Maharashtra Breaking News
23 Dec 2025 10:49 AM (IST)
माधुरी दीक्षित सध्या तिच्या नवीनतम वेब सिरीज “मिसेस देशपांडे” मुळे चर्चेत आहे. अलिकडेच, बॉलीवूडची धक धक गर्ल, तिच्या आईकडून मिळालेल्या भावनिक स्थिरता, आत्मविश्वास आणि चिकाटीबद्दल आणि तिच्या आईच्या सल्ल्याने तिला चित्रपट उद्योगात सुरुवातीच्या टीकेवर मात करण्यास कशी मदत केली याबद्दल उघडपणे बोलताना दिसली आहे. अलिकडेच एका मुलाखतीत, अभिनेत्रीने सतत मार्गदर्शनाखाली वाढण्याचा तिचा अनुभव शेअर केला, ज्यामुळे तिच्या कलात्मकतेलाच नव्हे तर तिच्या आत्मसन्मानालाही आकार मिळाला.
23 Dec 2025 10:41 AM (IST)
अॅशेस मालिकेतील पराभवानंतर, तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर जेव्हा ब्रेंडन मॅक्युलमला विचारले गेले की ते मुख्य प्रशिक्षकपद सोडतील का, तेव्हा ते म्हणाले, “मला माहित नाही. हा खरोखर माझा निर्णय नाही, आहे का? मी फक्त काम करत राहणार आहे, जे धडे मी अद्याप नीट शिकलो नाही ते शिकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यात बदल करणार आहे. हे प्रश्न माझ्यासाठी नाही तर दुसऱ्या कोणासाठी तरी आहेत. हे एक उत्तम काम आहे. ते खूप मजेदार आहे. तुम्हाला मुलांसोबत जगभर प्रवास करण्याची आणि काही रोमांचक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करण्याची आणि काही गोष्टी साध्य करण्याची संधी मिळते.”
23 Dec 2025 10:33 AM (IST)
बांगलादेशात ( Bangladesh ) गेल्या दोन आठवड्यांपासून अस्थिरतेचे वातावरण आहे. बांगलदेशचा विद्यार्थी नेता उस्मान हादी याची हत्या झाली आहे. त्याच्या हत्येनंतर प्रचंड तणाव निर्माण झाला असून हादीच्या इंकलाब गटाने याला तीव्र विरोध केला आहे. देशाचा हिंसाचाराचे वातावरण वाढत असून येत्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याच वेळी बांगलादेशचे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांनी यावर मोठी घोषणा केली आहे.
23 Dec 2025 10:26 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पाटेगाव शिवारातील गोदावरी नदीच्या काठावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. नदी काठी नागरिक गेले असता त्यांना दुर्गंधी सुटल्याचे जाणवले, त्यानंतर हा प्रक्रर उघड झाला. मंगळवारी ही घटना समोर आली असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कोणाचा हे शोधन आता पोलिसांसमोर मोठे आवाहन असणार आहे.
23 Dec 2025 10:19 AM (IST)
लाडक्या बहिणींना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी शासनाकडून मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. यामुळे अद्याप ई-केवायसी न केलेल्या लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यभरात सुमारे 1 कोटी 60 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित पात्र महिलांनी वेळेत ई-केवायसी करून योजनेचा लाभ कायम ठेवावा, असे आवाहन महिला व बालविकास विभागाकडून करण्यात आले आहे.
23 Dec 2025 10:11 AM (IST)
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्याचा टॉस संध्याकाळी ६:३० वाजता होईल, तर सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. भारत आणि श्रीलंकेच्या महिला संघांमधील मालिकेतील दुसरा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर थेट पाहता येईल. चाहते हिंदी आणि इंग्रजीमध्ये सामना पाहू शकतील. तो JioHotstar वर देखील स्ट्रीम करता येईल.
23 Dec 2025 10:02 AM (IST)
एका सत्य घटनेवर आधारित, “धुरंधर” हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवशी २८ कोटी रुपये या चित्रपटाने कमावले आहे. त्यानंतरही त्याची कमाई कमी झाली नाही. १७ दिवसांत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्वात मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकले. पहिल्या आठवड्यात त्याने २०७.२५ कोटी रुपये कमावले आणि दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने २५३.२५ कोटी रुपये कमावले. आता, तिसऱ्या आठवड्यात, त्याच्या कमाईच्या चार्टमध्ये थोडी चढ-उतार पाहायला मिळत आहे. १८ व्या दिवशी सर्वात कमी कमाई झाली, परंतु आता धुरंधरने “कांतारा २” ला मागे टाकले आहे.
23 Dec 2025 09:53 AM (IST)
डॉलर कमकुवत झाल्यामुळे आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात होण्याची अपेक्षा असल्याने सोमवारी वायदा व्यवहारात सोने आणि चांदीच्या किमती सर्वकालीन उच्वांकावर पोहोचल्या, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर फेब्रुवारी २०२६ च्या कराराची किंमत १.६२८ रुपये किंवा १.२१ टक्क्यांनी वाढून १.३५.८२४ रुपये प्रति १० ग्रॅम झाली. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमती ५७४ रुपये किंवा ०.४३ टक्क्यांनी वाढल्या होत्या. एमसीएक्सवर चांदीच्या वायदा किंवा सराफा व्यवहारातही मोठी वाढ झाली. मार्च २०२६ च्या करारात ६,१४४ रुपये किंवा २.९५ टक्क्यांनी वाढ होऊन तो २,१४.५८३ रुपये प्रति किलोग्रॅमचा सर्वकालीन उच्चांक गाठला.
