Mumbai Maratha Protest: मुंबईत मराठा आरक्षणावरून सुरु असलेल्या आंदोलनाचा परिणाम आता सार्वजनिक वाहतुकीवरही दिसू लागला आहे. मुंबईतील सांताक्रूझ आगारातून सुटणाऱ्या एका बेस्ट बसमध्ये (क्रमांक ७८६७) रविवारी रात्री काही आंदोलक आणि एका प्रवाशात वाद झाला. हा वाद इतका वाढला की, संतप्त आंदोलकांनी प्रवाशाला बसमध्येच मारहाण केली आणि बसची एक काचही फोडली. यामुळे बसमध्ये एकच गोंधळ उडाला.
ही घटना जुहू बस स्थानकाजवळ घडली. रविवार, रात्री ७:१५ वाजता बस जुहू स्थानकावरून जात असताना काही मराठा आंदोलक आणि बसमधील एका प्रवाशात वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन आंदोलकांनी त्या प्रवाशाला बसमध्येच पाडून मारहाण केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे. याव्यतिरिक्त, आंदोलकांनी बसच्या उजव्या बाजूची तिसरी खिडकीची काचही फोडली.
#WATCH | #Mumbai: Maratha Protesters Allegedly As*au*t Passenger, Vandalise BEST Bus At Juhu Bus Station; Probe Underway
Reported by: @Yourskamalk#MarathaReservation #ManojJarangePatil #MarathaAndolan #bestbus pic.twitter.com/wNbIStjXJZ
— Free Press Journal (@fpjindia) September 1, 2025
बसमधील गोंधळ ऐकून बस चालक आणि वाहक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोंधळ शांत होत नव्हता. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलीस हेल्पलाइन १०० वर कॉल करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच दोन्ही बाजूचे लोक तिथून निघून गेले होते.
हंगामा शांत झाल्यावर बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून त्यांच्या गंतव्यस्थानी सुरक्षितपणे पाठवण्यात आले. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आंदोलनाच्या नावाखाली प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या आंदोलकांवर जरांगे पाटील चांगलेच भडकले. याचबरोबर त्यांनी सत्ताधारी सरकारचाही चांगलाच समाचार घेतला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, गेले चार वर्ष आम्ही आमचा हक्क मागतोय आम्हाला मुंबईत यायची हौैस नाही. पोरं हुल्लडबाजी करतायत ते दिसतं पण सरकार गेली कित्येक दिवस हुल्लडबाजी करत आहेत ते दिसत नाही का ? या सरकारला आम्ही 2 वर्षांचा वेळ दिला मात्र हाती निराशाच आली. त्यामुळे आता जोपर्यंत आमच्या मागण्य़ा मान्य होत नाही तोवर आम्ही मुंबई सोडणार नाही असा इशाराच जरांगे पाटलांनी दिला आहे.
मुंबईत सुरू असलेले आंदोलन हाताबाहेर गेले आहे. पावसाची शक्यता असताना तुम्ही मुंबईत आलात. पावसात आंदोलन करता तर चिखलात बसण्याची तयारी ठेवा. मुंबईकरांना नाहक त्रास होता कामा नये. तुम्ही आंदोलनासाठी देण्यात आलेल्या नियमांचे पालन करणार का? असा सवाल हायकोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना विचारणा केली आहे. 5 हजारांपेक्षा जास्त असलेल्या आंदोलकांनी परत जावे असे पत्रक तुम्ही काढणार का? असा सवाल देखील हायकोर्टाने विचारला आहे.