केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी पुणे दौरा केला आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुण्यामध्ये आले होते. फ्यूएलचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न झाला असून यामध्ये ते सहभागी झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “देशात सर्वात मोठी समस्या रोजगार निर्मितीची आहे. अशा वेळेस सीएसआरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देणे हे अद्वितीय कार्य असून फ्यूएल यशस्वीपणे पार पाडीत आहे. यामुळे युवकांचे जीवन बदलून भारत आत्मनिर्भरतेकडे उंच भरारी घेत आहे.” असे विचार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
शिक्षण, कौशल्य विकास व रोजगारक्षमतेसाठी कार्यरत फ्यूएल शिक्षण संस्था समूहच्या फ्यूएल बिझनेस स्कूलचा पहिल्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. तसेच वन व्हिजन, वन मिशन आणि स्किल्ड नेशन या तत्वांवर आधारित फ्यूएलचा १९ वा वर्धापन दिवस भूगाव येथील संस्थेत उत्साहात साजरा झाला. या वर्षी २०० विद्यार्थ्यांना सीएसआर शिष्यवृत्ती व डिग्री प्रदान करण्यात आली. यावेळी फ्यूएल शिक्षण संस्था समूहाचे अध्यक्ष व सीईओ डॉ. केतन देशपांडे, चीफ मेंटॉर संतोष हुर्लेकोप्पी, फ्यूएलच्या सीओओ मयूरी देशपांडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नितीन गडकरी यांच्या हस्ते फ्यूएल बिझनेस स्कूलमध्ये पीजीडीएम (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स) अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच फ्यूएल आणि कॅपजेमिनीमध्ये एमओयू करण्यात आला. तसेच सीएसआरमध्ये कार्यरत व्यक्तींना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम लीडरशिप अवॉर्ड प्रदान करण्यात आला. यामध्ये सुदिप्ता पॉल, वामशी मुथ्थापू, सुमीत शहा, रेखा पिल्ले, रिया वैद्य, धनश्री पागे, बिना बलदोटा, शिल्पाश्री, अर्पणा पांडे यांचा समावेश आहे.
यावेळी नितीन गडकरी म्हणाले,“ जल, जमीन आणि जंगल यांचा विकास होणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने शहरे स्मार्ट होत चालली आहेत त्याच पद्धतीने येणार्या काळात आपली गावे स्मार्ट होणे गरजेचे आहे. कौशल्यपूर्ण शिक्षण हे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीस हातभार लावतो. परदेशात फामर्सी, नर्सिंग सेवकांची गरज मोठ्या प्रमाणात आहे, मात्र कौशल्यपूर्ण व्यक्तींचा अभाव जाणवतो. सीएसआरच्या माध्यमातून विद्यार्थी भविष्यासाठी सक्षम होत आहेत. सहकार, समन्वय आणि संवादातून कौशल्याधारित स्टार्टअप संस्कृती रुजू होत आहे. तंत्रज्ञान, संशोधन व ज्ञान या त्रिसूत्रीचा वापर करूनच रोजगार निर्मिती शक्य आहे. फ्यूएल ही संस्था उदयोगधंद्याना लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करत आहे.” अशा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
डॉ. केतन देशपांडे म्हणाले,“ सोशल आंत्रप्रेन्यूअरशीपची चळवळ उभी करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आज ७८ कॉर्पोरेट कंपन्यांच्या समर्थनामुळे एक नवे शिक्षण मॉडेल सर्वांसमोर आहे. काळानुरूप आता व्हर्टीकल युनिव्हर्सिटीची गरज भासू लागली आहे.” अशी भूमिका त्यांनी मांडली.