Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राच्या ‘क्रांती गाथा दालन’ व ‘जलभूषण’ या वास्तू प्रेरणा देणाऱ्या ठरतील : नरेंद्र मोदी

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे 'क्रांती गाथा' ही अत्यंत प्रेरणा देणारा उपक्रम असून हे भूमिगत दालन व जलभूषण सारखी नवीन वास्तू देशाला प्रेरणा देणारी ठरेल असे, उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 14, 2022 | 08:53 PM
महाराष्ट्राच्या ‘क्रांती गाथा दालन’ व ‘जलभूषण’ या वास्तू प्रेरणा देणाऱ्या ठरतील : नरेंद्र मोदी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे ‘क्रांती गाथा’ ही अत्यंत प्रेरणा देणारा उपक्रम असून हे भूमिगत दालन व जलभूषण सारखी नवीन वास्तू देशाला प्रेरणा देणारी ठरेल असे, उद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले.

राजभवन येथे येथे ‘क्रांती गाथा’ भूमिगत दालन व राज्यपालांच्या ‘जलभूषण’ निवासस्थानाच्या उद्घाटन पर कार्यक्रमानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य इतर मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘क्रांती गाथा’ भूमिगत दालन व जलभूषण ही नवी वास्तू हे दोन्हीही देशासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. राज्यपाल यांनी म्हटंल्याप्रमाणे ‘राजभवन’ हे लोकभवन म्हणून नावारूपास येईल. आज आपण एका चांगल्या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित आहोत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. यापूर्वीही मी अनेकदा राजभवनात आलो आहे. राजभवनाचे हे बदलले रूप निश्चीतच सर्वांना प्रेरणा देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या शौर्य स्वातंत्र्यसाठी मोठे प्रेरणा देणारे आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळी ने अनेक देशांना प्रेरित केले. संत तुकाराम ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या विचारांनी घडलेला महाराष्ट्राचे देशाच्या विकासात मध्ये मोठे योगदान दिले आहे. मुंबई तर स्वप्नांचं शहर आहेच आहे. मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे, मात्र महाराष्ट्रात अशी अनेक शहरे आहेत जी 21 व्या शतकात देशाच्या विकासाची केंद्रे बनतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. याच विचाराने एकीकडे मुंबईच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण केले जात आहे आणि त्याच वेळी इतर शहरांमध्ये देखील आधुनिक सुविधांमध्ये वाढ केली जात आहे असे त्यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्राला माझ आग्रहाच सांगणे आहे की नव्या पिढीला आपला इतिहास माहिती झाला पाहिजे.आपण सहलीसाठी अनेक ठिकाणी मुलांना घेवून जातो मात्र अंदमान निकोबारच्या तुरूंगही विद्यार्थ्यांना दाखविला जावा जेणेकरून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बलीदान माहिती होईल. गेल्या 60 -70 वर्षा पासून राजभवन च्या खाली बंकर होता पण कुणालाच माहीत नव्हते. आज या वास्तू निश्चीत सर्वांना माहिती होतील असाही विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

राजभवन हे लोकभवन बनेल : भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, मला प्रधानमंत्री यांनी या राज्याचा राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. राजभवनात साकारलेले ‘क्रांती गाथा’ भूमिगत दालन व ‘जलभूषण’ निवासस्थान हे राज्याला प्ररेणा देणारे ठरेल. या वास्तूंसाठी काम केलेल्या सर्वांचे आभारही त्यांनी मानले. यावेळी राज्यपाल महोदयांनी राज्यात शिक्षण क्षेत्रातही आपण नविन उपक्रम राबवित असल्याचे यावेळी सांगितले. राजभवन हे लोकभवन म्हणून यापुढे सर्वांना परिचित होईल. राजभवन च्या माध्यमातून लोकांना महाराष्ट्र कळण्यास मदत होईल. येथील निसर्ग सौंदर्य हे सर्वांना भुरळ घालत असते. राज्यपाल म्हणून काम करण्यासाठी दिलेल्या संधितून मी नक्कीच राज्यात चांगले उपक्रम राबवून लोकांसाठी काम करित राहणार असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.

‘क्रांती गाथा’ हे आधुनिक तीर्थस्थळ म्हणून सर्वांना परिचीत होईल : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतांना क्रांती गाथा दालनाचे उदघाटन हा एक योगायोगच नाही तर एक चांगला मुहूर्त आहे. क्रांतीगाथा हे आधुनिक तीर्थस्थळ म्हणून सर्वांना परिचित होईल. ‘दिव्यत्वाची जिथे प्रचिती तिथे कर माझे जुळती’ असं म्हटलं जातं. जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्यासाठी कितीजणांनी आपल्या घरादारावर निखारे ठेवले, किती जणांनी बलिदान दिलं, कितीजणांनी मरण यातना सोसल्या, क्षणभर विचार केला हे असं घडलं नसतं तर आपण हे स्वातंत्र्य उपभोगू शकलो असतो का हा प्रश्न मनात येतो. आपल्याला स्वातंत्र्य असंच नाही मिळाले, ते कुणी आपल्याला आंदण नाही दिलं हे स्वातंत्र्य आपल्याला लढून मिळवावं लागलं आहे. तो इतिहास नुसता जतन नाही तर जिवंत करणं हे आपलं काम आहे.काळ पुढे जात आहे.आपण पारतंत्र्यात १५० वर्षे होतो आता स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, पुढे जात असतांना हा वारसा पुढच्या पिढीला देण्याच काम केलं नाही तर मला वाटतं आपण आपल्या कर्तव्याला मुकतो आहोत. आज एक अप्रतिम काम आपण करत आहोत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, २०१६ ला हे भुयार सापडले. खंदक आणि भुयाराचा आज अप्रतिम उपयोग होतो आहे. तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी हे भुयार बघण्यास बोलावलं होतं. आता जी फिल्म बघितली त्यात याला तीर्थस्थळ म्हटलं आहे. हे एक तीर्थस्थळच आहे.महाराष्ट्रदिनी आपण एक पुस्तक प्राथमिक स्वरूपात तयार केलं आहे अजून ते पुर्ण व्हायचं आहे. माहिती गोळा होतेय. ज्ञात अज्ञात क्रांतीकारकांची. ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांचे ज्यांनी देशासाठी त्याग केला त्यांचे संकलन व्हायला पाहिजे म्हणून एक पुस्तक आपण तयार करत आहोत. नुसतं बोलत बसण्यापेक्षा क्रांतीकारकांनी ज्या गोष्टी केल्या त्यांच्या त्यागाच्या एक कण जरी काम आपण करू शकलो तरी त्यांचे बलिदान कृतार्थ होई असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,’जलभूषण’ या राज्यपालांच्या निवासस्थानाचे लोकार्पणही आज होत आहे. काळ बदलत असला तरी या परिसराने इतिहासाच्या पाऊलखुणा नेहमीच जपल्या आहेत. त्याला धक्का न लावता नुतनीकरण करणं, आधुनिक तंत्रज्ञानं हे काम करणं खुप मोठी गोष्ट. कलात्मक नजरेने याकडे पहातांना प्रत्येक ठिकाणी त्याचे सौंदर्य दिसते. इतक्या चांगल्याप्रकारे हे नुतनीकरणाचे काम करण्यात आले आहे. मला या दालनाच्या उदघाटनप्रसंगी उपस्थित रहाता आलं हा माझ्यासाठी सार्थकतेचा क्षण आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणी जागवणारा ब्रिटिश कालीन बंकर

‘क्रांती गाथा’ हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक ज्ञात व अज्ञात क्रांतिकारकांना समर्पित असलेले असे भूमिगत दालन आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सन २०१६ साली राजभवन येथे सापडलेल्या ब्रिटिशकालीन बंकरमध्ये ‘क्रांती गाथा’ या दालनाची निर्मिती करण्यात आली आहे. इतिहासकार व लेखक डॉ विक्रम संपत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नागपूर येथील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या मदतीने ‘क्रांती गाथा’ दालन निर्माण करण्यात आले आहे.’क्रांती गाथा’ या दालनामध्ये १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यापासून १९४६ साली मुंबई येथे नौदलात झालेल्या उठावापर्यंतच्या कालावधीतील महाराष्ट्रातील अनेक क्रांतिकारकांच्या आठवणी जागविण्यात येणार आहेत. यामध्ये वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, बाळ गंगाधर टिळक, वि. दा. सावरकर, बाबाराव सावरकर, क्रांतिगुरु लहूजी साळवे, अनंत लक्ष्मण कान्हेरे, मॅडम भिकाजी कामा, पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना ‘अभिनव भारत’, ‘पत्री सरकार’, गणेश विष्णू पिंगळे, वासुदेव बळवंत गोगटे, शिवराम राजगुरु यांसह इतर अनेक क्रांतिकारकांचा समावेश असेल. शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या अनेक आदिवासी क्रांतिकारकांची छायाचित्रे व माहिती देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. दालनाच्या पुढील टप्प्यात आणखी काही क्रांतिकारकांची माहिती दिली जाणार आहे. ब्रिटिश राजवटीविरुद्ध महाराष्ट्रातून – त्यावेळच्या मुंबई राज्यातून – दिल्या गेलेल्या सशस्त्र लढ्याची गाथा या ठिकाणी शिल्पे, दुर्मिळ छायाचित्रे व भित्तिचित्रे यांच्या माध्यमातून दाखविली जाणार आहे. राज्य पुराभिलेख विभाग, एशियाटिक सोसायटी, केसरी पुराभिलेख, व मुंबईतील सावरकर संग्रहालयातून यासाठी माहिती मिळविली आहे. या दालनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखील देखावा निर्माण करण्यात आला आहे.

