Maharashtra Breaking News
22 Dec 2025 11:35 AM (IST)
मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे. प्रत्येक बैठक संपल्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी जागावापट होऊन मनसे आणि ठाकरे गटाची युती जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, अनेक मराठीबहुल भागांमध्ये प्रभागांच्या वाटणीवरुन शिवसेना-ठाकरे गटात रस्सीखेंच सुरु असल्याची माहिती आता समोर आली आहे.
22 Dec 2025 11:25 AM (IST)
50 वर्षीय शेख अख्तर नवाज असे आरोपीचे नाव असून तो मुंबईल लोकलमधील महिलांच्या डब्यात चढला होता. ते पाहून डब्यातील काही महिला प्रवाशांनी त्याला खाली उतरण्यास सांगितलं, यावरून त्यांच्यात बोलाचाली झाली. एका 18 वर्षांच्या तरूणीनेही नवाज याला विरोध दर्शवत खाली उतरायला सांगितलं. मात्र ते ऐकून आरोपी प्रचंड संतापला आणि रागाच्या भरात त्याने मागचा पुढचा विचार न करता त्या तरुणीला चालत्या लोकलमधून धक्का देऊन बाहेर फेकलं
22 Dec 2025 11:15 AM (IST)
“भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे आणि हे वास्तव स्वीकारण्यासाठी कोणत्याही घटनात्मक मंजुरीची किंवा कागदोपत्री पुराव्याची आवश्यकता नाही”, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली. कोलकाता येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या वर्षानिमित्त आयोजित १०० व्याख्यानमाला या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
22 Dec 2025 11:05 AM (IST)
शिख सांप्रदायातील शेवटचे गुरु म्हणजे गुरु गोविंद सिंह. ते शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे मानवी गुरू होते. गुरु गोविंद सिंह यांनी १६९९ मध्ये खालसा पंथाची स्थापना केली, शिखांना ‘पाच ककार’ (केश, कडा, कंघा, काचेरा, कृपाण) धारण करण्याचा आदेश दिला, न्याय, समानता आणि शौर्याचा संदेश दिला आणि गुरु ग्रंथ साहिब यांना शिखांचा शाश्वत गुरू घोषित करून गुरु-परंपरा थांबवली. त्यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी पटना येथे झाला आणि मृत्यू ७ ऑक्टोबर १७०8 रोजी महाराष्ट्रातील नांदेड येथे झाला. आज त्यांची जयंती असून शिख बांधव उत्साहाने ती साजरी करत आहेत.
22 Dec 2025 10:59 AM (IST)
टेक जायंट कंपनी Apple पुढील वर्षी त्यांची आयफोन 18 सिरीज लाँच करणार आहे. या सिरीजमध्ये कोणत्या मॉडेल्सचा समावेश असणार आहे आणि त्यांचे स्पेसिफिकेशन्स काय असणार आहे, याबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत असतात. याशिवाय असं देखील सांगितलं जात आहे की, कंपनी आयफोन 18 सिरीजसोबत फोल्डेबल आयफोन देखील लाँच करणार आहे. कंपनीच्या आगामी आयफोन 18 सिरीजमध्ये कोणत्या मॉडेल्सचा समावेश केला जाणार आहे, याची माहिती देखील समोर आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी आयफोन 18 सिरीजअंतर्गत iPhone 18, 18 Pro आमि 18 Pro Max लाँच करणार आहे.
22 Dec 2025 10:54 AM (IST)
रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) दिवसेंदिवस भयंकर होत चालले आहे. या युद्धाने आतापर्यंत हजारोंचा बळी घेतला आहे. या युद्धाने सर्वाधिक युक्रेनचे नुकसान केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. यामुळे युक्रेनमध्ये अनेक पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत. युक्रेनेचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या आठड्यात रशियाने अनेक ड्रोन आणि ग्रेनेड बॉम्ब, क्षेपणास्त्रे युक्रेनच्या प्रदेशांवर डागली आहे.
22 Dec 2025 10:47 AM (IST)
फ्री फायर मॅक्समध्ये नवीन फेडेड व्हिल ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना 67 ईमोट मोफत जिंकण्याची संधी मिळणार आहे. हा या गेममधील लक रॉयल ईव्हेंट आहे, ज्यामध्ये रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावं लागणार आहे. या गेममध्ये रिवॉर्ड जिंकणं तुमच्या नशिबावर अवलंबून असणार आहे. प्रत्येक स्पिननंतर प्लेअर्सना रिवॉर्ड मिळणार आहे. या ईव्हेंटमधील ग्रँट प्राईज मिळवण्यासाठी देखील प्लेअर्सना स्पिन करावं लागणार आहे. स्पिन करण्यासाठी तुम्हाला डायमंड्स खर्च करावे लागणार आहे.
22 Dec 2025 10:40 AM (IST)
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना काल पार पडला, या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली आणि संघाने विजयी सुरुवात केली आहे. या विजयासह भारताच्या संघाने मालिकेमध्ये देखील 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम, भारतीय संघाने शानदार गोलंदाजी केली आणि श्रीलंकेला मजबूत धावसंख्या उभारण्यापासून रोखले. त्यानंतर, भारतीय गोलंदाजांनी त्यांची ताकद दाखवून विजय मिळवला. भारताने श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव केला.
