Maharashtra Breaking News, Marathi News Live Updates
Marathi Breaking news updates : India Share Market Update: जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज बुधवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, लाल रंगात सुरू होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,९०२ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ५८ अंकांनी कमी होता. त्यामुळे आज गुंतवणूकदरांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी काही शेअर्सची देखील शिफारस केली आहे.
वाचा सविस्तर- Stock Market Today: लाल रंगात होणार शेअर बाजाराची ओपनिंग, कोणत्या शेअर्समध्ये कराल गुंतवणूक? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज
10 Dec 2025 06:22 PM (IST)
मुंबई: वाढवण बंदर केवळ पालघर जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्य आणि देशाच्या जलद आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या बंदराशी संलग्न पायाभूत सुविधा उभारण्याचे काम प्रगतिपथावर असून, त्यातील वाढवण बंदर ते हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जोडमार्गाचे (फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प) काम लवकरच सुरू केले जाईल, अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली.
10 Dec 2025 05:31 PM (IST)
चीनमध्ये (China) एक दुर्दैवी घटना घडली आहे. दक्षिण भागातील एका निवासी इमारतीला आग (Fire Accident) लागली असून या आगीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या चायना डेलीने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी (१० डिसेंबर) ग्वांगडोंग प्रांतातील शांतौ भागात एका चार मजली इमारतीला आग लागली. या घटनेच्या काही दिवसांपूर्वी हॉंगकॉंगमध्ये देखील एका इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती.
10 Dec 2025 05:12 PM (IST)
कर्जत या महामुंबईचा भाग बनत असलेल्या प्रदूषण मुक्त प्रदेशाचा लचका गुंतवणूकदार यांनी तोडण्यास सुरुवात केली आहे. काही शे एकर जमीन खरेदी करणाऱ्या धनाढ्य यांना आपली साईट वर सहज पोहचता यावे यासाठी थेट हेलिकॉप्टर राईड सुरू झाल्या आहेत. प्रशासनाच्या आशीर्वादाने अशा हवाई सफारी शक्य नाहीत आणि त्यामुळे उद्योगपतींच्या या हवाई सफरींना सरकारी आशीर्वाद आहेत काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.दरम्यान,सलग दुसऱ्या दिवशी कर्जत मध्ये हेलिकॉप्टर सफर झाली असताना प्रशासनाला माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
10 Dec 2025 05:00 PM (IST)
नागपूर: राज्याच्या लालपरीचा कणा असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचा आवाज आज थेट सत्ताकेंद्रापर्यंत पोहोचला. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी एसटीचे अध्यक्ष व राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना आज (10 डिसेंबर) नागपूर येथील शासकीय निवासस्थानी सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनात प्रामुख्याने एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५५ टक्के महागाई भत्ता देण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. सध्या शासकीय कर्मचाऱ्यांना ५५ टक्के महागाई भत्ता मिळत असताना एसटी कर्मचाऱ्यांना मात्र केवळ ५३ टक्के भत्ता मिळतो आहे. हा वाढीव भत्ता पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून थकीत रकमेचा तातडीने लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
10 Dec 2025 04:50 PM (IST)
Princess Aiko Denied Throne : जपानला (Japan) जगामध्ये तंत्रज्ञान, प्रगती आणि आधुनिकतेचा जागतिक नेता मानले जाते. मात्र, या आधुनिक देशाची शाही उत्तराधिकार प्रणाली (Imperial Succession System) आजही महिलांना समान वागणूक देत नाही, हे एक मोठे विरोधाभास आहे. एका बाजूला जागतिक स्तरावर महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असताना, जपानमध्ये सिंहासनावर बसण्याचा अधिकार पुरुषांपुरता मर्यादित आहे.
याच कारणामुळे, जपानी जनतेत अतिशय लोकप्रिय असलेल्या राजकुमारी ऐको (Princess Aiko) यांच्या समर्थकांनी या उत्तराधिकार कायद्यात तातडीने बदल करण्याची मागणी केली आहे. राजकुमारी ऐको या विद्यमान सम्राट नारुहितो (Emperor Naruhito) यांच्या एकुलत्या एक अपत्य आहेत, तरीही त्यांना सिंहासन नाकारले जात आहे.
