• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Marathi Breaking News Today Live Updates Political Crime Sports 5

Top Marathi News Today: महाराष्ट्रात ‘या’ 16 ठिकाणी होणार मॉकड्रील अन् ब्लॅकआऊट

Marathi breaking live marathi- पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणता देश कोणाच्या बाजूने उभा राहील, यावर चर्चा सुरू झाली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 06, 2025 | 07:06 PM
Top Marathi News Today:  महाराष्ट्रात ‘या’ 16 ठिकाणी होणार मॉकड्रील अन् ब्लॅकआऊट

Photo credit- Team Navrashtra

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Marathi Breaking news live updates

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांना शांततेचा मार्ग स्वीकारण्याचा आणि लष्करी संघर्ष टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, युद्ध हा कोणत्याही परिस्थितीत योग्य पर्याय ठरू शकत नाही. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून, नागरिकांवर होणारे हल्ले अक्षम्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हल्ल्याच्या दोषींना कठोर शिक्षा व्हावी, याचे समर्थन करताना त्यांनी असेही सांगितले की, दोन्ही देशांनी तणाव वाढवण्याऐवजी संवाद व संयमाचे धोरण स्वीकारावे. दरम्यान, इराणनेही भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

 

The liveblog has ended.
  • 06 May 2025 04:57 PM (IST)

    06 May 2025 04:57 PM (IST)

    शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स १५५ अंकांनी घसरला

    जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे मंगळवारी (६ मे) भारतीय शेअर बाजार अस्थिर व्यापारात लाल रंगात बंद झाला. यामुळे, गेल्या तीन व्यापार सत्रांपासून बाजारात सुरू असलेला वरचा कलही थांबला. रिलायन्स, एचडीएफसी बँक आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये नफा बुकिंग झाल्यामुळे प्रमुख बेंचमार्क निर्देशांक निफ्टी ५० आणि सेन्सेक्समध्ये घसरण झाली.

  • 06 May 2025 04:24 PM (IST)

    06 May 2025 04:24 PM (IST)

    '100' दिवसाचा झालं, आता मुख्यमंत्र्यांचा '150' दिवसांचा कार्यक्रम

    100 दिवसांच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता 150 दिवसांचा 'विकसित महाराष्ट्र-2047' हा कार्यक्रम प्रशासनातील सुधारणांसाठी आज, मंगळवारी चौंडी (ता. जामखेड) येथे जाहीर केला. 6 मे ते 2 ऑक्टोबर, असा 150 दिवसांचा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमाची सविस्तर माहिती 7 मे रोजी 100 दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये यशस्वी झालेल्या विभागांचा सत्कार करताना देणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

  • 06 May 2025 04:05 PM (IST)

    06 May 2025 04:05 PM (IST)

    म्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळली

    पूंछ: जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. एक प्रवासी बसचे नियंत्रण सुटल्याने सांगरा येथील मानकोट भागात एका दरीत कोसळली आहे. ही बस इतक्या वेगाने दरीत कोसळली की, दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 40 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

  • 06 May 2025 03:25 PM (IST)

    06 May 2025 03:25 PM (IST)

    रस्ते अपघात पीडितांना आता मिळणार मोफत उपचार

    रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी केंद्र सरकारने मोठी मदत जाहीर केली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी (6 मे) देशभरातील रस्ते अपघातातील पीडितांसाठी कॅशलेस उपचार योजनेची घोषणा करणारी अधिसूचना जारी केली. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या राजपत्रित अधिसूचनेनुसार, या योजनेअंतर्गत, पीडित व्यक्ती अपघाताच्या तारखेपासून सात दिवसांपर्यंत कोणत्याही मान्यताप्राप्त रुग्णालयात जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार घेऊ शकते. ही योजना ५ मे २०२५ पासून लागू झाली आहे.

     

  • 06 May 2025 02:39 PM (IST)

    06 May 2025 02:39 PM (IST)

    'मी घाबरलो कारण...' शाहरुख खानने Met Gala 2025 मध्ये पदार्पणाचा अनुभव केला शेअर!

