फोटो सौजन्य - Proteas Men/Afghanistan Cricket Board सोशल मीडिया
Champions Trophy 2025 : चॅम्पियन ट्रॉफीची क्रेझ जगभरामध्ये सुरु आहे. या स्पर्धेचे आतापर्यत दोन सामने झाले आहेत. हे दोन्ही सामने अ गटामधील झाले आहेत. या स्पर्धेमध्ये आठ संघ सहभागी झाले आहेत. या संघाचे ४-४ असे दोन गट तयार करण्यात आले आहे. अ गटामध्ये पाकिस्तान, भारत, बांग्लादेश आणि न्यूझीलंड हे संघ आहेत तर ब गटामध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे संघ आहे. आज ब गटातील पहिला सामना रंगणार आहे. आज अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Afghanistan vs South Africa) यांच्यामध्ये सामना रंगणार आहे.
अफगाणिस्तानच्या संघाने मागील काही महिन्यांमध्ये क्रिकेट विश्वाला त्याच्या खेळीने चकित केले आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ सुद्धा मजबूत दिसत आहे. पण संघातील अनेक प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर आहेत. कराचीमध्ये होणाऱ्या या सामन्यात कोणत्या संघाचा वरचष्मा असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. संघात असे अनेक अनुभवी खेळाडू आहेत ज्यांच्याकडे कोणत्याही परिस्थितीत संघाला विजय मिळवून देण्याची ताकद आहे. रस्सी व्हॅन डर ड्यूसेन, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर आणि हेनरिक क्लासेन यांच्या उपस्थितीमुळे संघाची फलंदाजी खूपच मजबूत दिसते.
अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचे आयोजन कराची मैदानावर करण्यात आले आहे. या सामान्यांच्या खेळपट्टबद्दल बोलायचं झालं तर या मैदानावर ७९ सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये पहिले फलंदाजी करणारा संघ ३७ वेळा विजयी झाला आहे तर धावांचा पाठलाग करणारा संघ ३९ वेळा जिंकलेला आहे. या मैदानावर फलंदाजांना धावा करणे सोयीस्कर आहे तर सुरुवातीला वेगवान फायदा होण्याची शक्यता आहे. या मैदानावर भारताने २००८ मध्ये सर्वाच्च धावसंख्या उभारली होती. टीम इंडियाने हॉंगकॉंगच्या संघाविरुद्ध ३७४/४ अशी खेळी खेळली होती.
तर चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये याच मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने पहिले फलंदाजी करून ३२०/५ धावा केल्या. तर पाकिस्तानचा डाव ४७.२ षटकांत २६० धावांवर सर्वबाद झाला.
Afghanistan take on South Africa in the first match of Group B in Karachi 🏏
How to watch the big clash 👉 https://t.co/S0poKnwS4p pic.twitter.com/qXB7i5Uh9g
— ICC (@ICC) February 21, 2025
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघ ५ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने ३ सामने जिंकले आहेत तर अफगाणिस्तानने २ सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिका स्पर्धेपूर्वी आपला फॉर्म शोधण्याचा प्रयत्न करत असताना, अफगाणिस्तानला विजयाने सुरुवात करण्याची उत्तम संधी असेल.
रहमानुल्ला गुरबाज (विकेटकिपर), इब्राहिम झद्रान, सेदिकुल्ला अटल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अझमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, नांग्याल खरोती, रशीद खान, नूर अहमद.
टेम्बा बावुमा (कर्णधार), रायन रिकेल्टन, रस्सी व्हॅन डर ड्यूसेन, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), मार्को जानसेन, वियान मुल्डर, केशव महाराज, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी.