुतीर्ण झालेल्या एकूण ४२,३८८ विद्यार्थ्यांनी यंदाच्या परीक्षेसाठी पुन्हा नोंदणी केली होती. त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, म्हणजेच उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ टक्के आहे.
05 May 2025 12:19 PM (IST)
कोकण: ९७.५१ टक्के
नाशिक: ९४.७१ टक्के
पुणे: ९४.४४ टक्के
कोल्हापूर: ९४.२४ टक्के
छत्रपती संभाजी नगर : ९४.०८ टक्के
अमरावती: ९३ टक्के
लातूर: ९२.३६ टक्के
नागपूर: ९२.१२ टक्के
मुंबई: ९१.९५ टक्के
05 May 2025 12:05 PM (IST)
विज्ञान: ९७.३५ टक्के
कला: ८०.५३ टक्के
वाणिज्य: ९२.६८ टक्के
व्यावसायिक: ८३.३ टक्के
05 May 2025 11:58 AM (IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. नोंदणी केलेल्या १४ लाख २७ हजार ८५ नियमित विद्यार्थ्यांपैकी १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील १ लाख ४९ हजार ९३२ विद्यार्थ्यांना ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा ९७.३५ टक्के, कला शाखेचा ८०.५२ टक्के, वाणिज्य शाखेचा ९२.६८ टक्के, व्यवसाय अभ्यासक्रमाचा ८३.२६ टक्के, आयटीआयचा निकाल ८२.०३ टक्के लागला.
05 May 2025 11:49 AM (IST)
सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर जा.
होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी तुमचा सीट क्रमांक टाका. तसेच सोबत आईचे नाव भरुन ‘सबमिट’ बटणवर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
या निकालाची प्रत तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
05 May 2025 11:46 AM (IST)
पुणे – ९१.३२
नागपूर – ९०. ५२
छत्रपती संभाजीनगर – ९२.२४
मुंबई -९२.९३
कोल्हापूर – ९३.६४
अमरावती – ९१.४३
नाशिक – ९१.३१
लातूर – ८९.४६
कोकण – ९६.७४
05 May 2025 11:41 AM (IST)
1. https://www.mahahsscboard.in/
2. https://mahresult.nic.in/
3. https://main.mahahsscboard.in/mr
4. hscresult.mkcl.org
5. results.digilocker.gov.in
05 May 2025 11:39 AM (IST)
आज बारावीचा निकाल जाहीर होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा कोकणचा निकाल ९६.७४ टक्के सर्वाधिक लागला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.