Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today : राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन

Marathi breaking live marathiगुन्हे शाखेच्या अनेक युनिटमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या फेरबदलांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 17, 2025 | 06:45 PM
Top Marathi News Today Live:

Top Marathi News Today Live:

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates:  पुणे पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले असून तब्बल १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. बदल्यांमध्ये ६ गुन्हे शाखेचे निरीक्षक समाविष्ट आहेत. दरम्यान, वादग्रस्त ठरलेल्या कोंढवा आणि येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची बदली अनुक्रमे कंट्रोल आणि वाहतूक शाखेत करण्यात आली आहे.

The liveblog has ended.
  • 17 Oct 2025 06:44 PM (IST)

    17 Oct 2025 06:44 PM (IST)

    मोदींचे दिवाळी गिफ्ट! मध्यमवर्गीयांना मिळणार मोठा दिलासा, घर बांधणीसाठी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दिवाळीपूर्वी मध्यमवर्गीयांना एक मोठी भेट दिली आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)शहरी २.० अंतर्गत १.४१ लाख अतिरिक्त घरे बांधण्यास मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत, सरकार शहरी गरीब आणि मध्यमवर्गीयांना त्यांचे स्वतःचे घर शोधण्यास मदत करते. चला जाणून घेऊया तपशील.

  • 17 Oct 2025 06:31 PM (IST)

    17 Oct 2025 06:31 PM (IST)

    Naxalists Breaking: छत्तीसगडमध्ये नक्षलवादाला मोठे खिंडार! तब्बल 208 नक्षलवाद्यांनी थेट...

    गेल्या काही महिन्यांमध्ये भारत सरकारने नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आत्मसमर्पण किंवा सुरक्षा दलांच्या गोळीचे शिकार हे दोनच पर्याय नक्षलवाद्यांच्या समोर ठेवले आहेत. तसेच देशातील नक्षलवाद मार्च 2026 पर्यन्त संपवण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान छत्तीसगडमध्ये तब्बल 208 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

  • 17 Oct 2025 06:12 PM (IST)

    17 Oct 2025 06:12 PM (IST)

    IBच्या ‘या’ भरतीसाठी करा अर्ज! 455 सिक्युरिटी असिस्टंट येणार भरण्यात

    गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील इंटेलिजन्स ब्युरो (IB) विभागाकडून 2025 साली सिक्युरिटी असिस्टंट (Motor Transport)/एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 455 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून, राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. उमेदवारांनी अर्ज करताना संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचे डोमिसाईल प्रमाणपत्र तसेच स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

  • 17 Oct 2025 05:57 PM (IST)

    17 Oct 2025 05:57 PM (IST)

    Too much with kajol and twinkle:”म्हणून मला बदनाम केलं गेलं”…

    बॉलिवूडचा ‘हीरो नंबर 1’ गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बराच काळ शूटिंगला उशिरा पोहोचण्याच्या आरोपांवर आता त्याने स्पष्ट भूमिका घेतली आहे. गोविंदाने काजोल व ट्विंकल यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या कार्यक्रमात हजेरी लावलेली. यावेळी त्याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल आणि व्यावसायिक आयुष्याबद्दलही सांगितलं. कार्यक्रमात गोविंदाने त्याच्या पत्नीबद्दल व घटस्फोटाच्या अफवांबद्दलही सांगितलं.

    वाचा सविस्तर 

  • 17 Oct 2025 05:52 PM (IST)

    17 Oct 2025 05:52 PM (IST)

    Flood Relief: राज्यातील ‘या’ पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत

    सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील २१ लाख ६६ हजार १९८ शेतकऱ्यांच्या १५ लाख १६ हजार ६८१.२१ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी १३५६ कोटी ३० लाख २२ हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.

    वाचा सविस्तर 

  • 17 Oct 2025 05:28 PM (IST)

    17 Oct 2025 05:28 PM (IST)

    मुलगा की सैतान? दारुसाठी पैसे देत नाही म्हणून केला आईचा खून

    राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, धमक्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे. अशातच आता तासगावमधून एक मोठी घटना समोर आली आहे. एका तरुणाने दारुसाठी पैसे देत नाही म्हणून आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं आपल्या आईला जमिनीवर पाडून तिला तलवारीने भोसकलं आहे. पोटच्या मुलानेच अशाप्रकारे जन्मदात्या आईचा खून केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    वाचा सविस्तर 

  • 17 Oct 2025 05:20 PM (IST)

    17 Oct 2025 05:20 PM (IST)

    ऐतिहासिक क्षण! नाशिकमध्ये ‘तेजस MK-1A’ लढाऊ विमानाचे पहिले उड्डाण यशस्वी,

    केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आज (गुरुवारी) नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (HAL) नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले आणि याचसोबत तेजस LCA MK-1A या लढाऊ विमानाचे पहिले ऐतिहासिक उड्डाण पाहिले. राजनाथ सिंह यांनी LCA MK-1A साठीची तिसरी उत्पादन लाइन आणि HTT-४० विमानासाठीची दुसरी उत्पादन लाइन राष्ट्राला समर्पित केली. या उत्पादनांमुळे भारतीय हवाई दलाची (Indian Air Force – IAF) एकूण ताकद आणि क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

    वाचा सविस्तर

  • 17 Oct 2025 05:15 PM (IST)

    17 Oct 2025 05:15 PM (IST)

    Gujarat Cabinet Expansion: गुजरातमध्ये एवढी मोठी राजकीय उलथापालथ का?

    बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये एक मोठी राजकीय खेळी केली आहे, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता त्यांच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले. गुरुवारी संध्याकाळी भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदल आणि विस्ताराच्या तयारीसाठी एकूण १६ मंत्र्यांनी आपले राजीनामे सादर केले. गुजरातमध्ये राजकीय उलथापालथ ही काही नवीन गोष्ट नाही. सत्ताविरोधी लाटेचा सामना करण्यासाठी भाजपने यापूर्वीही त्यांच्या राजकीय फेरबदलांच्या फॉर्म्युल्याचा वापर केला आहे. २०२१ मध्ये, पक्षाने ‘नो रिपीट थिअरी’ अंतर्गत संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्यत  आले होते,  त्या काळातील मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा कार्यकाळ संपवला होता.

    वाचा सविस्तर 

  • 17 Oct 2025 04:43 PM (IST)

    17 Oct 2025 04:43 PM (IST)

    नाशिकमध्ये ‘तेजस MK-1A’ लढाऊ विमानाचे पहिले उड्डाण यशस्वी

    केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आज (गुरुवारी) नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (HAL) नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले आणि याचसोबत तेजस LCA MK-1A या लढाऊ विमानाचे पहिले ऐतिहासिक उड्डाण पाहिले. राजनाथ सिंह यांनी LCA MK-1A साठीची तिसरी उत्पादन लाइन आणि HTT-४० विमानासाठीची दुसरी उत्पादन लाइन राष्ट्राला समर्पित केली. या उत्पादनांमुळे भारतीय हवाई दलाची (Indian Air Force – IAF) एकूण ताकद आणि क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

  • 17 Oct 2025 04:28 PM (IST)

    17 Oct 2025 04:28 PM (IST)

    भारतात Triumph Speed Triple 1200 RX लाँच

    नुकतेच ट्रायम्फ कंपनीने भारतीय ऑटो बाजारपेठेत त्यांची नवीन लिटर-क्लास नेकेड बाईक लाँच केली आहे ज्यामध्ये स्पोर्टी डिझाइन, आक्रमक एर्गोनॉमिक्स आणि अपग्रेडेड हार्डवेअर आहे, तर त्यांचे इनलाइन-ट्रिपल इंजिन तसेच ठेवले आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 23.07 लाख रुपये आहे. हा मॉडेल जागतिक स्तरावर फक्त 1200 युनिट्सपुरता लिमिटेड एडिशन आहे. भारतात याचे किती युनिट्स उपलब्ध होतील, याची माहिती कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही.

  • 17 Oct 2025 04:22 PM (IST)

    17 Oct 2025 04:22 PM (IST)

    निफ्टी 25,709 वर बंद तर सेन्सेक्स 484 अंकांनी वधारला

    भारतीय शेअर बाजारांनी आठवडा सकारात्मक पातळीवर बंद झाला. ५० शेअर्सचा निफ्टी ५० ०.४९% वाढून २५,७०९.८५ वर बंद झाला, तर सेन्सेक्स ४८४.५३ अंकांनी किंवा ०.५८% वाढून ८३,९५२.१९ वर बंद झाला. एकूण १,६५८ शेअर्स वधारले, २,३१८ मध्ये घसरण झाली आणि १५८ स्थिर राहिले.

  • 17 Oct 2025 03:51 PM (IST)

    17 Oct 2025 03:51 PM (IST)

    ऑस्ट्रेलियाची झोप उडवणारे ‘ते’ चार भारतीय फलंदाज माहिती आहेत का?

    IND vs AUS ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेला रविवार, १९ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. सामने पर्थ, अॅडलेड आणि सिडनी येथे खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेपूर्वी संपूर्ण मालिकेत खेळाडूंच्या कामगिरी आणि विक्रमांची चर्चा आता रंगू लागली आहे.

  • 17 Oct 2025 03:43 PM (IST)

    17 Oct 2025 03:43 PM (IST)

    पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जमीन हडपली; मुरलीधर मोहोळांनी हडपल्याचा आरोप

    Pune Jain Boarding Land: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या बेकायदेशीर विक्रीवरून राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली. या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

  • 17 Oct 2025 03:34 PM (IST)

    17 Oct 2025 03:34 PM (IST)

    पंतप्रधान मोदींवरील टिप्पणीबद्दल अमेरिकन गायकाने राहुल गांधींना सुनावले खडे बोल

    Mary Millben on Raghul Gandhi: अमेरिकन गायिका मेरी मिलबेन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जोरदार फटकारले आहे. मिलबेन म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरत नाहीत. त्यांना दीर्घकालीन विचारसरणी समजते.

  • 17 Oct 2025 03:26 PM (IST)

    17 Oct 2025 03:26 PM (IST)

    6 नृत्यांगनांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; हाताच्या नसा कापल्या अन्…; कारण काय?

    कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील एका परिसरात 6 नृत्यांगनांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्या 6 महिलांनी सामूहिकपणे हाताच्या नसा कापून आपले जीव संपवण्याचा प्रयत्न केला आहे.

  • 17 Oct 2025 03:17 PM (IST)

    17 Oct 2025 03:17 PM (IST)

    ४० वर्षीय फलंदाजाचा मोठा कारनामा! रणजी ट्रॉफीमध्ये उडवली खळबळ

    Paras Dogra scores a century in Ranji Trophy 2025 : रणजी ट्रॉफी २०२५ चा हंगाम सुरू झाला आहे. या ट्रॉफीच्या ग्रुप डी सामन्यात जम्मू आणि काश्मीर आणि मुंबई यांच्यात एक रोमांचक लढाई सुरू आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी ४० वर्षीय अनुभवी फलंदाज पारस डोग्राने पुन्हा एकदा आपली प्रतिभा दाखवून दिली.

  • 17 Oct 2025 03:12 PM (IST)

    17 Oct 2025 03:12 PM (IST)

    गोपीचंद पडळकरांचा अजब सल्ला, वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच

    महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक वादग्रस्त विधान केले. त्यांनी म्हटले की हिंदू महाविद्यालयीन मुलींनी जिममध्ये जाणे टाळावे. हिंदू मुलींनी जिममध्ये जाण्याऐवजी घरी योगा किंवा व्यायाम करण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की एक मोठे षड्यंत्र सुरू आहे. 

  • 17 Oct 2025 02:50 PM (IST)

    17 Oct 2025 02:50 PM (IST)

    सजावटीतून सजगतेकडे; दिवाळी भेटवस्तूंमध्ये बदलता ट्रेंड

    सुनयना सोनवणे/ पुणे: दिवाळी येतेय…. दिवाळी म्हणजे उजेडाचा आणि आनंदाचा सण! या सणात भेट देणे म्हणजे आपुलकीचा, प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्याचा पारंपरिक मार्ग. मात्र यावर्षीच्या भेटवस्तू ट्रेंडमध्ये एक नवा बदल दिसून येतो आहे. नागरिकांचा कल आता केवळ सजावटीच्या वस्तूंवर न थांबता इको-फ्रेंडली आणि आरोग्यदायी हॅम्पर्सकडे झुकत आहे.

  • 17 Oct 2025 02:45 PM (IST)

    17 Oct 2025 02:45 PM (IST)

    स्मार्टफोन नाही, रोबोटच समजा! Honor चा नवा फोन झाला वायरल

    अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये Honor Magic 8 Pro आणि Magic 8 हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले होते. यानंतर कंपनीने एक नवीन कॉन्सेप्ट फोन सादर केला. हा स्मार्टफोन आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) डिव्हाईस इकोसिस्टमचा भाग असणार आहे. या नवीन स्मार्टफोनचं नाव Honor Robot Phone असं ठेवण्यात आलं आहे. कंपनीने सांगितलं आहे की, हा फोन रोबोटिक्स, फोटोग्राफी आणि मल्टी मॉडल AI कॅपेबिलिटीज जोडून तयार करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन मोबाईल वर्ल्ड कांग्रेस (MWC) 2026 दरम्यान लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये गिंबल आणि रोटोबल मोटरसह एक पॉप-अप AI कॅमेरा देण्यात आला आहे.

  • 17 Oct 2025 02:40 PM (IST)

    17 Oct 2025 02:40 PM (IST)

    आयुष्मान-रश्मिकाच्या ‘थामा’ चा रनटाइम किती?

    आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना स्टारर “थामा” हा चित्रपट या वर्षातील सर्वात अपेक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते “थामा” बद्दल खूप उत्सुक आहेत. हा येत्या चित्रपट २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी, या अहवालात “थामा” च्या रनटाइमपासून ते त्याच्या सीबीएफसी प्रमाणपत्र आणि ॲडव्हान्स बुकिंगपर्यंत आपण सर्व काही जाणून घेणार आहोत.