10 Dec 2025 04:40 PM (IST)
रणबीर कपूरच्या “रामायण” चित्रपटाची तयारी जोरात सुरू आहे. निर्माता नमित मल्होत्राने या प्रकल्पात मोठी गुंतवणूक केली आहे. हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित “रामायण” चा नवीन टीझर आता नुकताच प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये तो अरबी भाषेतही प्रदर्शित होणार असल्याचे उघड झाले आहे. “रामायण” च्या अरबी टीझरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना सगळ्या भाषेत पाहता येणार आहे.
10 Dec 2025 04:30 PM (IST)
Rahul Gandhi: गेल्या काही महिन्यापासून लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारच्या निर्णयांवर टिका करत आहेत. जीएसटीपासून निवडणुकांच्या तोंडावर होणाऱ्या एसआयआर प्रक्रियेपर्यंत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयांवर निशाणा साधला आहे. अशातच संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही राहुल गांधींचा आक्रमक बाणा दिसून येत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांनी पुन्हा केंद्र सरकारला तीन प्रश्न विचारत मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
10 Dec 2025 04:20 PM (IST)
वडगाव मावळ/सतिश गाडे: इंडिगो एअरलाइन्सच्या (Indigo) नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाल्याने अनेक उड्डाणे रद्द झाली आहेत. या विस्कळीत सेवेमुळे मावळ (Maval) तालुक्यातील गुलाबफूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मावळ तालुक्यात गुलाब शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. येथील फुलांची निर्यात देशातील विविध राज्यांसह परदेशातही केली जाते. दररोज सुमारे ४० लाख गुलाबफुलांची वाहतूक केली जाते, त्यापैकी २५ टक्के म्हणजे सुमारे १० लाख फुले विमानमार्गे देशभर पाठवली जातात.
10 Dec 2025 04:17 PM (IST)
2025 मधील वर्षातील शेवटची संक्रांती धनु संक्रांती आहे, जी मंगळवार, 16 डिसेंबर रोजी येते. पंचांगानुसार, सूर्याचा धनु राशीत प्रवेश किंवा संक्रांतीचा मुहूर्त या दिवशी पहाटे 4.27 वाजता आहे. अशाप्रकारे, 16 डिसेंबर रोजी सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. राशींमध्ये सूर्याच्या संक्रमणाला ‘संक्रांती’ म्हणतात आणि जेव्हा सूर्य वृश्चिक राशीतून धनु राशीत संक्रमण करतो तेव्हा त्याला धनु संक्रांती म्हणतात. सहसा, वर्षातील शेवटची संक्रांती धनु संक्रांती असते आणि वर्षातील पहिली संक्रांती मकर संक्रांती असते. या वर्षीची धनु संक्रांत ही एक विशेष ज्योतिषीय घटना आहे. ज्याचा परिणाम देश, जग, हवामान आणि सर्व राशींवर व्यापक प्रभाव पडेल. ही संक्रांत काही राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
10 Dec 2025 04:13 PM (IST)
प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडिया (P&G India) या आघाडीच्या आरोग्यसेवा आणि गृहउत्पादन क्षेत्रातील कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्वातून (CSR) पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘P&G शिक्षा’ या दीर्घकालीन सीएसआर उपक्रमाअंतर्गत कंपनीने वंचित आणि शिक्षणापासून दूर राहिलेल्या मुलांसाठी देशव्यापी स्वयंसेवक मोहिमेची घोषणा केली आहे. महिनाभर चालणाऱ्या या उपक्रमाद्वारे कंपनीचे कर्मचारी स्वतः शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन, शिक्षणाचे महत्त्व, कौशल्य प्रशिक्षण आणि जीवन कौशल्यांविषयी माहिती देणार आहेत.
