Top Marathi News Today Live: विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; 2 नक्षलवादी ठार
08 Oct 2025 01:25 PM (IST)
सर्वोच्च न्यायालयात एका ज्येष्ठ वकीलाने भारताचे सरन्यायाधीश CJI हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षा रक्षकांनी त्याला ताबडतोब न्यायालयातून बाहेर काढले. या घटनेमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर, बार कौन्सिलने घटनेतील आरोपी वकील राकेश किशोर यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. सीजेआयने कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्या न्यायालयीन अधिकाऱ्यांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना घटनेकडे दुर्लक्ष करण्यास आणि आक्षेपार्ह वकील राकेश किशोर यांना इशारा देऊन सोडून देण्यास सांगितले.
08 Oct 2025 01:20 PM (IST)
वैधकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हि घटना सोलापुरातील आयएमएस शाळेसमोरील आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव साक्षी सुरेश मैलापुरे असे आहे. साक्षी ही सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. ती अभ्यासात हुशार आणि मेहनती होती.
08 Oct 2025 01:20 PM (IST)
“सनम तेरी कसम” नंतर, अभिनेता हर्षवर्धन राणे पुन्हा एकदा प्रेमात वेडा झालेला दिसत आहे. आणखी एक भावनिक प्रेमकथा घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. त्याच्या आगामी “एक दिवाने की दिवानियात” या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चाहते चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. ट्रेलर पाहून ते चकीत झाले आहेत. आणि चित्रपट पाहण्यासाठी आतुर आहेत.
08 Oct 2025 01:11 PM (IST)
सरन्यायाधीश बी. आर. गवई (Bhushan Gawai) यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात वकील राकेश किशोर यांनी हा बूट फेकल्याचे समोर आले आहे. सुरक्षा रक्षकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी वकिलांना बाहेर काढले. या प्रकरणाची संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा सुरु असून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे वकील राकेश किशोर यांनी केलेल्या कृत्याबाबत कोणताही पश्चात्ताप नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणावर भाजप (BJP) नेत्याने प्रतिक्रिया दिली असून त्यांनी हल्लेखोराचे कौतुक केले आहे.
08 Oct 2025 01:10 PM (IST)
लातूर जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या आत्महत्यांनी जिल्हा हादरला होता. एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू असताना महादेव कोळी समाज आणि बंजारा समाजातील दोन जणांनी आतहमत्या केली होती. आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कपड्यातून चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर चिठ्या हे कुटुंबीयांनी लिहल्याचे समोर आले आहे.
08 Oct 2025 12:55 PM (IST)
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार आरोपींनी घरात घुसून एका महिलेवर आणि मुलावर तलवारीने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. या हल्ल्याचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ही घटना येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर येथे रविवारी सकाळी घडली. या थरारक घटनेने संपूर्ण भागात खळबळ माजली आहे.
08 Oct 2025 12:44 PM (IST)
बदलापूरच्या शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणाचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला होता. या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. आरोपीचं एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना निर्दोषत्व बहाल करण्यात आलं आहे. न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना क्लीनचिट देण्यात आली आहे. स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा न्या. दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाने मान्य केला आहे.
08 Oct 2025 12:30 PM (IST)
राज्यातील अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक देवस्थानांकडून मदतीचा हात पुढे केला जात आहे. अशातच आता पुण्यातील प्रसिद्ध अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने देखील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तब्बल 1 कोटींचा निधी दिला आहे. ही मतद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
08 Oct 2025 12:25 PM (IST)
नागपूरात महसुल सेवकांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. संविधान चौकात आंदोलन सुरू आहे. कोतवाल यांना चतुर्थ श्रेणी मिळावी, यासाठी महसूल सेवक संघटनेचं आंदोलन सुरु आहे. उपोषणामुळे गावगावातील सर्वे, पंचनामा, आणि महसूल विभागाच्या गाव स्तरावरील कामांवर परिणाम झाला आहे.
08 Oct 2025 12:15 PM (IST)
बीडमध्ये शेतीच्या वादातून थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. नेकनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनवती गावात भावकीतील चार जणांनी एका महिलेला निर्दयीपणे मारहाण करून तिचे पाय तोडण्याचा प्रयत्न केलाय. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडिता आश्विनी येडे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
08 Oct 2025 12:10 PM (IST)
मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या संजय पवार यांच्या कुटुंबाला माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी तीन लाख रुपयाची मदत केली आहे. बीडच्या घोसापुरी गावातील संजय पवार यांचा मुंबई येथील मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्यु झाला होता.
08 Oct 2025 12:05 PM (IST)
शहरात मोठ्या प्रमाणात रासायनिक वायू पसरल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागलतो आहे. मंगळवारी रात्री निसर्ग ग्रीन, मोरीवली पाडा, पाठारे पार्क, मोतीराम पार्क, हरिओम पार्क, बी केबिन रोड परिसरात मोठ्या प्रमाणात रासायनिक धूर पसरला होता. हवेत पसरलेल्या रासायनिक वायूला ऍसिड सारखा दर्प होता. या त्यामुळे लहान मुले, वृध्दांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तर यामुळे रस्ते आणि रेल्वे मार्गावरही दृश्यमानता कमी झाली होती. मोरीवली एमआयडीसी परिसरातून रासायनिक वायू हवेत सोडला असल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. शहरात दररोज अशा प्रकारे प्रदूषण होत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे
08 Oct 2025 12:00 PM (IST)
शबरीमला सोन्याच्या मुलामा वादावरून केरळ विधानसभेत सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांच्या गदारोळाने गोंधळ उडाला. विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन म्हणाले की, “गेल्या दोन दिवसांपासून विरोधी पक्षाने विधानसभेच्या कामकाजात सहकार्य केलेले नाही. देवस्वम मंत्री राजीनामा देईपर्यंत आम्ही विधिमंडळाच्या कामकाजात सहकार्य थांबवू” असे त्यांनी म्हटले आहे.
08 Oct 2025 11:50 AM (IST)
अमेरिकी सरकारने मोठा निर्णय घेत H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदल केला. आता H-1B व्हिसा मिळवण्यासाठी तब्बल 88 लाख रूपये शुल्क भरावे लागणार आहे. यासोबतच भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठीही अमेरिकेत जातात. आता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अमेरिकत भारतीय विद्यार्थ्यांनी जाण्याची संख्या कमी झालीये. भारतीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या व्हिसामध्ये मोठी घट झालयाचे आकडेवारीवरून स्पष्ट होतं आहे. टॅरिफ अमेरिकेने लावला. आता विद्यार्थ्यांना देखील अमेरिका सोडत नाहीये. भारतीय विद्यार्थ्यांना अगोदरच्या तुलनेत अमेरिकेचे व्हिसा मिळत नाहीत. यामुळे इच्छा असूनही विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकत नाहीत. भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसाच्या संख्येत मोठी घट अमेरिकेने केली आहे.
08 Oct 2025 11:40 AM (IST)
रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि इतरांविरुद्ध समीर वानखेडे यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने समन्स (नोटीस) जारी केले आहे. उच्च न्यायालयाने रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि इतरांना ७ दिवसांच्या आत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्याला सर्व प्रतिवादींना याचिकेची प्रत पुरवण्यास सांगितले आहे. हे प्रकरण ३० ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी सूचीबद्ध केले आहे.
08 Oct 2025 11:30 AM (IST)
२००१ मध्ये आजच्याच दिवशी मी पहिल्यांदा गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज मी देवासारख्या लोकांची सेवा करण्याच्या माझ्या २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. लोकशाही व्यवस्थेतील ही कामगिरी भारतीय जनतेकडून मिळालेला एक मोठा आशीर्वाद आहे. या वर्षांमध्ये प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षणी मी माझ्या देशवासीयांचे जीवन सुधारण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी समर्पितपणे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हा सर्वांचे सतत प्रेम मला मिळाले हे माझे भाग्य आहे, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या आहेत.
2001 में आज ही के दिन मैंने पहली बार गुजरात के मुख्यमंत्री के रूप में शपथ ली थी। आज मैंने सरकार के मुखिया के रूप में ईश्वर रूपी जनता-जनार्दन की सेवा करने के अपने 25वें वर्ष में प्रवेश किया है। लोकतांत्रिक व्यवस्था में ये सिद्धि, मुझे भारत की जनता का बहुत बड़ा आशीर्वाद है।
इन… pic.twitter.com/ycSvdSKIox— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2025
08 Oct 2025 11:15 AM (IST)
मुंबईत ईडीने आज छापेमारीची कारवाई केली आहे. ईडीच्या मुंबई झोन वनच्या पथकाकडून मोठी छापेमारीची कारवाई करण्यात आली. फैजल शेख आणि अल्फिया शेख यांच्या ड्रग सिंडिकेटवर कारवाई झाली. ड्र्ग्ज विक्रीतून मिळवलेला पैसा हा मनी लॉन्ड्रींगच्या माध्यमातून फिरवल्याचा संशय आहे. सलेम डोला ड्रग्ज तस्करीमधील मोठं नाव आहे. आधीपासून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. सलीम डोला दाऊद टोळीशी संबंधित आहे.
08 Oct 2025 11:02 AM (IST)
इंदिराबाई हळबे यांनी मावशी हळबे म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये स्थान मिळवले आहे. त्या महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध समाजसेविका होत्या, ज्यांनी १९५४ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे ‘मातृमंदिर’ नावाची संस्था स्थापन केली. प्रतिकूल परिस्थितीतही स्वबळावर समाजात कार्य उभ्या करणाऱ्या हळबे मावशींच्या जीवनावर ‘देवरुखच्या सावित्रीबाई’ हे पुस्तक अभिजित हेगशेट्ये यांनी लिहिले आहे. अनेक वैयक्तिक धक्क्यांमधून सावरत त्यांनी सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. कोकणातील एका गावातून त्यांनी स्वतःच्या आत्मबळावर एक उत्तुंग कार्य उभे केले. आजच्या दिवशी 1998 साली त्यांना देवाज्ञा झाली. पण कोकणातील मदर तेरेसा म्हणून ओळख मिळवलेल्या इंदिराबाईंना कोणीही विसरलेले नाही.
08 Oct 2025 11:00 AM (IST)
लातूर जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या आत्महत्यांनी जिल्हा हादरला होता. एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू असताना महादेव कोळी समाज आणि बंजारा समाजातील दोन जणांनी आतहमत्या केली होती. आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कपड्यातून चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र पोलिसांनी तपास केला आणि भलतच समोर आल. आर्थिक लाभासाठी समाजाला पण वेठीस धरल्याचं समोर आल आहे. तीन वेगवेगळ्या घटना एक निलंगा , दुसरी चाकूर तर तिसरी अहमदपूर तालुक्यात घडली होती. तीन प्रकरणात वेगवेगळ्या आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचं स्पष्ट झालं होत. पण काय झाल नक्की वाचा
08 Oct 2025 10:50 AM (IST)
गरेनाने नेहमीप्रमाणे आज देखील त्यांच्या प्लेअर्ससाठी रिडीम कोड्स जारी केले आहेत. या रिडीम कोड्सची यादी आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्यामुळे प्लेअर्स लगेचच हे रिडीम कोड्स क्लेम करून त्याच्या मदतीने आकर्षक रिवॉर्ड्स जिंकू शकतात.
08 Oct 2025 10:38 AM (IST)
अमेरिकेसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि ब्रिटनमधील मैत्री अधिकच घट्ट होताना दिसत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. ते बुधवारी (८ ऑक्टोबर) सकाळी मुंबईत पोहोचले. अमेरिकेने टॅरिफवरून तणाव वाढवला असताना, ब्रिटनने काही प्रमाणात दिलासा दिला आहे. भारत आणि ब्रिटनमधील अनेक व्यापार करारांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
08 Oct 2025 10:28 AM (IST)
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार आरोपींनी घरात घुसून एका महिलेवर आणि मुलावर तलवारीने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. या हल्ल्याचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ही घटना येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर येथे रविवारी सकाळी घडली. या थरारक घटनेने संपूर्ण भागात खळबळ माजली आहे.
08 Oct 2025 10:18 AM (IST)
या आठवड्यात, २ ऑक्टोबर रोजी, दसऱ्याला दोन प्रमुख चित्रपट प्रदर्शित झाले. ऋषभ शेट्टीचा बहुप्रतिक्षित चित्रपट “कांतारा चॅप्टर १” आणि करण जोहरचा “सनी संस्कार की तुलसी कुमारी” बॉक्स ऑफिसवर एकाच वेळी प्रदर्शित झाला, परंतु या चित्रपटाची कमाई वेगळी आहे. “कांतारा” पहिल्या दिवसापासूनच प्रचंड यशस्वी ठरला आहे, तर वरुण धवन, जान्हवी कपूर, सान्या मल्होत्रा आणि रोहित सराफ अभिनीत “सनी संस्कार की तुलसी कुमारी” ला रिलीजच्या एका आठवड्यातच मोठा धक्का बसला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मंदावला आहे. रिलीजच्या सहा दिवसांनंतरही, “सनी संस्कार की तुलसी कुमारी” ने त्याचे अर्धे बजेटही वसूल केलेले नाही.
08 Oct 2025 10:08 AM (IST)
08 Oct 2025 09:58 AM (IST)
हे आहेत आजचे रिडीम कोड्स
08 Oct 2025 09:48 AM (IST)
बदलापूर: बदलापूरच्या शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणाचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला होता. या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. आरोपीचं एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना निर्दोषत्व बहाल करण्यात आलं आहे. न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना क्लीनचिट देण्यात आली आहे. स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा न्या. दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाने मान्य केला आहे.
08 Oct 2025 09:38 AM (IST)
पर्यावरणाचे उल्लंघन आढळल्यानंतर अधिकाऱ्यांनी “बिग बॉस कन्नड सीझन १२” चे घर सील केले आहे. हा स्टुडिओ बेंगळुरू दक्षिण जिल्ह्यातील बिदादी भागात आहे, जिथे अनेक वर्षांपासून या शोचे चित्रीकरण सुरू आहे. सेट सील केल्यानंतर, घरातील सर्व स्पर्धकांना परिसर सोडावा लागला आहे. “बिग बॉस कन्नड १२” मधील सर्व स्पर्धक आता घराबाहेर पडले आहेत. तहसीलदार तेजस्विनी यांनी स्वतः स्पर्धकांना बाहेर काढले. सर्व स्पर्धकांना कारने ईगलटन रिसॉर्टमध्ये नेण्यात आले आहे. बिग बॉस कन्नड १२ चे चित्रीकरण ज्या सेटवर होत होते तो सेट पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे.
08 Oct 2025 09:28 AM (IST)
जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सपाट सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,२१२ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १३ अंकांनी कमी होता. मंगळवारी, देशांतर्गत शेअर बाजाराने सलग चौथ्या सत्रात तेजी दाखवली, बेंचमार्क निफ्टी ५० २५,१०० च्या वर बंद झाला.
08 Oct 2025 09:18 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर : कारागृहात शिक्षा भोगत असताना कैद्याने आत्महत्या केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यातच आता परंडा येथे एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा लागलेल्या एका कैद्याची रवानगी हसूल कारागृहात करण्यात आली होती. कारागृहातील दीड महिन्याच्या कालावधीत कैद्याने लोखंडी गजाला जोरदार धडक घेऊन स्वतःला जखमी करून घेतले होती. या कैद्यांवर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
08 Oct 2025 09:15 AM (IST)
मेट्रो, रिंग रोड, नियोजित पुरंदर विमानतळ आणि विविध मोठ्या पायाभूत प्रकल्पांमुळे पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सदनिका व जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना मोठी गती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांत झालेल्या दस्त नोंदणीत पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण पाच लाख ७६ हजार दस्तांची नोंदणी झाली असून, यामधून शासनाला पाच हजार ९८० कोटी रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान, राज्यभरात झालेल्या २२ लाख दस्त नोंदणींमधून एकूण २८ हजार ९५ कोटी रुपये महसूल मिळाला आहे.
08 Oct 2025 09:08 AM (IST)
भारतात 8 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,203 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,186 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,153 रुपये आहे. भारतात 8 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,860 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,22,030 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,530 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 157.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,57,100 रुपये आहे.
08 Oct 2025 08:55 AM (IST)
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते अजित पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासमोरच नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची मंगळवारी रात्री मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे बैठक झाली. या बैठकीत अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात नाराजीचे वातावरण दिसून आले. बैठकीदरम्यान अजित पवार म्हणाले, “काही नेते विशिष्ट जातीविषयी टोकाची भूमिका घेतात. त्यामुळे पक्षाची प्रतिमा बिघडते आणि त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते,” अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षरित्या भुजबळ यांच्यावर टीका केली.
08 Oct 2025 08:49 AM (IST)
जयपूर-अजमेर हायवेवर मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. रात्री सुमारे ११ वाजता एलपीजी सिलिंडरने भरलेल्या ट्रकला केमिकलने भरलेल्या दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातानंतर भीषण स्फोटांची मालिका सुरू झाली.
धडकेनंतर आग लागून एलपीजी सिलिंडर एकामागून एक स्फोट होऊ लागले. तब्बल दोन तासांपर्यंत सुरू असलेल्या या दुर्घटनेत जवळपास २०० गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. परिसरात दिवाळीतील अॅटमबॉम्बसारखे आवाज घुमत होते, तर आगीचे ज्वाळा दूरवर दिसत होत्या.
08 Oct 2025 08:45 AM (IST)
राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या हद्दीतील तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ अंतर्गत स्थापन झालेल्या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे आणि विशेष नियोजन प्राधिकरणांच्या अधिकारक्षेत्रातील क्षेत्रांवर तुकडेबंदीचा कायदा लागू राहणार नाही.
याशिवाय, प्रादेशिक योजनेनुसार निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेल्या क्षेत्रांमधील जमिनींसाठीही ही सूट लागू असेल.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शहरी आणि नियोजित विकास क्षेत्रांतील जमिनींच्या व्यवहारांवरील निर्बंध शिथिल होऊन बांधकाम व विकास कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.
08 Oct 2025 08:43 AM (IST)
राज्यात हवामानात पुन्हा मोठे आणि अनपेक्षित बदल होत असून, अनेक जिल्ह्यांवर अवकाळी पावसाचे संकट निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मान्सून सध्या राज्यातील काही भागांतून परतत असला, तरी बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या नव्या हवामान प्रणालींमुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मान्सून माघारीच्या काळात राज्यात दुहेरी हवामान परिस्थिती दिसून येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून पूर्णपणे परत जाईल असा अंदाज वर्तवला आहे. १० ते १२ ऑक्टोबरदरम्यान मान्सून महाराष्ट्रातून बाहेर पडेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Marathi Breaking news live updates: गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात देशातील काही राज्यात पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळत आहे. नैऋत्य मान्सून दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील बहुतेक भागांमधून माघार घेताना दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या भागात सतत मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.