  • 17 Oct 2025 02:35 PM (IST)

    17 Oct 2025 02:35 PM (IST)

    ‘कच्चा बादाम’ गायकाला प्रसिद्धी मिळाली, पण गाण्याचे गेले हक्क

    इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवलेलं ‘कच्चा बादाम’ हे गाणं आजही अनेकांच्या आठवणीत ताजं आहे. या गाण्यामुळे एका साध्या फेरीवाल्याचं आयुष्य बदललं. ‘कच्चा बादाम’ने त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली असली तरी या गाण्याचे हक्क मात्र त्याच्याकडून काढून घेण्यात आले आहेत.

  • 17 Oct 2025 02:30 PM (IST)

    17 Oct 2025 02:30 PM (IST)

    भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने मोडले व्यूअरशिपचे रेकाॅर्ड

    आयसीसी आणि जिओहॉटस्टारने महिला विश्वचषकाच्या पहिल्या १३ सामन्यांचे प्रेक्षकसंख्या आकडे जाहीर केले आहेत. भारत आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या विश्वचषकाला क्रिकेट चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. पहिले १३ सामने ६ कोटी लोकांनी पाहिले, जे २०२२ मध्ये झालेल्या मागील विश्वचषकापेक्षा जवळजवळ पाच पट जास्त आहे. भारत आणि पाकिस्तानी महिला संघांमधील सामन्याने सर्व प्रेक्षकसंख्या विक्रम मोडले.

  • 17 Oct 2025 02:25 PM (IST)

    17 Oct 2025 02:25 PM (IST)

    कुठे जोरदार पाऊस तर कुठे…; आज कसे असणार देशातील वातावरण?

    आजपासून दिवळीला सुरुवात झाली आहे. दरम्यान सणाच्या दिवशी देशती हवामानात देखील अनेक बदल झालेले दिसून येत आहेत. अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे. तर कुठे कडक उन्हाळा जाणवत आहे. तर पर्वतीय राज्यांमध्ये थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने आज कोणत्या राज्याला कोणता अलर्ट दिला आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.

  • 17 Oct 2025 02:20 PM (IST)

    17 Oct 2025 02:20 PM (IST)

    जरातमध्ये राजकीय उलथापाल; मंत्रिमंडळात फेरबदल

    Gujarat Cabinet Expansion News in Marathi: बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात भाजपने मोठे फेरबदल केले आहेत. शुक्रवारी (17 ऑक्टोबर) गांधीनगरमधील महात्मा मंदिरात झालेल्या शपथविधी समारंभात एकूण १९ नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला तर १० जुन्या मंत्र्यांना वगळण्यात आले. नवीन मंत्रिमंडळात महिलांचे प्रतिनिधित्वही वाढवण्यात आले आहे. 

  • 17 Oct 2025 02:15 PM (IST)

    17 Oct 2025 02:15 PM (IST)

    अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, आणि…

    दिल्ली: दिल्लीतुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्याहून ७ वर्ष लहान असलेल्या अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले नंतर त्याने तिला तिच्या घरातून पळवून नेलं. आरोपीने पिडीतेसोबत अतिशय घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे. तिला नको त्या अवस्थेत रस्त्यावर सोडून दिल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी १६ महिन्यानंतर या नराधमाला दिल्लीच्या लक्ष्मीनगर परिसरातून अटक केले आहे.

  • 17 Oct 2025 02:10 PM (IST)

    17 Oct 2025 02:10 PM (IST)

    घराच्या प्रवेशद्वारावर हे तोरण लावल्याने वाईट नजरेपासून होते संरक्षण

    भारतीय परंपरेनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तोरण लावण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. वास्तुशास्त्रानुसार, ते केवळ सजावटीचा भाग नसून घराची सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा एक उपाय देखील मानला जातो. सण किंवा शुभ प्रसंगी घरात लावलेल्या तोरणांमुळे घरात आनंद, शांती आणि समृद्धी येते. तोरण तयार करण्यासाठी आंब्याची पाने आणि अशोकाची पाने वापरणे शुभ मानले जाते. झेंडूची फुले देखील वापरली जातात. घराच्या प्रवेशद्वारावर कोणते तोरण लावावे जाणून घ्या

  • 17 Oct 2025 02:00 PM (IST)

    17 Oct 2025 02:00 PM (IST)

    माजी खासदार संजय पाटलांसह 13 जणांवर गुन्हा दाखल

    अवकाळी पावसामुळे झालेल्या मोठ्या शेती नुकसानीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली १४ ऑक्टोबर रोजी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर जुने बसस्थानक परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या उत्स्फूर्ततेने ‘चक्काजाम आंदोलन’ केले होते. शासनाकडून कोणतीही ठोस मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा उद्रेक या आंदोलनातून झाला. तथापि, जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचे कारण देत पोलिसांनी या आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