22 Dec 2025 10:32 AM (IST)
जगातील महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चीनचा (China) खरा आणि क्रूर चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. चीनच्या शिनजियांग प्रांतात राहणाऱ्या उइगर मुस्लिमांच्या (Uighur Muslims in China) अस्तित्वावरच आता संकट ओढवले आहे. वॉशिंग्टन येथील प्रतिष्ठित संस्था ‘जेनोसाइड वॉच’ (Genocide Watch) ने आपल्या ताज्या अहवालात २०२५ सालासाठी चीनमध्ये “नरसंहार आणीबाणी” (Genocide Emergency) जाहीर केली आहे. या अहवालाने मानवी हक्कांच्या रक्षणाचा दावा करणाऱ्या जागतिक समुदायाचे डोळे उघडले असून, उइगर मुस्लिमांचा पद्धतशीरपणे नाश केला जात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
22 Dec 2025 10:27 AM (IST)
मानधना २३ नोव्हेंबर रोजी संगीतकार पलाश मुच्छल यांच्याशी लग्न करणार होती, परंतु लग्न रद्द झाले. त्यानंतर, भारतीय खेळाडूने पहिल्यांदाच मैदानावर पाऊल ठेवले आणि इतिहास रचला. विशाखापट्टणम येथे श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात तिने हे केले, ज्यामध्ये भारताने विजय मिळवला. या सामन्यात मानधनाने मोठी खेळी केली नाही, पण तरीही तिने एका खास यादीत आपले स्थान मिळवले. ती या यादीतील फक्त दुसरी फलंदाज आहे. मानधनाने श्रीलंकेविरुद्ध २५ चेंडूंचा सामना केला आणि तेवढ्याच धावा केल्या. डावखुऱ्या फलंदाजाने तिच्या डावात चार चौकार मारले. या खेळीदरम्यान, मंधानाने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक मोठा टप्पा गाठला. तिने ४,००० टी-२० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा ओलांडला.
22 Dec 2025 10:19 AM (IST)
भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यातील संबंध सध्या एका नाजूक वळणावर आहेत. अशातच बांगलादेशातील काही माध्यम समूहाने दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर झालेल्या निदर्शनांबाबत खोट्या आणि चिथावणीखोर बातम्या पसरवण्यास सुरुवात केली आहे. या ‘फेक न्यूज’ मोहिमेचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तीव्र शब्दात निषेध केला आहे. भारताने स्पष्टपणे सांगितले आहे की, बांगलादेशी माध्यमांमध्ये जे काही दाखवले जात आहे, तो केवळ एक जाणीवपूर्वक रचलेला ‘प्रोपोगंडा’ म्हणजेच अपप्रचार आहे.
22 Dec 2025 10:14 AM (IST)
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना काल पार पडला, या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली आणि संघाने विजयी सुरुवात केली आहे. या विजयासह भारताच्या संघाने मालिकेमध्ये देखील 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम, भारतीय संघाने शानदार गोलंदाजी केली आणि श्रीलंकेला मजबूत धावसंख्या उभारण्यापासून रोखले. त्यानंतर, भारतीय गोलंदाजांनी त्यांची ताकद दाखवून विजय मिळवला. भारताने श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव केला.
22 Dec 2025 10:13 AM (IST)
विशाखापट्टनम : आयसीसी विमेन्स वर्ल्डकप २०२५ चा खिताब जिंकल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या टी-२० मालिका खेळवण्यात येत असून, या मालिकेतील पहिला सामना रविवारी विशाखापट्टनमच्या मैदानावर झाला.
या सामन्यात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत श्रीलंकेवर ८ विकेट्सने विजय मिळवला. गोलंदाजांच्या अचूक माऱ्यानंतर फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक खेळ साकारत सहज विजय संपादन केला.
या विजयासोबतच भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला गेला असून, चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
22 Dec 2025 10:12 AM (IST)
जागतिक बाजारातील सकारात्मक ट्रेंडमुळे सोमवार, २२ डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. वॉल स्ट्रीटवरील तंत्रज्ञान-चालित वाढीमुळे आशियाई शेअर बाजार सोमवारी तेजीत राहिले. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २६,१७० च्या जवळ व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा १३९ अंकांनी किंवा ०.५४% ने वाढला.
22 Dec 2025 10:04 AM (IST)
नागपूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना नवीन कामठी पोलीस ठाणे परिसरात शुक्रवारी (20 डिसेंबर 2025) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. सीबीएसई इयत्ता आठवीचा विद्यार्थी शाळेतील गॅदरिंग आटोपून घरी जात असताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी विद्यार्थ्यांवर मेयो हॉस्पिटलच्या आयसीयू विभागामध्ये उपचार सुरू आहेत.