भूमिगत बंकरचा पूर्वेतिहास

दिनांक १६ ऑगस्ट २०१६ रोजी राजभवनातील हिरवळीखाली भव्य ब्रिटीश कालीन बंकर असल्याचे तत्कालीन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांना आढळले. त्यानंतर लगेचच त्यांनी बंकरची पाहणी करून त्याचे जतन करण्याचे आदेश दिले होते.पहिल्या महायुद्धापूर्वी बांधण्यात आलेल्या या बंकरची वास्तू अनेक वर्षे बंदिस्त असल्यामुळे दुर्लक्षित अवस्थेत होती. सतत झिरपणाऱ्या पाण्यामुळे वास्तू स्थापत्य दृष्टीने असुरक्षित झाली होती. ही ऐतिहासिक वास्तू राजभवनाचा वारसा असल्यामुळे तसेच तिचे वरील बाजूस राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेली ‘जलभूषण’ ही वास्तू उभी असल्यामुळे राज्यपालांच्या सुरक्षेशी तडजोड न करता बंकरचे संवर्धन करणे आवश्यक होते. या दृष्टीने भूमिगत बंकरच्या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडीट केले गेले व नंतर तिचे बळकटीकरण करण्यात आले. या बंकरमध्ये विविध आकारांचे १३ कक्ष असून बंकरच्या सुरुवातीला २० फूट उंच भव्य प्रवेशव्दार, किल्ल्याप्रमाणे बांधकाम तसेच तोफा आत नेण्यासाठी प्रदीर्घ उतार (Ramp) आहे. बंकरचा शोध लागला त्यावेळी त्यातील कक्षांना ‘शेल स्टोअर’, ‘गन शेल’, काडतूस भांडार (Cartridge Store), शेल लिफ्ट, मध्यवर्ती तोफखाना कक्ष, कार्यशाळा इत्यादी नावे दिसुन आली होती. बंकरमध्ये पाण्याच्या निचऱ्याची तसेच शुध्द हवा व नैसर्गिक प्रकाशाची योग्य व्यवस्था असल्याचे आढळले. बंकरमध्ये जागोजागी दिव्यांसाठी जागा (Lamp Recess) ठेवण्यात आल्या होत्या. बंकरचे संवर्धन करताना तसेच आता त्या ठीकाणी क्रांतिकारकांचे दालन करताना सर्व मूळ वैशिष्टे जतन करण्याची काळजी घेण्यात आली आहे.दिनांक १८ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या बंकरमध्ये आभासी वास्तवतादर्शक संग्रहालयाचे उदघाटन करण्यात आले होते. मात्र एकूण १३ कक्ष असलेल्या बंकरमधील अनेक कक्ष रिकामे होते. ‘क्रांती गाथा’ दालनासाठी यातील अनेक कक्षांचा तसेच मार्गीकेतील भिंतीचा उपयोग करण्यात आला आहे.

[read_also content=”कोरा केंद्र उड्डाणपुल वादाच्या भोवऱ्यात; पालिकेविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका https://www.navarashtra.com/maharashtra/kora-center-flyover-in-the-midst-of-controversy-public-interest-litigation-in-the-high-court-against-the-municipality-nrdm-292785.html”]

‘जलभूषण’ निवासस्थान

जलभूषण या वास्तूला किमान २०० वर्षांचा इतिहास आहे. मुंबईचे गव्हर्नर माउंटस्टूअर्ट एलफिन्स्टन यांनी मलबार हिल येथे सन १८२० – १८२५ या काळात ‘प्रेटी कॉटेज’ नावाचा छोटा बंगला बांधला होता. ‘जलभूषण’ ही वास्तू याच जागेवर उभी आहे.सन १८८५ साली मलबार हिल येथे ‘गव्हर्न्मेंट हाउस’ स्थलांतरित झाल्यापासून या वास्तूमध्ये ब्रिटीश गव्हर्नर यांचे व स्वातंत्र्यानंतर मुंबईच्या व राज्यनिर्मितीनंतर महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निवासस्थान राहिले आहे. अनेकदा बांधली गेलेली व विस्तारित केलेली ही वास्तू निवासासाठी असुरक्षित असल्याचे आढळून आल्यामुळे या ठिकाणी नवी वास्तू बांधण्याचे ठरविण्यात आले. दिनांक १८ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या ‘जलभूषण’ इमारतीची पायाभरणी देखील केली होती. हे बांधकाम पूर्ण झाले असून नव्या वास्तूचे द्वारपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. नवीन ‘जलभूषण’ वास्तूमध्ये जुन्या वास्तूमधील ठळक वारसा वैशिष्ट्ये जतन करण्यात आली आहेत.

Web Title: Maharashtras kranti gatha dalan and jalbhushan will be inspiring narendra modi nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2022 | 08:27 PM

Topics:  

  • ajit pawar
  • bhagat sing koshyari
  • C M Uddhav Thackeray
  • cmomaharashtra
  • narendra modi
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
1

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा
3

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
4

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.