पांचट Jokes : तू स्वत:ला आवर नाहीतर...! नवरा-बायकोचं कडाक्याचं भांडण अन् पुढं काय झालं बघण्यासाठी वाचा भन्नाट जोक्स (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हसणे चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. अलीकडच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या काळात तर मानवाला याची खूप गरज आहे. पण सध्या हसणे दुर्मीळ होत चालले आहे. लोक डिप्रेशनमध्ये जात आहे. यामुळेच या डिप्रेशनमधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास विनोद घेऊन आलो आहोत. जे तुम्हाला खळखळून हसवतील!
आजचे शहाणपण…
जगात दोनच गोष्टी फ्री असतात…?
.
.
एक मॅगीसोबत मसाला आणि दुसरे
नातेवाईकाचे फुकटचे सल्ले…
शिक्षक आणि रामू
शिक्षक : रामू सांग, पृथ्वी सूर्याभोवती फिरते की सूर्य पृथ्वीभोवती?
रामू : सर दोघंही फिरत असतील… पण मी अजून बघितलं नाही!!!
पांचट Jokes : वाईन शॉप आणि कॉफी शॉपमध्ये फरक काय आहे? रामू चे उत्तर ऐकून पोट धरुन हसाल…
नवरा बायको
नवरा-बायकोचं भांडण सुरु असतं
नवरा : तू स्वत:ला आवर नाहीतर…
बायको : नाहीतर, काय? काय कराल
नवरा : नाहीतर, माझ्यातला जनावर बाहेर येईल.
बायको : येऊ द्या ना मगं… तसंही उंदराला कोण घाबरतं!!!
डॉक्टर आणि चिंटू
चिंटू : डॉक्टर मला विचित्र आजार झालाय
डॉक्टर : कसला?
चिंटू : जेवणानंतर भूक लागत नाही, काम केल्यावर थकवा येतो. काय करु?
डॉक्टर : रोज रात्री उन्हात बसा
गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंड
गर्लफ्रेंड : जानू, मी तुझ्यासाठी काय आहे?
बॉयफ्रेंड : Wi-Fi
गर्लफ्रेंड : म्हणजे?
बॉयफ्रेंड : जवळ आलीस की सगळं छान चालतं… लांब गेलीस की सिग्नल कमजोर होतो.
मित्र असावा तर असा!
मित्र १ : काय रे एवढ्या सकाळी कुठे निघालास?
मित्र २ : अरे मॉर्निंग वॉकला.
मित्र १ : हा का, मग ह्या गल्लीतनं जा, शॉटकर्ट हाय.
पांचट Jokes : पांचट पण झक्कास! हसण्याचा परफेक्ट डोस, जे वाचून तुम्ही राहाल टवटवीत
(टीप : हे विनोद केवळ तुम्हाला हसवण्यासाठी आहेत. यातून कोणत्या प्रकारे लोकांच्या भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. हसत रहा.)






