16 Sep 2025 01:35 PM (IST)
वीकेंड नंतरही ‘दशावतार’ चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. या चित्रपटाने ४ दिवसांत जोरदार कमाई केली आहे. कोकणातील लोककलेशी निगडीत असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. दशावतार शुक्रवारी. १२ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने सलग तीन दिवस कोटींमध्ये कमाई केली. आठवड्याच्या पहिल्यादिवशी सोमवारी या चित्रपटाने १ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ‘दशावतार’ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटर हाऊसफुल केले आहेत. दशावतार चित्रपटाने पहिल्या आठवड्यात आपली ताकद दाखवून असून या चित्रपटाने ४ दिवसांत एकूण ६.२३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
16 Sep 2025 01:25 PM (IST)
क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे.अंमलबजावणी संचालनालयाने (ED) माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. उथप्पाला २२ सप्टेंबर रोजी दिल्लीतील ईडी मुख्यालयात आणि युवराजला २३ सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. हे प्रकरण ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित आहे. उथप्पा सध्या आशिया कप २०२५ च्या कमेंट्री टीमचा भाग आहे. आतापर्यंत दिल्लीतील या प्रकरणात चार माजी भारतीय क्रिकेटपटूंना समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी, संघीय एजन्सीने या प्रकरणात माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांचीही चौकशी केली होती. हे प्रकरण १xBet नावाच्या बेटिंग अॅप प्लॅटफॉर्मशी संबंधित आहे.
16 Sep 2025 01:15 PM (IST)
नवीन ऑफरिंगमुळे अन्न वितरण बाजारपेठेत स्पर्धा तीव्र होत चालली आहे. ऑनलाइन ऑर्डरवर अन्न वितरण करणारी कंपनी स्विगीने परवडणाऱ्या श्रेणीमध्ये विविधता आणण्यासाठी ‘टोइंग’ हे वेगळे अॅप्लिकेशन सुरू केले आहे. सध्या, हे नवीन अॅप पुण्यात अन्न वितरण सेवा देत आहे. परंतु त्याचे मुख्य लक्ष्य निवडक रेस्टॉरंट्स, सुव्यवस्थित ऑर्डरिंग, सरलीकृत वापरकर्ता अनुभव आणि मुख्य स्विगी अॅपपेक्षा तुलनेने कमी किमती देणे आहे.
16 Sep 2025 01:05 PM (IST)
क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे.अंमलबजावणी संचालनालयाने (ED) माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. उथप्पाला २२ सप्टेंबर रोजी दिल्लीतील ईडी मुख्यालयात आणि युवराजला २३ सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. हे प्रकरण ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित आहे. उथप्पा सध्या आशिया कप २०२५ च्या कमेंट्री टीमचा भाग आहे. आतापर्यंत दिल्लीतील या प्रकरणात चार माजी भारतीय क्रिकेटपटूंना समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी, संघीय एजन्सीने या प्रकरणात माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांचीही चौकशी केली होती. हे प्रकरण १xBet नावाच्या बेटिंग अॅप प्लॅटफॉर्मशी संबंधित आहे.
16 Sep 2025 01:05 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे व्यापार सल्लागारी पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारतवर मोठे विधान केले आहे. नवारो यांनी पुन्हा भारत आणि अमेरिकेच्या व्यापार चर्चेवर आणि भारतावर लादलेल्या करावर आपले मत माडंले आहे. त्यांनी पुन्हा एकदा भारताला टॅरिफचा महाराजा म्हटले आहे. तसेच एका मुलाखतीदरम्यान नावारो यांनी म्हटले की, भारत व्यापार चर्चेचा अंतिम टप्प्यावर आला आहे. सध्या दोन्ही देशात व्यापारातील अडथळे दूर करण्यावर चर्चा सुरु आहे. पण त्यांनी भारत रशिया तेल व्यापारावर आणि भारत चीन संबंधावर टीका केली आहे.
16 Sep 2025 12:55 PM (IST)
उमराणे येथील रामेश्वर बाजार समितीच्या बाहेर शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला. कांदा बाजारभावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. अचानक भाव गडगडल्याने शेतकरी देवळा-मालेगाव रोडवर उतरले. रस्त्यावर बसून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांकडून शेतकऱ्यांना समजावण्याचे प्रयत्न सुरू. कांदाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी…
16 Sep 2025 12:45 PM (IST)
उमराणे (नाशिक) – उमराणे येथील रामेश्वर बाजार समितीच्या बाहेर शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला. कांदा बाजारभावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. अचानक भाव गडगडल्याने शेतकरी देवळा-मालेगाव रोडवर उतरले. रस्त्यावर बसून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
16 Sep 2025 12:35 PM (IST)
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेकांनी खोटे कागदपत्र दाखल करून योजनेचा लाभ घेतला, 65 वर्षाच्या वरील महिलांनीही लाभ घेतला तर 21 वर्षाच्या खालील तरुणींनी लाभ घेतला असे अनेक आरोप सुरु होते, तर एकाच घरात 3 जण योजनेचा लाभ घेत असल्याचेही पुढे आले, त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून राज्यात सर्वे करण्यात आला. यात मराठवाडा परिसरात सव्वा लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आहे.
