छत्रपती संभाजीनगर: राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहेत. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 155 ते 160 जागा, शिंदे गट 80 ते 85 जागा आणि अजित पवार गटाला 55 ते 60 जागा मिळणारअसल्याची माहिती आहे. महायुतीच्या सुत्रांनी एका वृत्तवाहिनीला याबाबत माहिती दिली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरआहेत. या दोन दिवसात ते विदर्भातील 62 विधानसभा मतदासंघांचा आढावा घेणार आहेत. याशिवाय मराठवाड्यातही दौरा करणार आहेत. त्याप्रमाणे अमित शाह काल मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना महायुतीचा हा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते. संभाजीनगरमधील हॉटेल रामामध्ये पार पडलेल्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार प्रफुल्ल पटेल यांची उपस्थित होते.
महायुतीच्या या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर अंतिम चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 155 ते 160 जागा, शिंदे गट 80 ते 85 जागा आणि अजित पवार गट 55 ते 60 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. पण महायुतीच्या कोणत्याही नेत्यांने या फॉर्म्युल्याबाबत अदयाप कुठलेही भाष्य केलेले नाही. दरम्यान, या बैठकीनंतर, जागावाटपाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत आमची सकारात्मक चर्चा झाली. आम्ही सुरुवातीपासूनच सर्वांच्या समन्वयाने जागावाटपाचा निर्णय घेऊ, आणि तुम्हाला लवकरच निर्णय सांगू असे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.