10 Dec 2025 04:07 PM (IST)
चिपळूण: नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान घेण्यात आलेल्या आश्वासन समितीच्या बैठकीत कोकणच्या अभिमान असलेल्या हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकन प्रकरणावर निर्णायक घडामोडी घडल्या, कृषी मंत्री दत्ता भरणे, राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला आमदार शेखर निकम, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रवीण दरेकर, कृषी सचिव विकासचंद्र रसतोगी, आयुक्त सुरज मांढरे, महाबीजचे एमडी बुवनेश्वरी मॅडम आदी अधिकारी उपस्थित होते. कोकण हापूसवरील ‘गुजरात वादावर’ निकम, दरेकर लाड यांनी बैठकीत जोरदार भूमिका मांडली.
10 Dec 2025 03:50 PM (IST)
आई मुलाच नातं जगातील सर्वात घट्ट आणि सुंदर नातं असतं. आपल्या मुलासाठी जसं आई मोठ्यातील मोठ्या संकटालाही सामोरं जाऊ शकते, त्याचप्रमाणे एक मुलगाही आपल्या आईला झालेला त्रास पाहू शकत नाही. मायेने आणि प्रेमाने भरलेल्या या नात्याची गोडी काही वेगळीच! नुकताच सोशल मिडियावर आई-लेकाच्या नात्याचा एक सुंदर व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक वासरु खुंटीला बांधण्यात आलेल्या आपल्या आईला (गाईला) कणिस आणून भरवताना दिसून आला.
10 Dec 2025 03:45 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे मंगळवारी पेनसिल्व्हेनियामध्ये एका महत्त्वपूर्ण निवडणूक रॅलीसाठी उपस्थित होते. या रॅलीचा मुख्य उद्देश त्यांच्या सरकारच्या आर्थिक अजेंडाचा प्रचार करणे आणि शेतकऱ्यांसाठी १२ अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेजची घोषणा करणे हा होता. संपूर्ण अमेरिकेचे लक्ष या कार्यक्रमाकडे होते. परंतु, ट्रम्प त्यांच्या भाषणादरम्यान अचानक मूळ विषयावरून भरकटले आणि त्यांनी आपल्या २८ वर्षीय प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट (Karoline Leavitt) यांच्या सौंदर्याचे आणि आत्मविश्वासाचे भरभरून कौतुक करायला सुरुवात केली. ट्रम्प आणि कॅरोलिन यांच्या वयात तब्बल ५० वर्षांचे अंतर आहे.
10 Dec 2025 03:40 PM (IST)
भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरकडून माजी भारतीय खेळाडू गुरशरण सिंगच्या कामगिरीचे स्मरण करण्यात आले. सिंग हाताला फॅक्चर असून देखील १९८९-९० च्या इराणी कप सामन्यात दिल्लीविरुद्ध रेस्ट ऑफ इंडियाकडून ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. जेणेकरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याचे शतक पूर्ण करू शकेल.
10 Dec 2025 03:35 PM (IST)
डिजिटल समावेशनाला गती देत एसुस इंडियाने ‘विद्या इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फॉर युथ अँड अॅडल्ट्स’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्रात डिजिटल साक्षरता मोहिमेचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील कमी उत्पन्न गटातील शाळांमध्ये नव्या डिजिटल लर्निंग केंद्रांची उभारणी केली जात असून, विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यावर भर देण्यात आला आहे. या प्रकल्पाचा प्राथमिक टप्पा अत्यंत यशस्वी ठरल्याने, उपक्रमाचा विस्तार आता पश्चिम महाराष्ट्र व मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये करण्यात येत आहे. सध्या या उपक्रमाचा लाभ ६,००० हून अधिक वंचित विद्यार्थी व तरुणांना मिळत आहे. पुढील काही महिन्यांत हा आकडा आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
10 Dec 2025 03:30 PM (IST)
संभाजीनगर शहरात विविध भागात अवैधरित्या प्रतिबंधीत नायलॉन मांज्याची विक्री करणाऱ्या पाच विक्रेत्यांना विविध भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. कफीलडल्ला खान फजलउल्ला खान (वय २८, रा. शरिफ कॉलनी), शेख मुशीर अहमद तसेच (वय २२, रा. शहाबाजार), तालेब खान शेरखान (वय २८, रा. फातेमानगर, हसुल) आणि मुद्दस्सीर मुजीब अहमद नजीर अहमद (वय ४५, रा. आजम कॉलनी, रोशन गेट) ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक अर्जुन कदम व त्यांच्या पथकाला शारिफ कॉलनी भागात अवैध नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.
10 Dec 2025 03:25 PM (IST)
पुण्यातील हडपसर परिसरातील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील हॉस्पिटल प्रशानसाच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी ही तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या बाहेर ठिय्या मांडला असून रुग्णालयाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
10 Dec 2025 03:20 PM (IST)
अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात एक भीषण अपघात घडला आहे. एक विमान थेट हायवेवरील कारला जाऊन धडकले (Plane Crash) आहे. फ्लोरिडा येथे एका विमानाला काही कारणामुळे तेथील रस्त्यावर इमर्जन्सी लँडिंग करणे भाग पडले. प्लेन लँडिंग करत असताना ते थेट एका कारला जाऊन धडकले आहे. याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. तांत्रिक अडचणीमुळे पायलटने प्लॅन रस्त्यावर लँडिंग करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.
10 Dec 2025 03:15 PM (IST)
सोलापूर जिल्ह्यातील पंढपूर जिल्ह्यातील कोर्टी परिसरात सोमवारी दुपारी हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. शेततळ्यात पाच वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याने आई-वडिलांनी देखील शेततळ्यात उडी मारली. यामुळे या दाम्पत्याचा देखील मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. विजय राजकुमार लोंढे (30), पत्नी प्रियांका (28) आणि त्यांचा लहान मुलगा प्रज्वल (5) अशी मृतांची नावे आहेत. मृत दाम्पत्याला एक मोठा मुलगा देखील आहे. ही घटना जेव्हा घडली तेव्हा तो शाळेत होता.
10 Dec 2025 03:10 PM (IST)
रणवीर सिंगचा “धुरंधर” बॉक्स ऑफिसवर उल्लेखनीय कामगिरी करत असतानाच आणखी एका स्पाय-थ्रिलरच्या चित्रपटाच्या रिलीजची एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुपर-स्पाय “पठाण” म्हणून शाहरुख खानचे पुनरागमन आता अधिकृतपणे झाले आहे. अभिनेत्याचा ब्लॉकबस्टर “पठाण २” ची घोषणा करण्यात आली आहे. तसेच “धुरंधर” ची हवा बॉक्स ऑफिसवर सुरु असताना चाहते शाहरुख खानच्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
10 Dec 2025 03:05 PM (IST)
झी मराठी वाहिनीवर लवकरच शुभ श्रावणी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन दिवसांपूर्वी झी मराठीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या मालिकेत‘शुभ श्रावणी कुटुंबातील नात्यांची उब, मनातील न सांगितलेलं दुख: आणि हळुवार फुलत जाणारी प्रेमकथा यांचा मोहक संगम “शुभ श्रावणी” मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
10 Dec 2025 02:50 PM (IST)
भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि तांत्रिक भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी जगातील अनेक तंत्रज्ञान कंपन्यांच्या सीईओंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. या बैठकीत कॉग्निझंट आणि इंटेल सारख्या प्रमुख कंपन्यांचे प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते. या सीईओंनी पंतप्रधान मोदींना भारतात त्यांच्या गुंतवणूकी आणि कामकाजाचा विस्तार करण्याचे आश्वासन दिले, ज्यामुळे देशात रोजगार आणि नवोपक्रमाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदींनी जागतिक स्तरावरील सीईओंना भेटल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
10 Dec 2025 02:45 PM (IST)
झी मराठी वाहिनीवर लवकरच शुभ श्रावणी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन दिवसांपूर्वी झी मराठीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या मालिकेत‘शुभ श्रावणी कुटुंबातील नात्यांची उब, मनातील न सांगितलेलं दुख: आणि हळुवार फुलत जाणारी प्रेमकथा यांचा मोहक संगम “शुभ श्रावणी” मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
10 Dec 2025 02:40 PM (IST)
राज्यात शिष्यवृत्ती परीक्षेचा जोर विद्यार्थ्यंमध्ये दिसत आहे. शाळांमध्ये पाचवी तसेच आठवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी त्यांचा सराव घेतला जात आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयार करण्यामागे शाळा कोणतीही कमतरता पडू देत नाही आहे. अशात अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आल्यामुळे, ज्या शाळांना शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी त्यांच्या विद्यार्थ्यांची अद्याप नोंद केली नाही, त्यांना या वाढलेल्या मुदतीचा चांगलाच लाभ होणार आहे. (Extension of application deadline of the Scholarship Exam)
10 Dec 2025 02:35 PM (IST)
रणवीर सिंगचा "धुरंधर" बॉक्स ऑफिसवर उल्लेखनीय कामगिरी करत असतानाच आणखी एका स्पाय-थ्रिलरच्या चित्रपटाच्या रिलीजची एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुपर-स्पाय "पठाण" म्हणून शाहरुख खानचे पुनरागमन आता अधिकृतपणे झाले आहे. अभिनेत्याचा ब्लॉकबस्टर "पठाण २" ची घोषणा करण्यात आली आहे. तसेच "धुरंधर" ची हवा बॉक्स ऑफिसवर सुरु असताना चाहते शाहरुख खानच्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
10 Dec 2025 02:30 PM (IST)
अकोला: अकोला शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्रीपासून तीन मुले गायब झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी हे तिघेही घराबाहेर पडले परंतु रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांच्या चिंतेत भर पडली. नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांकडे विचारपूस केल्यानंतरही त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. शेवटी पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
10 Dec 2025 02:25 PM (IST)
हक्काचं घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आशादायक माहिती समोर आली आहे. सिडको घरांच्या दरात कपात (CIDCO Housing Price Cut) होणार की नाही, याबाबताज राज्य मंत्रिमंडाची बैठक होणर आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. सिडको घरांच्या दरात कपात झाल्यास हक्काचं घर घेता येणार आहे.
10 Dec 2025 02:20 PM (IST)
सनातन धर्मामध्ये कालष्टमीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. हा दिवस भगवान शिवाचे भयंकर रूप असलेल्या कालभैरवाला समर्पित आहे. दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी कालाष्टमी साजरी केली जाते. श्रद्धेनुसार या दिवशी उपवास केल्याने विधीनुसार कालभैरवाची पूजा केल्याने भक्तांना सर्व प्रकारच्या भीती, दुःख आणि नकारात्मक उर्जेपासून मुक्तता मिळते आणि भगवान शिवाचे आशीर्वाद देखील मिळतात. या वर्षातील शेवटची कालाष्टमी 11 डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे ही महत्त्वाची तिथी मानली जाते.
10 Dec 2025 02:15 PM (IST)
राज्य शासनाच्या विविध विभागांत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना २००६ मध्ये सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला. हंगामी मलेरिया प्रतिबंधक कामगारांना तब्बल ५ वर्षांनी सहावा वेतन आयोग लागू झाला. मात्र, त्याची थकबाकी अद्याप या कामगारांना देण्यात आली नाही. गत १९ वर्षांपासून थकबाकीसाठी या हंगामी कामगारांचा शासनाशी लढा सुरू आहे. मात्र, प्रत्येकवेळेस त्यांची बोळवण केली जात आहे. दरम्यान, गत काही वर्षांत मलेरिया फवारणीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्याचाही फटका मलेरिया प्रतिबंधक कामगारांना बसला आहे.
10 Dec 2025 02:09 PM (IST)
नागरिकांच्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर २०१९-२० मध्ये चामोर्शी तालुक्यातील घोट येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत ‘हर घर जल’ ही योजना राज्य व केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात आली. या योजनेंत समाविष्ट असलेल्या घोट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पाचही गावांतील नागरिक व जवाहर नवोदय विद्यालय यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने तब्बल १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून १ मे २०२५ ला काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू झाला. मात्र, जेमतेम १ महिनाही लोटत नाही, तोच मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद पडला आहे.
10 Dec 2025 02:02 PM (IST)
आदित्य धर यांचा 'धुरंधर' हा चित्रपट २०२५ च्या अखेरीस चित्रपटगृहात प्रदर्शित होताच धमाका करत आहेत. या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरील परफॉर्मन्स प्रेक्षकांना खूप आवडला आहे. अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि आर. माधवन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत १५० कोटींचा आकडा ओलांडला आहे. चित्रपटातील प्रत्येक पात्राचे कौतुक होत असतानाच, अक्षय खन्ना हे असेच एक नाव आहे जे पडद्यावर आणि सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. चित्रपटातील अभिनेत्याच्या डान्स मूव्ह देखील व्हायरल होत आहे. या गाण्यात अक्षय खन्नाच्या एन्ट्रीची मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली जात आहे. आता, या डान्स मूव्ह आणि विनोद खन्नाच्या ३६ वर्षांच्या जुना डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
10 Dec 2025 01:55 PM (IST)
रामटेक उपविभागांतर्गत असलेल्या मौदा विभागातील मनसर डीसीचे (विद्युत वितरण केंद्र) लवकरच विभाजन होण्याची शक्यता आहे. यासोबतच, शितलवाडीसाठी (परसोडा) नवीन डीसी स्थापित केली जाऊ शकते. यासाठी जिल्हा (रामटेक ग्रामीण) भाजपचे उपाध्यक्ष उदयसिंह ऊर्फ गज्जू यादव प्रयत्नशील आहेत.
10 Dec 2025 01:45 PM (IST)
पंधरा वर्षांपूर्वी, वॉर्नर ब्रदर्स हे एक मनोरंजनासाठी प्रसिद्ध नाव होते आणि नेटफ्लिक्स तेव्हा एक छोटी कंपनी होती जी चित्रपटांच्या डीव्हीडी भाड्याने लोकांना विकत असे. तेव्हा कोणीतरी टाइम वॉर्नरचे तत्कालीन सीईओ जेफ बुक्स यांना विचारले की नेटफ्लिक्स तुमच्यासोबत करार करू शकते का? यावेळी बुक्स हसले. “हे असे विचारण्यासारखे आहे की अल्बेनियन सैन्य जग ताब्यात घेईल का?”. असे म्हणून त्याने नेटफ्लिक्स वर विनोद करून टीका केली.
10 Dec 2025 01:38 PM (IST)
नागपूर शहराच्या पूर्वेकडील पार्डी परिसरात बिबट्याच्या हालचाली पुन्हा एकदा दिसून लागल्य आहेत. नागपूर शहरातील पारडी परिसरातील एका घरा बिबट्या शिरल्याचे लक्षात येताच सकाळपासून शहरात खळबळ उडाली होती. नागपूर वन विभागाच्या अखत्यारीतील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील बचाव पथके घटनास्थळी पोहोचली. दरम्यान, कॅम्पसमध्ये गर्दी असल्याने बचाव कार्य करण्यात अडचणी येत होत्या. बिबट्याने चार जणांना जखमी केल्याचे वृत्त आहे. अखेर, दोन्ही अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनंतर “ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर” च्या चमूने बिबट्याला जेरबंद केला. जेरबंद जेरबंद बिबट्याला सेमीनरी हिल्स वरील ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रात आणले.
10 Dec 2025 01:30 PM (IST)
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’च्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला आरोग्याच्या सर्व सुविधा तत्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही योजना अधिक व्यापकपणे राबविण्यात येईल. राज्यात सध्या या योजनेंतर्गत ६०४ आपला दवाखाने सुरू असून उर्वरित ९६ दवाखाने येत्या जानेवारी अखेर सुरू करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली.
10 Dec 2025 01:20 PM (IST)
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स (JD Vance) आणि त्यांची पत्नी उषा व्हान्स (Usha Vance) हे अमेरिकेच्या सत्ता वर्तुळात (US Power Circle) सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहे. त्यांच्या विधानांमुळे आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलच्या अटकळींमुळे हे जोडपे सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असते. दरम्यान, जे.डी. व्हान्स यांनी नुकत्याच एका पोस्टद्वारे त्यांच्या नात्यावर आणि खासगी आयुष्यावर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सोशल मीडिया यूजर्सवर जोरदार टीका केली आहे. व्हान्स यांनी त्यांच्या पत्नीसोबत एका रेस्टॉरंटमध्ये त्यांचा वाद झाला असल्याचा दावा फेटाळून लावला.
10 Dec 2025 01:13 PM (IST)
बॉलीवूड अभिनेत्री नीलम कोठारीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या प्रवासातील अडचणी आणि एअरलाइनच्या निष्काळजीपणाबद्दल एक पोस्ट शेअर केली. तिने दावा केला आहे की टोरंटो हून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये तिला अचानक अस्वस्थ वाटले, ज्यामुळे तिला मोठा त्रास झाला. तिने सांगितले की जेवल्यानंतर काही वेळातच ती बेशुद्ध पडली, परंतु एअरलाइन कर्मचाऱ्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. तिला एअरलाइन कर्मचाऱ्यांकडून कोणतीही मदत मिळाली नाही आणि कोणीही तिच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली नाही
10 Dec 2025 01:00 PM (IST)
सिंधुदुर्गातील कणकवलीत तरंदळे धरणात 22 वर्षीय युवक व 18 वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केली. मध्यरात्री दोघे धरणाकडे गेल्याचे दिसले आणि पहाटे मृतदेह सापडले. प्रेमसंबंध किंवा कौटुंबिक कारणांची शक्यता तपासात.
10 Dec 2025 12:50 PM (IST)
माळशिरस तालुक्यातील नातेपुते स्मशानभूमीत मध्यरात्री काळ्या बाहुल्या, लिंबू, सुया, फोटो व दारूच्या बाटल्या आढळल्या. जळत्या चितेजवळ वस्तू ठेवण्यात आल्याने आघोरी कृत्याचा संशय व्यक्त, गावात भीती; पोलिस तपास सुरू.
10 Dec 2025 12:40 PM (IST)
ठाण्यात कासारवडवली येथे घरकाम करणाऱ्या महिलेनं एका दिवसाची सुट्टी घेतल्यानंतर चार दिवस कामावर न गेल्याने वाद झाला. घरमालकिणी व तिच्या मुलाने महिलेला धमक्या दिल्या. मुलाने बंदूकसदृश लाईटर दाखवत धाक दिला.
10 Dec 2025 12:30 PM (IST)
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात 45 वर्षीय महिलेनं गरिबीमुळे 14 मुलांपैकी काही मुलांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आशा कर्मचाऱ्यांच्या तपासादरम्यान हे उघड झाले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
10 Dec 2025 12:20 PM (IST)
नागपुरात चाकूने भोसकून तरुणाची हत्या करण्यात आली. जरीपटकाच्या मिसाळ ले-आऊट परिसरात मानेवर चाकूने वार करत तरुणाला संपवले. या हत्याकांडातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
10 Dec 2025 12:10 PM (IST)
धाराशिवमध्ये कला केंद्रातील नर्तिकेसोबत प्रेमसंबंधातील वादामुळे 25 वर्षीय अश्रुबा कांबळे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघे देवदर्शनावरून परतताना वाद झाला होता. पोलिस तपास सुरू असून महिला ताब्यात.
10 Dec 2025 11:00 AM (IST)
बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री रेखा नुकतीच सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झाली. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल अभिनेत्रीला मानद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८१ मध्ये प्रदर्शित झालेला आणि सुपरहिट ठरलेला रेखा यांचा चित्रपट “उमराव जान” देखील या प्रसंगी प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट रेड सी फिल्म फेस्टिव्हलच्या ट्रेझर्स स्ट्रँड विभागात दाखवण्यात आला, जिथे जुने चित्रपट पुन्हा री- रिलीज करण्यात आले.
10 Dec 2025 10:55 AM (IST)
महापालिकेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वीच निवडणुकीच्या गोपनीयतेचा भंग करत भाजप पदाधिकारी व महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संगनमत करून मतदारयाद्यांमध्ये बदल फेरफार व केले आहेत. या गंभीर प्रकाराचे सीसीटीव्ही चित्रीकरणही उपलब्ध आहे, असा प्रकार शहरात अन्य ठिकाणीही झाल्याचे नाकारता येत नाही.’ (Pune Election Scam)
असा गौप्यस्फोट करत काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून भाजप पदाधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी’ अशी मागणी महापालिका आयुक्त व राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
10 Dec 2025 10:45 AM (IST)
अमेरिकन चिप उत्पादक इंटेलने स्थानिक बाजारपेठेसाठी भारतात सेमीकंडक्टर्सचे उत्पादन आणि असेंबल करण्यासाठी टाटा समूहासोबत करार केला आहे. या करारामुळे एआय पीसी क्रांतीला मोठा हातभार लागणार आहे. भारताला टॉप-5 पीसी बाजार बनवण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. या करारमुळे ‘मेक इन इंडिया’ला मोठी चालना मिळणार आहे. भारतात सेमीकंडक्टर निर्मितीला नवी गती मिळणार आहे.
10 Dec 2025 10:35 AM (IST)
आज स्वीडीश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांचा स्मृतिदीन आहे. अल्फ्रेड नोबेल यांच्या संशोधनातील कामगिरीचा गौरव करण्यासाठी आणि त्याच्या स्मरणासाठी हा कार्यक्रम केला जातो. त्यांच्या मृत्यूच्या तब्बल पाच वर्षानंतर १९०१ मध्ये पहिल्यांदा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अल्फ्रेड नोबेल यांनी साहित्य, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र अशा क्षेत्रात उत्तम कामिगीर केली आहे. त्यांना स्विडीश, रशियन, फ्रेंच, इंग्लिश आणि जर्मन या भाषा येत होत्या. त्यांनी डायनामाईटचा शोध लावला होता. शिवाय अल्फ्रेड यांनी तब्बल २६.५ कोटी डॉलर्सची संपत्ती जागतिक पातळीवरील पुरस्कार स्थापन करण्यासाठी दान केली होती. यामुळे त्यांच्या पुण्यतिथीनिमत्त त्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी जगभरातील संशोधन क्षेत्रात उत्तम कागिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
10 Dec 2025 10:25 AM (IST)
भारताची अर्थव्यवस्था (India’s economy) आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक विकास समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी जगातील अनेक आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची (CEOs) भेट घेतली. या भेटीत कॉग्निझंट आणि इंटेलसारख्या दिग्गज कंपन्यांचे सीईओ सहभागी झाले होते, ज्यामुळे भारताच्या तांत्रिक भविष्याला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे.
10 Dec 2025 10:15 AM (IST)
यासाठी बटाट्याचे दोन तुकडे करून त्यावर हळद, टूथपेस्ट आणि खोबरेल तेल घालून मिक्स करा. त्यानंतर पायांच्या टाचांवर हलक्या हाताने मसाज करा. काहीवेळ मसाज केल्यानंतर पाय तसेच ठेवून द्या. नंतर कोमट पाण्याने पाय स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित केल्यास पायांना पडलेल्या भेगा कमी होण्यासोबतच डेड स्किन पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. त्वचेच्या फाटलेल्या भेगा भरून काढण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करावा. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी वाटीमध्ये गुलाब पाणी घेऊन त्यात ग्लिसरीन मिक्स करा. तयार केलेले मिश्रण पायांच्या फाटलेल्या भेगांवर लावून रात्रभर तसेच ठेवावे. यामुळे त्वचा हायड्रेट राहील आणि त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल.
10 Dec 2025 10:04 AM (IST)
थायडंल आणि कंबोडियानंतर आता नायजेरियात (Nigeria) देखील संघर्षाची लाट उसळली आहे. नायजेरियात सुरक्षा दलांनी महिला निदर्शकांवर गोळीबार केला आहे. यामध्ये 9 महिला ठार झाल्या असून 10 जण जखमी झाल्या आहेत. यामुळ सध्या नायजेरियाच्या सुरक्षा दलांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.






