आजच्या ब्रेकिंच्या बातम्या
माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या कारला अपघात झाला आहे. सौरव गांगुलीच्या गाडीला अपघात झाला जेव्हा तो त्याच्या ताफ्यासह दुर्गापूर एक्सप्रेसवेवरून जात होता. गांगुली एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बर्दवानला जात होते. दरम्यान, त्यांच्या गाडीसमोर एक ट्रक आला आणि तो टाळण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांच्या ताफ्यातील वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात सौरव गांगुली थोडक्यात बचावला असल्याने चाहत्यांनी देवाचे आभार मानले आहेत
21 Feb 2025 06:01 PM (IST)
दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश करणाऱ्या अभिजीत पवार यांनी गुरुवारी सायंकाळी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. या प्रवेशाप्रसंगी घेतल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड आणि अभिजीत पवार यांनी अजित पवार तसेच नजीब मुल्ला यांच्यावर विविध आरोप केले होते. याचपार्श्वभूमीवर या आरोपांचे खंडन करण्यासाठी शुक्रवारी (21 फेब्रुवारी) सकाळी नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले आहेत.
21 Feb 2025 05:44 PM (IST)
तेलंगणा राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. तेलंगणा राज्यातील जाडचेरला येथील नरसी मोनजी इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS) च्या अनेक विद्यार्थ्यांना खाण्यातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. विषबाधा झालेल्या या विद्यार्थ्यांचा आकडा 80 पेक्षा जास्त असल्याचे म्हटले जात आहे.
21 Feb 2025 05:38 PM (IST)
प्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण आज सुपौल न्यायालयात हजर झाले असल्याची बातमी समोर आली आहे. हे प्रकरण त्यांच्या पहिल्या पत्नी रंजना झा यांनी दाखल केलेल्या वैवाहिक जीवन पुनर्संचयित करणे आणि देखभालीच्या खटल्याशी संबंधित आहे
21 Feb 2025 05:09 PM (IST)
भारतात अनेक उत्तम आणि आधुनिक कार लाँच होताना दिसत आहे. या अनेक नवीन कारला ग्राहक देखील चांगला प्रतिसाद देत आहे. अनेक विदेशी कंपन्या देखील भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या कार लाँच करत आहे. यातीलच एक मोठे नाव म्हणजे किया मोटर्स. ही साऊथ कोरियाची वाहन निर्माता कंपनी देशात अनेक वर्षांपासून बेस्ट कार लाँच करत आहे.
21 Feb 2025 04:57 PM (IST)
आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्सने आपली नवीन जर्सी लॉंच केली आहे. त्याचा व्हिडिओ देखील मुंबई इंडियन्सने सोशल मिडियावर शेअर केला आहे. या नवीन जर्सीमध्ये मुंबई इंडियन्सची ओळख दर्शवणारे रंग तसेच ठेवण्यात आले आहेत. दरम्यान सोशल मिडियामध्ये शेअर झालेल्या या व्हिडिओमधून मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने संघाच्या चाहत्यांना एक संदेश देखील दिला आहे.
21 Feb 2025 04:37 PM (IST)
डाव्या कोपराच्या दुखापतीमुळे यष्टीरक्षक-फलंदाज हेनरिक क्लासेनला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडावे लागले. खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने त्याला न खेळवण्याचा निर्णय घेतला. पुढे, दक्षिण आफ्रिकेला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे.
21 Feb 2025 04:33 PM (IST)
मंत्री गणेश नाईक यांनी 24 फेब्रुवारीला ठाण्यात जनता दरबार घेण्याचे स्पष्ट केले आहे. प्रत्येक तालुक्यात असे दरबार होणार आहेत. त्यांनी राज्यातील प्रत्येक मंत्र्याला तालुक्यात जाऊन जनता दरबार घेण्याचे आवाहन केले. यामुळे ठाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
21 Feb 2025 04:24 PM (IST)
माजी आमदार संदिप नाईक यांच्या समर्थकांनी नुकतंच वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपात प्रवेश करत घरवापासी केली.घर वापसी केलेल्या नगरसेवकांबाबत सामंजस्याची भूमिका घेत, ' कल का भूला वापस आये तो उसे भुला नहीं केहते ' असे वक्तव्य केल्याने सर्वांनीच भुवया उंचावल्या आहेत.
