Maharashtra Breaking News
11 Nov 2025 10:05 AM (IST)
सांगली: सांगलीतून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका घोड्याच्या तबेल्यात शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमीर रावसाहेब कन्नुरे असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मित्रांनी रात्री पार्टी केली आणि त्यात शिवीगाळ झाली. याच शिवीगाळवरून वाद वाढला आणि हत्या झाली.
11 Nov 2025 10:00 AM (IST)
Delhi Blast Update: दिल्लीतील लाल किल्ल्याच्या स्फोटानंतर यूपीमध्ये कडक सुरक्षा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. धार्मिक शहरी भागात दक्षता वाढवण्यात आली असून अयोध्या, काशी (वाराणसी) आणि मथुरा या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवली आहे. रामजन्मभूमी परिसर, काशी विश्वनाथ धाम आणि कृष्णजन्मभूमी मंदिर परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
11 Nov 2025 09:55 AM (IST)
जागतिक बाजारपेठेतील उत्साही वातावरणामुळे आज, मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,७२२ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ २८ अंकांनी जास्त होता.
11 Nov 2025 09:50 AM (IST)
Delhi Bomb Blast News in Marathi : नवी दिल्ली : काल (१० नोव्हेंबर) राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ एक हादरवणारी घटना घडली.लाल किल्ल्याजवळी मेट्रो स्टेशमन परिसरात एक भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या घटनेत आतापर्यंत ८ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या धमाक्यानंतर केवळ भारतच नव्हे, तर शेजारी देशांमध्ये पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेशमध्ये देखील खळबळ उडाली आहे.
11 Nov 2025 09:40 AM (IST)
भारतात 11 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,383 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,351 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,288 रुपये आहे. भारतात 11 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,510 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,23,830 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,880 रुपये आहे. भारतात 11 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 157.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,57,100 रुपये आहे.
11 Nov 2025 09:30 AM (IST)
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी कोणत्याही निवडणुकीत एकत्रित दिसली नाही. असे असताना आता नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढवणार असून, समन्वयाने जागा वाटपाचा निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
11 Nov 2025 09:20 AM (IST)
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी सायंकाळी एक मोठा स्फोट झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील गर्दीच्या परिसरात झालेल्या शक्तिशाली कार स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. तर 24 जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे अनेक वाहनांना आग लागली. प्राथमिक तपासात दहशतवादी हल्ला असल्याचा संशय आहे.
11 Nov 2025 09:10 AM (IST)
बॉलीवूड अभिनेते आणि "ही-मॅन" धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला आहे. ११ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी येण्यापूर्वी त्यांचे जवळचे मित्र आणि सह-अभिनेते अमिताभ बच्चन यांना धक्का बसला आहे. त्यांनी १० नोव्हेंबर रोजी उशिरा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून, ज्यातून त्यांच्या दुःखाची खोली स्पष्ट झाली. बिग बींना वीरूच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे.
11 Nov 2025 09:10 AM (IST)
Bihar Assembly Election: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उद्या दुसऱ्या म्हणजेच अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. उद्या 20 जिल्ह्यांमधील 122 जागांसाठी मतदान होणार आहे. तर 14 नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या दिवशी बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार हे समजणार आहे. उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
11 Nov 2025 09:06 AM (IST)
काल संध्याकाळच्या सुमारास राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ एक भीषण स्फोट झाला. या स्फोटात 10 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 30 पेक्षा अधिक जखमी झाले आहे. या स्फोटाची तीव्रता जवळपास 200 मीटर लांबपर्यंत असल्याचे समजते आहे. दरम्यान हा स्फोट एका चालत्या गाडीत झाला आहे. दरम्यान सुरक्षा दलांनी हि गाडी कुठली आहे आणि कोणाची आहे याचा शोध लावला आहे.
11 Nov 2025 09:05 AM (IST)
देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी सायंकाळी एक मोठा स्फोट झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील गर्दीच्या परिसरात झालेल्या शक्तिशाली कार स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. तर 24 जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे अनेक वाहनांना आग लागली. प्राथमिक तपासात दहशतवादी हल्ला असल्याचा संशय आहे.
11 Nov 2025 09:03 AM (IST)
काल राजधानी दिल्ली आणि संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. दिल्लीत लाल किल्ल्याजवळ असलेल्या मेट्रो स्टेशन परिसरात भीषण स्फोट झाला आहे. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. या घटनेत 10 जणांचा मृत्यू तर 30 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान हा स्फोट होण्याआधीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये कार चालवणारा व्यक्ती तोंडाला मास्क लावून चालवत असल्याचे दिसून येत आहे.
11 Nov 2025 09:02 AM (IST)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शुभारंभ होणार आहे. यासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद हे शुभमन गिल यांच्याकडे असणार आहे तर दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपद टेम्बा बवुमा कडे असणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका १४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कोलकात्यात दाखल झाले आहेत आणि त्यांनी तयारी सुरू केली आहे.
11 Nov 2025 09:02 AM (IST)
काल (१० नोव्हेंबर) राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ एक हादरवणारी घटना घडली.लाल किल्ल्याजवळी मेट्रो स्टेशमन परिसरात एक भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या घटनेत आतापर्यंत ८ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या धमाक्यानंतर केवळ भारतच नव्हे, तर शेजारी देशांमध्ये पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेशमध्ये देखील खळबळ उडाली आहे.
11 Nov 2025 09:01 AM (IST)
लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चालत्या कारमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झाले. स्फोटाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की आजूबाजूची अनेक वाहने चिरडली गेली. सुरुवातीला ११ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, घटनेनंतर तीन तासांनी गृहमंत्री अमित शहा यांनी आठ मृत्यूंची पुष्टी केली. त्यानंतर रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या यादीत मृतांचा आकडा नऊ असल्याचे नमूद केले आहे. गृहमंत्री शहा म्हणाले की, “आय-२० कारच्या मागील बाजूस स्फोट झाला.” पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, हरियाणातील गुरुग्राम येथे सलमान या व्यक्तीच्या नावावर ही कार नोंदणीकृत होती.
Marathi Breaking news live updates : हिंदी चित्रपटसृष्टीतील स्वतःचे अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाल्याची बातमी समोर आली. पण त्यानंतर काही वेळातच अभिनेते धर्मेंद्र यांची कन्या आणि अभिनेत्री इशा देओलने धर्मेद्र यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.
ईशा देओलने सोशल मीडियावर एक संदेश शेअर केला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की मीडिया खोट्या अफवा पसरवत आहे. “माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यात सुधारणा होत आहे. आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा. माझ्या वडिलांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद.” धर्मेंद्र सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत आणि त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत.