    मेट गाला २०२५ मध्ये पदार्पण केल्यानंतर, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची सर्वत्र चर्चा होत आहे. या नवीन लूकचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या खास फॅशन इव्हेंटसाठी शाहरुखने प्रसिद्ध भारतीय डिझायनर सब्यसाची यांनी डिझाइन केलेला पोशाख परिधान केला होता. त्याच्या लूकसोबतच, या सुपरस्टारने त्याच्या सौम्य उच्चार आणि आकर्षणाने परदेशी माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, शाहरुखचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने मेट गाला २०२५ मधील त्याच्या पदार्पणाबद्दलचा अनुभव शेअर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की अभिनेता सुरुवातीला खूप घाबरला.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by VOGUE India (@vogueindia)

  • 06 May 2025 02:33 PM (IST)

    06 May 2025 02:33 PM (IST)

    या' वाहनांमध्ये इंधन बंदी

    तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्याचा विचार असून, लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व इतर अधिकारी उपस्थित होते.

  • 06 May 2025 02:10 PM (IST)

    06 May 2025 02:10 PM (IST)

    Elon Musk ने X वर पुन्हा बदललं आपलं नाव!

    एलन मस्क सतत सोशल मीडिया अकाऊंट एक्सरील त्याच्या प्रोफाईलचं नाव बदलत असतो. आता मस्कने पुन्हा एकदा त्याच्या प्रोफाईलचं नाव बदलून 'गोर्कलॉन रस्ट' असं ठेवलं आहे. खरं तर हे नाव पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत आणि प्रत्येकजण या नवीन नावाचा अर्थ काय आहे याचा अंदाज लावत आहेत. गेल्या सहा महिन्यांत मस्कने तिसऱ्यांदा त्याचे नाव बदलले आहे. यापूर्वी त्याने डिसेंबर 2024 मध्ये त्याच्या एक्स प्रोफाईलचं नाव बदलून 'केकियस मॅक्सिमस' असं ठेवलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी 2025 रोजी त्याने त्याच्या एक्स प्रोफाईलचं नाव बदलून 'हॅरी बोल्झ' असं ठेवलं होतं. यानंतर आता मस्कने पुन्हा एकदा त्याच्या एक्स प्रोफाईलचं नाव बदललं आहे.

  • 06 May 2025 02:10 PM (IST)

    06 May 2025 02:10 PM (IST)

    पूंछमध्ये बस अपघाात २ जणांचा मृत्यू ३५ जण गंभीर जखमी

    जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथे मंगळवारी (६ मे) एक भीषण रस्ता अपघात झाला. बस उलटल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर ३५ जण जखमी झाले आहेत. पूंछ जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयाचे बीएमओ मोहम्मद अशफिक यांनी सांगितले की, दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि ३५ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

  • 06 May 2025 02:09 PM (IST)

    06 May 2025 02:09 PM (IST)

    जपानला मागे टाकेल, भारत ‘या’ वर्षापर्यंत तिसरी सर्वात मोठी…

    आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या एप्रिल २०२५ च्या ताज्या जागतिक आर्थिक दृष्टिकोनानुसार, भारत २०२५ मध्ये जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. २०२५ (आर्थिक वर्ष २६) साठी भारताचा नाममात्र जीडीपी ४१८७.०१७ अब्ज डॉलर असण्याची अपेक्षा आहे, जो जपानच्या संभाव्य जीडीपीपेक्षा किंचित जास्त आहे, जो अंदाजे $४१८६.४३१ अब्ज आहे. २०२४ पर्यंत, भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती परंतु आयएमएफच्या ताज्या अंदाजानुसार, चालू वर्षात ती चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे.