21 Feb 2025 04:21 PM (IST)
दिल्ली विधानसभेत 27 वर्षांनी भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. भाजप नेतृत्वाने पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपदाची कमान सोपवली आहे. काल दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर लगेचच दिल्ली सरकारने कामास सुरुवात केली आहे. मात्र सरकार स्थापन होऊन एकही दिवस होत नाही. तोवर आजी आणि माजी मुख्यमंत्री यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
21 Feb 2025 04:20 PM (IST)
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. दोघेही १८ महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. अंतिम सुनावणी गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी वांद्रे कुटुंब न्यायालयात झाली, त्या वेळी धनश्री आणि युजवेंद्र उपस्थित होते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, या जोडप्याने अधिकृतपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
21 Feb 2025 04:18 PM (IST)
गुजरातमधील कच्छमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. जिथे बस आणि ट्रकच्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये ४० प्रवासी होते असे सांगण्यात येत आहे.
21 Feb 2025 04:02 PM (IST)
दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि त्यांचे मंत्री आज शुक्रवारी सचिवालयात पोहोचले आहेत. मात्र त्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. पदभार स्वीकारण्यास विलंब का होत आहे याबद्दल अद्याप कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. गुरुवारी मुख्यमंत्री रेखा यांच्यासोबत परवेश वर्मा, मनजिंदर सिंग सिरसा, पंकज सिंग, रवींद्र इंद्रजित सिंग, कपिल मिश्रा आणि आशिष सूद यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
21 Feb 2025 03:30 PM (IST)
भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून निफ्टी २२८०० च्या वर दिसून येत होता. आज निफ्टीमध्ये १६० अंकांपेक्षा जास्त आणि सेन्सेक्समध्ये ६०० अंकांपेक्षा जास्त घसरण दिसून आली आहे.
21 Feb 2025 03:20 PM (IST)
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना पोटाच्या आजारामुळे गुरुवारी सकाळी ८:३० वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर गंगाराम रुग्णालयाच्या अहवालानुसार, त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे आणि त्यांची नियमित तपासणी केली जात आहे. असे म्हटले जात आहे की ६८ वर्षीय ज्येष्ठ नेत्याला आज कधीही डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.
21 Feb 2025 03:08 PM (IST)
'गेल (गॅस अँथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) कंपनीची पाईप लाईनसाठी जमीन संपादनाचे घोरण 60-70 वर्षांपूर्वी तयार झालेल्या कायद्याअनव्येचे आहे. वापराचा हक्क संपादित करण्यात येतो. जमीन संपादित करण्यात येत नाही. त्यासाठी देण्यात येणारी रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. जमिनीच्या किमतीच्या 10 टक्के रक्कम म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय आहे. याआधी पेण तालुक्यात चार वेळा शासनाच्या माध्यमातून पाईपलाईन उभ्या-आडव्या गेल्या आहेत. याबाबत आक्रमक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे.
21 Feb 2025 03:00 PM (IST)
महिला, मुले, वृद्ध सर्वजण पवित्र स्नान करण्यासाठी महाकुंभात जात आहेत. मात्र काही ठिकाणी गैरकृत्य पहायला मिळाली आहेत. संगमावर स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत. या व्हिडिओंची डार्कवेबवर विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे.
21 Feb 2025 02:48 PM (IST)
कर्जतमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात होत्या म्हणून आंदोलन करण्यात आलं होतं. मोजणी पूर्ण होईपर्यंत कंपनीला संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीवर कंपाउंड वॉलचे बांधकाम न करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.याबाबत पोलीस प्रशासनालाही निर्देश देण्यात आले आहेत असे लेखी आश्वासन प्रांत अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यानंर अखेर मध्यरात्री उशिरा एक वाजता माजी आमदार सुरेश लाड यांनी आपले उपोषण सोडले.
