Top Marathi News Today Live: विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; 2 नक्षलवादी ठार
07 Oct 2025 01:05 PM (IST)
गेल्या काही वर्षांपासून नवीन स्मार्टफोनसह बॉक्समध्ये चार्जर मिळणं बंद झालं आहे. स्मार्टफोनमध्ये चार्जर मिळणं बंद झाल्यानंतर युजर्सनी नाराजी व्यक्त केली होती. चार्जरनंतर आता USB केबलची वेळ आली आहे. मोबाईल फोन तयार करणाऱ्या कंपन्यांनी आता नव्या स्मार्टफोनसोबत USB केबल देणं बंद केलं आहे. वाढता ई-कचरा आणि खर्च कमी ठेवणे, ही कंपन्यांच्या निर्णयांची प्रमुख कारणं आहेत. याचा अर्थ असा आहे की, आता ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करताना बॉक्समध्ये USB केबल दिली जाणार नाही.
07 Oct 2025 01:05 PM (IST)
बीड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेवर अमानुषपणे अटायचार करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेच्या घरात घुसून एका आरोपीने तिच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली आणि तिच्यावर विनयभंग करत अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिच्या पती आणि नातेवाईकांनाही धमकी दिल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
07 Oct 2025 12:55 PM (IST)
एका डॉक्टरने 4 वर्षाच्या मुलापासून 89 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला देखील भक्षले नाही. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरने आतापर्यंत १-२ नाही तर तब्बल ३० लोकांना औषधांच्या बदल्यात विष दिल्याचे समोर आले आहे.यामुळे तब्बल १२ रुग्णानाचे मृत्यू झाले आहेत.
07 Oct 2025 12:45 PM (IST)
ओडिशातील गंजम जिल्ह्यातील ब्रह्मपूर येथील वकील पिताबास पांडा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. पांडा यंच्या घरासमोरच सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. शहरातील ब्रह्मनगर भागात त्यांच्या घरासमोर ही घटना घडली आणि संपूर्ण परिसरात खळबळ आणि तणाव निर्माण झाला.
07 Oct 2025 12:35 PM (IST)
सलमान जाफरी उर्फ सलमान इराणी या सराईत चोरट्याला अटक करण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी लूटमार करून त्याने दहशत माजवायचा. कल्याण जवळच्या आंबिवलीतील इराणी वस्तीतून फिल्मी स्टाईलने त्याला अटक करण्यात आली. या आरोपीला पकडण्याचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, यावेळी सलमानच्या नातेवाईकांनी पोलिसांवर हल्ला करून त्याला सोडवण्याचा प्रयत्नही केला. ही कारवाई पनवेल शहर पोलिसांनी ओळख पेटवलेल्या आरोपीला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांच्या मदतीने जेरबंद करण्यात आले.
07 Oct 2025 12:20 PM (IST)
पालघर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ ५० हजारांसाठी एका आजीने आपल्या १४ वर्षीय नातीची विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही विक्री तीन वर्षांपूर्वीच करण्यात आली होती. तिचे जबरदस्तीने लग्न देखील लावण्यात आले. या अल्पवयीन मुलीला नंतर एक मुलगी झाली. नंतर तिचा छळ करायला सुरुवात केली. वाढत्या त्रासामुळे तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
07 Oct 2025 12:05 PM (IST)
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्य उद्घाटन बुधवारी, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पनवेल, उरणसह नवी मुंबई परिसरातील नागरिक आणि भाजप महायुतीचे २५ हजारांहून अधिक कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासह राज्यातील विविध प्रांतांतील लोककला, नृत्य, संगीत आणि पारंपरिक वाद्यवृंद सादर होणार आहेत
07 Oct 2025 12:00 PM (IST)
कल्याणमधील गांधारी येथील हनुमान मंदिरात दिवसाढवळ्या धक्कादायक चोरी घडली. एका चोरट्याने देवाला हात जोडून, दर्शन घेतल्यानंतर दानपेटी फोडून रक्कम पळवली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
07 Oct 2025 11:50 AM (IST)
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न हा केवळ न्यायाधीशांवर हल्ला नाही तर भारताच्या आत्म्यावर, या देशाच्या न्यायव्यवस्थेवर हल्ला आहे. हे लोक कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने देशातील सर्वोच्च पदावर पोहोचणारा दलित मुलगा सहन करू शकत नाहीत. त्यांचा धाडस पहा. त्यांचे समर्थक सोशल मीडियावर सरन्यायाधीशांना उघडपणे धमकावत आहेत. हा देश अशा प्रकारचे राजकारण आणि गुंडगिरी कधीही सहन करणार नाही.
07 Oct 2025 11:40 AM (IST)
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्यात आल्यामुळे तीव्र निषेध केला जात आहे. या प्रकरणावर तेजस्वी यादव यांनी व्हिडिओ शेअर करत जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "आज सर्वोच्च न्यायालयातच भारताच्या सरन्यायाधीशांवर बूट फेकण्यात आला. आपल्या लोकशाही आणि न्यायिक इतिहासातील ही एक लज्जास्पद घटना आहे. जेव्हा देशातील सर्वोच्च न्यायिक पदावर असलेल्या व्यक्तीला न्यायालयातच अशा अपमानाचा सामना करावा लागतो तेव्हा ती गंभीर चिंतेची बाब आहे. २०१४ पासून राज्याच्या संरक्षणाखाली विविध मार्गांनी देशात द्वेष आणि हिंसाचार कसा सामान्य झाला आहे याचा हा प्रतिकूल परिणाम आहे. दलित समुदायातील लोक आणि संविधानाची भावना जपणारे लोक संवैधानिक पदांवर सुरक्षित नाहीत का? हा बूट भारताच्या सरन्यायाधीशांवर नाही तर संविधान आणि त्याचे शिल्पकार, आपले पूज्य बाबा साहेब आंबेडकर यांच्यावर फेकण्यात आला. काही लोक धर्माच्या नावाखाली विष ओकत आहेत.या घटनेवर संविधानविरोधी आणि दलितविरोधी भाजप सदस्य गप्प का आहेत? न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा ही आपल्या लोकशाहीचा कणा आहे - तिचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे."
07 Oct 2025 11:30 AM (IST)
रायबरेली येथे झालेल्या दलित तरुण हरिओम वाल्मिकीच्या क्रूर आणि निर्दयी हत्येचा काँग्रेस पक्षाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. यावर पत्र जाहीर करत कॉंग्रेसने लिहिले आहे की, २०१४ पासून, मॉब लिंचिंग, बुलडोझर अन्याय आणि जमावाची राजवट यासारख्या प्रवृत्ती आपल्या काळातील एक भयानक वैशिष्ट्य बनल्या आहेत.हिंसाचार हा कोणत्याही सुसंस्कृत समाजाचा वैशिष्ट्य असू शकत नाही, म्हणून हरिओमसोबत जे घडले ते आपल्या सामूहिक नैतिकतेवर एक गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते. डॉ. भीमराव आंबेडकरांच्या स्वप्नांचा भारत आणि महात्मा गांधींच्या "वैष्णव जन..." चा भारत हा सामाजिक न्याय, समानता आणि करुणेचा भारत आहे, ज्यामध्ये अशा गुन्ह्यांना स्थान नाही. मानवता हाच एकमेव मार्ग आहे.
07 Oct 2025 11:20 AM (IST)
प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रेला स्थगित देण्यात आली आहे. श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने म्हटले आहे की, "आयएमडीने जारी केलेल्या प्रतिकूल हवामान सल्ल्यानुसार, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत स्थगित ठेवण्यात येईल आणि ८ ऑक्टोबर रोजी पुन्हा सुरू होईल."
07 Oct 2025 11:10 AM (IST)
जगातील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या आणि निर्णायक भूमिका घेणारे व्लादिमीर पुतिन यांचा आज जन्मदिन. व्लादिमीर पुतिन हे रशियाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. 1999 पासून ते रशियाचे नेतृत्व करत असून त्यांनी पूर्वी रशियाचे पंतप्रधान म्हणून आणि 2000 ते 2008 या काळात राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले आहे. 16 वर्षे KGB मध्ये परदेशी गुप्तचर अधिकारी म्हणून काम केले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांच्या मैत्रीची जोरदार चर्चा असते.
07 Oct 2025 10:58 AM (IST)
२२ सप्टेंबर २०२५ पासून देशभरात नवीन जीएसटी स्लॅब लागू झाला आहे, त्यानंतर कारच्या किमतींमध्ये लक्षणीय कपात होत आहे. या बदलामुळे केवळ कार खरेदीदारांना फायदा झाला नाही तर देशातील सर्वात परवडणाऱ्या कारच्या यादीतही लक्षणीय बदल झाला आहे. आता, भारतातील सर्वात स्वस्त कार आता मारुती अल्टो के१० नसून मारुती एस-प्रेसो आहे. त्याची किंमत फक्त ₹३.५० लाखांपासून सुरू होते. देशातील टॉप ५ स्वस्त कार कोणत्या आहेत ते जाणून घेऊया?
07 Oct 2025 10:49 AM (IST)
कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथील हायवे ५० वर सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास एक हेलिकॉप्टर कोसळला. हायवे ५० पूर्वेकडे ५९ व्या स्ट्रीटजवळ हा अपघात झाला. या अपघातात अनेक लोक गंभीर जखमी झाले. घटनेनंतर लगेचच कॅलिफोर्निया हायवे पेट्रोल (CHP) आणि कॅलट्रान्सच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी बचाव आणि मदत कार्य सुरू केले. अपघातामुळे हायवेच्या पूर्वेकडे जाणाऱ्या सर्व लेन बंद करण्यात आल्या, ज्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली.
07 Oct 2025 10:48 AM (IST)
सर्च इंजिन गुगलच्या ब्राऊझर क्रोमसाठी पुन्हा एकदा सरकारकडून एडवायजरी जारी करण्यात आली आहे. सरकारने आता गुगल क्रोम युजर्ससाठी हाय अलर्ट सिक्योरिटी अलर्ट जारी केला आहे. सरकारी एजेंसी इंडियन कम्प्यूटर इमरजेंसी रेस्पॉन्स टीम (CERT-In) ने क्रोम यूजर्ससाठी आता पुन्हा एकदा सिक्योरिटी अलर्ट जारी केला आहे. 3 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेली हे अलर्ट हाय-सीवियरिटी म्हणजेच गंभीर स्तरावरील चेतावणी आहे. सरकारने जारी केलेली ही चेतवाणी भारतातील लाखो क्रोम युजर्सवर परिणाम करणार आहे, ज्यामध्ये विंडोज आणि लिनिक्स सिस्टम यूजर्स यांचा समावेश आहे.
07 Oct 2025 10:38 AM (IST)
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) एका व्यावसायिकाशी संबंधित ₹६० कोटी (अंदाजे $१.६ अब्ज) फसवणुकीच्या प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची सुमारे चार तास आणि तीस मिनिटे चौकशी करण्यात आली आहे. आतापर्यंत शिल्पाचा पती राज कुंद्रासह पाच जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तपास यंत्रणेचे लक्ष आता त्या कंपनीवर आहे ज्याच्या माध्यमातून हा संपूर्ण व्यवहार झाला, ज्यामध्ये शिल्पा आणि राज कुंद्रा दोघेही संचालक होते. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण जाणून घेऊयात.
07 Oct 2025 10:29 AM (IST)
मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, अॅलेक्स कॅरी, कूपर कॉनोली, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल ओवेन, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, अॅडम झांपा
मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट, झेवियर बार्टलेट, टिम डेव्हिड, बेन द्वारशिस, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुह्नेमन, मिचेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, अॅडम झांपा
07 Oct 2025 10:23 AM (IST)
ओडिशातील गंजम जिल्ह्यातील ब्रह्मपूर येथील वकील पिताबास पांडा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. पांडा यंच्या घरासमोरच सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. शहरातील ब्रह्मनगर भागात त्यांच्या घरासमोर ही घटना घडली आणि संपूर्ण परिसरात खळबळ आणि तणाव निर्माण झाला.
07 Oct 2025 10:19 AM (IST)
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालींना राज्यात वेग आला आहे. सोमवारी बिहार विधानसभा निवडणुकीच्या घोषणेसोबतच महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. काही दिवसांत महापालिकांच्या महापौर पदांचे आरक्षणही जाहीर होणार आहे.
07 Oct 2025 10:14 AM (IST)
सलमान जाफरी उर्फ सलमान इराणी या सराईत चोरट्याला अटक करण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी लूटमार करून त्याने दहशत माजवायचा. कल्याण जवळच्या आंबिवलीतील इराणी वस्तीतून फिल्मी स्टाईलने त्याला अटक करण्यात आली. या आरोपीला पकडण्याचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, यावेळी सलमानच्या नातेवाईकांनी पोलिसांवर हल्ला करून त्याला सोडवण्याचा प्रयत्नही केला. ही कारवाई पनवेल शहर पोलिसांनी ओळख पेटवलेल्या आरोपीला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांच्या मदतीने जेरबंद करण्यात आले.
07 Oct 2025 10:05 AM (IST)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, ५० षटकांच्या सामन्यात ५०० धावांचा टप्पा ओलांडलेला नाही, परंतु अलीकडेच मलेशिया अंडर-१९ आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धेत असे घडले. प्रथम फलंदाजी करताना, सेलांगोरच्या संघाने निर्धारित ५० षटकांमध्ये ५६४ धावांचा मोठा धावसंख्या उभारला. या दरम्यान, त्यांचा फलंदाज मोहम्मद अक्रम एबीडी मलेकनेही द्विशतक झळकावले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सेलांगोरच्या संघाने हा सामना ४४७ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. अनेक संघ कधीकधी कसोटी क्रिकेटमध्येही अशी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरतात.
07 Oct 2025 10:00 AM (IST)
07 Oct 2025 09:55 AM (IST)
सोमवारी संध्याकाळी कार अपघातानंतर अभिनेता विजय देवरकोंडा यांनी त्यांचे पहिले विधान जारी केले आहे. सोशल मीडियावर अनेक वृत्तांत फिरत होते ज्यात असे म्हटले होते की अभिनेता जोगुलंबा गडवाला जिल्ह्यातील उंडावल्लीजवळ अपघातात सामील होता. परंतु, अभिनेत्याने आता या घटनेचे स्पष्टीकरण दिले आहे. तो नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.
07 Oct 2025 09:52 AM (IST)
महिला विश्वचषक 2025 काल सातवा सामना खेळवण्यात आला या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विश्वचषकाचा पहिला विजय नोदवला आहे. पहिल्या सामन्यामध्ये इंग्लडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या संघाची फारच निराशाजनक फलंदाजी राहिली होती. सर्व अटकळांना झुगारून देत, दक्षिण आफ्रिकेने आयसीसी महिला विश्वचषकात न्यूझीलंडला हरवून त्यांच्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या. काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्ध फक्त ६९ धावांवर गारद झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे सोमवारी पूर्णपणे वेगळेच चित्र दिसून आले.
07 Oct 2025 09:45 AM (IST)
इंग्लडविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये करुन नायर याचे 7 वर्षानंतर भारतीय संघामध्ये पुनरागमन झाले होते, पण त्याने त्या मालिकेमध्ये फार काही चांगली कामगिरी केली नाही. सध्या सुरु असलेल्या मालिकेमधून करुन नायर याला वगळण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी करुण नायरची निवड झाली. मात्र, तो पुरेशी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळाली नाही. मात्र, आता त्याची कर्नाटक क्रिकेट संघात निवड झाली आहे. त्याची आगामी रणजी ट्रॉफीसाठी निवड झाली आहे. मयंक अग्रवालकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
07 Oct 2025 09:38 AM (IST)
पालघर: पालघर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ ५० हजारांसाठी एका आजीने आपल्या १४ वर्षीय नातीची विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही विक्री तीन वर्षांपूर्वीच करण्यात आली होती. तिचे जबरदस्तीने लग्न देखील लावण्यात आले. या अल्पवयीन मुलीला नंतर एक मुलगी झाली. नंतर तिचा छळ करायला सुरुवात केली. वाढत्या त्रासामुळे तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
07 Oct 2025 09:32 AM (IST)
भारतात 7 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,078 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,071 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,059 रुपये आहे. भारतात 7 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,10,710 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,20,780 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 90,590 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 156.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,56,100 रुपये आहे.
07 Oct 2025 09:25 AM (IST)
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने सोमवारी (दि.६) जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राज्यातील निवडणुका दोन टप्प्यात होतील असे म्हटले आहे. पहिला टप्पा ६ नोव्हेंबर आणि दुसरा टप्पा ११ नोव्हेंबरला होणार आहे. तर मतमोजणी आणि निकालांची घोषणा १४ नोव्हेंबर रोजी होईल. या घोषणेसह, बिहारच्या राजकारणात निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्यानंतर बिहारच्या राजकारणात आता रंगत येणार आहे.
07 Oct 2025 09:15 AM (IST)
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले. पुढील तीन ते चार दिवसांत महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीचे आरक्षण जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य निवडणुकींचा बिगुल वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
07 Oct 2025 09:12 AM (IST)
महायुती सरकारमध्ये निधी वाटपावरून नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील आमदारांनी निधीवाटपाबाबत असमाधान व्यक्त केल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेबाबतही हे आमदार उदासीन असल्याची तक्रार करत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील ही खदखद उफाळून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार या नाराजीवर काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
07 Oct 2025 09:04 AM (IST)
गिरजवडे पैकी मुळीकवाडी (ता. शिराळा) येथील आजोबांसोबत शेतात गेलेल्या आरव अमोल मुळीक (वय ४) या मुलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात आरव हा गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि ६) साडे पाचच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, बजरंग मुळीक हे आपला नातू आरवसोबत गाडे मळा शेजारी असणाऱ्या पाचिरो पाडा येथे जनावरांसाठी गवत आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी सोबत काशिनाथ मुळीक, शोभा मुळीक, राजेश्री मुळीक उपस्थित होते. त्यावेळी अचानक झाडाच्या आड लपलेल्या बिबट्याने आरववर झडप घालून त्यास उसाच्या शेतात फरपटत नेले. त्यावेळी काशिनाथ मुळीक यांनी धावत जाऊन आरवची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली.
07 Oct 2025 09:03 AM (IST)
भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तेजी पाहायला मिळाली. सोमवारी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. त्यामुळे गुंतवणूकदार देखील आनंदी होते. मात्र आज शेअर बाजारात काय परिस्थिती असणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुंतवणूकदारांनी अशी शक्यता वर्तवली आहे की, आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक पातळीवर होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे आज मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, नकारात्मक पातळीवर उघडतील अशी शक्यता बाजारातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
Marathi Breaking news live updates- इंग्लडविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये करुन नायर याचे 7 वर्षानंतर भारतीय संघामध्ये पुनरागमन झाले होते, पण त्याने त्या मालिकेमध्ये फार काही चांगली कामगिरी केली नाही. सध्या सुरु असलेल्या मालिकेमधून करुन नायर याला वगळण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी करुण नायरची निवड झाली. मात्र, तो पुरेशी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळाली नाही. मात्र, आता त्याची कर्नाटक क्रिकेट संघात निवड झाली आहे. त्याची आगामी रणजी ट्रॉफीसाठी निवड झाली आहे. मयंक अग्रवालकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.