  • 06 May 2025 01:11 PM (IST)

    06 May 2025 01:11 PM (IST)

    चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्या- सुप्रीम कोर्टाचे आदेश

    गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता मुहूर्त लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला येत्या चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

  • 06 May 2025 12:37 PM (IST)

    06 May 2025 12:37 PM (IST)

    महाराष्ट्रात ‘या’ 16 ठिकाणी होणार मॉकड्रील अन् ब्लॅकआऊट,

    पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ७ मे रोजी २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत. या सरावाचा उद्देश नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि नागरी संरक्षण तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी प्रशिक्षित करणे आहे. या सरावात, नागरिकांना हल्ल्यादरम्यान सुरक्षित राहण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. १९७१ नंतरचा हा भारतातील पहिलाच मोठा नागरी संरक्षण मॉक ड्रिल असणार आहे. मॉक ड्रिल म्हणजे नक्की काय? सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी नेमकं काय करावे? तसेच महाराष्ट्राच मॉक ड्रिल कोणकोणत्या ठीकाणी होणार आहे?

    सविस्तर बातमीसाठी- 

  • 06 May 2025 12:33 PM (IST)

    06 May 2025 12:33 PM (IST)

    विधानसभा उपाध्यक्षांचा गुन्हेगारांसोबत वाढदिवस साजरा

    यानंतर देखील अजित पवार गटाचे नेते व विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी गुन्हेगारासोबत वाढदिवस साजरा केला आहे. आण्णा बनसोडे यांना गुंड आकाश उर्फ आक्या बॉण्ड उर्फ सुमित मोहोळ याने थेट केक भरवला आहे.

  • 06 May 2025 12:32 PM (IST)

    06 May 2025 12:32 PM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच वाढ

    महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून खुशखबर मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच वाढ होईल, अशी घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.महागाई भत्ता ४६ टक्क्यांवरून ५३ टक्के होण्याची शक्यता आहे. माणगावमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली. सरनाईकांच्या घोषणेनंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदचे वातावरण आहे.

  • 06 May 2025 12:28 PM (IST)

    06 May 2025 12:28 PM (IST)

    महाराष्ट्रात ‘या’ 16 ठिकाणी होणार मॉकड्रील

    पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ७ मे रोजी २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत. या सरावाचा उद्देश नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि नागरी संरक्षण तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी प्रशिक्षित करणे आहे. या सरावात, नागरिकांना हल्ल्यादरम्यान सुरक्षित राहण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. १९७१ नंतरचा हा भारतातील पहिलाच मोठा नागरी संरक्षण मॉक ड्रिल असणार आहे.

    महाराष्ट्रातील 16 ठिकाणी होणार मॉकड्रील-

    १. मुंबई
    २. उरण-जेएनपीटी
    ३. तारापूर
    ४. पुणे
    ५. ठाणे
    ६. नाशिक
    ७. थळ-वायशेत
    ८. रोहा-धाटाव-नागोठाणे
    ९. मनमाड
    १०. सिन्नर
    ११. पिंपरी-चिंचवड
    १२. संभाजीनगर
    १३. भुसावळ
    १४. रायगड
    १५. रत्नागिरी
    १६. सिंधुदुर्ग

  • 06 May 2025 11:53 AM (IST)

    06 May 2025 11:53 AM (IST)

    राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह गारपीट

    गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. कधी कडक उन्ह तर कधी अवकाळी पाऊस होत असल्याचे पाहिला मिळत आहे. त्यात महाराष्ट्रातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याचे दिसून आले. या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भात या पावसाने शेतीच्या पिकांसह आंबा-केळी-द्राक्ष बागांचेही नुकसान झाले आहे.

  • 06 May 2025 11:43 AM (IST)

    06 May 2025 11:43 AM (IST)

    भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होणार की टळणार? AI ने दिलं उत्तर

    भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल तणाव आता चर्चेचा विषय बनला आहे. युद्ध झालं तर काय होईल आणि युद्ध न झाल्यास पाकिस्तानला कसा धडा शिकवायचा याबाबत आता प्रत्येकजण आपलं मत मांडत आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत पूर्ण प्रयत्न करत आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेले हे सर्व प्रश्न आता AI ला विचारण्यात आले आहेत. भारत - पाकिस्तानच्या युद्धाच्या प्रश्नांवर आता AI ने उत्तर दिलं आहे. युद्ध झालं तर काय होऊ शकतं आणि युद्ध टाळण्यासाठी कोणते प्रयत्न केले जाऊ शकतात, याबाबत AI ने माहिती दिली आहे. बातमी वाचा

  • 06 May 2025 11:27 AM (IST)

    06 May 2025 11:27 AM (IST)

    मॉक ड्रिलपूर्वी राष्ट्रीय समन्वयासाठी बैठक सुरु

    नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली आहे. नॉर्थ ब्लॉकमध्ये गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षेसंदर्भात उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. बैठकीला सर्व राज्यांचे मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी आणि आपत्कालीन यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. देशभरात उद्या म्हणजे ७ मे रोजी होणाऱ्या मॉक ड्रिलपूर्वी राष्ट्रीय समन्वयासाठी ही बैठक घेतली जात आहे. हवाई हल्ला, क्षेपणास्त्र, सायरन, ब्लॅकआउट आणि स्थलांतर यासारख्या घटकांचा आढावा घेतला जात आहे.

  • 06 May 2025 11:21 AM (IST)

    06 May 2025 11:21 AM (IST)

    राज्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यांचा कहर

    महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह गारपीट होत असून, या अवकाळी पावसामुळे शेतीसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः विदर्भातील अनेक जिल्ह्यांत गेल्या तीन दिवसांपासून पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा प्रकोप सुरू आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाने हजेरी लावली असून, जळगाव, जामनेर आणि पारोळा तालुक्यांमध्ये सोमवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने धडक दिली. मराठवाड्यात देखील अवकाळी पावसामुळे खरीप हंगामाच्या तयारीला अडथळा निर्माण झाला आहे.या पावसामुळे उभ्या पिकांवर तसेच काढणीस आलेल्या फळबागांवर मोठा परिणाम झाला असून, प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी जोर धरत आहे.

  • 06 May 2025 11:01 AM (IST)

    06 May 2025 11:01 AM (IST)

    यूक्रेनमध्ये नागरिकांना सतर्क करण्यासाठी केला जातोय या App चा वापर

    अनेक देश असे आहेत जिथे युद्धादरम्यान नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन वाजवलं जातं. मात्र युक्रेनमध्ये नागरिकांना अलर्ट करण्यासाठी अ‍ॅपचा वापर केला जातो. गेल्या 3 वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. या ठिकाणी नागरिकांना अलर्ट करण्यासाठी अ‍ॅपचा वापर केला जातो. रशियाकडून केल्या जाणाऱ्या हवाई हल्ल्यादरम्यान नागरिकांना अलर्ट करण्यासाठी यूक्रेनमध्ये Air Alarm अ‍ॅपचा वापर केला जातो.

  • 06 May 2025 11:00 AM (IST)

    06 May 2025 11:00 AM (IST)

    7 मे ला भारतात वाजणार हवाई हल्ल्याचे सायरन

    मिळालेल्या माहितीनुसार, उद्या 7 मे रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या मॉक ड्रिल दरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये हवाई हल्ल्यावेळी अलर्ट करणारे सायरन लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारच्या हवाई हल्ल्यादरम्यान हे सायरन वाजू लागतात, ज्यामुळे नागरिकांना अलर्ट केलं जातं आणि नागरिक सुरक्षित ठिकाणी लपू शकतात. हवाई युद्धादरम्यान नागरिकांची सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी हे सायरन अत्यंत महत्त्वाची भुमिका बजावतात. अशी माहिती समोर आली आहे की, केंद्रीय गृह मंत्रालयने अनेक राज्यांमध्ये बुधवार 7 मे रोजी सिविल डिफेंस ड्रिल आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.