22 Dec 2025 09:58 AM (IST)
स्टार फास्ट बॉलिंग ऑलराउंडर शार्दुल ठाकूर आणि मिताली पारुलकर एका मुलाचे पालक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर त्यांची बातमी शेअर करत म्हटले आहे की, “पालकांच्या हृदयात लपलेले, शांतता, विश्वास आणि असीम प्रेमाने संरक्षित. आमचे रहस्य अखेर उघड झाले आहे. स्वागत आहे मुला, आम्ही नऊ महिने शांतपणे जोपासलेले स्वप्न.” ठाकूर आणि मितालीचे लग्न २७ फेब्रुवारी २०२३ रोजी झाले होते. लग्नापूर्वी त्यांनी एकमेकांना डेट केले होते. ते अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. मितालीने शार्दुलला त्याच्या कठीण काळात साथ दिली.
22 Dec 2025 09:55 AM (IST)
सिंदखेड राजा (बुलढाणा) : राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या निवडणुकांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा नगरपरिषदेची लढत विशेष चर्चेची ठरली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या चुरशीच्या संघर्षात अवघ्या २१ वर्षीय सौरभ तायडे यांनी विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
22 Dec 2025 09:40 AM (IST)
MEA Randhir Jaiswal on Bangladesh High Commission protest : भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यातील संबंध सध्या एका नाजूक वळणावर आहेत. अशातच बांगलादेशातील काही माध्यम समूहाने दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर झालेल्या निदर्शनांबाबत खोट्या आणि चिथावणीखोर बातम्या पसरवण्यास सुरुवात केली आहे. या ‘फेक न्यूज’ मोहिमेचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तीव्र शब्दात निषेध केला आहे. भारताने स्पष्टपणे सांगितले आहे की, बांगलादेशी माध्यमांमध्ये जे काही दाखवले जात आहे, तो केवळ एक जाणीवपूर्वक रचलेला ‘प्रोपोगंडा’ म्हणजेच अपप्रचार आहे.
22 Dec 2025 09:35 AM (IST)
Russia Ukraine War News Marathi : कीव/मॉस्को : रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) दिवसेंदिवस भयंकर होत चालले आहे. या युद्धाने आतापर्यंत हजारोंचा बळी घेतला आहे. या युद्धाने सर्वाधिक युक्रेनचे नुकसान केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. यामुळे युक्रेनमध्ये अनेक पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत. युक्रेनेचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या आठड्यात रशियाने अनेक ड्रोन आणि ग्रेनेड बॉम्ब, क्षेपणास्त्रे युक्रेनच्या प्रदेशांवर डागली आहे.
22 Dec 2025 09:30 AM (IST)
पाठीशी कोणतेही मोठे राजकीय पाठबळ नसताना, कोणत्याही पक्षाची साथ न घेता आणि आर्थिकदृष्ट्याही सक्षम नसतानाही एका तरुण उमेदवाराने लोकशाहीच्या या उत्सवात आपले नशीब आजमावले. विशेष म्हणजे, लोकराजाने त्याच्या पारड्यात भरभरून मतदान करत त्या तरुणाला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. सचिन उर्फ जांभा कैलास कराळे असे या विजयी उमेदवाराचे नाव असून, त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे हा ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नेरमध्ये कराळे यांनी बाजी मारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
22 Dec 2025 09:25 AM (IST)
Dhurandhar Movie : अक्षय खन्ना आणि रणवीर सिंह यांचा ‘धुरंधर’ हा चित्रपट सध्या भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सिनेमा रिलीज होऊन तब्बल तीन आठवडे उलटले असले, तरीही प्रेक्षकांची क्रेझ कमी झाल्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत. उलट, तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने विक्रमी कमाई करत नवा इतिहास रचला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई सुरू ठेवली आहे. विशेष म्हणजे, सहसा चित्रपट तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी कमाईच्या बाबतीत संथावतात. मात्र, ‘धुरंधर’च्या बाबतीत याउलट चित्र पाहायला मिळत आहे. सिनेमाच्या कमाईत कोणतीही घट झालेली नाही, तर वाढच होताना दिसत आहे.
22 Dec 2025 09:23 AM (IST)
ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या अंतिम दिवशी भेदक गोलंदाजी करत इंग्लंडचा ८२ धावांनी पराभव केला. या शानदार विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी निर्णायक आघाडी घेत अॅशेसवर कब्जा केला आहे. ४३५ धावांचे आव्हान मिळालेल्या इंग्लंडचा दुसरा डाव ३५२ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अंतिम दिवशी प्रभावी मारा करत इंग्लंडला लक्ष्यापर्यंत पोहोचू दिले नाही.
Maharashtra- National And International Breaking news : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. मुळातच दोन्ही पक्षांनी आणि त्यांच्या सर्वोच्च नेतृत्त्वाने या निवडणुकीकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले नाही, याचा थेट परिणाम निकालांवर दिसून आला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही महायुतीच्या प्रमुख नेत्यांप्रमाणे मैदानात सक्रियपणे उतरले नव्हते. त्यामुळे या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांना फारसे यश मिळवता आले नाही.
दरम्यान, राज्यातील आगामी २९ महानगरपालिकांच्या निवडणुका ठाकरे गट आणि मनसेसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. यामध्ये विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेसाठी (BMC Election 2026) मनसे आणि ठाकरे गटामध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे.