  • 17 Oct 2025 01:50 PM (IST)

    17 Oct 2025 01:50 PM (IST)

    या दिवाळीत iPhone नेच करा प्रो लेव्हल फोटोग्राफी, या टिप्स ठरतील फायदेशीर

    जर तुम्हाला चित्रपटांप्रमाणे ग्रेनी, रेट्रो लुक आवडत असेल तर तुम्ही Mood अ‍ॅपने फोटोग्राफी करू शकता. या Mood अ‍ॅपमध्ये युजर्सना Portrait Mode आणि Normal Mode मिळणार आहेत. यासोबतच युजर्सना वेगवेगळे फोकल लेंथ आणि फिल्म स्टॉक निवडण्याचा देखील ऑप्शन मिळणार आहे. या अ‍ॅपचे फ्री ट्रायल 7 दिवसांसाठी उपलब्ध असणार आहे. Flash Trend गेल्या काही काळापासून लोकप्रिय आहे. यामध्ये ऑब्जेक्टवर उजेड पडतो, ज्यामुळे पाठीमागे काही हलकी सावली पडते. यासांरखे फोटो तुम्हाला आयफोनद्वारे क्लिक करण्यासाठी फ्लॅश ऑटोमोड वरून काढून ऑन करावं लागणार आहे. दिवाळीची लाइटिंग आणि दिव्यांसह फोटो क्लिक करायचे असतील Portrait Mode बेस्ट ऑप्शन आहे. बॅकग्राउंड दिवाळी लाइटिंगसह तुम्ही चांगले फोटो क्लिक करू शकता.

  • 17 Oct 2025 01:40 PM (IST)

    17 Oct 2025 01:40 PM (IST)

    पिंपरीत ऐन दिवाळीत महापालिकेची जप्तीची कारवाई

    ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने थकबाकीदारांविरोधात जप्तीची कारवाई सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. कर संकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी मोहिमेला गती दिली असून, आतापर्यंत शहरातील तब्बल 27 मालमत्तांची जप्ती करण्यात आली आहे.

  • 17 Oct 2025 01:30 PM (IST)

    17 Oct 2025 01:30 PM (IST)

    दिवाळीच्या आधी करा शरीराचीही आतून ‘स्वच्छता’, पंचकर्मने करा Body Detox

    दिवाळीपूर्वी शरीराचे डिटॉक्सीकरण

    • मनाची ताणमुक्तीः सध्या आपण घरापेक्षा ऑफिसमध्ये वा बिझनेसमध्ये इतके गुंतून गेलो आहोत की, सतत मनावर ताण असतो. दिवाळीसारख्या सणापूर्वी मनावरील ताण कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही पंचकर्माचा उपयोग करून घेऊ शकता
    • शरीराचे वजन नियंत्रणः वजनाच्या वाढीमुळे अनेक आजार आपल्या मागे लागतात आणि मग जे पैसे कमावतो ते सर्व आपण आजारांच्या मागे आणि डॉक्टरकडे घालतो. त्यामुळे वजन वाढीसारखे आजार  सहज होतात आणि वजन नियंत्रणात आणण्यासाठी शरीराचे डिटॉक्स होणे खूपच गरजेचे आहे
    • शिरा अभिसरण सुधारणेः पंचकर्मात शिरा अभिसरण अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे रक्तप्रवाह चांगला राहतो. मेंदू सुदृढ राहतो आणि त्यामुळे तुम्ही याचा उपयोग करून घ्यायला हवा
  • 17 Oct 2025 01:20 PM (IST)

    17 Oct 2025 01:20 PM (IST)

    गुजरातचे नवीन मंत्रिमंडळ कसे असू शकते?

    गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला. भाजप २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी आधीच करत असल्याचे मानले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार आज गांधीनगर येथील महात्मा मंदिरात होत आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. वाचा सविस्तर. 

  • 17 Oct 2025 01:10 PM (IST)

    17 Oct 2025 01:10 PM (IST)

    अर्जुन बिजलानी ठरला Rise and Fall चा विजेता

    “राईज अँड फॉल” ला अखेर त्याचा विजेता सापडला आहे. अर्जुन बिजलानीने ट्रॉफी जिंकली आहे आणि २८ लाख १० हजार रुपयांची मोठी रक्कमही मिळवली आहे. त्याने अरुष भोला, आकृती नेगी, धनश्री वर्मा आणि अरबाज पटेल या सगळ्यांना मागे टाकून त्याने बाजी मारली आहे. शोच्या पहिल्या दिवसापासूनच अर्जुनने हे सिद्ध केले की त्याच्याकडे विजेता बनण्याचे गुण आहेत.

