सोलापूर : राज्यात आगीच्या घटना काही कमी होताना नाव घेत नाहीत. सोलापूर जिल्ह्यातून आगीचे एक मोठी घटना समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील रबर कारखान्याला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. (Solapur Rubber Factory Fire) या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Bridge) २५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग मोठी असल्यामुळं आगीवर नियंत्रण मिळविण्यास वेळ लागत आहे.
आगीचे कारण अस्पष्ट…
दरम्यान, ही आग कोणत्या कारणामुळं लागली याची माहिती समोर आली नाही. परंतु, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या आगीत कोणतीही जीवितहानी न झाल्याचे वृत आहे. कंपनीला आग लागल्यानंतर सोलापूर पालिका, एमआयडीसी, एनटीपीसी, अक्कलकोट शहर, बार्शी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
आगीत वित्तहानी मोठ्या प्रमाणात…
या आगीत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या आगीच्या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. या आगीच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ही आग किती भीषण आहे, या व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. मात्र या आगीच्या धुराच्या लोट परिसरात मोठ्या प्रमाणात पसरले आहेत.