
Marathi Breaking news live updates- Gold Rate Today: भारतात 12 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,076 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,986 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,807 रुपये आहे. भारतात 12 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,19,860 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,30,760 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 98,070 रुपये आहे. भारतात 12 डिसेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 201.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,01,100 रुपये आहे.
IND vs SA 2nd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना काळ चंदीगडमध्ये खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाला 51 धावांनी पराभव स्वीकारावा लागला, हा त्यांचा धावांच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठा T20I पराभव ठरला आहे. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल यांच्या फॉर्मबाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
सोशल मीडियाच्या युगात, काहीही व्हायरल होणे सोपे आहे. सर्व काही वणव्यासारखे पसरते. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. शाळेतील या फोटोमध्ये एक नाही तर दोन सुपरस्टार आहेत. या फोटोमध्ये हृतिक रोशन आणि जॉन अब्राहम आहेत. ते दोघेही एकाच वर्गात शिकत होते. ते लहानपणी गोंडस आणि निरागस होते, पण आता ते कूल, हँडसम आणि हृदयस्पर्शी बनले आहेत. केवळ मुलीच नाही तर मुलेही त्यांच्या लूकसाठी मरण्यास तयार असतात. त्यांच्या लूकची चर्चा केवळ भारतातच नाही तर जगभरात होते. जे त्यांच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा चित्रपटसृष्टीतच संबंध नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही एक मनोरंजक संबंध आहे.
महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट कायम असून पुणे शहरात या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्रासह पुण्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली घसरला.
मुंबई: महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि व्यवसाय-अनुकूल वातावरण या तीन घटकांमुळे महाराष्ट्र ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसाठी अग्रगण्य ठरत आहे. यावर्षी जाहीर केलेले नवीन GCC धोरण राज्यात उच्च मूल्याच्या, कौशल्याधारित रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
MG Hector देखील मार्केटमध्ये लोकप्रिय आहे. आता लवकरच कंपनी या कारचे अपडेटेड व्हर्जन मार्केटमध्ये लाँच करणार आहे. ही कार लाँच होण्यापूर्वी, सोशल मीडियावर एक नवीन टीझर रिलीज करण्यात आला आहे. ही कार अधिकृतपणे 15 डिसेंबर रोजी लाँच करण्यात येईल.
आज अंदमान निकोबार येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विंनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी पुतळ्याची निर्मिती करणाऱ्यांचा सत्कार केला.
भारतीय राजकारणाच्या इतिहासात अनेक दिग्गज नेत्यांचा उल्लेख केला जातो. यात आवर्जून Sharad Pawar यांचा देखील उल्लेख केला जातो. फक्त महाराष्ट्राच्या नाही देशाच्या राजकारणात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली. आज त्यांचा 85 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरात त्यांचे वाढदिवसाचे बॅनर झळकले आहे.
सिद्दू हा भारतातील हिमाचल प्रदेशातील एक पारंपारिक पदार्थ आहे जो गव्हाच्या पिठापासून तयार केला जातो. यात मसालेदार स्टफिंग भरून झणझणीत चटणीसह याला खाण्यासाठी सर्व्ह केले जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण भारताच्या अनेक भागात ही डिश फार वेगाने लोकप्रिय होऊ लागली आहे. थंडीच्या दिवसांत ते ही वाफवलेली गरमा गरम डिश मनाला वेगळच सुख देऊन जाते. तुम्ही आजवर जर ही डिश जर कधी खाल्ली नसेल तर यावेळी तुम्ही घरीच बनवून या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता. चविष्ट असण्यासोबतच, ही डिश आरोग्यदायी देखील आहे कारण ती तेलाऐवजी वाफेवर शिजवली जाते. सिद्दू अनेक प्रकारे बनवला जातो. पण आज आम्ही तुम्हाला मसूर सिद्दूची रेसिपी सांगणार आहोत. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
कानपूरच्या बिधानू पोलीस स्टेशन हद्दीतील जगदीशपूर गावात २१ वर्षीय मानसीच्या गूढ आणि दुःखद मृत्यूने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृतक विवाहित होती पण गेल्या सहा महिन्यांपासून ती तिच्या प्रियकर मनीष यादवसोबत त्याच्या घरी राहत होती. तिच्या मृत्यूनंतर, कुटुंबीयांनी आरोपी प्रियकरावर गंभीर आरोप केले आहेत. मनीषने प्रथम मानसीवर जबरदस्तीने बलात्कार केला आणि नंतर तिच्या गुप्तांगात कापडाचे तुकडे भरले. अपमान आणि वेदनेने कंटाळून मानसीने सल्फा सेवन केले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. मृतकाचे वडील धरमवीर यांनी मनीष यादवविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अजूनही फरार आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी अनेक पोलिस पथके काम करत आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष आणि संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump )यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील धोरणांवर वॉशिंग्टनमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. या चर्चेत अमेरिकन प्रकाशन ‘पॉलिटिको’ मधील १२ डिसेंबरच्या लेखानुसार, ट्रम्प हे सध्याच्या G7 (Group of Seven) सारख्या युरोप-केंद्रित (Europe-centric) गटांना मागे टाकण्याच्या प्रयत्नात आहेत. ट्रम्प G7 (जो केवळ जुने, श्रीमंत आणि लोकशाही देशांपुरता मर्यादित आहे) याला अपुरे मानतात. त्यामुळेच, व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाच्या (NSS) अप्रकाशित भागातून ‘C5’ (Core Five) किंवा ‘कोर फाइव्ह’ या नवीन एलिट फोरमची कल्पना पुढे आली आहे. C5 गट हा अधिक व्यावहारिक आणि शक्ती-आधारित (Power-based) असेल.
प्रचंड विरोधानंतर देखील नाशिकमध्ये वृक्षतोड करण्यात आली, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, सयाजी शिंदे यांच्यासह अनेकांनी नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोड करण्यास विरोध केला. यासाठी मोठ्या प्रमाणत जनआंदोलन उभारण्यात आले. मात्र तरी देखील प्रशासनाने नाशिकमधील 1200 हून अधिक झाडांची कत्तल केली. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा संताप अनावर झाला. यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांना मस्ती आलीये असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला.
भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीचे सुपरस्टार रजनीकांत आज त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. राजकारण्यांपासून ते चाहत्यांपर्यंत, प्रत्येकजण सोशल मीडियावर त्यांच्या आवडत्या ॲक्शन अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सुपरस्टारला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच सोशल मीडियावर फोटो देखील पंतप्रधान मोदींनी शेअर केले आहेत. ज्याला चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.
कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका सध्या एका नव्या आणि आव्हानात्मक वळणावर आहे. या वळणात आदिशक्तीची रचना, तिच्या दैवी अवतारातील मानवी मर्यादा आणि भावना यांचा गुंता दाखवण्यात आला आहे, ज्यामुळे मिळालेले आव्हान अधिकच रंजक झाले आहे.मालिकेच्या येत्या भागात दैवी शक्तींच्या मानवी अवतारातल्या नात्यांमधल्या भावना, त्यांच्यातला अविश्वास आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या रहस्यमय घटनांचं नाट्यमय मिश्रण पाहायला मिळणार आहे. शिवा–जगदंबाच्या नात्यात एका छोट्याशा भेटवस्तूच्या निमित्ताने निर्माण होणारं मोठं वादळ प्रेक्षकांना तणावाची जाणीव करून देणार आहे. या भेटवस्तूत दडलेला अर्थ आणि त्या भेटीमुळे निर्माण होणारी घटनांची मालिका ही संपूर्ण कथेला नवं वळण देणार आहे. या भेटीमुळे जगदंबेचा जो मोठा गैरसमज होतो, तो शिवाचं सत्य दूर करेल का आणि हा दैवी प्रवास कसा घडेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित नायलॉन (चायनीज) मांजाची अवैध विक्री रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी (Chhatrapati Sambhajinagar Rural Police) मोठी मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) चार तालुक्यांमध्ये धडक कारवाई करत ६ गुन्हे दाखल केले असून, ₹१६ हजार ७४० किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली १० डिसेंबर रोजी ही मोहीम राबवण्यात आली.
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक घटनांचे व्हिडिओज शेअर केले जातात. काही मजेदार, काही हास्यास्पद तर काही थक्क करणारे व्हिडिओज इथे शेअर होतात. पण अलीकडेच इंटरनेटवर एका धक्कादायक आणि हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांकडून गुरुवारी पोस्ट करण्यात आला आहे. यात एका स्कायडायव्हरसोबत घडलेली थरारक घटना कैद करण्यात आल्याचे दिसून आले. आकाशात उडी मारण्यासाठी स्कायडायव्हरने जशी झेप घेऊ पाहिली तितक्यातच त्याचा त्याचा पॅराशूट ओपन झाला आणि विमानाच्या कोपऱ्याला जाऊन अडकला. यामुळे स्कायडायव्हरदेखील पॅराशूट अडकलेल्या जागी ओढला गेला आणि सुमारे 15 हजार फुटांवर आकाशात लटकला. घटनेचा हा संपूर्ण थरार तुम्हाला व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाहता येईल.
रणवीर सिंगचा “धुरंधर” हा चित्रपट थिएटरमध्ये अभूतपूर्व कामगिरी करताना दिसत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा सतत सुरु आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना, अक्षय खन्नाने साकारलेल्या रहमान डकैतच्या भूमिकेचे सर्वजण प्रशंसा करताना दिसत आहेत. अभिनेत्याचा जबरदस्त अभिनय आणि व्हायरल झालेला FA9LA सीन प्रेक्षकांना रीलमध्ये पाहायला मिळत आहे. या सगळ्यामध्ये, अक्षयची एक जुनी मुलाखत देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. या मुलाखतीत तो त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलताना दिसला आहे. अभिनेता नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.
Legendary Kapil Dev gave advice : दक्षिण आफ्रिका सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे, या दौऱ्यावर सुर्वतीला भारत आणि दक्षिण आफ्रिका यायांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. ही मालिका दक्षिण आफ्रिकेने २-० अशी जिंकीली. भारताच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघ आणि संघ व्यवस्थापणावर खूप टीका झाली होती. दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या ०-२ अशा कसोटी मालिकेतील पराभवानंतर, भारताला पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणारे माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली, त्यांनी म्हटले आहे की “लीगपेक्षा देशासाठी खेळणे आहे महत्त्वाचे आहे.”
मुंबई: सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने मुंबईत दाखल झाले आहेत, महाराष्ट्र सरकार आणि मायक्रोसॉफ्टमध्ये महत्वाचा करार पार पडला आहे. मायक्रोसॉफ्ट राज्यात मोठी गुंतवणूक करण्याची शक्यताब आहे, या गुंतवणुकीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळणार आहे.
महाराष्ट्र सरकार आणि मायक्रोसॉफ्टमध्ये ग्लोबत कॅपॅबिलिटी सेंटर हा महत्वाचा प्रकल्प उभारण्याबाबत करार झाल्याचे समजते आहे. हा प्रकल्प जवळपास २० लाख स्केवर फुटांवर उभारले जाणार आहे. यामुळे जवळपास १५ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
जागतिक आरोग्य सेवा कंपनी नोवो नॉर्डिस्कने भारतात ओझेम्पिक (इंजेक्शन म्हणून दिले जाणारे सेमाग्लुटाइड) दाखल करत असल्याची घोषणा केली आहे. हे टाइप २ मधुमेह असलेल्या प्रौढांसाठी आहे ज्यांचा मधुमेह केवळ आहार आणि व्यायामाने नियंत्रित होत नाही. ओझेम्पिक आठवड्यातून एकदा दिले जाते. हे GLP-1 RA (ग्लुकागॉनसारखे पेप्टाइड-1 रिसेप्टर अॅगोनिस्ट) औषधांच्या वर्गाशी संबंधित आहे. टाइप २ मधुमेहावरील उपचारांचे मुख्य आधार असलेल्या संतुलित आहार आणि नियमित व्यायामासह सहायक उपचार म्हणून हे औषध घेतले पाहिजे.
विनेश फोगाट निवृत्ती यू-टर्न: भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने एक मोठा निर्णय घेतला आहे. तिने निवृत्तीनंतर यू-टर्न जाहीर केला आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये विनेश फोगाटने खेळापासून दूर जाऊन राजकारणात प्रवेश केला. तथापि, ती पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज आहे. विनेश फोगाटने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये तिच्या चाहत्यांसोबत ही अपडेट शेअर केली आहे. तिचे लक्ष आता लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या २०२८ च्या ऑलिंपिक खेळांवर आहे.
Maria Corina Machado Nobel Peace Prize : व्हेनेझुएलाच्या (Venezuela) लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठीचा सर्वात प्रमुख आवाज असलेल्या मारिया कोरिना मचाडो (María Corina Machado) यांनी अनेक महिन्यांच्या लपूनछपून राहिल्यानंतर अखेर नॉर्वेमध्ये पाऊल ठेवले. हे पलायन कोणत्याही सामान्य प्रवासापेक्षा चित्रपटातील कथेसारखे (Like a movie story) होते, कारण हे अत्यंत धोकादायक ऑपरेशन अमेरिकेच्या विशेष दलाचे माजी कर्मचारी ब्रायन स्टर्न यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केले होते. मचाडो यांनी देशातून पलायन करण्याचा निर्णय घेतला कारण राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या सरकारकडून त्यांना आणि इतर विरोधी नेत्यांना अटक होण्याचा धोका होता. जवळपास एक वर्ष त्या लपून बसल्या होत्या. हे धोकादायक निर्वासन (Evacuation) ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी, माचाडो कोणाच्याही लक्षात येऊ नये यासाठी वाहनांमध्ये अनेक बदल करण्यात आले आणि सुरक्षा चौक्या टाळण्यासाठी गर्दीचे मार्ग टाळण्यात आले.
संत गाडगेबाबा क्रीडा संकुलाच्या मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही पार पडलेल्या तालुका बाल क्रीडा स्पर्धेत बिडगाव जिल्हा परिषद प्राथमिक व वरिष्ठ प्राथमिक शाळेने पुन्हा एकदा अव्वल कामगिरी करत सलग चौथ्या वर्षी तालुका चॅम्पियनपदावर आपली मोहोर उमटवली आहे. गुणवत्तापूर्ण तयारी, शिस्तबद्ध खेळ आणि संघभावनेच्या बळावर बिडगावने क्रीडा क्षेत्रात आपला अपराजित दबदबा कायम ठेवल्याचे पुन्हा सिद्ध झाले. सन २०२५-२६ मधील मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत आयोजित या क्रीडा स्पर्धांमध्ये तालुक्यातील विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. कबड्डी, खो-खो, क्रिकेटसह अनेक प्रकारांमध्ये चुरशीचे सामने बघायला मिळाले. मात्र प्रत्येक विभागात बिडगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अचूक हालचाली, रणनीतीपूर्ण खेळी आणि समन्वयपूर्ण सादरीकरणामुळे ते इतरांपेक्षा ठळकपणे उठून दिसले.
संत गाडगेबाबा क्रीडा संकुलाच्या मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही पार पडलेल्या तालुका बाल क्रीडा स्पर्धेत बिडगाव जिल्हा परिषद प्राथमिक व वरिष्ठ प्राथमिक शाळेने पुन्हा एकदा अव्वल कामगिरी करत सलग चौथ्या वर्षी तालुका चॅम्पियनपदावर आपली मोहोर उमटवली आहे. गुणवत्तापूर्ण तयारी, शिस्तबद्ध खेळ आणि संघभावनेच्या बळावर बिडगावने क्रीडा क्षेत्रात आपला अपराजित दबदबा कायम ठेवल्याचे पुन्हा सिद्ध झाले. सन २०२५-२६ मधील मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत आयोजित या क्रीडा स्पर्धांमध्ये तालुक्यातील विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. कबड्डी, खो-खो, क्रिकेटसह अनेक प्रकारांमध्ये चुरशीचे सामने बघायला मिळाले. मात्र प्रत्येक विभागात बिडगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अचूक हालचाली, रणनीतीपूर्ण खेळी आणि समन्वयपूर्ण सादरीकरणामुळे ते इतरांपेक्षा ठळकपणे उठून दिसले.
सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु आहे. राज्यसभा आणि लोकसभेमध्ये विविध विषयांवर सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये खडाजंगी सुरु आहे. वंदे मातरम, व्होट चोरी यासारख्या अनेक विषयांवर चर्चा झाली. यानंतर आता तृणमूल काँग्रेस (टीएमसी) खासदार सौगत रॉय हे जोरदार चर्चेत आले आहेत. त्यांचा संसदेच्या आवारात सिगारेट ओढताना व्हिडिओ व्हायरल (Viral News) झाला असून त्यांच्यावर कारवाई होणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या "बॉर्डर २" च्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता, चित्रपटाच्या टीझरच्या प्रदर्शनाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. २०२६ च्या सर्वात अपेक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या "बॉर्डर २" चा टीझर १६ डिसेंबर रोजी विजय दिवसाच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे.
ज्योतिषशास्त्र हे विविध प्रकारचे असते, ज्यामध्ये हस्तशास्त्र, संख्याशास्त्र, सामुद्रिक शास्त्र असे अनेक प्रकार आहेत. ज्योतिषानुसार प्रत्येक गोष्टीला एक अर्थ असतो आणि शरीरावर विविध ठिकाणी तीळ असण्याचा एक अर्थ असतो, याबाबत अधिक माहिती आपण आज घेऊया. सामुद्रिक शास्त्रानुसार, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर तीळ असणे एखाद्या व्यक्तीबद्दल सखोल अंतर्दृष्टी प्रकट करते. सामुद्रिक शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर तीळ शुभ किंवा अशुभ असू शकतो. या भागात, आपण उजव्या, डाव्या किंवा मधल्या कपाळावर तीळाचा अर्थ आणि अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्यांचा तपशीलवार अभ्यास करणार आहोत. ज्योतिषाचार्य आनंद पाठक यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे, जाणून घ्या.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. ती स्वप्नांची नगरी आहे. देशभरातून तरुण-तरुणी येथे त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असताता. अभिनय जगात स्वतःचे नाव कमावण्याची आणि ग्लॅमर जगात स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा अनेक मुली आणि मुलांच्या मनात असते. पण येथील चित्र वेगळचं पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जून ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ३७० हून अधिक अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. त्यापैकी २६८ मुली आहेत, जे एकूण प्रकरणांपैकी अंदाजे ७२ टक्के आहेत. एकूण दरमहा सरासरी ६० मुले बेपत्ता होतात. अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता निर्माण होते.
स्पेनकडून पराभव झाल्यानंतर ज्युनियर महिला हॉकी विश्वचषकातील भारतीय महिला संघाचे आव्हान संपुष्टात आला. ज्युनियर हॉकी विश्वचषकात भारतीय महिला हॉकी संघाला स्पेनने पराभूत केले. या पराभवामुळे भारतीय संघाला स्पर्धेत एकूण १० व्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पेनकडून भारतीय संघ २-१ असा पराभूत झाला. भारतीय संघाकडून कनिका सिवाचला (४१’) ने एकमेव गोल करता आला.तर स्पेनकडून नतालिया विलानोवा (१६’) आणि एस्थर कॅनालेस (३६’) यांनी गोल डागले.
घरातील एक तोळे सोने चोरीस गेल्याच्या संशयावरून घरकाम करणाऱ्या एका महिलेवर अघोरी आणि अमानुष तंत्रविद्येचा प्रयोग केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधील सुराणानगर येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी लिंबू कापून तंत्रमंत्राचा प्रयोग करणाऱ्या सासू आणि सुनेविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन आणि हक्क्क्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे. सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून नागपूरमधून शेतकऱ्यांसाठी खूशखबर यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे. यावरुन आमदार रोहित पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. माध्यमांशी संवाद साधून त्यांनी इशारा दिला आहे.
ओटीटीची लोकप्रिय महिला-केंद्रित मालिका "फोर मोअर शॉट्स प्लीज" पुन्हा एकदा प्रेक्षकांचे स्वागत करण्यास सज्ज झाली आहे. चौथ्या आणि शेवटच्या सीझनचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि हे स्पष्ट आहे की यावेळी कथा केवळ ग्लॅमरस नाईटलाइफ, नातेसंबंध आणि हृदयविकारापुरती मर्यादित नाही तर ती वैयक्तिक संघर्षांमध्ये गुंतलेली आहे. यावेळी ट्रेलरमध्ये काहीतरी खास दाखवले जाणार आहे.
बिहारमधील छपरा जिल्ह्यात एका मध्यमवयीन व्यक्तीच्या निर्घृण हत्येने खळबळ उडाली आहे. मांझी नगर पंचायतीतील दक्षिण टोला येथील रहिवासी ५५ वर्षीय सूरज प्रसाद यांची गुन्हेगारांनी निर्घृण हत्या केली. त्यांचा मृतदेह मांझी दक्षिण टोला येथील त्यांच्या खोलीत बेडखाली रक्ताने माखलेला आढळला. गुन्हेगारांनी त्यांचे दोन्ही डोळे बाहेर काढले आणि त्यांचे गुप्तांग चिरडले होते.
बांगलादेशमध्ये (Bangladesh) सार्वत्रिक निवडणुका जाहीर होताच, देशाचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी थेट अंतरिम सरकारचे प्रमुख (Interim Government Head) मुहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय बंड केले आहे. या अप्रत्याशित हल्ल्यामुळे बांगलादेशातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रपती झाल्यानंतर मोहम्मद शहाबुद्दीन यांनी पहिल्यांदाच मीडियाला मुलाखत दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, युनूस लोकशाही तत्त्वांचे पालन करत नाहीत आणि ते राष्ट्रपतींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. शहाबुद्दीन यांच्या मते, युनूस यांच्या अपमानामुळे ते इतके दुःखी झाले आहेत की, आपला २०२८ पर्यंतचा कार्यकाळ पूर्ण न करता ते राजीनामा देण्याचा विचार करत आहेत.
आयुर्वेदिक डॉक्टर कपिल त्यागी यांचा असा विश्वास आहे की हिवाळ्यात योग्य अन्न खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात आणि सांधे लवचिक राहतात. डॉक्टरांनी स्पष्ट केले की हिवाळ्यात स्नायू कडक होतात आणि सांध्याची हालचाल कमी होते, म्हणून पौष्टिक अन्न खाणे अत्यंत महत्वाचे आहे. डॉक्टरांनी स्पष्ट केले की कॅल्शियम आणि विटामिन डी हाडांसाठी आवश्यक आहेत. योगायोगाने, हिवाळ्यात काही पदार्थ आढळतात ज्यात हे दोन्ही पोषक घटक चांगल्या प्रमाणात असतात. जर तुम्ही संपूर्ण हिवाळ्यात हे पदार्थ खाल्ले तर तुमची हाडे मजबूत होतील, शरीराची सूज कमी होईल आणि थंड हवामानातील वेदना टाळता येतील.
डिजि यात्राने एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, डिजी यात्राने तब्बल 19 दशलक्ष यूजर्सचा आकडा पार केला आहे. याशिवाय नवीन घोषणा देखील करण्यात आली आहे. आता डिजीयात्रा ६ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. भारतातील सेल्फ सॉव्हरेन आयडेण्टिटी (एसएसआय)-आधारित डिजि यात्रा यूजर्ससाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. डिजि यात्रा हे भारतातील सेल्फ सॉव्हरेन आयडेण्टिटी (एसएसआय)-आधारित आणी प्रायव्हसी-बाय-डिझाइन प्लॅटफॉर्म आहे. डिजि यात्राने जलद, कॉन्टॅक्टलेस आणि अधिक सर्वसमावेशक प्रवासी अनुभवाच्या माध्यमातून विमान प्रवासाला अधिक उत्साहपूर्ण बनवले आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागरितेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत बंगळुरूचे एस. विघ्नेश शिशिर यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. राहुल गांधी यांच्यावर ब्रिटीश आणि भारतीय असे दुहेरी नागरिकत्व असल्याचा आरोप शिशिर यांच्याकडून करण्यात आला आहे.या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होणार असून आज याचा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टीम इंडियामधून वगळल्यानंतर नितीश कुमार रेड्डी उत्कृष्ट फॉर्ममध्ये परतला आहे. हार्दिक पंड्याच्या दुखापतीनंतर त्याला व्हाईट बॉल क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो लक्षणीय प्रभाव पाडू शकला नाही आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला संधी मिळाली नाही. पंड्याच्या पुनरागमनानंतर, नितीशला भारताच्या टी-२० संघातूनही वगळण्यात आले. तथापि, त्याने आता शानदार हॅटट्रिक घेत पुनरागमनाचा दावा केला आहे. त्याने मध्य प्रदेशविरुद्ध त्याच्या गोलंदाजी कौशल्याचे प्रदर्शन केले.
पुणे महापालिका निवडणुकीच्या मैदानत उतरली आहे. महाविकास आघाडीसोबत जायचे की नाही याचा निर्णयाची वाट न पाहता मनसेने मोर्चेबांधणी सुरू केली असून आजपासून फॉर्म वाटप केले आहे. शुक्रवारी आणि शनिवारी दुपारी ४ ते ७ या वेळात उमेदवारी अर्ज वाटपाची प्रक्रिया होणार आहे.
गुंतवणूकदारांची भिशी वेळेत न देता आल्याने भाजप जिल्हा उपाध्यक्षाच राजू मोरे आत्महत्याचा प्रयत्न केला आहे. गुंतवणूकदारांनी तगादा लावल्याने विष घेतले. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भिशी फुटण्याच्या दिवशीच आत्महत्याचा प्रयत्न केल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले.गेल्या अनेक दिवसांपासून टोलवाटोलवी करत असल्याने गुंतवणूकदारांनी आपला गोंधळ घातला होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात न्यायालयाने काढलेले समन्स रद्द करण्याते आले आहे, सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही, तर गावाचे पाणी बंद करू," अशी कथित धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात समन्स काढण्यात आले होते. बारामती सत्र न्यायालयाने हे समन्स रद्द केले आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एका उमेदवारने सात ते आठ कोटी वाटल्याची जाहीर कबुली दिली आहे. त्या उमेदवाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरातील हा प्रकार आहे.
मुंबई पोलीस दलातील शिपाई आणि उपनिरीक्षकांना आता किमान ५३८ चौरस फुटांची सदनिका सेवानिवासस्थान म्हणून मिळणार आहे. याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पाठविलेला प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला आहे.याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मुंबईतील वाय.बी.सेंटरमध्ये गर्दी केली आहे.
आंध्र प्रदेशातील मरेदुमिल्ली येथे एक बस दरीत कोसळून नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एएसआर जिल्ह्यातील चिंतुरू आणि भद्राचलम दरम्यान घाट रस्त्यावर एक बस उलटली. नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. जखमींना उपचारासाठी भद्राचलम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती एएसआरचे जिल्हाधिकारी दिनेश कुमार यांनी दिली आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने मोठे आंदोलन केले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दोनदा मोर्चा धडकला. त्यानंतर मराठा समाजाला कुणबी दाखले मिळावेत यासाठी राज्य सरकारने राज्यात कुणबी नोंदणींचा शोध घेण्याचे निर्देश दिले. तर हैदराबाद गॅझेटिअरसह सातारा आणि इतर गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला
उत्तर प्रदेशात पुढील सहा महिन्यांसाठी संपावर बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही विभागातील कर्मचारी सहा महिने संपावर जाऊ शकत नाहीत. सरकारने हा निर्णय उत्तर प्रदेश अत्यावश्यक सेवा देखभाल कायद्याअंतर्गत (ESMA) घेण्यात आला.
जपानममध्ये पुन्हा एकदा भूंकपाच्या धक्क्यांनी जनजीवन विस्कळीत केले आहे. हाचिनोहे या परिसरामध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंपाचा धक्का बसला आहे. 6 .7 तीव्रतेचा हा धक्का असून यामुळे त्सुनामीचा धक्का बसला आहे.
भुवनेश्वरच्या सत्य विहार परिसरातील एका नाईटक्लबमध्ये शुक्रवारी (१२ डिसेंबर २०२५) भीषण आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसून, तीव्र ज्वाळांनी केवळ नाईटक्लबचेच नव्हे तर शेजारील फर्निचर दुकानालाही वेढले.
लाकूड आणि स्पंजसारख्या ज्वलनशील साहित्यामुळे दुकानात आग झपाट्याने पसरली आणि मोठे नुकसान झाले. आगीदरम्यान वाऱ्याची दिशा बदलल्याने संपूर्ण बाजारपेठेत धूर पसरला, ज्यामुळे काही काळ दृश्यमानता कमी झाली आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.
राजकारणात समाजवादी, उजवे, डावे, शेतकरी-कामगार वर्गाचे प्रतिनिधीत्व करणारे अनेक पक्ष आणि नेते होते. पण सुसंस्कृतपणा आणि शालीनता हे या राजकारण्यांचा मुख्य स्वभाग गुण होता. शिवराज पाटील चाकुरकर हे या पिढीतील नेते होते. त्यांच्या निधनामुळे त्यांचे चाहते, कार्यकर्त्यांना अनेक गोष्टींची यानिमित्ताने आठवण होत आहे. त्यांच्या राजबिंड व्यक्तिमत्वाला या शालिनतेचा साज होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवराज पाटील यांच्या निधनानंतर आदरांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, "शिवराज पाटील जी यांच्या निधनाने दुःख झाले आहे. ते एक अनुभवी नेते होते. सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे तसेच लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले. समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याच्या ध्येयाने ते झपाटले होते. गेल्या काही वर्षांत त्यांच्यासोबत माझे अनेक वेळा संवाद झाले, त्यापैकी सर्वात अलीकडील भेट काही महिन्यांपूर्वीच जेव्हा ते माझ्या निवासस्थानी आले होते तेव्हा झाली होती. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. ओम शांती. "
श्री शिवराज पाटील जी यांच्या निधनाने दुःख झाले आहे. ते एक अनुभवी नेते होते. सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे तसेच लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले. समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याच्या ध्येयाने ते… pic.twitter.com/aqQVerLnhn
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2025
जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की, राज्यसभा खासदार शरद पवार जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा, अशा शुभेच्छा पंतप्रधान मोदींनी दिल्या आहेत. ़
Birthday wishes to Rajya Sabha MP Shri Sharad Pawar Ji. Wishing him a long and healthy life.@PawarSpeaks
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2025
एक बहुआयामी व्यक्तीमत्त्व आणि राजकारणातील चाणक्य अशी ओळख निर्माण करणाऱ्या शरद पवार यांचा आज वाढदिवस. चांदा ते बांदापासून प्रत्येक व्यक्तीच्या तोंडात शरद पवारांचे नाव असतेच. मुळचे बारामतीच्या असणाऱ्या शरद पवारांनी केंद्रीय मंत्रिपदापासून राज्यातील सत्तेमध्ये मुख्यमंत्री पद भुषवले आहे. त्यांची राजकीय नीती आणि राजकारणाची पद्धत यामुळे ते सत्तेमध्ये असो किंवा नसो नेहमीच त्यांची चर्चा असते. शरद पवार या भाकरी फिरवणार यावरुन आजही राजकारणाची दिशा ठरते. शरद पवार आज त्यांचा 85 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
जितेशला परिस्थिती बदलता आली नाही, परंतु मैदानावर घडलेल्या एका घटनेने सर्वांनाच धक्का बसला. यष्टिरक्षक-फलंदाजाच्या चांगल्या नशिबाने गोलंदाजही थक्क झाला. झाले असे की, भारतीय डावाच्या १६ व्या षटकाचा दुसरा चेंडू ओथनिएल बार्टमनने टाकला. मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात जितेशने त्याची बॅट जोरात फिरवली. तथापि, तो चेंडूची रेषा चुकवला आणि तो त्याच्या स्टंपवर आदळला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चेंडू बेल्सवर आदळला, पण तो पडला नाही.
जेष्ठ नेते शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. आज महाराष्ट्रातील चौकाचौकात शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत. शरद पवार यांना नेते, कार्यकर्ते, कलाकार या सगळ्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे शरद पावर यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन दोन दिवस आधीच करण्यात आले. वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी डिनर पार्टी झाली. यामध्ये राजकीय नेत्यांसह उद्योगपती सहभागी झाले होते. या पार्टीला विशेष उपस्थित अजित पवार यांची होती. शरद पवार यांचा राजकीय प्रवास फारच प्रेरणादायी आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची राजकीय कारकिर्द आणि बालपणातील काही गोष्टी जाणून घेऊया.
मुंबई महापालिकेमार्फत शहरातील मराठी शाळा ठरवून बंद पाडल्या जात असल्याचा गंभीर आरोप ‘मराठी शाळा परिषद’ आणि मराठी अभ्यास केंद्राकडून करण्यात आला आहे. कुलाबा, लोअर परळ, शिवडी, माहिम, भांडूप, मानखुर्द अशा विविध भागांतील अनेक महापालिका शाळा अतिधोकादायक इमारत, नूतनीकरणातील विलंब किंवा विद्यार्थ्यांची कमी पटसंख्या अशा कारणांवरून बंद करण्यात येत असल्याचा या संस्थांचा दावा आहे. यामुळे मुंबईतील मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात आले असून, या लढ्याला बळकटी देण्यासाठी येत्या १४ डिसेंबरला दादर येथे मोठी परिषद आयोजित करण्यात आली आहे.
जपान (Japan) आणि फिजी (Fiji) यांसारख्या भूकंपप्रवण प्रदेशांना (Earthquake-prone regions) पुन्हा एकदा हादरा बसला आहे. तीन दिवसांपूर्वी जपान ७.५ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचा (Powerful Earthquake) सामना करत असताना, शुक्रवार, १२ डिसेंबर रोजी या दोन्ही प्रदेशांमध्ये ५.१ रिश्टर स्केलचा (5.1 Richter Scale) भूकंप जाणवला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) नुसार, हे भूकंप भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ३:३९ वाजता झाले. जपानची राजधानी टोकियोपासून ६८० किलोमीटर उत्तर-ईशान्य दिशेला (NNE) या भूकंपाचे केंद्र होते आणि ते ६२ किलोमीटर खोलीवर होते. या ताज्या भूकंपाने आधीच विस्कळीत झालेल्या जपानमधील सामान्य जनजीवन (Normal Life) आणखी प्रभावित झाले आहे.
भारतीय विमान वाहतूक बाजारपेठ जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे. तरीही ती विमान कंपन्यांसाठी सातत्याने तोट्यात चालणारी आहे. देशातील सर्वांत मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोमधील अलीकडील गोंधळामुळे पुन्हा एकदा भारतात विमान वाहतूक चालवणे खरोखर कठीण आहे की नाही याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. या गंभीर प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर एअरएशियाचे सीएफओ विजय गोपालन यांचे वक्तव्य धोक्याची घंटा मानली जात आहे.
उत्तर भारतातून येणाऱ्या गार वाऱ्यांचा जोर वाढल्याने महाराष्ट्रातील तापमानात मोठी घसरण झाली आहे. राज्यातील अनेक शहरांत किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा त्याखाली नोंदवले जात आहे. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १५ अंश, तर माथेरानमध्ये १७ अंश इतकी नोंद झाली. अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक थंडी जाणवत असून येथे पारा ६.६ अंशांवर घसरला आहे. सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद याच जिल्ह्यात झाली आहे.
पुणे आणि नाशिकमध्येही तापमान ७ ते ८ अंशांपर्यंत खाली आले आहे. हवामान विभागाचा अंदाज आहे की उत्तर भारतातून वेगाने येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवस राज्यात थंडीची लाट कायम राहणार आहे. मध्य, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत पाऱ्याची घसरण यापुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे.
भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिलने त्याचे तंत्र अपारंपरिक ऐवजी अधिक क्लासिक बनवले आहे, ज्यामुळे टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याला अपेक्षित असलेले फायदे मिळत नाहीत. इंग्लंडविरुद्ध कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी मालिकेत ७५४ धावा काढणाऱ्या गिलला सर्वात लहान स्वरूपात तोच फॉर्म पुन्हा दाखवता आला नाही. गेल्या हंगामात तीन आंतरराष्ट्रीय शतके झळकावणाऱ्या गिलच्या जागी उच्च कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनने गिलची निवड केली आहे हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे.
नागपूर : सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा केली जात आहे. त्यातच सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मांडलेल्या ७५२८६ कोटी ३७ लाख ५९ हजार रुपयांच्या विक्रमी पुरवणी मागण्यांना सभागृहात मंजुरी दिली. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील तरतूद आणि करण्यात येणाऱ्या कामांचीही माहिती दिली. यात महसूल, कृषी, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय या विभागांच्या मागण्यांचाही समावेश होता.
Pakistani Army Firing Kech District : पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तान (Balochistan) प्रांतात सुरक्षा दलांकडून (Security Forces) नागरिकांवर होणारे अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत. या बिघडत्या मानवी हक्कांच्या (Human Rights) परिस्थितीबद्दल आता बलुचिस्तानच्या जनतेचा रोष उफाळून आला आहे. केच जिल्ह्यात (Kech District) नुकत्याच घडलेल्या एका क्रूर घटनेविरोधात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने (Protests) केली आहेत. निदर्शकांनी पाकिस्तानी सैन्यावर “क्रूर वृत्ती” (Cruel Attitude) स्वीकारल्याचा आरोप केला आहे, ज्याचे परिणाम सामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत. या निदर्शनांमुळे पुन्हा एकदा बलुचिस्तानमधील परिस्थितीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
India Share Market Update: जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात केल्यानंतर डाऊ आणि एस अँड पी ५०० रात्रभर विक्रमी उच्चांकावर बंद झाला. याचा परिणाम शेअर बाजारावर होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांचा विचार केला तर भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० आज, शुक्रवारी, १२ डिसेंबर रोजी सकात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
युवराज सिंगचे नाव भारतीय क्रिकेट इतिहासातील महान खेळाडूंमध्ये गणले जाते. २००७ चा टी-२० विश्वचषक आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक भारताला विजेता बनवणाऱ्या युवराजला त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी पंजाब क्रिकेट असोसिएशनने मोठा सन्मान दिला आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशनने नवीन चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये युवराज सिंगच्या नावावर एका स्टँडचे नाव देण्याची घोषणा केली आहे. या मैदानावर होणारा हा पहिलाच पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे.
कल्याण–डोंबिवली महापालिकेत वरिष्ठ पदांच्या नियुक्तीवरून मोठे वादंग निर्माण झाले आहे. मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांना तांत्रिक पदावरून येऊनही उपायुक्त दर्ज्याचे पद दिल्याचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला. या नियुक्तीत नियमभंग झाल्याचा आरोप करण्यात आला.
अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित होताच महापालिका आयुक्तांनी तत्काळ कारवाई करत संजय जाधव यांच्याकडून अतिरिक्त पदभार काढून टाकला व त्यांना त्यांच्या मूळ पदावर परत रुजू केले. या घडामोडीनंतर जाधव यांचे अतिरिक्त आयुक्त पदावर जाण्याचे स्वप्न ‘थांबले’ असल्याची चर्चा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात रंगत आहे.
एप्रिलपासून पुणे विमानतळ परिसरात दिसणारा प्रौढ नर बिबट्या अखेर वन विभागाच्या नेतृत्वाखाली RESQ Charitable Trust, भारतीय हवाई दल आणि पुणे विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त कारवाईत सुरक्षितरीत्या पकडण्यात आला. बिबट्याला बेशुद्ध करून ताब्यात घेण्यात आले. हा बिबट्या भूमिगत बोगदे, दाट झुडपे आणि कमी मानवी हालचालीच्या भागांचा वापर करून विमानतळ परिसरात सतत वावरत होता. विस्तृत आणि संवेदनशील क्षेत्र असल्याने पकड मोहिमेदरम्यान अनेक तांत्रिक व सुरक्षा अडचणींना सामोरे जावे लागले. वन विभागाने कॅमेरा ट्रॅप, लाइव्ह कॅमेरे आणि पिंजऱ्यांच्या मदतीने सातत्याने निरीक्षण करत अखेर ही मोहीम यशस्वी केली.
उत्तर भारतातून येणाऱ्या गार वाऱ्यांचा जोर वाढल्याने महाराष्ट्रातील तापमानात मोठी घसरण झाली आहे. राज्यातील अनेक शहरांत किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा त्याखाली नोंदवले जात आहे. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १५ अंश, तर माथेरानमध्ये १७ अंश इतकी नोंद झाली. अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक थंडी जाणवत असून येथे पारा ६.६ अंशांवर घसरला आहे. सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद याच जिल्ह्यात झाली आहे. पुणे आणि नाशिकमध्येही तापमान ७ ते ८ अंशांपर्यंत खाली आले आहे. हवामान विभागाचा अंदाज आहे की उत्तर भारतातून वेगाने येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवस राज्यात थंडीची लाट कायम राहणार आहे. मध्य, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत पाऱ्याची घसरण यापुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे.
देशाचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. लातूरमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास वयाच्या 90 व्या त्यांचे निधन झाले. वृद्धापकाळाने शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात थंडीने अक्षरश: घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. उत्तर भारतात, विशेषतः हरियाणा, पंजाब, चंदीगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. एका नवीन पश्चिमी विक्षोभामुळे पर्वतांमध्ये बर्फवृष्टी आणि तीव्र थंडी आली आहे. शीतलहर, दाट धुके आणि प्रदूषण यांचे एकत्रित परिणाम मैदानी भागातील जनजीवनावर थेट परिणाम करत आहेत.