  • 17 Oct 2025 01:05 PM (IST)

    17 Oct 2025 01:05 PM (IST)

    विराट कोहलीला भेटून छोटा चाहता आनंदाने झाला वेडा, Video Viral

    २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कोहलीचा टीम इंडियासाठी हा पहिलाच सामना असेल. कोहलीने एकदिवसीय आणि कसोटी दोन्हीमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता तो फक्त एकदिवसीय सामने खेळतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडिया तिथे सराव करण्यात व्यस्त आहे. तथापि, कोहली त्याच्या काही चाहत्यांना भेटला. त्यापैकी एक मुलगा होता, ज्याला कोहलीने ऑटोग्राफ दिला.  मुलाला ऑटोग्राफ मिळताच तो खूप आनंदी झाला. तो धावत गेला आणि आनंदात ओरडला. एवढेच नाही. थोडे अंतर चालल्यानंतर तो जमिनीवर झोपला आणि आनंद साजरा करू लागला. या छोट्या चाहत्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि हा गोंडस व्हिडिओ पाहणाऱ्या कोणालाही हसू आवरत नाही.

  • 17 Oct 2025 12:00 PM (IST)

    17 Oct 2025 12:00 PM (IST)

    या लोकांना माझा इतिहास माहिती नाही छगन भुजबळ

    ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.  ओबीसी महाएल्गार सभेपूर्वी भुजबळ म्हणाले की, ना माझा इतिहास माहिती नाही. शिवेसनेत असताना केलेल्या आंदोलनाची कल्पना नाही असे सूतोवाच केले. या लोकांना छगन भुजबळ यांचा इतिहास माहीत नाही. शिवसेना सोडल्यानंतर असे अनेक आव्हान पचवले आहे. जेव्हा हे सगळ लहान होते तेव्हा मी हे बघितलं आहे, असा टोला त्यांनी जरांगेंना लगावला.

  • 17 Oct 2025 11:50 AM (IST)

    17 Oct 2025 11:50 AM (IST)

    योग्यवेळी राज-उद्धव भूमिका मांडतील - संजय राऊत

    उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या युतीची सगळीकडे चर्चा आहे, पण त्याची अद्याप घोषणा होत नाहीये असा सवाल पत्रकारांनी विचारला असता, तुम्हाला युतीची फारच चिंता लागून राहिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे गेले अनेक महिने एकत्र काम करत आहेत, एकत्र भूमिका मांडत आहे, एकत्र राजकारण करत आहेत महाराष्ट्राचं , पुढील पावलं जी पडणार आहेत, त्यासंदर्भात योग्य वेळी ते बोलतील असे राऊत म्हणाले.

  • 17 Oct 2025 11:40 AM (IST)

    17 Oct 2025 11:40 AM (IST)

    ब्राझीलचे उपाध्यक्ष गेराल्डो अल्कमिन आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांची भेट

    परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी ब्राझीलचे उपाध्यक्ष आणि विकास, उद्योग, व्यापार आणि सेवा मंत्री गेराल्डो अल्कमिन यांची भेट घेतली. यावेळी देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय संबंधावर चर्चा झाली.

  • 17 Oct 2025 11:30 AM (IST)

    17 Oct 2025 11:30 AM (IST)

    डिटर्जंटपासून बनवलेला ८०२ किलो खवा जप्त

    लखनौमध्ये युरिया आणि डिटर्जंटपासून बनवलेला ८०२ किलो खवा जप्त करण्यात आला. हे रॅकेट राज्यभरात मोठ्या प्रमाणात सुरू होते. दिवाळीच्या सणापूर्वी हे सापडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

    लखनऊ में यूरिया और डिटर्जेंट से तैयार 802 किलो खोआ पकड़ा गया है

    पूरे प्रदेश में गोरखधंधा चल रहा है आपकी जान से खिलवाड़ हो रहा है

    अपने रिस्क पर ही बाहर का कुछ खाइए
    pic.twitter.com/V8A9nRvyz0

    — Surya Samajwadi (@surya_samajwadi) October 16, 2025

  • 17 Oct 2025 11:15 AM (IST)

    17 Oct 2025 11:15 AM (IST)

    दिवाळी संपल्यावर मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेईन - शरद पवार

    “कोणीतरी गैरकायद्याने तुमची जमीन काढू शकत नाही. विमानतळ झाला पाहिजे हे सगळ्याचं म्हणणं असेल, तर ज्या जागेवर होणार त्या भागातल्या शेतकऱ्याला, जमीन मलाकाला उद्धवस्त करुन चालणार नाही. योग्य नुकसानभरपाई, पर्यायी जमीन द्यावी ही त्यांची मागणी आहे. मी त्यांना सांगितलय की, यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना विनंती करणार आहे. असा निर्णय आमच्या बैठकीत काल झालेला आहे. दिवाळी संपल्यावर मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेईन” असं शरद पवार म्हणाले.

