Maharashtra Breaking News Updates Today:
मुंबई : नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी संबंध आल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात होती. याप्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. चाकणकरांनी तत्काळ राजीनामा द्यावा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर काही तासांतच त्यांनी राजीनामा दिला. खरात प्रकरणात रूपाली चाकणकर पूर्णपणे अडकल्या होत्या. खरातच्या मंडळीत चाकणकर प्रमुख होत्या, असा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्यांचे तांत्रिकासोबतचे फोटो व्हायरल झाल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती.
21 Mar 2026 04:55 PM (IST)
महागाई भत्त्याची वाट पाहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच एक आनंदाची बातमी मिळू शकते. मागील ट्रेंडनुसार, केंद्र सरकार मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्त्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचारी या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. जरी पुढच्या आठवड्यात घोषणा झाली, तरी ही रक्कम त्यांच्या मार्च महिन्याच्या पगारात जमा केली जाणार नाही.
21 Mar 2026 04:50 PM (IST)
खोपोली नगरपरिषदेने ३० वर्षांपूर्वी १२.५ एकर जागा शैक्षणिक उपक्रमांसाठी के. टी. एस. पी. मंडळाला भाडेतत्त्वावर दिली होती. मात्र या कालावधीत त्या जागेवर कोणताही ठोस उपक्रम राबवण्यात आलेला नाही. उलट या जागेवर अतिक्रमण वाढल्याचे समोर आले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी विशेष सभेत हा मुद्दा उपस्थित करत मंडळाकडून स्पष्टीकरण मागवले होते. के. टी. एस. पी. मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील यांनी गेल्या ३० वर्षांत कोणताही उपक्रम राबवता न आल्याची खंत व्यक्त केली आहे. या भूखंडाबाबत पुढे काय भूमिका घेतली जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
21 Mar 2026 04:45 PM (IST)
रूपाली चाकणकर यांचा केवळ राजीनामा न घेता त्यांची हकालपट्टी करायला हवी होती. अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे. अंधश्रद्धा विरोधी कायदा असतानाही अशा प्रकारांना समर्थन मिळत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेतून केला. कॅप्टन अशोक खरात प्रकरणातील सर्व संबंधितांची सखोल चौकशी व्हावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
21 Mar 2026 04:40 PM (IST)
रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे खांबाचा मळा परिसरात पक्षाचा पाठलाग करताना एक ब्लॅक पँथर थेट ५० फूट विहिरीत पडला. वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून पिंजरा सोडून पँथरला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
21 Mar 2026 04:37 PM (IST)
Tata Motors ने आपल्या सर्वात पॉवरफुल SUV Tata Harrier EV चा नवीन व्हेरिएंट Fearless+ QWD75 लाँच केला आहे. या नव्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 26.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या SUV मध्ये क्वाड व्हील ड्राइव्ह (QWD) सिस्टम दिली असून ऑफ-रोडिंगसाठीही ती उत्तम ठरते. ही पूर्णपणे ‘Made in India’ इलेक्ट्रिक SUV आहे.
21 Mar 2026 04:35 PM (IST)
हाय प्रोफाईल योगी कॉम्प्लेक्समधील फ्लोरा माउंट इमारतीमधील घटना सोसायटीतील काही नागरिकांनी मालमत्ता कर भरला नाही याची शिक्षा ९० फ्लॅट धारकांना सोसायटीतील पाणीपुरवठा महापालिकेने केला खंडित सोसायटीतील बोरिंग कनेक्शन देखील कापले
21 Mar 2026 04:30 PM (IST)
पालघर जिल्ह्यातील डहाणू समुद्रकिनाऱ्यावर ‘डहाणू महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. आज या महोत्सवाला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक खाद्यपदार्थ, मच्छीच्या विविध रेसिपी आणि हस्तकलेच्या स्टॉल्सवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. राज्यात लवकरच ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवा सुरू करण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
21 Mar 2026 04:25 PM (IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा आंबा उत्पादन केवळ ५ ते १० टक्के असून यामुळे येथील बागायतदार वर्ग अडचणीत आहे. लहरी हवामानाचा फटका आंबा पिकाला बसल्याने बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या झाडांवर शिल्लक राहिलेला आंबा काढणी करून नवी मुंबई बाजारपेठेत पाठविला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून यापूर्वी दिवसाला ५० ते ६० ट्रक आंबा नवी मुंबईकडे रवाना होत असे मात्र यावर्षी २ ते ३ ट्रक आंबा रवाना होत आहे. एकंदरीत आंबा आणि काजू नुकसानीबाबत येथील बागायतदारांनी सरकारने मागणी केली असून अधिवेशन संपेपर्यंत ती जाहीर व्हावी, असे बागायतदारांचे म्हणणे आहे.
