Top Marathi News today Live
Marathi Breaking news live updates : बीड हत्या प्रकरणामुळे अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. वाल्मिक कराड सोबत संबंध असल्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीने जोर धरला आहे. सीआयडीने वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे निकटवर्तीय असल्याचे आरोपपत्रात म्हटलं आहे. यानंतर धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावर सूचक पोस्ट केली आहे. ३-३-२०२५ ला राजीनामा होणार. अशी एका ओळीची पोस्ट करुणा धनंजय मुंडेंनी पोस्ट केली आहे. त्यांच्या फेसबुक पेजवर ही पोस्ट करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 3 मार्चला धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत.
02 Mar 2025 04:36 PM (IST)
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबाबत जो प्रकार घडला त्याकडे मी स्वतः लक्ष दिले आहे.गुन्हा दाखल झालेला आहे.त्या टवाळखोर याला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतले असेल,बऱ्याच गोष्टी समोर येतील, जो यात दोषी आढळले जाईल त्यावर कठोर कारवाई केली जाईल.त्या टवाळ खोरांनी व्हिडिओ काढला, गार्ड ने त्यांना खाली आल्यानंतर हटकले होते.यापूर्वी त्या टवाळ खोरवर गुन्हा दाखल आहे.या प्रकरणी ही लोकं, माणसाच्या कळपातील विकृती आहेत यांचे चेहरे आता समोर आणली पाहिजे,काळी कपडे न घालता त्यांना आता जनतेसमोर आणले पाहिजे,ही विकृती कमी झाली पाहिजे,मुख्यमंत्री, आयोग, पोलिस नक्की दखल घेतली जाईल,मिडिया ट्रायल न करता,पोलीस कारवाई करत असतील तर त्यांना सहकार्य केले पाहिजे, असे मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.
02 Mar 2025 04:12 PM (IST)
वर्धा जिल्हातील हिंगणघाट येथे शासकीय विश्राम गृहात आज राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षातर्फे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला प्रमूख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद साहारे आणि कृषी उत्पन बाजार समितीचे अध्यक्ष सुधीर कोठारी आणि कार्य अध्यक्ष वर्धा आशिष ठाकरे आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष मयूर डफरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
02 Mar 2025 03:55 PM (IST)
ठाणे महापालिकेने नवीन प्रारुप विकास आराखडा तयार केला आहे. हा विकास आराखडा विशिष्ट हेतू समोर ठेवून करण्यात आला असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कोकण प्रभारी डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो कळव्यातील स्थानिक एकवटले आहेत. या विकास आराखडय़ाला विरोध करण्यासाठी कळवा नाका येथे नागरिकांनी जोरदार आंदोलन केलं आहे.
02 Mar 2025 03:45 PM (IST)
मार्च महिना सुरू होताच दुष्काळाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. येवला तालुक्यातील कुसमाडी येथे पाच दिवसानंतर नळांना पाणी येत असून येणारे पाणीदेखील पुरत नाही त्यात काही ग्रामस्थांच्या पाण्याच्या पट्ट्या थकल्यामुळे ग्रामपंचायतीने सर्वच गावाचा पाणीपुरवठा बंद केला आहे त्यामुळे संताप झालेल्या नागरिकांनी थेट पाण्याच्या टाकी वरती चढून शोले स्टाईलने आंदोलन केले जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
02 Mar 2025 03:24 PM (IST)
मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या प्रकरणावर मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आरोपींना माफी देता कामा नये. त्यांच्यावर कडक कारवाई होणारच. खडसेंच्या नातीला छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे आहेत. दुर्दैवाने त्यात एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत. ज्यांनी अतिशय वाईट काम केलेले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काहींना अटक केली आहे. इतरांनाही अटक केली जाईल. पण अशाप्रकारे छेड काढणं, त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे. कोणत्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल," असे मत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केले आहे.
02 Mar 2025 02:47 PM (IST)
OnePlus 12R स्मार्टफोनच्या खेरदीवर आता ई-कॉमर्स साइट Amazon वर प्रचंड सवलती आणि बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. OnePlus 12R स्मार्टफोन कंपनीने 42,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता OnePlus 12R चा 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंट आता Amazon वर 32,999 रुपयांना उपलब्ध आहे.
02 Mar 2025 02:34 PM (IST)
जतच्या महसूल विभागाने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. इतकंच नाही तर हे कार्यालय आहे की दलालांचा अड्डा हेदेखील समजत नाही, इतक्या गंभीर तक्रारी महसूल विभागासंदर्भात सांगलीच्या खासदारांसमोर येताच खासदारांनी डोक्याला हात मारत खासदारकीपेक्षा तहसीलदार झालो असतो तर बरं झालं असतं, म्हणत या विभागाच्या लोक नाराजीवर बोट ठेवले. खासदार विशाल पाटील यांनी पहिल्यांदाच जतेत सर्व शासकीय कार्यालयाची आढावा बैठक घेतली
02 Mar 2025 02:08 PM (IST)
मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप यांनी मढी गावाला भेट देत सभेला संबोधित केले. यावेळी नितेश राणे चांगलेच गरजलेले पाहायला मिळाले. तर हे देवाभाऊचे, हिंदूंचे सरकार आहे अशी पाटी ठराव रद्द करणाऱ्या त्या अधिकाऱ्याच्या दालनाबाहेर लावण्याचे देखील यावेळी आपल्या भाषणातून सांगितले.
02 Mar 2025 02:07 PM (IST)
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत विशेष तपासणी मोहिमेचा शुभारंभ आणि राज्यस्तरीय मेळाव्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अजित पवार यांनी महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे. या आजारावर लस आली आहे. ही लस राज्यातील महिला आणि मुलींना कशी देता येईल, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे असे मत व्यक्त केले आहे.
02 Mar 2025 01:56 PM (IST)
महाडमधील श्री विरेश्वर महाराज यांच्या छबिना उत्सवाला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हजेरी लावली. श्री वीरेश्वर महाराज यांचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी श्री वीरेश्वर महाराज यांच्या मंदिर सुशोभीकरणासाठी योग्य निधी उपलब्ध करून देण्याच मंदिर व्यवस्थापकाना आश्वासन दिलं. रात्री उशिरा त्यांनी या मंदिर परिसराला भेट दिली.
02 Mar 2025 01:42 PM (IST)
रगेट एसटी स्थानकात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. स्वारगेट डेपोत घडलेल्या घटनेच्या निमित्ताने महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. ह्या अनुषंगाने आजच्या बैठकीत त्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला असून, येथील सुरक्षा कर्मचारी वाढविणे यासोबतच एसटी महामंडळात एक सुरक्षा रक्षक कमिटी नेमून त्यात आयपीएस दर्जाचा सुरक्षा अधिकारी नेमणार असल्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
02 Mar 2025 01:27 PM (IST)
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणाऱ्या टावळखोरांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली असल्याचं समोर आलं आहे. जळगावमधल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील प्रकरण ताजे असताना हा प्रकार घडला आहे.
02 Mar 2025 12:59 PM (IST)
स्वारगेट एसटी स्थानकात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. स्वारगेट डेपोत घडलेल्या घटनेच्या निमित्ताने महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. ह्या अनुषंगाने आजच्या बैठकीत त्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला असून, येथील सुरक्षा कर्मचारी वाढविणे यासोबतच एसटी महामंडळात एक सुरक्षा रक्षक कमिटी नेमून त्यात आयपीएस दर्जाचा सुरक्षा अधिकारी नेमणार असल्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
02 Mar 2025 12:30 PM (IST)
Samsung ने आज 2 मार्च रोजी Galaxy A56, Galaxy A36 आणि Galaxy A26 स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन 12 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायासह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीने अद्याप या स्मार्टफोन्सची किंमत जाहीर केलेली नाही. तिन्ही स्मार्टफोन्समध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
02 Mar 2025 12:23 PM (IST)
ज्येष्ठ निरूपणकार, महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांची आज जयंती आहे. समाजासाठी अध्यात्म, आरोग्य, शिक्षण, व्यसनमुक्तीचे अविरतपणे कार्य करणाऱ्या नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर आणि पुण्यात देखील स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पुणे महानगरपालिका आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम पार पडली. या भव्य मोहिमेमध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हजारोंच्या संख्येने अनुयायी सहभागी झाले.
02 Mar 2025 11:43 AM (IST)
दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. याचदरम्यान आता पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी शनिवारी (1 फेब्रुवारी) अनेक मोठ्या घोषणा केल्या.दिल्ली सरकार ३१ मार्चनंतर शहरातील पेट्रोल पंप आणि सीएनसी स्टेशनवर १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना इंधन पुरवणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय राजधानीतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सिरसा म्हणाले की, वाहनांमधून होणारे उत्सर्जन आणि प्रदूषण रोखण्यासाठी सरकार कठोर उपाययोजना करत आहे.
02 Mar 2025 11:11 AM (IST)
व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्म स्काईप 5 मे 2025 पासून बंद होणार आहे. आता स्काईपला पूर्वीसारखी लोकप्रियता दिली जात नाही. त्यामुळे त्याच्या युजर्सच्या संख्येत देखील काही प्रमाणात घट झाली आहे. याच सर्व कारणांमुळे आता कंपनीने हा प्लॅटफॉर्म बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
02 Mar 2025 10:50 AM (IST)
मार्च महिना सुरु होताच आता होळी, शिमग्या सणाची तयारी सुरू होते. कोकणात होळी आणि शिमग्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठी ठाणे परिवहन विभागातर्फे होळी आणि शिमग्यासाठी 11 ते 13 मार्च या कालावधीत सुमारे 85 बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यातील 70 टक्के गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे.
02 Mar 2025 10:48 AM (IST)
काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांचा संशयितरित्या मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह एका सूटकेसमध्ये आढळून आला आहे. हरियाणातल्या रोहतकमध्ये ही घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान पक्षाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.