23 Dec 2025 09:48 AM (IST)
माजी नगरसेवक राहुल कलाटे आज आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याने पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रवेशामुळे भाजपची शहरातील ताकद आणखी वाढणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
23 Dec 2025 09:40 AM (IST)
विजय हजारे ट्रॉफीची सुरुवात झाली आहे, भारताच्या संघामधील अनेक खेळाडू हे विजय हजारे ट्रॉफीचे सामने खेळताना दिसणार आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू शिवम दुबे विजय हजारे ट्रॉफी गटातील मुंबईच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये खेळतील. हे दोन्ही खेळाडू ६ जानेवारी रोजी हिमाचल प्रदेश आणि ८ जानेवारी रोजी जयपूर येथे होणाऱ्या पंजाबविरुद्धच्या सामन्यांसाठी उपलब्ध असतील.
23 Dec 2025 09:35 AM (IST)
चीनमधील एका खासगी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अनोखा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. कंपनीकडून तब्बल 18 कर्मचाऱ्यांना फ्लॅट देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या फ्लॅटची किंमत प्रत्येकी सुमारे 1.3 कोटी ते 1.50 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना हे फ्लॅट देण्यात येणार आहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, कंपनीचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ आपल्या संस्थेशी जोडून ठेवण्याचा आहे.
23 Dec 2025 09:30 AM (IST)
भंडाराच्या तुमसर नगरपालिकेचा निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान भाजपचे विजयी नगरसेवक पंकज बालपांडे यांनी एका महिलेला मारहाण करीत शिवीगाळ केली. या प्रकरणी काल (22 डिसेंबर) बालपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, या घटनेचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. भाजपचे नगरसेवक पंकज बालपांडे यांची विजयी रॅली निघालेली असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवार वर्षा लांजेवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अंडा फेकून मारल्यानं हा वाद वाढल्याचं आता समोर आलं आहे.
23 Dec 2025 09:25 AM (IST)
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीने सत्ता मिळवली असली, तरी राजकीय वर्तुळात भाजपच्या यशापेक्षा काँग्रेसच्या पराभवाचीच अधिक चर्चा होताना दिसत आहे. सातत्याने निवडणूक अपयशांचा सामना करणाऱ्या काँग्रेससाठी ही निवडणूक काही अंशी दिलासादायक ठरल्याचे चित्र आहे. 2014 नंतर सलग अनेक निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेस पक्षाने या नगरपरिषद निवडणुकीत राज्यभरात नगराध्यक्ष पदाच्या 43 जागा आणि नगरसेवक पदाच्या 1006 जागा जिंकल्या आहेत. या निकालामुळे काँग्रेसची पराभवाची मालिका काही अंशी खंडित झाल्याचे मानले जात आहे.
23 Dec 2025 09:20 AM (IST)
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून 24 डिसेंबर रोजी, बुधवारी ठाकरे गट–मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करतील, असे सांगितले जात आहे.
23 Dec 2025 09:15 AM (IST)
अंडर 19 आशिया कप फायनलचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली आणि टीम इंडियाचा फायनलच्या सामन्यामध्ये पराभव झाला. संपूर्ण स्पर्धेमध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली होती पण भारताचे फलंदाज फायनलच्या सामन्यामध्ये खराब कामगिरी केल्यामुळे आशिया कप 2025 ची ट्राॅफी पाकिस्तानच्या नावावर झाली आहे.
23 Dec 2025 09:10 AM (IST)
नांदेड मनपाचे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांच्यावर अपहरण करून जीवघेणी मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. अपहरण होतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाले आहेत. अपहरणकर्त्यांनी आपला संतोष देशमुख करू अशी धमकीही दिल्याची माहिती जीवन घोगरे यांनी दिली. त्यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीमागे अजितदादांच्या पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांच्या सहकार्यांचा हात असल्याचा आरोप जीवन घोगरे यांनी केला आहे. या अपहरण आणि मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आहे. अपहरण होतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहे.
23 Dec 2025 09:08 AM (IST)
केंद्र सरकारकडून जनतेच्या फायद्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आगीच्या घटनेत बाधित झालेल्या रुग्णांना आता उपचाराशिवाय रुग्णालयात ‘वेटिंग’वर ठेवले जाणार नाही. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, जर रुग्णालयात उपचार उपलब्ध नसतील तर रुग्णाची स्थिती स्थिर करावी आणि योग्य उपचार शक्य असलेल्या रुग्णालयात थेट हलवावे.
Maharashtra- National And International Breaking news : माजी नगरसेवक राहुल कलाटे आज आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याने पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रवेशामुळे भाजपची शहरातील ताकद आणखी वाढणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. राहुल कलाटे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली होती. कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातुन तीन वेळा निवडणूक लढवत विजयी उमेदवाराला तगडे आव्हान दिले होते.