21 Mar 2026 04:20 PM (IST)
मुस्लिम समाजातील अत्यंत पवित्र समजला जाणारा रमजान ईद हा सण आज लातूरच्या विरोगा मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी नमा दादा करत सुख शांती एकात्मता अबाधित राहण्यासाठी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करत केली प्रार्थना सर्वधर्म समानतेचा संदेश देणारे लातूरच्या मुस्लिम बांधवांनी एकात्मतेचे प्रतिक इतका मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे तसेच लातूर शहर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती सचिन बंडा फुले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण जाधव तसेच नगरसेवक विविध क्षेत्रातील मान्यवर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी ईदगा मैदानावर मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा देण्यासाठी आले होते आखाती देशांमध्ये सध्या बुद्ध सुरू आहे ते लवकरात लवकर संपवून सर्वांनी एकोप्याने राहावे अशा पद्धतीची प्रार्थना मौलाना मुफ्ती ओवेस कास्मी - नमाज पठण करत केली.
21 Mar 2026 04:15 PM (IST)
वसई येथे महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२६ संदर्भात पालकमंत्री गणेश नाईक यांनी पत्रकार परिषद घेत विविध तरतुदींची माहिती दिली. नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत त्या तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेने त्यांच्या अडचणी थेट माझ्यापर्यंत पोहोचवा त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल असे आवाहन करत त्यांनी पीएंचे संपर्क क्रमांकही जाहीर केले.
21 Mar 2026 04:10 PM (IST)
आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने देशात एलपीजी गॅस तुटवडा असल्याच्या अफवा पसरत आहेत त्यामुळे नागरिक सिलेंडर भरून ठेवण्यासाठी गॅस एजन्सीवर भल्या पहाटे उठून रांगा लावत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे गॅस सिलेंडर साठी मोठी गर्दी होत असल्याने पोलिसांना बोलवण्यात आले आणि पोलिसांच्या बंदोबस्तात आता सिलेंडर वितरण केले असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. बुलढाणा शहरातील एचपी गॅस गोडाऊन समोर नागरिकांनी गॅस सिलेंडर भरून घेण्यासाठी रात्री चार वाजेपासूनच रांगा लावल्या असल्याचे चित्र आहे. आज रमजान ईद असून सणासुदीच्या काळात देखील नागरिक गॅस सिलेंडर साठी रांगेत उभे असल्याचे बघायला मिळाले गॅस गोडाऊन वर एलपीजी गॅस उपलब्ध असून सुद्धा नागरिकांना ते मिळेल किंवा नाही या भीतीपोटी स्वतःच रांगा लावत आहेत तर एलपीजी गॅस सिलेंडरचे व्यवस्थापक गॅस सिलेंडर बुकिंग केल्यानंतर तुम्हाला घरपोच सिलेंडर मिळेल असे सांगत असले तरी नागरिक मात्र मोठ्या संख्येने गोडाऊन वर रांगा लावत असल्याचे चित्र आहे
21 Mar 2026 04:05 PM (IST)
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. गाव भेटी दरम्यान झालेल्या सभेत त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. के.के. रेंज परिसराबाहेरील ७ हजार एकर जमीन दारुगोळा प्रकल्पासाठी संपादित करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. "मी सभागृहात असेन तर एक फूटही जमीन जाऊ देणार नाही" असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले आहे.
21 Mar 2026 03:40 PM (IST)
गडचिरोली जिल्ह्यात धान लागवडीखाली सर्वाधिक क्षेत्र असलेला तालुका म्हणून चामोर्शी ओळखला जातो. उच्च प्रतीच्या धान उत्पादनामुळे येथे मोठ्या प्रमाणावर राईस मिल्स कार्यरत असून येथील तांदूळ देशात तसेच परदेशात पाठविला जातो. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून आखाती देशांतील युद्धपरिस्थितीचा तांदूळ व्यापारावर परिणाम झाला आहे. निर्यात मंदावल्याने तांदूळ उत्पादक आणि व्यावसायिकांची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे.
21 Mar 2026 03:30 PM (IST)
Russia Iran Intelligence Deal Fake News : जागतिक महासत्तांमधील ‘इंटेलिजन्स वॉर’ आता एका नव्या वळणावर आले आहे. रशिया (Russia) आणि अमेरिका (America) यांच्यात पडद्यामागे काहीतरी शिजत असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. रशियाने अमेरिकेसमोर एक अत्यंत धक्कादायक प्रस्ताव ठेवला होता, अशा बातम्या पाश्चात्य माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या. मात्र, क्रेमलिनने (रशियाचे राष्ट्राध्यक्ष कार्यालय) या सर्व बातम्यांचा कडाडून निषेध केला असून हे रशियाला बदनाम करण्याचे कारस्थान असल्याचे म्हटले आहे.
21 Mar 2026 03:10 PM (IST)
रांजणी : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीत यंदा मोठी चुरस पाहायला मिळाली. अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या मतदारसंघाला प्रतिनिधित्व मिळावे. यासाठी जोरदार प्रयत्न केले; मात्र, या सर्व राजकीय घडामोडींमध्ये आंबेगाव तालुक्याने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील यांची झालेली निवड ही केवळ व्यक्तीगत यश नसून वळसे पाटील कुटुंबाच्या सातत्यपूर्ण राजकीय परंपरेचे आणि प्रभावी नेतृत्वाचे प्रतीक मानली जात आहे.+
21 Mar 2026 03:03 PM (IST)
सांगली: सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. चारित्र्यावर संशय घेत लाकडाने मारहाण करत ही हत्या करण्यात आली. मंगल अंकुश वाघमारे (वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना निंबवडे (ता. आटपाडी) येथे घडली.
या प्रकरणातील आरोपीचे नाव अंकुश बाळू वाघमारे (वय ३७, मूळ रा. गायमळा आदिवासी पाडा, ता. सुधागड, जिल्हा रायगड) असे नाव आहे. पोलिसांनी अंकुशला अटक केली आहे. मंगल वाघमारे या पती अंकुश बाळू वाघमारे यांच्यासह निंबवडे गावाबाहेरील ओढ्यालगत रामचंद्र मोटे यांच्या शेतात खोपटे बांधून वास्तव्यास होत्या. हे कुटुंब कोळसा तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय करत होते. त्यांच्यामागे काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होते. अंकुश वाघमारे हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार पत्नीशी भांडण करत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
21 Mar 2026 02:50 PM (IST)
मराठी मनोरंजनासाठी ओळखल्या जाणाऱ्या ZEE5 ने आपल्या आगामी ‘हे काय नवीन?’ या ओरिजनल सिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आणला आहे. Umesh Kamat आदित्यच्या आणि Priya Bapat रमाच्या भूमिकेत झळकणार असून, Varun Narvekar यांच्या दिग्दर्शनाखाली ही सिरीज तयार झाली आहे. शुभांगी गोखले, उदय टिकेकर, सुयोग गोऱ्हे, राजसी भावे, ओंकार गोवर्धन, तन्वी कुलकर्णी आणि पायल जाधव यांच्यासह इतर कलाकारांचा समावेश असलेली ‘हे काय नवीन?’ सिरीज 31 मार्च रोजी मराठी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.
21 Mar 2026 02:45 PM (IST)
उत्तरपरदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आधी तिला शेतात बोलावले नंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पाटील अटक केली असून न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. मात्र त्याने हत्या का केली? जाणून घ्या…
21 Mar 2026 02:40 PM (IST)
‘थाला’, ‘कॅप्टन कूल’, ‘मास्टरमाइंड’, ‘माही’ अशा विविध नावांनी माहीला भारतीय क्रिकेट विश्वात ओळखलं जातं. आता एम.एस. धोनी वयाच्या 44 व्या वर्षी पुन्हा एकदा आपल्या कौशल्याची झलक दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएलची (इंडियन प्रीमियर लीग) सुरुवात २८ मार्च रोजी होत आहे. धोनीचा संघ, चेन्नई सुपर किंग्स आपला सलामीचा सामना ३० मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे.
21 Mar 2026 02:30 PM (IST)
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसराची निवड भारत सरकारच्या नीती आयोगअंतर्गत कार्यरत अटल इनोव्हेशन मिशन यांच्या ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ योजनेसाठी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी २.५ कोटी रुपयांचे अनुदान नुकतेच मंजूर झाले आहे. ग्रामीण व निमशहरी भागात नवोपक्रम आणि स्टार्टअप संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे कोकणातील युवक, शेतकरी, मत्स्य व्यावसायिक आणि स्थानिक उद्योजकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. मोठ्या शहरांपुरती मर्यादित असलेली स्टार्टअप परिसंस्था आता गावपातळीवर पोहोचविण्याचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
21 Mar 2026 02:20 PM (IST)
मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण तणावाने (US-Israel VS Iran War) आता विनाशकारी रुप घेतले आहे. इराणने जगासाठी अत्यंत महत्त्वाचा स्ट्रेट ऑफ होर्मुझ सागरी मार्ग बंद केल्याने जागतिक बाजारपेठेत तेल आणि वायूचे संकट निर्माण झाले आहे. ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाच नव्हे, तर प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसू लागला आहे. या नाकेबंदीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आता अमेरिकेने मोठी तयारी केली आहे. अमेरिकेने आपली अत्यंत घातक युद्धनौका USS Tripoli खाडीच्या दिशेने रवाना केली आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली असून समुद्रात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
21 Mar 2026 02:15 PM (IST)
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगोली जिल्ह्यात आज पक्ष अस्तित्व टिकवण्यासाठी झगडताना दिसत आहे. बाहेरील पक्षांपेक्षा अंतर्गत गटबाजी, नेतृत्वाची कमतरता आणि नेत्यांच्या एक्झिटमुळे काँग्रेसची ताकद कमी झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या तीन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा एकेकाळी दबदबा होता. हिंगोलीत सलग तीन वेळा काँग्रेसचे आमदार निवडून आले होते, तर कळमनुरीतही पक्ष मजबूत होता. दिवंगत नेत्या रजनीताई सातव आणि दिवंगत खासदार राजीव सातव यांनी जिल्ह्यात काँग्रेसला मोठे बळ दिले. २०१४ च्या मोदी लाटेतही राजीव सातव यांनी विजय मिळवत हिंगोलीत काँग्रेसचा प्रभाव कायम असल्याचे दाखवून दिले. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, पक्षाचे प्रवक्ते आणि गुजरातचे प्रभारी अशी जबाबदारी सांभाळत त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही ठसा उमटवला.
21 Mar 2026 02:10 PM (IST)
कोलकाता येथून आरजी कर रुग्णालयात पुन्हा एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. या रुग्णालयात शुक्रवारी (२० मार्च) पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. आपल्या मुलाच्या उपचारासाठी अरुप बॅनर्जी हे आले होते. मात्र त्यांचाच याच रुग्णालयात लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे सरकारी रुग्णलयातील सुरक्षा व्यवस्था आणि देखभाल दुरुस्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
21 Mar 2026 02:00 PM (IST)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी विविध विकासकामांच्या उपसूचनांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये चिंचवड येथील नियोजित ‘सिटी सेंटर’च्या जागेवर आता ‘अजितदादा पवार आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ’ उभारण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावासह शहराच्या पायाभूत सुविधा आणि नामकरणाच्या अनेक उपसूचनांना मंजुरी देण्यात आली आहे.
21 Mar 2026 01:55 PM (IST)
मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाने (US-Israel Iran War) जागतिक राजकारणाच्या समीकरणात आणि अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडला आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोडी इराणविरोधी लष्करी मोहिम अमेरिका-इस्रायलने सुरु केली होती. या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या युद्धाने रौद्र रुप धारण केले आहे. यामुळे मध्यपूर्वेत प्रचंड अस्थिरता पसरली असून होर्मुझ खाडी बंद झाल्याने जागतिक तेल बाजाराला आणि अर्थव्यवस्थेला मोठा फटला बसला आहे. मात्र या युद्धाच्या आगीत सर्वात जास्त लाभ हो रशियाचा झाला आहे.
21 Mar 2026 01:50 PM (IST)
चिपळूण-तिवरे या एसटी बसमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने बस चालक आणि वाहकासोबत हुज्जत घालत त्यांना मारहाण करण्यात आली. ही धक्कादायक घटना कळकवणे फाट्याजवळ घडली आहे. या प्रवाशाने केवळ शिवीगाळच केली नाही, तर चालकाच्या शर्टाचा खिसा फाडून त्याला जखमी केले. झटापटीत वाहकाचे पैसेही गहाळ झाले आहेत. याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात संबंधित प्रवाशाविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
21 Mar 2026 01:45 PM (IST)
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा हाय व्होल्टेज ड्रामा जिल्हा परिषद परिसरात सुरू असतानाच, याच जिल्हा परिषदेतील सेस फंड तिजोरीत खडखडाट करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांच्या विरोधात रिपब्लिकन गवई गट आक्रमक झालेला पाहायला मिळाला. जिल्हा परिषद गेटवर जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांच्या नेतृत्वाखाली रिपाईने घंटानाद आंदोलन केले.दरम्यान या आंदोलनावेळी बोलताना संजय गाडे म्हणाले की, “सातारा जिल्हा परिषदेतील सेस फंड हा चुकीच्या पद्धतीने प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशणी नागराजन यांनी खर्च केला असून, अंगणवाडी इमारतीला नियोजन समितीतून प्रस्तावित निधी मंजूर झालेला असताना देखील जिल्हा परिषद सेसफंडातील लाखो रुपये हे अंगणवाडी इमारतींसाठी चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य वळवण्यात आले आहेत. त्यांच्या या भूमिकेवर रिपब्लिकन पार्टीला संशय असून नेमके हे पैसे वळवण्याचा उद्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट करावा.
21 Mar 2026 01:40 PM (IST)
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीत यंदा मोठी चुरस पाहायला मिळाली. अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या मतदारसंघाला प्रतिनिधित्व मिळावे. यासाठी जोरदार प्रयत्न केले; मात्र, या सर्व राजकीय घडामोडींमध्ये आंबेगाव तालुक्याने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील यांची झालेली निवड ही केवळ व्यक्तीगत यश नसून वळसे पाटील कुटुंबाच्या सातत्यपूर्ण राजकीय परंपरेचे आणि प्रभावी नेतृत्वाचे प्रतीक मानली जात आहे.
21 Mar 2026 01:35 PM (IST)
जागतिक राजकारणात आणि ऊर्जा बाजारपेठेत सध्या प्रचंड खळबळ माजली आहे. इराण आणि इस्रायलमधील (US-Israel Iran War) संघर्षामुळे ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ हे जगातील सर्वात धोकादायक ठिकाण बनले आहे. जगातील एकूण तेल आणि एलएनजी (LNG) पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के वाहतूक याच अरुंद मार्गातून होते. मात्र, गेल्या २४ तासांपासून इथली शांतता भयावह आहे. एकही कच्च्या तेलाचा टँकर इथून जाऊ शकलेला नाही. अशा भीषण परिस्थितीत भारताची दोन अजस्त्र जहाजे ‘पाईन गॅस’ (Pine Gas) आणि ‘जग वसंत’ (Jag Vasant) या मार्गावरून जाण्याची तयारी करत आहेत.
21 Mar 2026 01:25 PM (IST)
वर्ल्डकपनंतर IPL 2026 ची तयारी जोमात जोरात सुरू आहे. ही स्पर्धा २८ मार्च रोजी सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या IPL चा फीव्हर जोर धरत आहे. या लीगचा पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणार आहे. पण IPL चा हंगाम सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाचं नवीन शेड्युल आलं आहे. IPL पूर्वी, शनिवारी BCCI ने आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघ नव्या दौऱ्यावर जाणार आहे. म्हणजेच घरातला क्रिकेट सोहळ्यानंतर टीम इंडिया पुन्हा आंतरराष्ट्रीय सामान्यांसाठी सज्ज झाली आहे.
21 Mar 2026 01:15 PM (IST)
राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र त्यात केवळ बँकांकडून घेतलेल्या कर्जालाच दोन लाखांपर्यंत माफी मिळणार आहे. प्रत्यक्षात राज्यात लाखो शेतकरी हे सावकारांचे कर्जदार आहेत. अशा सावकारी कर्जातून शेतकऱ्यांना मुक्ती मिळणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कष्ट उपसता उपसता शेतकऱ्यांचे आयुष्य पुरते काळवंडले आहे. राज्यात ८ लाख ८१ हजार १५५ शेतकऱ्याभोवती परवानाधारक सावकारी कर्जाचा फास घट्ट झाला आहे. शेतकऱ्यांच्या सातबारावर १ हजार ११५ कोटी ६९ लाखांच्या कर्जाचा बोजा आहे. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, कर्जात अडकलेल्या शेतकऱ्यांची सावकाराच्या जाचातून मुक्ती कशी होणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
21 Mar 2026 01:05 PM (IST)
मराठी मनोरंजनासाठी ओळखल्या जाणाऱ्या ZEE5 ने आपल्या आगामी ‘हे काय नवीन?’ या ओरिजनल सिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आणला आहे. Umesh Kamat आदित्यच्या आणि Priya Bapat रमाच्या भूमिकेत झळकणार असून, Varun Narvekar यांच्या दिग्दर्शनाखाली ही सिरीज तयार झाली आहे. शुभांगी गोखले, उदय टिकेकर, सुयोग गोऱ्हे, राजसी भावे, ओंकार गोवर्धन, तन्वी कुलकर्णी आणि पायल जाधव यांच्यासह इतर कलाकारांचा समावेश असलेली ‘हे काय नवीन?’ सिरीज 31 मार्च रोजी मराठी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.
21 Mar 2026 01:00 PM (IST)
पुणे महापालिकेकडून मिळकतकर भरण्यासाठी दिलेले धनादेश न वटल्यास संबंधित मिळकतधारकांवर कायदेशीर तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कर आकारणी व संकलन विभागाने दिला आहे. अभय योजनेनंतर कर भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धनादेश स्वीकारण्यात आले होते; मात्र, तब्बल ७ हजार ४७ धनादेश वटले नसल्याची माहिती समोर आली आहे.
21 Mar 2026 12:50 PM (IST)
मुंबई महानगर प्रदेशात एलपीजीच्या तुटवड्यामुळे कोळशाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कारण हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कुटुंबे पर्यायी इंधनाच्या शोधात आहेत. दरम्यान, शहरातील अनेक भागांमध्ये किरकोळ कोळशाच्या दरात जवळपास ५० टक्केने वाढ झाली आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, जो कोळसा पूर्वी ३०-४० रुपये प्रति किलोग्रॅम दराने विकला जात होता, तो आता खार, वर्सोवा आणि भायखळा यांसारख्या भागांमध्ये ५० ते ६० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. तथापि, काही छोटे विक्रेते ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी जुन्या साठ्यावर अवलंबून कमी दरात विक्री करत आहेत. डोंगरीतील एका विक्रेत्याने सांगितले की, तो अजूनही ३०-३५ रुपये प्रति किलोग्रॅम दराने कोळसा विकत आहे.स्वयंपाकासाठी कोळशावर अवलंबून असलेल्या छोट्या खानावळींवर याचा मोठा परिणाम होत आहे.
21 Mar 2026 12:40 PM (IST)
मध्य-पूर्वेतील रणसंग्राम (US-Israel Iran War) आता केवळ लष्करी तळांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो सर्वसामान्यांच्या घरापर्यंत आणि रक्ताच्या थारोळ्यापर्यंत पोहोचला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने आता अत्यंत भयानक वळण घेतले आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांमुळे इराणमध्ये आतापर्यंत २,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १६५ लहान मुलींचा समावेश असल्याची हृदयद्रावक माहिती समोर आली असून, यामुळे जागतिक स्तरावर संतापाची लाट उसळली आहे.
21 Mar 2026 12:30 PM (IST)
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाने आता तिसऱ्या आठवड्यामध्ये प्रवेश केला आहे. याचा परिणाम तेल आणि गॅस सिलेंडरवर आधीच होत आहे. मात्र आता अशी शक्यता वर्तवली जात आहे की दोन देशांमध्ये सुरू असलेल्या या युद्धाचा परिणाम इंटरनेटवर देखील होऊ शकतो. समुद्राच्या तळाशी काही आशा केबल्स आहेत ज्याच्या मदतीने केवळ मध्यपूर्वेतच नाही तर संपूर्ण जगभरात इंटरनेटचा पुरवठा केला जातो. या केबल्सवर जर परिणाम झाला तर संपूर्ण जगभरातील इंटरनेट बंद होऊ शकतो.
21 Mar 2026 12:20 PM (IST)
बीसीसीआय आणि आयपीएल अधिकाऱ्यांनी यापूर्वी निवेदने जारी केली आहेत की भविष्यात आयपीएल सामन्यांची संख्या वाढवली जाईल. यामुळेच ७४ ते ८४ सामन्यांच्या वृत्तांना जोर मिळाला आहे, जे खरे नाही. आयपीएलचे मीडिया हक्क २०२७ पर्यंत विकले गेले आहेत. त्यामुळे, २०२७ च्या सीझनंतर आयपीएलमधील सामन्यांच्या संख्येत वाढ आपल्याला दिसू शकते.
21 Mar 2026 12:20 PM (IST)
जालना येथून एक हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय विवाहित आणि त्यांच्या १२ वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोटच्या मुलीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी मारली. मात्र यात दोघीनींही आपले प्राण गमावले. ही घटना जालना तालुक्यातील पंढरपूर वाडी परिसरात शक्रवारी दुपारी घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
21 Mar 2026 12:15 PM (IST)
एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहे.
21 Mar 2026 12:10 PM (IST)
मुंबईत एलपीजी टंचाईचे संकट तीव्र झाले असून त्याचा थेट परिणाम ईद-उल-फितरच्या तयारीवर होत आहे. शेवया तयार करणाऱ्या व्यावसायिकांना कमर्शियल गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी माव्याचाही तुटवडा निर्माण झाला आहे, कारण दूध उकळणे आणि मावा तयार करण्यासाठी आवश्यक गॅस उपलब्ध नाही. शीरखुमां सारख्या पारंपरिक ईद पदार्थामध्ये मावा अत्यावश्यक असतो; मात्र सध्या दुकानांमधील साठा झपाट्याने संपत आहे. त्यामुळे ईदच्या शेव्यांची गोडीही फिकी पडताना दिसत आहे.
21 Mar 2026 12:00 PM (IST)
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून कमर्शियल अर्थात व्यावसायिक गॅसचा साठा मुबलक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या गॅसचा पुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही पुणे जिल्ह्यात अद्याप कमर्शियल गॅस वितरण सुरू न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
21 Mar 2026 11:50 AM (IST)
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षातील फेब्रुवारी अखेरपर्यंतच्या आकडेवारीवरून नाशिक जिल्ह्यातील मद्यविक्रीचे समीकरण पूर्णपणे बदलल्याचे समोर आले आहे. विदेशी दारूच्या वाढत्या किमती आणि करांमुळे मद्यपींनी आपला मोर्चा आता ‘महाराष्ट्र मेड लिकर’ (एमएमएल), देशी दारू आणि बिअरकडे वळवला आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच महिन्यांत एमएमएल या नव्या प्रकाराला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे विदेशी दारूच्या विक्रीत तब्बल १७टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.
21 Mar 2026 11:40 AM (IST)
मध्य-पूर्वेतील (US-Israel Iran War) ठिणगी आता हिंद महासागरापर्यंत पसरली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष एका अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला असून, इराणने थेट अमेरिकेच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ‘डिएगो गार्सिया’ (Diego Garcia) या लष्करी तळाला लक्ष्य केले आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने (WSJ) दिलेल्या या वृत्ताने संपूर्ण जगाचे लष्करी तज्ज्ञ हादरले आहेत, कारण हा हल्ला इराणच्या ज्ञात क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे.
21 Mar 2026 11:30 AM (IST)
सध्या सोशल मीडियाच्या काळात लाईक्स आणि व्ह्यूज साठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. यामध्ये विशेष करुन तरुणाईचा समावेश असतो. रेल्वे ट्रॅकवर डान्स करणे, रस्त्यावर धोकादायक बाईक स्टंट, स्केटिंग करत बस खाली घुसण्याचा स्टंट सतत काही ना काही धोकादायक कृत्य ही तरुण मंडळी करत असतात. या लोकांना आपले आणि आसपासच्या लोकांच्या जीवाचे जराही भान राहिलेले नाही. आता नुकताच एक धोकादायक बाईक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने हिरोगिरा दाखवण्यासाठी अत्यंत धोकादायक कृत्य केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्यासोबत बाईकवर गर्लफ्रेंड बसलेली आहे. यामुळे तिचाही जीव धोक्यात आला आहे.
21 Mar 2026 11:20 AM (IST)
नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे यात आणखी उलगडे होताना दिसत आहेत. आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास यंत्रणादेखील प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. दरम्यान, नाशिकमधील या विकृताशी असलेले संबंध उघडकीस आल्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. विरोधकांच्या दबावानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिला.
21 Mar 2026 11:10 AM (IST)
मेटा प्लॅटफॉर्मने गुरुवारी फेसबूक आणि इंस्टाग्रामवर मेटा एआय सपोर्ट असिस्टंट सुरु करण्याची घोषणा केली आहे. मेन्लो पार्कस्थित या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या, आपल्या सर्व ॲप्सवर सपोर्ट आणि कंटेंट एनफोर्समेंटसाठी टूल्स उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वाकांक्षेचा हा एक भाग आहे. असा दावा करण्यात आला आहे की, हे नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) असिस्टेंट प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि यूजर्सच्या वतीने कृती करण्यास सक्षम आहे.
21 Mar 2026 10:55 AM (IST)
हा व्हिडिओ एखाद्या बांधकाम साइटवर किंवा विटभट्टीमध्ये शूट केलेला दिसतो, जिथे लोक सहसा राबण्यात व्यस्त असतात. पण या महिलेने आपल्या कामातही आनंदाचे क्षण शोधले. गाणे सुरू होताच, ती आत्मविश्वासाने आणि न डगमगता गाण्यावर थिरकू लागते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, डोक्यावर जड विटांचे वजन असते पण तरीही तिच्या पाऊले किंचितही अडखळत नाही. तिचा डान्स केवळ साध्या हालचालींपुरता मर्यादित नाही; उलट, ती अचूक लय आणि तालावर नाचते. महिलेच्या मागे एक पुरुष देखील खेळकरपणे व्हिडिओत मागून डान्स करताना दिसतो जे पाहणे रंजक ठरते. कठोर कामातही त्यांच्यात असलेला उत्साह आणि आनंद पाहून यूजर्स भारावून गेले आणि अनेकांनी त्यांच्या या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
21 Mar 2026 10:45 AM (IST)
एसटी बसेसची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी, सरकारने महसूल वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलली आहेत. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, केवळ डिझेल खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणल्यामुळे अंदाजे २४१ कोटी रुपयांची वार्षिक बचत सुनिश्चित झाली आहे. यापूर्वी, एसटी बसेसना डिझेलवर प्रति लिटर अंदाजे २.७० रुपयांची सवलत मिळत होती, जी आता ३ रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. आता, स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे प्रति लिटर ५.१३ रुपयांची सवलत मिळवण्यात आली आहे. यामुळे अंदाजे ₹२४० ते ₹२४१ कोटींची वार्षिक बचत होईल. यामुळे, आता सर्व प्रकारचे इंधन फक्त एसटी पेट्रोल पंपांवरच उपलब्ध होईल.
21 Mar 2026 10:35 AM (IST)
यवतमाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. चाकू थेट पाठीत खुपसल्याने अडकला, तरुण अश्या स्थितीत थेट शासकीय रुग्णालयात पोहोचला.चाकू अडकल्याने त्याचा जीव वाचला. मात्र दुखापत गंभीर नसल्याने पोलिसांनी या प्रकरणाची तीव्रताच कमी करून टाकत साधा मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकारामुळे शहरात चर्चांना उधाण आलं आहे.
21 Mar 2026 10:25 AM (IST)
एचडीएफसी बँकेने एक मोठा बदल केला आहे. त्यानुसार आता यूपीआय वापरून एटीएममधून काढलेली रोख रक्कम तुमच्या मोफत व्यवहार मर्यादेमध्ये समाविष्ट केली जाईल. याचा अर्थ असा की, जर तुम्ही पूर्वनिश्चित मोफत मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केले, तर तुम्हाला प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी ₹23 अधिक कर भरावा लागेल. पूर्वी, UPI द्वारे रोख रक्कम काढणे वेगळे मानले जात होते. परंतु आता ते नियमित ATM मधून पैसे काढण्यासारखेच असेल.






