प्राजक्ता माळीच्या तक्रारीची राज्य महिला आयोगाने घेतली दखल (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
Santosh Deshmukh Case: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देताना काही अभिनेत्रीची नावे घेतली होती. त्यामध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे देखील नाव घेतले होते. त्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरून दिले होते. त्यानंतर प्राजक्ता माळीने सुरेश धस यांच्या व्यक्तव्याविरुद्ध राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. हा अर्ज राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला असून, महिला आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांना काही निर्देश दिले आहेत.
बीडमधील देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतले होते. त्यानंतर त्यांच्या वक्तव्याविरुद्ध प्राजक्ता माळीने राज्य महिला योगाकडे तक्रार दाखल केली. तसे तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. याबाबत राज्य महिला आयोगाने एक्सवर माहिती दिली आहे. त्यामुळे आता आमदार सुरेश धस यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. बीड जिल्ह्यातील आमदार श्री सुरेश धस यांनी श्रीमती माळी यांच्याबद्दल केलेले कथित अयोग्य, अवमानकारक व बदनामीकारक विधान तसेच.. १/३
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) December 30, 2024
प्राजक्ता माळीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
प्राजक्ता माळीने मुख्यमंत्र्याच्या सागर या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयामार्फत अधिकृत ट्विटर हॅंडलवर पोस्ट करून पोस्ट कऱण्यात आली आहे. “अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिले. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्र्वस्त केले. त्यांच्याविरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली. त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले आहे.
काय म्हणाले होते सुरेश धस?
परळीत इव्हेंट मॅनेजमेंट खूप प्रमाणात केलं जातं. वाल्मिक कराडला या इव्हेंट मॅनजमेंट करण्याची हौस असते. धनुभाऊंकडे गत पाच वर्षात एवढे पैसे कुठून आले? काय ते सांस्कृतिक कार्यक्रम..! रश्मिका मंदाना, सपना चौधरी, अलीकडे प्राजक्ता ताई माळीही परळीला यायला लागली आहे. असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे. त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याच प्रसार करावा,असं सुरेश धस यांनी म्हटलं होते. त्यानंतर प्राजक्ता माळी चांगलीच संतापली होती. सुरेश धस यांच्या या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीनेही पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांना जाहीर माफी मागण्यास सांगितले आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्याचा अभ्यास करून, कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल.
महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान ठेवलं पाहिजे,कारण संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) December 29, 2024
काय म्हणाली प्राजक्ता माळी?
प्राजक्ता माळी म्हणाली, ” महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे शोभत नाही.कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांत जाऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे आमचं काम आहे. मी परळीच नाही तर महाराष्ट्रभरात काम केलं आहे. यापुढेही करत राहील.यापूर्वीही अनेक राजकीय नेत्यांसोबत माझे फोटो आहेत पण त्याचा अर्थ तुम्ही माझे नाव कुणासोबतही जोडणार का? एक महिला कलाकार म्हणून मला हे अतिशय निंदनीय वाटतं. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. तुम्ही महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाही आहात तर महिलांच्या कर्तृत्त्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात.