पुण्यात महाविकास आघाडी एकत्रित लढणार (संग्रहित फोटो)
पुणे : राज्यात नगर पंचायत, नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. असे असताना पुणे जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगराध्यक्षपदाच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या वतीने एकत्रित लढविण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष विजय कोलते व शिवसेना अध्यक्ष उल्हास शेवाळे (उबाठा) यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पुणे जिल्हा शिवसेना पक्ष असे नाव विकास आघाडी म्हणून सत्ताधारी महायुतीच्या विरोधात एकत्र येऊन सक्षमपणे तसेच नवीन चेहरे व कार्यकर्ते या सर्वांना सामावून घेऊन निवडणूक लढविणार आहे. महायुतीतील पक्षांबरोबर कोणत्याही स्तरावर स्थानिक पातळीवर आपण निवडणूक लढविणार नसून अशाप्रकारे कोणताही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केलास पक्षाद्वारे त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी कोलते व पाटील यांनी सांगितले.
तर महाविकास आघाडीच्या विरुद्ध काम करणाऱ्या या तीनही पक्षातील कार्यकर्ते तथा पदाधिकारी यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केली म्हणून तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा समावेश जिल्ह्यात करावयाचा की नाही याबाबत अद्याप आम्हाला कोणतेही आदेश आले नाहीत, असे स्पष्टीकरणही यावेळी विजय कोलते यांनी दिले.
नागपुरात काँग्रेसचे ‘एकला चलो रे…’
शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सन्मानजनक जागा दिल्यास आघाडीत यायला तयार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, काँग्रेसने यास अद्याप कुठलाही प्रतिसाद दिला नसून नागपूर जिल्ह्यातील सर्व इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम काँग्रेसने जाहीर केला आहे. हे बघता आघाडीची शक्यता मावळल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हेदेखील वाचा : Mahavikas Aghadi Rally: ‘ही सत्तेची लढाई नाही, सत्याची लढाई…’; महाविकास आघाडीसह ठाकरे बंधू मुंबईच्या रस्त्यांवर उतरणार