  • 17 Oct 2025 11:02 AM (IST)

    17 Oct 2025 11:02 AM (IST)

    चित्रपटसृष्टीत अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री स्मिता पाटील हिची जयंती

    चित्रपटसृष्टीतील एक शुक्रतारा म्हणून अभिनेत्री स्मिता पाटीलला ओळखले जाते. तिने जगाचा निरोप घेतला असला तरी आजही ती प्रेक्षकांच्या मनामध्ये जीवंत आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून आपल्या अभियनाची छाप सोडणाऱ्या स्मिताने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या प्रभावी आवाज, देखणं व्यक्तीमत्व आणि अभिनय कौशल्य यामुळे अल्पावधीच स्मिताने आपली वेगळी ओळख निर्माण केली. 17 ऑक्टोबर 1955 रोजी तिचा जन्म झाला. तिने पुण्यातील रेणुका स्वरूप शाळेमध्ये शिक्षण घेतले. १३ डिसेंबर १९८६ रोजी वयाच्या ३१ व्या वर्षी बाळंतपणाच्या गुंतागुंतीमुळे तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिचे दहाहून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले.

  • 17 Oct 2025 10:53 AM (IST)

    17 Oct 2025 10:53 AM (IST)

    राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन

    राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांचे वय 67 वर्षे होते. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

  • 17 Oct 2025 10:44 AM (IST)

    17 Oct 2025 10:44 AM (IST)

    रणजी ट्राॅफीच्या पहिल्या राउंडमध्ये दुसऱ्या दिनी 5 द्विशतके आणि 6 शतके

    रणजी ट्रॉफीचा नवा हंगाम सुरु झाला आहे, यामध्ये अनेक भारतीय आंतराष्ट्रीय संघामध्ये खेळणारे खेळाडू हे कमाल करताना दिसत आहेत. रणजी ट्रॉफीचे दोन दिवस सामने खेळवण्यात आले आहेत. या हंगामात रणजी ट्रॉफीचा उत्साह वाढला आहे. तरुण खेळाडू वरिष्ठांमध्ये आपली छाप पाडत आहेत. पहिला फेरी १५ ऑक्टोबर रोजी सुरू झाला. पहिल्या दिवशी सात शतके झळकावली गेली, तर दुसऱ्या दिवशी सहा शतके झळकावली गेली. पाच द्विशतकेही नोंदली गेली.

    बातमी सविस्तर वाचा...

  • 17 Oct 2025 10:36 AM (IST)

    17 Oct 2025 10:36 AM (IST)

    गेमर्ससाठी खुशखबर! गेममध्ये सुरु झाला Dhamaka Sale

    फ्री फायर मॅक्समध्ये धमाका सेल लाईव्ह झाला आहे. या सलदरम्यान फ्री फायर मॅक्स प्लेअर्सना प्रिन्सेस डार्कहार्ट बंडल आणि प्रिन्स डार्कहार्ट बॅकपॅक सारखे गेमिंग आयटम्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. फ्री फायर मॅक्स हा भारतातील पॉपुलर बॅटल रॉयल गेम आहे. या पॉपुलर बॅटल रॉयल गेममध्ये प्लेअर्सना वेगवेगळे इन-गेम आइटम्स मिळवण्याची संधी असते. हे गेमिंग आयटम्स मिळवण्यासाठी प्लेअर्सना इन-गेम करेंसी Diamonds खर्च करावे लागतात. हे डायमंड मिळवण्यासाठी प्लेअर्सना पैसे खर्च करावे लागतात. जर तुम्हाला गेममध्ये वस्तू खरेदी करताना Diamonds वाचवायचे असतील, तर गेममधील नवीनतम ईव्हेंट तुमच्यासाठी लाईव्ह आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेअर्स आकर्षक गेमिंग आयटम्स जिंकू शकतात.

  • 17 Oct 2025 10:29 AM (IST)

    17 Oct 2025 10:29 AM (IST)

    NDA चा विजय झाल्यास कोण होणार बिहारचा मु्ख्यमंत्री?

    बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ही निवडणूक विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी महत्त्वाचीच नव्हे तर प्रतिष्ठेचीही मानली जात आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यापासून बिहारच मुख्यमंत्री कोण होणार,याबाबतही चर्चांना जोर आला आहे. अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. राजधानी पटना येथील एका मीडिया चॅनेलच्या कार्यक्रमात बोलताना, एनडीएच्या विजयानंतर विधीमंडळ पक्ष बिहाराच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील, असं अमित शाहांनी म्हटलं आहे.