21 Feb 2025 02:44 PM (IST)
महाराष्ट्र पोलिसांचा सायबर सेल विकिपीडियावरील त्या मजकुराच्या संपादकांवर एफआयआर दाखल करणार आहे. सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्र सायबर सेलने विकिपीडियाला मजकूर काढून टाकण्याबाबत १० हून अधिक ईमेल पाठवले होते परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
21 Feb 2025 02:40 PM (IST)
आज सुरुवातीच्या व्यवहारात महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांनी मोठी घसरण झाली, जी गेल्या ७ महिन्यांतील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे. शेअर बाजारात आज वरच्या पातळीपासून मोठी घसरण दिसून आली. निफ्टी आणि सेन्सेक्स ०.५ टक्क्यांहून अधिक घसरत आहेत.
21 Feb 2025 02:30 PM (IST)
युट्यूबर आशिष चंचलानी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आता महाराष्ट्र आणि आसाम सरकारकडून उत्तर मागितले आहे. इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये अश्लीलतेचा प्रचार केल्याबद्दल आशिषविरुद्ध गुवाहाटीमध्ये दाखल केलेला एफआयआर रद्द करावा किंवा तो शो मुंबईत हस्तांतरित करावा अशी याचिका दाखल करण्यात आली आहे.
21 Feb 2025 02:19 PM (IST)
चॅम्पियन ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे, हे दोन्ही संघ ग्रुप ब मधील आहेत. या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ टेम्बा बाऊमाच्या नेतृत्वाखाली मागील काही वर्षांपासून सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे.
21 Feb 2025 01:49 PM (IST)
पहिल्याच दिवशी दहावीच्या मराठी पेपर फुटीला ग्रहण लागलेलं आहे. जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. जालना जिल्ह्यातील बदानापूर येथे दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात आहेत. त्यामुळे आता खळबळ उडाली आहे.
21 Feb 2025 01:38 PM (IST)
पॅट कमिन्स चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडल्यानंतर, स्टीव्ह स्मिथला स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडविरुद्धच्या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेची सुरुवात करेल
21 Feb 2025 01:29 PM (IST)
भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकीचे पत्र मिळाले आहे. या प्रकरणी चिखली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात येणार आहे. श्वेता महाले यांना धमकीचे पत्र मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
21 Feb 2025 01:27 PM (IST)
वॉलमार्ट-समर्थित डिजिटल पेमेंट कंपनी फोनपे लवकरच स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होणार आहे. यापूर्वी, पेटीएम आणि मोबिक्विक या डिजिटल पेमेंट कंपन्या सूचीबद्ध झाल्या आहेत. आता भारतातील आघाडीची फिनटेक कंपनी फोनपे भारतीय शेअर बाजारात लिस्टिंगची तयारी करत आहे. कंपनीने गुरुवारी त्यांच्या संभाव्य आयपीओबाबत प्रारंभिक पावले उचलण्याबाबत माहिती शेअर केली.
21 Feb 2025 01:27 PM (IST)
आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेल्या ग्रेटा कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे.
21 Feb 2025 12:53 PM (IST)
‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वादग्रस्त आणि अश्लील टिप्पणीप्रकरणी इतर अनेक स्टार्सचीही चौकशी सुरू आहे. आता महाराष्ट्र सायबर सेलने अभिनेत्री राखी सावंतला समन्स बजावले आहे.
21 Feb 2025 12:40 PM (IST)
शेअर बाजारातील अस्थिरतेतही गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी चालून आली आहे. शेअर बाजारातील घसरण थोडी कमी झाली असली तरीही सेन्सेक्स आणि निफ्टी अजूनही घसरणीत आहेत. सेन्सेक्स ४९ अंकांनी घसरून ७५६८६ वर आणि निफ्टी १८ अंकांनी घसरून २२८९४ वर आहे. या दरम्यान अनेक शेअर्समध्ये वाढ झाली आहे.
