महाविकास आघाडीतील घटकपक्ष समाजवादी पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ५ जागांची मागणी केली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं बुधवारी ८५-८५-८५ जागांवर एकमत झालं. १८ जागां मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत. तरीही १५ जांगाचा घोळ काय आहे. मित्रपक्षांसोबत आज बैठक होणार आहे, म्हणजे त्या १८ जागांवरही अद्याप शिक्कामोर्तब नाही. मित्रपक्षासाठी सोडण्यात आलेल्या १८ आणि शिल्लक १५ जागा अशा एकून ३३ जागांबाबत महाविकास आघाडीत अद्यापही संभ्रम कायम आहे. आता यातील १५ जागा कोण लढवणार हा कळीचा मुद्दा बनला आहे. त्यावर कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तीन्ही प्रमुख पक्षांची ८५-८५-८५ च्या फार्म्युल्यावर सहमती झाली असून २७० जागांवर एकमत आहे. मित्रपक्षांसाठी काही जागा सोडल्या आहेत. तर काही जागांवर समजूतीने बदल केला जाईल. त्यामुळे कोणाली किती जागा मिळाल्या याचा प्रश्न नाही. त्यासाठी आग्रह नव्हता, आम्ही मेरिटनुसार जागा ठरवल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेस ४२-४३ जागा लढवणार आहे.
उर्वरीत १५ जागांबाबत कोणताही संभ्रम नसून त्या जागाही समजूतीने सोडवल्या जातील. गरज पडल्यास बदल केला जाईल. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा काही जागांसाठी आग्रह आहे. त्यामुळे त्या जागा तुर्तास बाजूला ठेवण्यात आल्या आहेत. मात्र तरीही उर्वरीत १५ जागांमध्ये कॉंग्रेसचा वाटा जास्त राहिल. कॉंग्रेस १००-१०५ च्या दरम्यान जागा लढवणास असल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
८५-८५-८५ चा फार्म्युला सांगितला. मात्र या फार्म्युल्यानुसार तिन्ही पक्षांच्या मिळून २५५ जागा होतात तर मित्रपक्षांच्या १८ जागा, अशा एकून २७३ जागांचं गणित जुळतं. मात्र विधानसभेच्या जागा २८८, त्यामुळे उरलेल्या १५ जागांचं काय? याबाबत राज्यभर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
लोकसभा निवडणुकीत कमी जागा लढवून कॉंग्रेसने १३ जागा जिंकल्या आहेत. तर ठाकरे गटाने सर्वाधिक जागा लढवून ९ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाल्यापासून दोन्ही पक्षांच्या उपेक्षा उंचावल्या होत्या. त्यात हरियाणा निवडणुकीचे निकाला कॉंग्रेसच्या विरोधात गेले. त्यामुळे शिवसेनेनेही जागावाटप ताणून धरल्याची चर्चा आहे. दरम्यान आज मित्रपक्षांसोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आहे. त्या बैठकीत मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत दिली होती. आता या बैठकीत नक्की काय निर्णय होतो याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.