  • 17 Oct 2025 10:21 AM (IST)

    17 Oct 2025 10:21 AM (IST)

    एकीकडे ट्रम्प-पुतीनची चर्चा, तर झेलेन्स्की अमेरिकेत

    इस्रायल-हमास युद्धाच्या समाप्तीनंतर आणि शांतता करारानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांना जगातील कोणताही वाद सोडवण्याचा एक नवा आत्मविश्वास मिळाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनाही डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या आणि पुतिन यांच्यातील वाद सोडवतील अशी मोठी आशा आहे. म्हणूनच यावेळी वॉशिंग्टनमध्ये पोहोचलेल्या झेलेन्स्की यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. ते रशियन राष्ट्राध्यक्षांची तुलना अतिरेकी संघटना हमासशी करत आहेत. रशिया आणि युक्रेन युद्ध अनेक वर्षांपासून चालू आहे.

  • 17 Oct 2025 10:13 AM (IST)

    17 Oct 2025 10:13 AM (IST)

    आयुक्त संतोष खांडेकर 10 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

    जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक. १० लाखांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पालिकेच्या बांधकामाचे बिल अदा करण्याच्या बदल्यात कंत्राटदाराकडून लाच स्वीकारत असतांना एसीबीने कारवाई केली. या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी त्यांच्या मोतीबाग येथील शासकीय निवासस्थानी झडती घेत आहेत. या कारवाईने सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 17 Oct 2025 10:06 AM (IST)

    17 Oct 2025 10:06 AM (IST)

    आशिया कप 2025 मधून बीसीसीआयला झाला मोठा फायदा

    भारताच्या संघाने आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केले तर इतर संघाना एक वेळा पराभुत करुन एकही सामना न गमावता आशिया कप जिंकला आहे. पण त्यानंतर आशिया कप 2025 च्या ट्राॅफीवरुन मोठा वाद पाहायला मिळाला. अजूनपर्यत भारताच्या संघाला आशिया कप 2025 ट्राॅफी देण्यात आलेली नाही. टीम इंडियाने २०२५ चा आशिया कप ट्रॉफी जिंकला नसेल, पण या स्पर्धेचे आयोजन केल्याने बीसीसीआयला १०० कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

  • 17 Oct 2025 10:00 AM (IST)

    17 Oct 2025 10:00 AM (IST)

    आजच्या बाजारात सोनं-चांदीची चमक कायम!

    भारतात 17 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,943 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,864 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,707 रुपये आहे. भारतात 17 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,18,640 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,29,430 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 97,070 रुपये आहे. भारतात आज 17 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 188.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,88,900 रुपये आहे.

  • 17 Oct 2025 09:55 AM (IST)

    17 Oct 2025 09:55 AM (IST)

    ‘कांतारा चॅप्टर १’ च्या कमाईत १५ व्या दिवशी मोठा झटका

    ऋषभ शेट्टीचा नुकताच प्रदर्शित झालेला “कांतारा चॅप्टर १” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपवादात्मकरित्या चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत आणि या काळात, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे, शिवाय तो प्रचंड कमाईही करताना दिसत आहे. २०२२ च्या ब्लॉकबस्टर “कांतारा” च्या प्रीक्वलने पुन्हा एकदा भारतात आणि परदेशात नवे विक्रम मोडले आहेत. “कांतारा चॅप्टर १” ने रिलीजच्या १५ व्या दिवशी, तिसऱ्या गुरुवारी किती कमाई केली जाणून घेऊयात.

  • 17 Oct 2025 09:50 AM (IST)

    17 Oct 2025 09:50 AM (IST)

    पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदली

    Pune Police News: शहर पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा आणि वाहतूक विभागात अनेक अधिकारी बदलले गेले आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. बदल्यांमध्ये ६ गुन्हे शाखेचे निरीक्षक समाविष्ट आहेत. दरम्यान, वादग्रस्त ठरलेल्या कोंढवा आणि येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची बदली अनुक्रमे कंट्रोल आणि वाहतूक शाखेत करण्यात आली आहे.

  • 17 Oct 2025 09:45 AM (IST)

    17 Oct 2025 09:45 AM (IST)

    भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिका अ संघाची घोषणा

    भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे तर दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. 19 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार टेम्बा बावुमा याचा भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिका अ संघात समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बावुमाचा दक्षिण आफ्रिका अ संघात समावेश करण्यात आला नव्हता.

Web Title: Marathi breaking news today live updates politcal national international sports crime entertainment business breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 08:33 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live: राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार
1

Top Marathi News Today Live: राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार

Top Marathi News Today Live: गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे निधन
2

Top Marathi News Today Live: गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे निधन

Top Marathi News Today:  जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई, कुपवाडामध्ये दोन दहशतवादी ठार
3

Top Marathi News Today: जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई, कुपवाडामध्ये दोन दहशतवादी ठार

Top Marathi News Today: राष्ट्रीय संरक्षण अकादमीत 18 वर्षीय कॅडेटचा मृत्यू
4

Top Marathi News Today: राष्ट्रीय संरक्षण अकादमीत 18 वर्षीय कॅडेटचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.