जरांगे पाटील आंदोलनावर ठाम (फोटो- सोशल मीडिया)
उद्या सकाळी मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुंबईत धडक देणार आहेत. ऐन गणेशोत्सवात मुंबईत मराठा समाजाचा मोचा आल्यास यंत्रणवेर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरांगे पाटलांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सरकारद्वारे केला जात आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलणासाठी जाण्यावर ठाम आहेत. याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “अंमलबजावणी आवश्यक आहे. किती दिवस वेळ द्यायचा? किती दिवस सहन करायचे याला मर्यादा आहे. शेवटी यांच्या समाजातील लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता नाही तर कधीच नाही. निर्णायक टप्प्यावर हे आंदोलन आलेले आहे. आंदोलन करावेच लागणार आहे. न्याय मिळवावाच लागणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईकडे निघणार. ”
हायकोर्टाची आंदोलनाला मनाई
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. मात्र मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी करत असताना हायकोर्टाने आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसलेला आहे.
काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
हैदराबाद गॅझेटच्या बाबतीत न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी जरांगे- पाटलांनी केली होती. या समितीला आणखी 6 महीने मुदतवाढ देण्यात आली आहे. हैदराबादच्या गॅझेटच्या अभ्यास करून त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत. जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर हे आरक्षण टिकू शकले नाही. त्यानंतर पुन्हा एकदा महायुती सरकार राज्यात स्थापन झाले. या सरकारने पुन्हा मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले. ते अजूनही टिकून आहे. आरक्षणाच्या बाबतीत शासनाची कोणतीही नकारात्मक भूमिका नाही.
बावनकुळे जरांगे पाटलांवर संतापले
देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार तीन कोटी 17 लाख लोकांनी निवडून दिले आहे. 51.78 टक्के लोकांनी हे सरकार निवडून दिले आहे. असे सरकार उलथवून टाकू ही जी भाषा सुरू आहे जी महाराष्ट्राला चीड आणणारी आहे. महाराष्ट्रात चिथावणीखोर भाषा करू नये अशी माझी विनंती आहे. मराठा आरक्षण राज्यात आणण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे.