Maharashtra Breaking News Updates Today:
युद्धामुळे गॅस तुटवड्याचे संकट आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या (LPG) वितरणात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार, आता नागरिकांना पूर्ण वजनाचा सिलिंडर मिळण्याऐवजी तो कमी वजनाचा मिळणार आहे. १४.२ ऐवजी ८ ते १० किलो गॅस सध्या घरगुती वापरासाठी १४.२ किलो वजनाचा सिलिंडर पुरवला जातो. मात्र, नव्या आदेशानुसार आता सिलिंडर तोच राहणार असला तरी, त्यात केवळ ८ ते १० किलो गॅस भरण्याचे निर्देश गॅस कंपन्यांना देण्यात आले आहेत. सध्या उपलब्ध असलेला १४.२ किलोचा साठा संपल्यानंतर ही नवीन पद्धत लागू केली जाईल. ग्राहकांकडून केवळ त्यातील गॅसच्या वजनानुसारच पैसे आकारले जाणार आहेत.
23 Mar 2026 06:56 PM (IST)
Complete your higher education : सध्याच्या काळात शिक्षण बरंच खर्चिक बनत चाललं आहे. आता परीक्षा झाल्या लवकरच निकला लागणार आहे. त्यानंतर पालकांसह विद्यार्थ्यांनाही पुढील शिक्षण कसं होणार याबाबत चिंता सतावत असते. निकाल काय लागेल आणि पुढील शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा, हे पाहण्यासाठी लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक वाट पाहत आहेत. कॉलेजची फी, वसतिगृह आणि पुस्तकांच्या विचाराने अनेक घरांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पण चांगली बातमी अशी आहे की, सरकारने विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी एक अतिशय विशेष योजना सुरू केली आहे: स्टुडंट क्रेडिट कार्ड योजना (BSCC). नुकतेच, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या योजनेबद्दल एक मोठी माहिती दिली. ही योजना आता लाखो विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील शिक्षण सहजपणे पूर्ण करण्यास मदत करणार आहे.
23 Mar 2026 06:44 PM (IST)
मध्यपूर्वेतील (Middle East) युद्धाच्या वणव्यात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणवरील हल्ले 5 दिवसांसाठी स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर, इराणने यावर आपली पहिली आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “इराणने दिलेल्या कठोर इशाऱ्यामुळेच अमेरिका घाबरली असून त्यांनी आपल्या ऊर्जा पायाभूत सुविधांवरील (Energy Infrastructure) हल्ल्याची योजना गुंडाळली आहे,” असा दावा काबूलमधील इराणच्या दूतावासाने केला आहे.
23 Mar 2026 06:36 PM (IST)
गुरुग्राममध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या कथित लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तीन वर्षांच्या चिमुरडीवर ज्या आरोपीने लैंगिक शोषण केलं त्याच्याच शेजारी बसवून पिडितेची चौकशी करणाऱ्या हरियाणा पोलीसांवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने चांगलेच ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणाची चौकशी करताना हरियाणा पोलीसांनी दाखवलेली असंवेदनशीलतेवर न्यायालयाने संताप व्यक्त केला. न्यायालयाने याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. पोलीसांचं हे वागणं माणूसकीला धरुन नाही त्याचबरोबर कायद्यात हे वागणं बसत नाही असं देखील न्यायालयाने सुनावलं आहे.
23 Mar 2026 06:29 PM (IST)
पुणे: उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. एलटीटी–नागपूर, पुणे–नागपूर आणि सीएसएमटी–मडगाव या मार्गांवर एकूण ८ अतिरिक्त विशेष फेऱ्या चालविण्यात येणार (Indian Railway) असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
23 Mar 2026 06:20 PM (IST)
1300 IAS Posts Vacant : देशाचा कारभार चालवण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची कमतरता स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या आयएएस संवर्गात १,३०० पदे रिक्त आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ८१ अधिकाऱ्यांची कमतरता आहे. लहान राज्यांमध्येही परिस्थिती गंभीर असून, केरळमध्ये ७२ अधिकाऱ्यांची कमतरता आहे. या परिस्थितीचा परिणाम केंद्र आणि राज्य सरकार या दोघांच्याही प्रशासकीय क्षमतेवर होत आहे.
23 Mar 2026 06:15 PM (IST)
Donald Trump major statement on Iran war: मध्यपूर्वेतील (Middle East) पेटलेला वणवा विझवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गेल्या 24 दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धानंतर, ट्रम्प यांनी इराणवरील सर्व लष्करी हल्ले पुढील 5 दिवसांसाठी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. या काळात उभय देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी उच्चस्तरीय चर्चा केली जाणार असून, या चर्चेच्या निष्कर्षावर पुढील रणनीती अवलंबून असेल.
23 Mar 2026 06:11 PM (IST)
Impact Player Rule IPL 2026 : IPL हंगामात नेहमची वेगवेगळे वाद चर्चेत राहिलेले असतात. आताचा २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी क्रिकेट जगतात पुन्हा एकदा एका जुन्या वादाने आपलं तोंड वर काढले आहे. तो वाद म्हणजे ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याने या नियमावर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याने थेट या मुद्द्यावर वक्तव्य करत अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी होत असल्याचे विधान केलं आहे. नेमकं काय प्रकरण ?
23 Mar 2026 06:07 PM (IST)
ICC World Cup 2027: नुकतीच टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा पार पडली आहे. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकपवर आपले नाव कोरले आहे. आता सर्व क्रिकेट चाहत्यांना 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेची आतुरता लागली आहे. मात्र त्याबाबत काही महत्वाची बातमी समोर येत आहे.
23 Mar 2026 05:55 PM (IST)
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान घडलेल्या नाट्यमय घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे. ज्या सदस्याच्या अपहरणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी धरपकड आणि अटकसत्र राबवले होते, त्या बापू शिंदे यांनी स्वतः समोर येत “माझे अपहरण झालेच नाही” असा खळबळजनक खुलासा केला आहे.
23 Mar 2026 05:41 PM (IST)
सध्याच्या काळात शिक्षण बरंच खर्चिक बनत चाललं आहे. आता परीक्षा झाल्या लवकरच निकला लागणार आहे. त्यानंतर पालकांसह विद्यार्थ्यांनाही पुढील शिक्षण कसं होणार याबाबत चिंता सतावत असते. निकाल काय लागेल आणि पुढील शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा, हे पाहण्यासाठी लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक वाट पाहत आहेत. कॉलेजची फी, वसतिगृह आणि पुस्तकांच्या विचाराने अनेक घरांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पण चांगली बातमी अशी आहे की, सरकारने विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी एक अतिशय विशेष योजना सुरू केली आहे: स्टुडंट क्रेडिट कार्ड योजना (BSCC). नुकतेच, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या योजनेबद्दल एक मोठी माहिती दिली. ही योजना आता लाखो विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील शिक्षण सहजपणे पूर्ण करण्यास मदत करणार आहे.
23 Mar 2026 05:13 PM (IST)
पुणे-नाशिक महामार्गावर मंचरजवळील एकलहरे (ता.आंबेगाव) येथे रविवारी (दि.२२) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि सासू अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत.
23 Mar 2026 04:50 PM (IST)
भारतीय वायुसेना आणि राजस्थान इंटेलिजन्सने एक संयुक्त ऑपरेशन करून एअरफोर्स स्टेशनवर तैनात असणाऱ्या एका व्यक्तीला पाकिस्तानसाठी गुप्तहेरी करण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. हा आरोपी वायुसेनेचे महत्वाची माहिती पाकिस्तानी हँडलर्सला पुरवत असल्याचे समोर आले आहे.आरोपी मूळचा उत्तर प्रदेशकहा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. तो आसाममधील एअरफोर्स स्टेशनवर कार्यरत असल्याचे समजते आहे. आरोपी गेल्या तीन वर्षांपासून भारतीय वायुसेनेशी संबंधित माहिती पाकिस्तानी हँडलर्सला देण्याचे काम करत होता. यामध्ये बिकानेरमधील नाल एअरपोर्टचा देखील समावेश आहे.
23 Mar 2026 04:45 PM (IST)
एप्सटीन फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव येणे हे गंभीर असून परवानगी नाकारली तरीही आम्ही संघ कार्यालयावर मोर्चा काढणारच असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.
23 Mar 2026 04:40 PM (IST)
प्रवाशांशी सौजन्याने वागावे, कोणत्याही परिस्थितीत भाडे नाकारू नये आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांना दिला. कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुल सभागृहात सोमवारी आयोजित बैठकीत हा संदेश देण्यात आला.
23 Mar 2026 04:30 PM (IST)
मध्यपूर्वेतील युद्धाचा पडसाद आता दक्षिण आशियात उमटू लागले आहेत. श्रीलंकेने इराणच्या जहाजांना आणि नागरिकांना मदत केल्यानंतर अमेरिकेने दक्षिण आशियात आपली सक्रियता वाढवली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे विशेष राजदूत सर्गियो गोर सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आले आहे. त्यांच्या या दौऱ्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले असून भारतही यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. इराणच्या मुद्द्यावरुन अमेरिका-श्रीलंकेत तणाव निर्माण झाला होता. यामुळे सर्गियो यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
23 Mar 2026 04:25 PM (IST)
महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत लोकनेते पुंडलिकशेठ म्हात्रे कामगार संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे.महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात कंत्राटी कामगारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असतानाही त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. समान काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन द्यावे, वेतन दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत थेट बँक खात्यात जमा करावे, तसेच ओव्हरटाइमचा मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कंत्राटदार व सुपरवायझरकडून होणारे शोषण तात्काळ थांबवावे, कचरा वेचक, सफाई कर्मचारी आणि ड्रेनेज विभागातील कामगारांना हातमोजे, मास्क, बूट व गणवेश यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने (PPE किट) उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
23 Mar 2026 04:20 PM (IST)
नेरळ येथील विद्या विकास शाळेचा विद्यार्थी असलेल्या हिरेन राम हिसाळके याने आज जागतिक हवामान शास्त्र दिनाच्या निमित्ताने सायकलफेरी काढून विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.सलग तिसऱ्या वर्षी हा प्रयोग हिरेन याने केला असून शालेय विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. 1950 साली जागतिक हवामानशास्त्र संघटना स्थापन झाली. स्थानिक हवामानाचा संबंध जागतिक पातळीवर नैसर्गिक बदलांशी असतो हे आपल्या ध्यानात यावे हवामानाचे महत्त्व समजावे तसेच याविषयी जाणीव आणि जागरूकता निर्माण व्हावी.या उद्देशाने 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन आजच्या युगात ग्लोबल वॉर्मिग चा धोका लक्षात घेऊन विचारमंथन करण्यावर शास्त्रज्ञ भर देत आहेत.कर्जत तालुक्यातील नेरळ गावातील विद्या विकास मंदिर शाळेचं विद्यार्थी असलेल्या हिरेन राम हिसाळके हा भविष्यात भेडसावणाऱ्या ग्लोबल वॉर्मिग चे धोक्याबाबत जनजागृती करीत असतो.
23 Mar 2026 04:15 PM (IST)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे सुरेश इंजले ( रा विकासनगर कडवई) नामक इसमाने कडवई बाजारपेठ येथे असलेल्या फरिदा कमाल वागळे या महिलेच्या घरासमोर उभ्या असणाऱ्या कारची तोडफोड केली . सदरची कार ही हर्षद मोडक नामक इसमाच्या मालकीची असल्याचे समजते . याबाबत संगमेश्वर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी सुरेश इंजले याच्यासह अन्य दोन अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .रविवार दिनांक २२ मार्च रोजी सकाळी साडेदहा च्या सुमारास सुरेश इंजले हा इसम हातामध्ये तलवार व लोखंडी रॉड घेऊन फरीदा वागळे यांच्या घरासमोर आला . त्यांच्या घरासमोर उभी असणारी होंडा सिटी कार क्रमांक एम येच ०२ ए वाय ८६०२ ही हर्षद मोडक यांच्या मालकीची आहे का अशी विचारणा केली . आणि त्या कारची लोखंडी रॉडच्या साह्याने तोडफोड केली.व निघून गेला .ही घटना पूर्ववैमन्सयातून झाली असल्याचे बोलले जात आहे . भरवस्तीत दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे .
23 Mar 2026 04:10 PM (IST)
ठाणेकरांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज, दिनांक २३ मार्च रोजी ठाणे महापालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मात्र यंदा एक वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. स्थायी समिती अद्याप गठीत न झाल्यामुळे हा अर्थसंकल्प थेट महासभेत सादर केला जात आहे. दरम्यान, काही नगरसेवकांनी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळण्याची आशा व्यक्त केली आहे. म्हणूनच यंदाचा अर्थसंकल्प ठाण्याच्या विकासासाठी किती महत्त्वाचा ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण सर्वसामान्य ठाणेकरांचा एकच सवाल आहे. या अर्थसंकल्पातून ठाणेकरांना नेमक्या कोणत्या सुखसोयी मिळणार? रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, आरोग्य सेवा, आणि पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांमध्ये काय नवे निर्णय घेतले जाणार, याची उत्सुकता वाढली आहे. मात्र ठाण्याच्या विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प ठरणार का, की फक्त आश्वासनांपुरताच मर्यादित राहणार? याचं उत्तर आजच्या सादरीकरणानंतर स्पष्ट होईल.
23 Mar 2026 03:50 PM (IST)
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळले सांगता येत नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय काही व्हिडिओ असे असताता की पाहू तळपायाची आग मस्तकात जाते, तर काही व्हिडिओ पाहून डोकं आपटून घेण्याची इच्छा होते. सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणाने धावत्या बाईकवर असे काही कृत्य केले आहे की पाहून लोक अचंबित झाले आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान वेगाने व्हायरल होत आहे.
23 Mar 2026 03:40 PM (IST)
आयपीएल २०२६ साठी मिचेल स्टार्क संघ शिबिरात कधी सामील होईल हे अस्पष्ट असल्याने दिल्ली कॅपिटल्स संघ पेचात सापडला आहे. काही दिवसांपूर्वीच एका वृत्तानुसार, हा धडाकेबाज वेगवान गोलंदाज, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांच्यासह, आगामी हंगामातील सुरुवातीचे काही सामने मुकणार आहे.
23 Mar 2026 03:35 PM (IST)
जंगलसमृद्ध जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीतच सद्यस्थिीतीत बांबूचा तीव तुटवडा निर्माण झाल्याने स्थानिक आदिवासींच्या पारंपरिक लघुउद्योगावर मोठा घाला बसला आहे. गत १५ दिवसांपासून कच्चा माल मिळत नसल्याने शेकडो कारागीर अक्षरशः हातावर हात धरून बसले आहेत. परिणामी त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
23 Mar 2026 03:30 PM (IST)
जगाच्या पाठीवर कुठेही संकट आले की, भारताचे ‘संकटमोचक’ धोरण पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मध्य-पूर्वेत इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या २४ दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जग एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. अशा परिस्थितीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज लोकसभेत देशाला संबोधित करताना भारतीयांच्या सुरक्षिततेबाबत सर्वात मोठा अपडेट दिला आहे. “युद्धग्रस्त भागातून आतापर्यंत ३ लाख ७५ हजार भारतीयांना आम्ही सुखरूप बाहेर काढले आहे,” असे सांगत पंतप्रधानांनी भारताच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली.
23 Mar 2026 03:21 PM (IST)
मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्षा(US-Israel Iran War) ला २३ दिवस उलटून गेले आहे. आता हे युद्ध एका अनपेक्षित वळणार येऊन पोहचले आहे. इस्रायलवर इराणने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला केला असून त्यावर स्पेनच्या पंतप्रधान पेड्रो सांचेझचा फोटो लावण्यात आला आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ आणि फोटो वेगाने व्हायरल होत आहे.
23 Mar 2026 02:40 PM (IST)
PM Modi Live: पश्चिम आशियात युद्धामुळे परिस्थिती खूपच बिघडली आहे. या संकटाला तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे. आखाती देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांवर वाईट परिणाम होत आहेत. या युद्धामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धामुळे भारतासमोरही मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. या युद्धाचा भारताच्या नागरिकांसह अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहेत.” अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली.
23 Mar 2026 02:35 PM (IST)
पालघर/ संतोष पाटील : पालघर जिल्ह्यातील बोईसर-तारापूर एमआयडीसी परिसरात औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बोईसर येथील तारापूर एमआयडीसीतल्या प्लॉट क्रमांक डी-18 वरील ‘आरती फार्मा लॅब’ या कंपनीत काल (रविवार) रात्री उशिरा धोकादायक वायू गळतीची घटना घडली.
23 Mar 2026 02:30 PM (IST)
US Iran War News in Marathi : तेहरान/वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील अमेरिका इराण युद्धा(US Iran War)ने आता सध्या अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिका किंवा इराण कोणीही युद्धातून माघारा घेण्यास तयार नाही. दोन्ही देशांकडून सातत्याने हवाई हल्ले सुरु आहे. या हल्ल्यात दोन्ही देशांचे प्रचंड लष्करी नुकसान झाले आहे. या हल्ल्यांदरम्यानच इराणने एक खळबळजनक दावा केला आहे. इराणने अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली फायटर जेट F-35 पाडल्याचा दावा केला होता. मात्र अमेरिकेने हा दावा फेटाळून लावला आहे.
23 Mar 2026 02:25 PM (IST)
महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत म्हणजेच एसटीच्या ताफ्यात नव्या पर्वाची सुरुवात होत आहे.‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या, २४ मार्च रोजी विधिमंडळाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.
23 Mar 2026 02:20 PM (IST)
टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लवकरच आई होणार असून, त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर आपल्या प्रेग्नन्सीची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. पती विवेक दहिया सोबत बेबी बंप फ्लॉन्ट करत या जोडप्यांनी फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले होते. तसेच त्यांनी नव्या यूट्यूब चॅनलचीही घोषणा केली होती.
23 Mar 2026 02:16 PM (IST)
आज आयपीएल केवळ एक क्रिकेट लीग राहिलेली नाही, तर ती एक प्रमुख व्यावसायिक मॉडेल बनली आहे. २०२५ च्या एका अहवालानुसार, आयपीएल संघांचे स्पॉन्सरशिपचे (Sponsorship) उत्पन्न ₹१,००० कोटींहून अधिक होण्याचा अंदाज आहे. यावरून असे दिसून येते की, कंपन्या आता आपल्या ब्रँडच्या प्रचारासाठी क्रिकेटला सर्वोत्तम माध्यम मानत आहेत.
23 Mar 2026 02:10 PM (IST)
Railway Recruitment : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवणे देशातील लाखो तरुणांचे स्वप्न असतं. रेल्वेतील विविध पदांसाठी वेळोवेळी भरती प्रक्रिया राबवली जाते. मात्र, आता रेल्वे बोर्डाने ‘कोच अटेंडंट’ या महत्त्वाच्या पदासाठीच्या शैक्षणिक पात्रतेत मोठा बदल केला आहे. प्रवाशांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
23 Mar 2026 02:06 PM (IST)
इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यापासून सर्वत्र तेल आणि एलपीजीचा तुटवडा निर्माण होत आहे. भारत देखील यामध्ये सामील आहे. स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई आणि पुरवठा विस्कळीत होण्याची भीती यांसारख्या चिंतांच्या पार्श्वभूमीवर, एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील सध्या सुरू असलेल्या तीव्र संघर्षामुळे पर्शियन आखातात अडकून पडलेली दोन भारतीय जहाजे ‘जग वसंत’ आणि ‘पाइन गॅस’ आता ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ सुरक्षितपणे ओलांडू लागली आहेत.
23 Mar 2026 02:00 PM (IST)
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि ‘पीटीआय’ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान (Imran khan) सध्या रावळपिंडीच्या अदियाला जेलमध्ये बंद आहेत. मात्र, तुरुंगाच्या भिंतीही त्यांचा आवाज दाबू शकलेल्या नाहीत. नुकताच ईदच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या मुलांशी फोनवरून संवाद साधला आणि या संवादादरम्यान त्यांनी पाकिस्तानी न्यायव्यवस्थेवर जे ताशेरे ओढले आहेत, त्याने संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. “न्यायाधीशांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी आणि आत्मा विकला आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
23 Mar 2026 01:55 PM (IST)
सासवडचे मंडल कृषी अधिकारी अमोल सुनील सुतार याला शेतकऱ्यांना कृषी अनुदान देण्याच्या प्रक्रियेत लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून पकडले आहे. त्यामुळे लाच मागण्यात आता कृषी विभाग पाठीमागे नाही हे उघड झाले आहे. पुरंदरला लाचखोर प्रवृत्ती वाढत चालली आहे. शेतकऱ्याने केलेल्या धाडसामुळे कृषी विभागातील भ्रष्टाचाराचे जाळे उघड होण्यास मदत होणार आहे. पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा सर्व ठिकाणी सामान्य नागरिकांना वर्षानुवर्षे अशा लोकांचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड कधी थांबणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
23 Mar 2026 01:50 PM (IST)
भोरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भोर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा अखेर बिगुल वाजला आहे. भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या सरपंच आणि सदस्य पदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये ९ सरपंच आणि ३४ सदस्य अशा एकूण ४३ जागांसाठी येत्या २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
23 Mar 2026 01:45 PM (IST)
पॅनासोनिक लाइफ सोल्यूशन्स इंडियाने भारतात आपली नवीन व्हीएल-व्हीक्यू सिरीज एसआयपी आधारित आयपी व्हिडिओ इंटरकॉम सिस्टम लाँच केली. आधुनिक निवासी संकुले आणि मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये सुरक्षा, संवाद आणि प्रवेश व्यवस्थापन अधिक सुगम करण्याचा या सिस्टमचा मुख्य उद्देश आहे. भारतातील शहरी भागांत गेटेड कम्युनिटीज, बहुमजली इमारती आणि एकात्मिक टाऊनशिप्सचा झपाट्याने विस्तार होत आहे, ज्यामुळे प्रगत आणि स्थिर सुरक्षा उपायांची गरज अत्यंत महत्त्वाची बनली आहे. ही वाढती गरज ओळखून पॅनासोनिकची ही नवीन यंत्रणा एकाच व्यासपीठाद्वारे थ्री-लेअर्ड सिक्युरिटी (त्रिस्तरीय सुरक्षा) प्रदान करते. यामध्ये पॅनासोनिकच्या सेंटर मॅनेजमेंट सॉफ्टवेअरद्वारे (सीएमएस) अनेक प्रवेशद्वार आणि संवाद केंद्रांचे मध्यवर्ती नियंत्रण केले जाते, ज्यामुळे निवासी सुरक्षा व्यवस्थापन अधिक स्मार्ट आणि कार्यक्षम होते.
23 Mar 2026 01:40 PM (IST)
भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड आणि सतत तोट्यात असणारी टेलीकॉम कंपनी व्हिआय यांच्यामध्ये स्पेक्ट्रम शेयरिंग आणि फायबर कवरेजबाबत चर्चा सुरु आहे. बीएसएनएल आणि व्हिआय यांनी हातमिळवणी केल्यास ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. नेटवर्क कवरेजपासून ब्रॉडबँड कनेक्टिविटीपर्यंत ग्राहकांचा अनुभव पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगला होण्याची शक्यता आहे.
23 Mar 2026 01:35 PM (IST)
रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देण्याचा निर्धार आठवले गटाचे प्रमुख व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींपैकी चार राज्यात रिपब्लिकन पक्ष आपले उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यावेळी आरपीआयचे पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, जनरल सेक्रेटरी गौतम सोनवणे, सचिव बाळासाहेब जानराव, उपमहापौर परशुराम वाडेकर, चंद्रकांता सोनाकांबळे, सूर्यकांत वाघमारे, महिपाल वाघमारे, नीलेश अल्हाट, हिमाली कांबळे, निशा मानवतकर, बसवराज गायकवाड, विशाल शेवाळे, जयदेव रंधवे, नीलेश रोकडे, सचिन मानवतकर, विरेन साठे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
23 Mar 2026 01:30 PM (IST)
दरवर्षी जेव्हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) सुरू होते, तेव्हा प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न येतो की हा हंगाम एमएस धोनीचा शेवटचा असेल का? एमएस धोनी, ज्याने २०१९ मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तो आयपीएलमध्ये खेळत राहिला आहे. आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतरही त्याने आपल्या संघासाठी एक ट्रॉफी जिंकली आहे. आता, या ४४ वर्षीय अनुभवी खेळाडूचे एक नवीन विधान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की तो वयाच्या ६० वर्षांपर्यंत आयपीएलमध्ये खेळण्याचा प्रयत्न करेल.
23 Mar 2026 01:25 PM (IST)
भारतामध्ये सैनिक शाळांचा मोठा रुबाब आहे. त्यांना नेहमी त्यांच्या शिस्त, देशभक्ती आणि कठोर शारीरिक प्रशिक्षणासाठी विशेष ओळखलं जातं. इथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने सशस्त्र दलांमध्ये अधिकारी बनण्यासाठी घडवले जातं. जसजसं एकीकडे जग बदलत चाललं आहे तसतसं फक्त शस्त्रांचं प्रशिक्षण पुरेसं नाही तर बदलत्या प्रगत तंत्रज्ञानाची जोड असणं आवश्यक आहे. तंत्रज्ञानाची ताकद ही लष्करी सामर्थ्याइतकीच महत्त्वाची बनली आहे. या बदलाच्या पार्श्वभूमीवर, आता सैनिक शाळांच्या अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याच्या योजना आखल्या जात आहेत.
23 Mar 2026 01:15 PM (IST)
खाद्यप्रेमींसाठी एक नवीन सनसनाटी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरदारजींनी ‘धुरंधर २ थाळी’ सादर केली आहे, ज्यात एकाच थाळीत ४० पदार्थ दिले जातात. ही थाळी सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे आणि एकाच ताटात इतके पदार्थ कसे काय मावतात हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. फक्त ₹१,१९९ मध्ये उपलब्ध असलेली ही मेगा थाळी पंजाबी चवीने परिपूर्ण असून त्यात सर्व प्रकारच्या पदार्थांचा समावेश आहे. तुम्हाला स्टार्टर्सपासून ते डेझर्टपर्यंत सर्व काही मिळेल. व्हिडिओमध्ये, सरदारजी उत्साहाने थाळी सजवताना दिसत आहेत.
23 Mar 2026 01:10 PM (IST)
सातारा आणि कोकण या समृद्ध इतिहास व नैसर्गिक वैभव लाभलेल्या प्रदेशांना एकत्र जोडणारे पर्यटन सर्किट विकसित करण्यासाठी कोल्हापूर फर्स्टने पुढाकार घेत केंद्रीय पर्यटनमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे. प्रस्तावित सर्किटमध्ये पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील ऐतिहासिक गड-किल्ले, सांस्कृतिक वारसा आणि प्राचीन धार्मिक स्थळांचा समावेश असणार असून, 1 एप्रिलपासून जाहीर होणाऱ्या नव्या पर्यटन धोरणात कोल्हापूर परिसरातील महत्त्वाच्या स्थळांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. या उपक्रमामुळे कोल्हापूरच्या पर्यटनवृद्धीसह आर्थिक प्रगतीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी म्हणून कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. कोल्हापूर जिल्हा जैवविविधतेने नटलेला पश्चिम घाट आहे.
23 Mar 2026 01:00 PM (IST)
आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम ‘धुरंधर २’ बद्दल एक स्टोरी शेअर केली आणि लिहिले, “जसकिरत सिंग रंगी आणि हा क्षण, हेच सर्वकाही आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्यात पूर्णपणे ताळमेळ असण्याची ही जादू आहे. ‘धुरंधर’च्या ऐतिहासिक थिएटरमधील यशाबद्दल संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन.” यापूर्वीही आलिया भट्टने ‘धुरंधर’चे कौतुक केले होते, ज्याने सोशल मीडियावर बरीच चर्चा निर्माण केली होती. अभिनेत्रीला या सीनने भावुक केल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
23 Mar 2026 12:55 PM (IST)
भायखळा येथे असलेले वीरमाता जिजाबाई भोसले पार्क आणि प्राणीसंग्रहालय (राणी बाग) हे मुंबई आणि परदेशातील पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण बनत आहे. गेल्या दोन वर्षांत, ७१.८ लाख पर्यटकांनी बिबट्या, बंगाल वाघ, मगर आणि अस्वल यांसारख्या देशी आणि विदेशी प्राणी व पक्षी पाहण्याचा थरार अनुभवला आहे. जपानी क्रौंच आणि आफ्रिकन ग्रे पोपटांच्या किलबिलाटाने देशी आणि विदेशी पर्यटकांना राणीबागेकडे आकर्षित केले आहे. मुंबई महापालिकेने पर्यटकांकडून २८.१ कोटी रुपये महसूल मिळवला आहे. भारत आणि परदेशातील कुटुंबे, मुले आणि पर्यटक दररोज राणीबागेला भेट देत असतात. शनिवार, रविवार आणि सुट्टयांच्या दिवशी पार्क आणि प्राणीसंग्रहालयात मोठी वर्दळ असते. आधुनिकीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. राणीबागेमध्ये एक नवीन गुलाब उद्यान आणि जपानी उद्यान तयार करण्यात आले आहे.
23 Mar 2026 12:50 PM (IST)
व्हॉट्सअॅप एक नवीन फीचर लाँच करण्याची तयार करत आहे. हे फीचर डिसअपियरिंग मेसेज फीचरचे नवीन वर्जन असणार आहे. या नवीन फीचरमध्ये यूजर्सना त्यांच्या हिशोबाने टाईमर सेट करता येणार आहे.
23 Mar 2026 12:50 PM (IST)
आयपीएल 2026 सुरू व्हायला एक आठवडा शिल्लक असताना आता आयपीएलच्या सामन्यांच्या तिकीटांची विक्री सुरू झाली आहे. सोशल मिडियावर फ्रॅन्चायझींनी यासंदर्भात माहिती शेअर केली आहे. आता आरसीबीच्या चाहत्यासाठी आनंदाची बातमी आहे. आयपीएल २०२६ अगदी जवळ आली आहे, आणि बंगळूरुचे चाहते विशेषतः आनंदित होतील कारण ऐतिहासिक एम. चिन्नास्वामी स्टेडियमला अखेर आरसीबीचे सर्व घरचे सामने आयोजित करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.
23 Mar 2026 12:45 PM (IST)
इराण युद्धामुळे देशांतर्गत बाजारात एलपीजीचा (LPG Gas Cylinder) तुटवडा निर्माण झाला आहे. एलपीजीच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी सरकारी तेल कंपन्या एका बृहत्तर योजनेवर विचार करत आहेत. सरकारी तेल कंपन्या घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोग्रॅमच्या सिलेंडरमागे फक्त १० किलोग्रॅम एलपीजी पुरवठा करण्याचा विचार करत आहेत. उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या मते, इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत साठा कमी झाला आहे आणि आयात घटली आहे.
23 Mar 2026 12:40 PM (IST)
पूर्व प्राथमिक शाळा या राष्ट्रीय शैक्षणिकधोरण २०२० चा आधार बनल्या आहेत. परंतु राज्यातील पूर्व प्राथमिक शाळांना नोंदणी / शासन मान्यता अनिवार्य करणारा कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे राज्यातील पूर्व प्राथमिक शाळा मनमानी पद्धतीने व चालकांच्या गरजा आणि आवश्यकता विचारात न घेता चालवण्यात येत आहेत. त्यामुळे पूर्व प्राथमिक शाळांना शासन मान्यता अनिवार्य करणारा कायदा त्वरित तयार करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची राज्य कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
23 Mar 2026 12:40 PM (IST)
मध्यपूर्व आशियातील तणाव आता एका नव्या आणि धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी होर्मुझ खुला करण्यासाठी दिलेल्या ४८ तासांच्या अल्टीमेटमला इराणने थेट आव्हान दिले आहे. इराणने थेट होर्मुजमधून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर २० लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे १८.८ कोटी रुपयांचा ‘ट्रान्झिट टॅक्स’ लागू करण्याचे संकेत दिले आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे.
23 Mar 2026 12:35 PM (IST)
पुण्याचा गल्ली-बोळ ते विमानतळाचा परिसर असा ‘ड्रग्ज’चा वर्तुळ शहरात पुर्ण झालेला असल्याचे गेल्या काही वर्षात सातत्याने समोर आले आहे. एकीकडे पुणे पोलिस गल्ली बोळातून ड्रग्ज शोधत असतानाच कस्टमचा विभाग परदेशातून हवाई-मार्गे येत असलेले ड्रग्ज पकडत आहेत. एकूणच पुण्याच्या वाढत्या औद्योगिककरण अन् विस्तारात ड्रग्जचे जाळे देखील मोठ्या प्रमाणात फोफावत चालले असल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यात बँकॉक टू पुणे असा ड्रग्जचा रूट उघड झाला असून, कोट्यवधींचे ड्रग्ज कस्टम विभागाने पकडले आहे.