16 Sep 2025 12:25 PM (IST)
सोलापूर काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. काँग्रेसकडून त्या दोन वेळा विजयी झाल्या होत्या. स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या सक्रिय आमदार म्हणून त्यांची ओळख होती. काँग्रेस पक्षासह त्यांचा महिला चळवळीतही सक्रिय सहभाग होता. सोलापूर शहर दक्षिण मधून काँग्रेसकडून 1872 ते 1976 या काळात त्या विधानसभेवर तर त्यानंतर त्या विधान परिषदेवर आमदार राहिल्या.
16 Sep 2025 12:15 PM (IST)
सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं सोमवारी रात्री निधन झालं. वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सर्वोच्च न्यायालयात चक्कर आल्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सिद्धार्थ शिंदे यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मूळचे नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरचे ते रहिवासी होते. सिद्धार्थ हे माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते.
16 Sep 2025 12:05 PM (IST)
दादर रेल्वे स्थानकावर एका ६२ वर्षीय आरोपीने लोकलमधील गर्दीचा फायदा घेत लोकलधील १९ वर्षीय तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. डीजी मखाण असे या आरोपीचे नाव आहे. त्यांच्यावर १९ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.
ही घटना १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता घडली. मखाण दिल्लीचे रहिवासी असून तहसीलमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतात. तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर जीआरपी पोलिसांनी त्याला अटक केली.
16 Sep 2025 11:55 AM (IST)
नाना पटोले यांनी नुकतंच अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध प्रलंबित विषयांवर भेट घेतल्याची माहिती दिली. राज्याच्या तिजोरीतून पैसे कुठे चालले आहेत, सध्या तिजोरी लुटण्याचं काम सुरु असल्याने राज्यावर बोजा येत आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले.
16 Sep 2025 11:45 AM (IST)
बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या खडकपूर्णा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, प्रकल्पाचे एकूण १९ दरवाजे ५० सेंमीने उघडण्यात आले आहेत. यामुळे प्रकल्पातून १३२६ घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने नदीकाठच्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याशिवाय, जिल्ह्यातील पेन टाकळी प्रकल्पाचेही पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे, नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
16 Sep 2025 11:35 AM (IST)
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अमरावतीमध्ये धुसफूस असल्याची चर्चा आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ता लावलेल्या फलकावरुन शिवसेनेच्या उपनेत्या प्रिती बंड यांचा फोटो नसल्याचे वादाला तोंड फुटलं आहे. प्रीती बंड यांनी काही महिन्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. ज्ञानेश्वर धाने पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.
16 Sep 2025 11:33 AM (IST)
देशाचे माजी अर्थमंत्री असलेल्या पी. चिदंबरम यांचा आज वाढदिवस आहे. कॉंग्रेसमधील एक संयमी नेते आणि राजकारणातील अनुभवी व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या पी. चिदंबरम यांनी तीन वेळा देशाचे अर्थमंत्रीपद सांभाळले आहे. मनमोहन सिंग सरकारमधील एक महत्त्वाचे सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या शांत आणि मृदू स्वभावामुळे त्यांची राजकीय वर्तुळामध्ये संयमी नेते अशी ओळख निर्माण झाली आहे. तीन दशके त्यांनी कॉंग्रेस पक्षामधून काम केले असून १६ सप्टेंबर १९४५ रोजी तामिळनाडूमध्ये झाला.
16 Sep 2025 11:25 AM (IST)
राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवेला सरकारने महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियमांतर्गत परवानगी दिली आहे. आता राज्य सरकारने या बाइक टॅक्सीचे भाडेदर निश्चित केलं आहे. हा निर्णय तत्काळ लागू करण्यात येणार असल्याचेही परिवहन विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
16 Sep 2025 11:15 AM (IST)
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अर्ज केला आहे. जानेवारी 2026 पर्यंत मुदत वाढ मिळावी, अशी मागणी सरकारने केली आहे. त्यावर आज सुनावणी आहे.
16 Sep 2025 11:12 AM (IST)
महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या बोगस किंवा अपात्र महिलांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मराठवाड्यातील बोगस लाखो लाडक्या बहिणींची पोलखोल झाली असून 80 हजार मराठवाड्यामधील अर्ज बाद करण्यात आले आहे. यामध्ये 65 वर्षांहून अधिक वय असलेल्या महिलांनी अर्ज दाखल केले असल्याचे उघडकीस आले आहे.
16 Sep 2025 11:09 AM (IST)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार असून याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. निवडणुक घेण्याबाबत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. सरकारने याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज केला असून यामध्ये जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढीची मागणी केली आहे.
Marathi Breaking news live updates : आज देखील देशभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने आज देशभरातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. पर्वतीय राज्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस पूर्वेकडील राज्यांमध्ये तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राजस्थान, पंजाब, गुजरात आणि अन्य भागात पावसासाठी अनुकूल आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्रातील कोंकण किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आसाम, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेशमधील 14 राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने या राज्यांना अलर्ट जारी केला आहे. राजधानी दिल्लीत आज हवामान मोकळे राहण्याचा अंदाज आहे.