  • 06 May 2025 10:00 AM (IST)

    06 May 2025 10:00 AM (IST)

    डीएसपी साहेबांना Rohit Sharma ची अनोखी भेट

    मुंबई आणि गुजरात सामन्यापूर्वी, जीटीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला एक खास भेट देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून  सोमवारी एक खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

    सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  • 06 May 2025 09:50 AM (IST)

    06 May 2025 09:50 AM (IST)

    सोन्याला पुन्हा मिळाली नवी झळाळी, चांदीच्या दरात घसरण

    6 मे रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,574 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,776 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,181 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 87,760 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 95,740 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,810 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 96.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 96,900 रुपये आहे.

  • 06 May 2025 09:48 AM (IST)

    06 May 2025 09:48 AM (IST)

    केवळ 6,499 रुपयांच्या किंमतीत Lava चा Smartphone लाँच

    टेक कंपनी लावाने भारतात Lava Yuva Star 2 हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन ऑक्टा-कोर UNISOC प्रोसेसर, 5,000mAh बॅटरी आणि Android 14 Go प्लॅटफॉर्म सारख्या फीचर्सने सुसज्ज आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, फोन ब्लोटवेयर-फ्री एक्सपीरियंस ऑफर करणार आहे, ज्यामध्ये कोणताही प्री-इंस्टॉल्ड अ‍ॅप नाही. यामुळे युजर्सना क्लीन आणि सेफ यूजर इंटरफेस मिळणार आहे.

  • 06 May 2025 09:33 AM (IST)

    06 May 2025 09:33 AM (IST)

    सोन्याला पुन्हा मिळाली नवी झळाळी, चांदीच्या दरात घसरण

    6 मे रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,574 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,776 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,181 रुपये आहे. 5 मे रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,550 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,754 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,163 रुपये होता.

  • 06 May 2025 09:32 AM (IST)

    06 May 2025 09:32 AM (IST)

    पुण्यात 2 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, सावत्र भावाचं अश्लील कृत्य

    पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. धनकवडी आणि कोंढवा या भागातून या घटना उघडकीस आल्या आहेत. धनकवडीत एका तरूणाने नऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. धक्कादायक म्हणजे पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य करून तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. आईने केलेल्या तक्रारीवरून २१ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय

  • 06 May 2025 08:57 AM (IST)

    06 May 2025 08:57 AM (IST)

    Virat kohli टॉपमध्ये तर गोलंदाजीत Prasidhhi Krishnaची कमाल

    ज्या प्रकारे आजकाल देशाचा सेन्सेक्स काही दिवस वाढतोय तर काही दिवस घसरतोय. त्याचप्रमाणे, आयपीएलमध्ये, ऑरेंज-पर्पल कपची शर्यत प्रत्येक सामन्यासोबत चढ-उतारांमधून जात आहे. दोन आठवड्‌यांच्या चढ-उतारात परिस्थिती पुन्हा बदलली आता विराट कोहलीने तो मान पुन्हा एकदा मिळवला. शुक्रवारी गुजरात टायटन्सचा सलामीवीर बिसाई सुदर्शनने थोडक्यात आघाडी घेतली. पण एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सीएसकेविरुद्ध आरसीबीकडून किंग कोहलीने शानदार खेळी करत आघाडी परत मिळवली.

Web Title: Marathi breaking news today live updates political crime sports 5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 08:55 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News:  महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडे्स एका
1

Maharashtra Breaking News: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडे्स एका

Maharashtra Breaking News Today: MIMशी युतीवरून भाजपचा युटर्न; फडणवीसांचा संताप
2

Maharashtra Breaking News Today: MIMशी युतीवरून भाजपचा युटर्न; फडणवीसांचा संताप

Maharashtra Breaking News Today: सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
3

Maharashtra Breaking News Today: सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nagpur Election 2026 : “जोपर्यंत तुमचे राजकीय नेते नाही तोपर्यंत बुलडोझर चालणार..! औवेसींचा मुस्लीम समाजाला कानमंत्र

Nagpur Election 2026 : “जोपर्यंत तुमचे राजकीय नेते नाही तोपर्यंत बुलडोझर चालणार..! औवेसींचा मुस्लीम समाजाला कानमंत्र

Jan 11, 2026 | 03:55 PM
‘तो चॅप्टर आता संपला आहे…’ युजवेंद्र चहलने धनश्रीसोबतच्या घटस्फोटाबरोबरच आरजे महवशसोबतच्या डेटिंगवरही दिली प्रतिक्रिया

‘तो चॅप्टर आता संपला आहे…’ युजवेंद्र चहलने धनश्रीसोबतच्या घटस्फोटाबरोबरच आरजे महवशसोबतच्या डेटिंगवरही दिली प्रतिक्रिया

Jan 11, 2026 | 03:50 PM
शिक्षकांच्या बदलीचा मुहूर्त गवसला! राज्यातील जि.प.च्या १२ हजार शिक्षकाचा समावेश, ग्राम विकास विभाग अ‍ॅक्टिव्ह मोडवर

शिक्षकांच्या बदलीचा मुहूर्त गवसला! राज्यातील जि.प.च्या १२ हजार शिक्षकाचा समावेश, ग्राम विकास विभाग अ‍ॅक्टिव्ह मोडवर

Jan 11, 2026 | 03:44 PM
Cyber Job Scam Abroad: परदेशातील जादा पगाराच्या नोकरीचे आमिष, सायबर फ्रॉड न केल्यास केले जाते शोषण

Cyber Job Scam Abroad: परदेशातील जादा पगाराच्या नोकरीचे आमिष, सायबर फ्रॉड न केल्यास केले जाते शोषण

Jan 11, 2026 | 03:43 PM
Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीनंतर लहान मुलांचं बोरन्हाण का केलं जातं? जाणून घ्या धार्मिक आणि शास्त्रीय कारणे

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीनंतर लहान मुलांचं बोरन्हाण का केलं जातं? जाणून घ्या धार्मिक आणि शास्त्रीय कारणे

Jan 11, 2026 | 03:43 PM
मोठी बातमी! मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! एकनाथ शिंदेनी फिरवला गेम; ‘या’ बड्या नेत्याचा शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश

मोठी बातमी! मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! एकनाथ शिंदेनी फिरवला गेम; ‘या’ बड्या नेत्याचा शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश

Jan 11, 2026 | 03:42 PM
Mahayuti Manifesto: मुंबईतील पाणी समस्या, बेस्टमध्ये महिलांना ५०% सवलत; महायुतीच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?

Mahayuti Manifesto: मुंबईतील पाणी समस्या, बेस्टमध्ये महिलांना ५०% सवलत; महायुतीच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?

Jan 11, 2026 | 03:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

Jan 11, 2026 | 11:38 AM
मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीआधी मराठी एकीकरण समितीचा मराठी वचननामा जाहीर

मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीआधी मराठी एकीकरण समितीचा मराठी वचननामा जाहीर

Jan 11, 2026 | 11:32 AM
Latur Elections : “अमित देशमुखांकडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने केवळ आरोप करतायत”- अजित पवार

Latur Elections : “अमित देशमुखांकडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने केवळ आरोप करतायत”- अजित पवार

Jan 10, 2026 | 08:13 PM
Jalgaon Election : प्रचारादरम्यान महिला शिवीगाळ करत असल्याच्या व्हिडिओवर भंगाळे यांचे स्पष्टीकरण

Jalgaon Election : प्रचारादरम्यान महिला शिवीगाळ करत असल्याच्या व्हिडिओवर भंगाळे यांचे स्पष्टीकरण

Jan 10, 2026 | 08:09 PM
Maharashtra Politics :  मीरा-भाईंदरमध्ये राजकीय भूकंप ; भाजपचे माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल

Maharashtra Politics : मीरा-भाईंदरमध्ये राजकीय भूकंप ; भाजपचे माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल

Jan 10, 2026 | 08:05 PM
Thane :  निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली

Thane : निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली

Jan 10, 2026 | 08:00 PM
Muncipal Corporation Elections : “लातूर शहर दहशत मुक्त करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या” – अमित देशमुख

Muncipal Corporation Elections : “लातूर शहर दहशत मुक्त करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या” – अमित देशमुख

Jan 10, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.