21 Feb 2025 11:57 AM (IST)
आज ब गटातील पहिला सामना रंगणार आहे. आज अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Afghanistan vs South Africa) यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. काय आहे पीच रिपोर्ट? जाणून घेण्यासाठी नक्की क्लिक करा
AFG vs SA : चॅम्पियन ट्रॉफीत आज लढणार अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका, जाणून घ्या पीच रिपोर्ट
21 Feb 2025 11:37 AM (IST)
तालुक्यातील वाटद एमआयडीसीच्या भूसंपादनाला येथील स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. भूमी अभिलेख, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि उप विभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून ही संयुक्त मोजणी करण्यात येत होती. टोकाच्या विरोधामुळे नोटीस बजावलेल्या ग्रामस्थांच्या जमिनीची मोजणी करता आली नाही. मात्र या परिसरातील एका खासगी कंपनीच्या पंधरा एकर जमिनीची मोजणी करून अधिकारी माघारी परतले.भूमी अभिलेख विभागाकडून 12 फेब्रुवारीला संयुक्त मोजणीसाठीची नोटीस काढली. हीनोटीस कळझोंडीतील जमिनमालक, शेतकरी, ग्रामस्थांकडे वेळेत सुपूर्द करणे आवश्यक होते.
21 Feb 2025 11:27 AM (IST)
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी होत आहे. भराडी देवीच्या दर्शनासाठी देश- विदेशातूनही भाविक येतात.याचापार्श्वभूमीवर या यात्रेला मोठी गर्दी होत असल्याने एक दिवस अगोदर काही भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली असून भाविकांना दर्शन ८ रांगाद्वारे देण्यात येईल. भराडी देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अन्य राजकीय नेते येणार आहेत.
21 Feb 2025 11:25 AM (IST)
विकी कौशल अभिनीत या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात किती कलेक्शन केले आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आणि याचीच झलक बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे. चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात २०० कोटींचा गल्ला पार केला आहे.
21 Feb 2025 11:11 AM (IST)
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर बाव नदीजवळ सळई वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
21 Feb 2025 11:04 AM (IST)
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत शनिवारी (दि.22) एकाच दिवशी एका क्लिकवर 62967 घरकुल मंजुरीचे पत्र वितरण होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. तसेच सदरचा राज्यस्तरावरील मुख्य कार्यक्रम पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार असल्याचेही सांगण्यात आले.
21 Feb 2025 11:00 AM (IST)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणाऱ्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी या दोन तरुणांना गुरुवारी दिली होती. गोरेगाव पोलीस ठाण्यासह अन्य दोन ठिकाणी त्यांनी ई-मेलवरून शिंदेंना ही धमकी दिली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुलढाणा पोलिसांच्या मदतीने दोघांना केली अटक केली आहे. मंगेश अच्युतराव वायाळ (वय 35 वर्ष) अभय गजानन शिंगणे (वय 22) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.
21 Feb 2025 10:52 AM (IST)
कोल्हापूर शहरातील 80 वर्षाच्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या दहा दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. जीबीएसवर शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 12 वर पोहोचली आहे.
21 Feb 2025 10:51 AM (IST)
आजपासून दिल्लीत 98 वे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहेत. डॉ. तारा भवाळकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष असून पंतप्रधानांच्या हस्ते आज संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. आज पंतप्रधान मोदी, शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर दिसणार आहेत.
21 Feb 2025 10:50 AM (IST)
शिमग्यासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी स्पेशल होळी ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण 24 फेब्रुवारी रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू होईल, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली.होळीनिमित्त मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने सीएसएमटी – मडगाव, एलटीटी – मडगाव अशा रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.
21 Feb 2025 10:49 AM (IST)
सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. “सोनिया गांधी यांची नियमित तपासणी करण्यात आली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना आता डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे,