Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय

Marathi breaking live marathi - आगामी निवडणुकांसाठी स्थानिक नेते निर्णय घेतील. परंतु, सोबत येतील ते सहकारी असतील. याबाबत आधीच तसे कळविले आहे. महाराष्ट्रामध्ये विशिष्ट व्यासपीठावर एकत्र येण्याची संस्कृती आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 10, 2025 | 07:56 PM
Top Marathi News Today:  राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates :  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर पुढे जाईल, असे स्पष्ट संकेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहेत. आगामी काळातील या निवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांना सर्वाधिकार दिल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकीत महाविकास आघाडी तुटलेली असेल, असे आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत.

 

 

The liveblog has ended.
  • 10 Jun 2025 07:05 PM (IST)

    10 Jun 2025 07:05 PM (IST)

    लॉस एंजलिसमध्ये आंदोलनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर; ट्रम्प यांनी सैनिकांच्या संख्येत केली वाढ

    Los Angeles Protest: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाविरोधात तीव्र आंदोलन सुरु आहे.अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्येही स्थलांतरितांविरोधात निदर्शने सुरु आहेत. परंतु येथील परिस्थिती अजून नियंत्रणाबाहेर गेली आहे. यामुळे ट्रम्प ट्रम्प यांनी सैनिकांच्या संख्येत वाढ केली आहे. आर्ट्स डिस्ट्रिक्ट आणि लिटिल टोकियोच्या भागात निदर्शक आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

    संपूर्ण प्रकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  • 10 Jun 2025 06:30 PM (IST)

    10 Jun 2025 06:30 PM (IST)

    Crime News: जमिनीच्या व्यवहारात फसवणूक, १२ जणांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

    पिंपरी: मागासवर्गीय महिलेच्या आजीची जमीन साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र करून स्वतःच्या नावावर केल्या प्रकरणी १२ जणांच्या विरोधात फसवणूक आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ डिसेंबर २००३ ते २ मार्च २०१० या कालावधीत पाईट खेड येथे घडली.

  • 10 Jun 2025 06:17 PM (IST)

    10 Jun 2025 06:17 PM (IST)

     पोर्तुगालचा विजय अन् रोनाल्डोच्या डोळ्यांना अश्रुधारा! पटकावले नेशन्स लीगचे जेतेपद..

    ४० वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने युएफा नेशन्स लीग २०२५ स्पर्धेचे विजेतेपद नावावर केले. अत्यंत रोमांचक झालेल्या नेशन्स लीगच्या अंतिम सामन्यात पोर्तुगालने स्पेनला पेनल्टी शूट आऊटमध्ये ५-३ अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला.

    सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

  • 10 Jun 2025 06:14 PM (IST)

    10 Jun 2025 06:14 PM (IST)

    अहिल्यानगर हादरलं! फाशीचे Reel शूट झाले Real; तरुणाच्या जीवाशी आला खेळ, प्रकृती चिंताजनक

    अहिल्यानगर: अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अहिल्यानगरमध्ये एक तरुण फाशीचे रील शूट करत होता. मात्र त्याच दरम्यान त्याला खरोखरच फास बसला आहे. त्या युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. सध्याचा काळ हा डिजिटलचा आहे. सोशल मिडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे स्टंट केले जात आहेत. अशीच अहिल्यानगरमधील घटना घडल्याचे दिसून येत आहे.

  • 10 Jun 2025 05:06 PM (IST)

    10 Jun 2025 05:06 PM (IST)

    'हेरा फेरी ३' बनणार की नाही? सुनील शेट्टीने एकाच वाक्यात सांगितलं...

    सध्या सोशल मीडियासह सर्वत्रच 'हेरा फेरी ३'ची जोरदार चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपट भलताच चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. अभिनेता परेश रावल यांनी चित्रपटातून एक्झिट घेतल्यानंतर चाहते खूपच नाराज आहेत. चाहते सध्या परेश रावल यांची जागा कोण घेणार ? हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच, चित्रपटाचा मुहूर्त शॉट पार पडला. यावेळी चित्रपटातील सर्वच स्टारकास्ट चित्रपटातल्या लूकमध्ये दिसले. आता अशातच अभिनेता सुनील शेट्टीने एका मुलाखतीत चित्रपटाबद्दल सर्व काही स्पष्ट सांगितलं आहे.

    (सविस्तर बातमीची लिंक)

  • 10 Jun 2025 04:47 PM (IST)

    10 Jun 2025 04:47 PM (IST)

    RCB संघ विकला जाणार? आयपीएलच्या इतिहासात कधी नव्हे होणार महागडा करार... 

    १७ वर्षांचा दुष्काळ संपवून ३ जून रोजी आरसीबीने आयपीएल २०२५ ट्रॉफी जिंकली. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. आरसीबी संघाच्या मालकीमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

  • 10 Jun 2025 04:41 PM (IST)

    10 Jun 2025 04:41 PM (IST)

    धक्कादायक! ऑस्ट्रियात शाळेत विद्यार्थ्याकडून अंदाधुंद गोळीबार; 9 जणांचा मृत्यू

    एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑस्ट्रियाच्या ग्राझमध्ये एका शाळेत गोळीबाराची घटना घडली आहे. ऑस्ट्रिया प्रेस एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गोळीबारात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका विद्यार्थ्यांने हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण ऑस्ट्रियात खळबळ उडाली आहे.

    संपूर्ण प्रकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा

    🚨🇦🇹 Multiple fatalities in Graz, Austria as gunman goes on shooting rampage in school - reports of 30-40 shots fired.

    This is unbearably horrific - Europe is not ok ‼️ pic.twitter.com/Tn7akHUF6a

    — Concerned Citizen (@BGatesIsaPyscho) June 10, 2025

  • 10 Jun 2025 04:14 PM (IST)

    10 Jun 2025 04:14 PM (IST)

    खासदार संजय राऊतांचा चंद्रहार पाटलांवर जोरदार घणाघात

    राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मागील वाद विसरुन एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 10 Jun 2025 04:01 PM (IST)

    10 Jun 2025 04:01 PM (IST)

    खारघरमधील डॉल्फिन प्राईड सोसायटीत पाकिस्तानी महिलेची हत्या

    खारघर सेक्टर 34 मधील डॉल्फिन प्राईड सोसायटीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानी महिला सपना नोतनदास यांचा त्यांच्या पतीने चाकूने खून केला, नंतर स्वतः आत्महत्या केली. दोघेही नोव्हेंबर 2024 मध्ये लॉन्ग टर्म व्हिसावर भारतात आले होते. पोलिसांचा तपास सुरू आहे.

  • 10 Jun 2025 03:59 PM (IST)

    10 Jun 2025 03:59 PM (IST)

    मुलांमधील ब्रेन ट्यूमरची लक्षणे कोणती, तज्ज्ञांनी दिला इशारा

    जेव्हा एखाद्या मुलाला ब्रेन ट्यूमरचे निदान होते तेव्हा वेळीच उपचार केल्यास त्याचा अमूल्य जीव वाचविता येतो. विलंब न करता मुलांमधील ही धोक्याची लक्षणे ओळखणे आणि त्वरित उपचार सुरू करणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत जागरुक राहण्याची आवश्यकता आहे. ब्रेन ट्यूमर ही मेंदूतील असामान्य पेशींची वाढ आहे आणि ती कर्करोगजन्य असू शकते. प्रौढांप्रमाणेच, मुलांमध्ये ब्रेन ट्यूमर देखील एक सामान्यपणे आढळून येणारा आजार आहे. हे खरंय की ब्रेन ट्यूमर लहान मुलांसह सर्व वयोगटातील लोकांमध्ये उच्च विकृती आणि वाढत्या मृत्युदरास कारणीभूत ठरते. मात्र वेळीच निदान आणि उपचार मुलांना त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात.

  • 10 Jun 2025 03:53 PM (IST)

    10 Jun 2025 03:53 PM (IST)

    RCB ला मिळणार नवा मालक? Diageo आपला हिस्सा विकणार? ‘हे’ कारण आल समोर

    ब्रिटिश मद्य कंपनी डियाजियो पीएलसी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) मधील आपला हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, डियाजियो सध्या संभाव्य सल्लागारांशी सुरुवातीच्या टप्प्यात चर्चा करत आहे. हा हिस्सा अंशतः किंवा पूर्णपणे विकला जाऊ शकतो.

  • 10 Jun 2025 03:44 PM (IST)

    10 Jun 2025 03:44 PM (IST)

    फलंदाज ताकद दाखवणार की गोलंदाज कहर करतील, जाणून घ्या लॉर्ड्सच्या खेळपट्टीचा मूड

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना ११ जूनपासून सुरू होत आहे. ५ दिवस चालणाऱ्या या निर्णायक सामन्यासाठी १६ जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. हा सामना ऐतिहासिक सामना असणार आहे. या सामन्याचा विजेता हा येत्या पाच दिवसांमध्ये मिळणार आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वर्ल्ड टेस्ट क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाणार आहे हा ऐतिहासिक सामना ऐतिहासिक मैदानावर होणार आहे.

  • 10 Jun 2025 03:42 PM (IST)

    10 Jun 2025 03:42 PM (IST)

    आरोग्यमंत्र्यांचे कोरोनाबाबत भाष्य; म्हणाले, “रुग्णसंख्येत वाढ होतेय, मात्र…”

    राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दिवसेंदिवस प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातही कोरोना पसरत असून आरोग्य विभाग आणि प्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत. “कोरोना रुग्णसंख्या वाढली तरी काळजी करू नका, घाबरू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या, गोंधळून जाऊ नका. राज्यातील रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी, राज्यातील परिस्थिती अजूनही नियंत्रणात आहे.” त्यामुळं आरोग्य विभागाला काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.

  • 10 Jun 2025 03:37 PM (IST)

    10 Jun 2025 03:37 PM (IST)

    ‘इंग्लंड दौरा आव्हानात्मक अन् मजेदारही, भारताला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागणार;

    माजी क्रिकेटपटूंने शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला इंग्लंडमध्ये यशस्वी होण्यासाठी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला, तर मायकेल वॉनचा असा विश्वास आहे की ही पाच कसोटी सामन्यांची मालिका भारतासाठी काहीतरी खास होण्याची सुरुवात असू शकते. रोहित शर्मा, विराट कोहली कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांनी कसोटी  क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट बदलाच्या टप्प्यातून जात आहे. या दौऱ्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचीही निवड झालेली नाही. चेतेश्वर पुजारा म्हणाला, भारताला इंग्लंडमधील परिस्थितीशी त्वरित जुळवून घ्यावे लागेल.

  • 10 Jun 2025 03:33 PM (IST)

    10 Jun 2025 03:33 PM (IST)

    “साहेबांना माझ्या काही गोष्टी पटत नाहीत…”; पुण्यातील कार्यक्रमात निलेश लंकेंचे मोठे विधान

    आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचा २६ वा वर्धापन दिन पार पडला. 26 व्या वर्धापन दिनी शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. आज पुण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे.

  • 10 Jun 2025 03:29 PM (IST)

    10 Jun 2025 03:29 PM (IST)

    राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय

    राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात विद्यार्थ्यांचं विद्यावेतन वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात १०००० रूपयांची वाढ करण्यात येणार आहे. बीएससी नर्सिंग आणि व्यवसायोपचार अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनाही वाढीव विद्यावेत मिळणार आहे.

  • 10 Jun 2025 03:20 PM (IST)

    10 Jun 2025 03:20 PM (IST)

    बांगलादेशात आंदोलनांवर बंदी

    गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात राजकीय गोंधळ सुरु आहे. बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी एप्रिल २०२६ पर्यंत सार्वत्रिक निवडणूका घेण्याचे जाहीर केले आहे. परंतु त्यांच्या या निर्णयाला विरोधी पक्ष, सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि लष्करामध्ये संताप निर्माण झाला आहे. यामुळे बांगलादेशात तीव्र निदर्शने सुरु आहे. अशा परिस्थितीत मोहम्मद युनूस यांनी ढाकातील निदर्शनांवर आणि सार्वजनिक सभांवर बंदी घातली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

    संपूर्ण प्रकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  • 10 Jun 2025 03:16 PM (IST)

    10 Jun 2025 03:16 PM (IST)

    रोहित शर्माकडील वनडेचे कर्णधारपद धोक्यात! BCCI नव्या योजनेच्या विचारात.. 

    रोहित शर्माची २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खेळण्याची खूप इच्छा आहे, परंतु  तो बीसीसीआयच्या योजनेत बसत नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआय त्याच्या जागी दुसऱ्या कोणाचा कर्णधार म्हणून विचार करण्याच्या विचारात आहे.

    बातमी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लीक करा

     

     

     

  • 10 Jun 2025 03:10 PM (IST)

    10 Jun 2025 03:10 PM (IST)

    सोनम कपूरच्या पार्टीत नेमकं झालं तरी काय? बेबोचा उदास चेहरा पाहून चाहते अस्वस्थ, Video Viral

    करीना कपूर ही बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्री पैकी एक आहे. तिने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत आणि तिच्या दमदार अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य केले आहे. करीना खूप आनंदी देखील आहे आणि ती नेहमीच पॅप्ससोबत हसतमुखाने पोज देताना दिसते. अलीकडेच करीनाने तिची बेस्ट मैत्रिण सोनम कपूरच्या प्री-बर्थडे पार्टीला हजेरी लावली. आता सोनमच्या बर्थडे पार्टीतील अभिनेत्रीचा असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.

     

  • 10 Jun 2025 03:08 PM (IST)

    10 Jun 2025 03:08 PM (IST)

    इंदूर कपल केसदरम्यान चर्चेत आली Chum Darang, अभिनेत्रीच्या पोस्टने दिला खास संदेश

    मेघालय राज्यात हनिमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशी या तरुणाच्या हत्येनंतर, ही घटना देशभर चर्चेचा विषय बनली आहे. कंगना रणौतने या प्रकरणावर न्याय मागणारी प्रतिक्रिया दिली. आता चुम दरंगची प्रतिक्रियाही समोर आली आहे. तथापि, तिच्या पोस्टद्वारे, बिग बॉस १८ मधील एक्स स्पर्धक चुमने ईशान्येकडील राज्याला पाठिंबा दर्शवत त्याचे समर्थन केले आहे. खरंतर, राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, ईशान्येकडील राज्यात द्वेषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. चुम दरंगने याबद्दल तिचे मौन तोडले आहे.

  • 10 Jun 2025 03:05 PM (IST)

    10 Jun 2025 03:05 PM (IST)

    ७ वर्षे मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सोडलं मौन

    २०२० मध्ये रिलीज झालेल्या 'डॉली, किट्टी और वो चमकते सितारे' नावाच्या चित्रपटामध्ये कोंकणा सेन शर्मा आणि अमोल पाराशर यांनी एकत्र काम केले. या चित्रपटाच्या शुटिंगपासून दोघांच्याही अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. तेव्हापासून ते आजवर अनेकदा त्यांच्या रिलेशनच्या चर्चा झाल्या आहेत. आता अशातच कोंकणा सेन शर्मा आणि अमोल पाराशर यांच्या रिलेशनच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. सध्या माध्यमांमध्ये हे कपल रिलेशनशिपमध्ये असल्याच्याही चर्चा सुरु आहेत. याचं कारण ठरलंय, स्वत: अमोल पाराशरने केलेले विधान...

  • 10 Jun 2025 03:04 PM (IST)

    10 Jun 2025 03:04 PM (IST)

    भारत विरुद्ध इंग्लड मालिकेत काॅमेंटेटरची यादी

    भारत विरुद्ध इंग्लड मालिकेला फक्त 10 दिवस शिल्लक राहिले आहेत. टीम इंडीया ही शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. या मालिकेचा पहिला सामना हा 20 जून रोजी सुरु होणार आहे. या मालिकेसाठी आता काॅमेंटेटरची यादी समोर आली आहे.

    इंग्लिश काॅमेंटेटरची यादी

    सुनील गावस्कर, मायकल वॉन, चेतेश्वर पुजारा, नासेर हुसेन, माईक अथर्टन, संजना गणेशन, हर्षा भोगले

    हिंदी काॅमेंटेटरची यादी

    अजय जडेजा, इरफान पठाण, आशिष नेहरा, विवेक राजदान, सबा करीम, आरपी सिंग, अर्जुन पंडित, गौरव कपूर

     

  • 10 Jun 2025 03:04 PM (IST)

    10 Jun 2025 03:04 PM (IST)

    अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 3 जणांचा जागीच मृत्यू

    सोलापूर अक्कलकोट महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला असून यात तीन भाविकांचा मृत्यू आल्याची माहिती आहे. तर १५-२० भाविक जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान ट्रॅव्हल्स बसमध्ये ३५ प्रवाशी असल्याची माहिती असून सर्व भाविक पुण्याहून अक्कलकोटला देवदर्शनाला जात असताना ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

  • 10 Jun 2025 03:02 PM (IST)

    10 Jun 2025 03:02 PM (IST)

    भारतात कोणत्या कार्सची होते सर्वाधिक विक्री

    भारतात पेट्रोल कार नक्कीच सर्वाधिक विकल्या जातात, परंतु मे महिन्यात किती डिझेल आणि सीएनजी कार तसेच हायब्रिड आणि इलेक्ट्रिक कार विकल्या गेल्या हे मे महिन्याच्या बाजारातील त्यांच्या हिश्शावरून कळायला हवे. याबाबत अधिक माहिती बातमीत वाचता येईल

  • 10 Jun 2025 02:59 PM (IST)

    10 Jun 2025 02:59 PM (IST)

    पहिल्यांदा मोदी सरकारच्या काळात घडला बँक कर्जात मोठा बदल

    कर्ज देण्याच्या बाबतीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी खाजगी बँकांना मागे टाकले आहे. २०११ नंतर पहिल्यांदाच असे घडले आहे. यामध्ये गृहकर्ज आणि कॉर्पोरेट कर्जे यांचा समावेश आहे. यासोबतच, ऑटो कर्जांसारख्या गैर-मॉर्टगेज रिटेल सेगमेंटमध्येही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे वर्चस्व राहिले आहे.

  • 10 Jun 2025 12:54 PM (IST)

    10 Jun 2025 12:54 PM (IST)

    शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करचा पहिला व्लॉग समोर, नणंद सबा म्हणाली ‘हा काळ खूप कठीण…’

    टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करचा लिव्हर ट्यूमर शस्त्रक्रियेनंतरचा पहिला व्लॉग समोर आला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या प्रियजनांचे आभार मानले आहेत आणि तिच्या प्रकृतीबद्दल अपडेट शेअर केले आहे. हा व्लॉग शोएब इब्राहिमने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो चाहत्यांना दीपिकाच्या बरे होण्याची झलक दाखवत आहे. यादरम्यान, अभिनेत्री खूप भावनिकही दिसत होती. अर्थात, शोएब सतत दीपिका कक्करच्या प्रकृतीबद्दल अपडेट देत होता. सुमारे १४ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर, अभिनेत्री तीन दिवस आयसीयूमध्ये होती. तथापि, आता तिला एका खाजगी वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे.

  • 10 Jun 2025 12:53 PM (IST)

    10 Jun 2025 12:53 PM (IST)

    ‘Housefull 5’ ने मागील चार भागांचा मोडला रेकॉर्ड, ४ दिवसांत १०० कोटींचा आकडा केला पार!

    ‘हाऊसफुल ५’ ने त्याच्या मागील चार भागांचा विक्रम मोडला आहे. ‘हाऊसफुल ४’ ने बॉक्स ऑफिसवर ८७.७८ कोटी रुपये कमावले होते. तर ‘हाऊसफुल ३’ ने ६१.५३ कोटी रुपये कमावले होते, तर ‘हाऊसफुल २’ आणि ‘हाऊसफुल’ ने बॉक्स ऑफिसवर ४६.२३ कोटी रुपये आणि ३७ कोटी रुपये कमावले होते. ‘हाऊसफुल’ चित्रपटाच्या चारही भागाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केले आहे. तसेच ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटामध्ये २० कलाकार असल्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस हा चित्रपट चांगलाच उतरला आहे.

  • 10 Jun 2025 12:53 PM (IST)

    10 Jun 2025 12:53 PM (IST)

    अमिताभ बच्चन यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती होणार कोणाच्या नावावर? बिग बींनी स्वतःच केला खुलासा

    मालमत्तेबद्दल अमिताभ बच्चन यांचे मत
    २०११ मध्ये रेडिफला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते की त्यांनी आणि त्यांच्या पत्नी जया बच्चन यांनी आधीच ठरवले होते की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची सर्व मालमत्ता मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन नंदा यांच्यात समान वाटली जाईल. त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, “माझ्यानंतर काहीही झाले तरी ते अभिषेक आणि श्वेता यांच्यात समान वाटले जाईल. कोणाविरुद्धही कोणताही भेदभाव केला जाणार नाही.” असे अभिनेत्याने म्हटले आहे.

  • 10 Jun 2025 12:19 PM (IST)

    10 Jun 2025 12:19 PM (IST)

    सोनम रघुवंशीला पुन्हा नेणार मेघालयात

    सोनम रघुवंशी हिला मेघालय पोलिस फुलवारी पोलिस स्टेशनमधून ताब्यात घेत आहेत. मेघालय पोलिसांकडे तिच्यासाठी तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड आहे. तिला मेघालयातील शिलाँग येथे नेले जाईल.

  • 10 Jun 2025 12:09 PM (IST)

    10 Jun 2025 12:09 PM (IST)

    मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा - जयंत पाटील

    पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा  26 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांना मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा अशी विनंती केली आहे. यावेळी त्यांनी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे देखील सांगितले. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. वाचा सविस्तर  

  • 10 Jun 2025 11:18 AM (IST)

    10 Jun 2025 11:18 AM (IST)

    Liquid Glass डिझाईन Apple ने सादर केला iOS 26!

    Apple च्या अ‍ॅनुअल डेवलपर इवेंट WWDC 2025 ची सुरुवात झाली आहे. हा ईव्हेंट 9 जूनपासून सुरु झाला आहे. अ‍ॅपलच्या या ईव्हेंटमध्ये कंपनीने त्यांच्या सॉफ्टवेअर्सवर लक्ष केंद्रीत केलं आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनीने अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट्स सादर केले आहेत. अ‍ॅनुअल डेवलपर ईव्हेंट WWDC 2025 मध्ये अ‍ॅपलने त्यांच्या आयफोनच्या ऑपरेटिंग सिस्टम iOS साठी Liquid Glass डिझाईनसह iOS 26 सादर केलं आहे.

  • 10 Jun 2025 11:09 AM (IST)

    10 Jun 2025 11:09 AM (IST)

    बुलडाण्यात विजेच्या धक्क्याने चिमुकल्याचा मृत्यू

    घराच्या गच्चीवर खेळायला गेलेल्या चिमुकल्याला वाकलेल्या वीजतारांचा जोरदार धक्का बसला. यातच त्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.9) उघडकीस आली. अमित संतोष तायडे (रा. भीमनगर) असे मृताचे नाव आहे.

  • 10 Jun 2025 10:10 AM (IST)

    10 Jun 2025 10:10 AM (IST)

    12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला Vivo Y300c

    गेल्या काही दिवसांपासून विवो सतत नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे. आता देखील कंपनीने त्यांचा एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट डिव्हाईस आहे. नवीन स्मार्टफोन कंपनीने Vivo Y300c या नावाने लाँच केला आहे. कंपनीने सध्या हा स्मार्टफोन केवळ होम टाउन चीनमध्ये लाँच केला आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतात देखील लाँच केला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र अद्याप या स्मार्टफोनची भारतातील लाँच डेट जाहीर करण्यात आली नाही. वीवो Y सीरीजचा हा नवीन आणि बजेट स्मार्टफोन मीडियाटेक 6300 चिपसेटने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन तीन कलर व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

  • 10 Jun 2025 09:19 AM (IST)

    10 Jun 2025 09:19 AM (IST)

    लोह खाणींसाठी गडचिरोलीत १ लाख झाडांची कत्तल करणार

    राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील बहुचर्चित सूरजागड लोह खाणीतील उत्खनन क्षमतेत वाढ करण्यास पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 937 हेक्टर जंगल क्षेत्र खाणकामासाठी वापरण्यात येणार आहे.या निर्णयाअंतर्गत सुमारे 1.23 लाख झाडांची कत्तल होणार असून, 900 हेक्टर जंगल क्षेत्रातील झाडे तोडण्यास वन्यजीव संरक्षणाच्या अटींवर परवानगी देण्यात आली आहे.परंतु, या निर्णयाला पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध होऊ लागला आहे. जंगल आणि जैवविविधतेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून, पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

  • 10 Jun 2025 09:00 AM (IST)

    10 Jun 2025 09:00 AM (IST)

    सोन्याच्या दरात मोठी घसरण, काय आहेत आजच्या किंमती?

    10 जून रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,768 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,954 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,326 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 89,540 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 97,680 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,260 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 108.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,08,100 रुपये आहे.

  • 10 Jun 2025 08:59 AM (IST)

    10 Jun 2025 08:59 AM (IST)

    शेअर बाजाराची सुरुवात आज सकारात्मक होण्याची शक्यता

    जागतिक बाजारपेठेतील तेजीचा मागोवा घेतल्यानंतर तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० ची सुरुवात आज १० जून रोजी मंगळवारी सकारात्मक होण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी आज सकारात्मक सुरुवात दर्शवितात.

  • 10 Jun 2025 08:27 AM (IST)

    10 Jun 2025 08:27 AM (IST)

    मुंबई लोकल ट्रेन अपघात प्रकरणाला वेगळे वळण

    मुंबई लोकल रेल्वे अपघतात प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ट्रेनमधून खाली पडून जखमी झालेल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीमुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ज्या लोकल ट्रेनमधून प्रवासी खाली पडले त्या ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर ओरखडे आढळून आले आहेत. तसेच ट्रेनमधून पडलेल्या एका प्रवाशाने, 'आम्हाला काहीतरी लागल्यासारखं वाटले, असे सांगितले. आम्ही खाली पडण्यापूर्वी आम्हाला भिंतीला धडकल्यासारखं वाटलं', असे त्याने म्हटले. त्यामुळे ही 'अज्ञात' गोष्ट म्हणजे लोखंडी रॉड असावा, असा संशय मध्य रेल्वेला आहे.

  • 10 Jun 2025 08:20 AM (IST)

    10 Jun 2025 08:20 AM (IST)

    पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा मोठा निर्णय

    आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या आषाढी यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना मंदिर समिती मार्फत मुबलक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच भाविकांचे सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी दि. 27 जून पासून 24 तास दर्शन व्यवस्था उपलब्ध होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

Web Title: Marathi breaking news today live updates politics crime sports entertainment social national international breaking news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 08:18 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live: भिवंडीत 65 वर्षीय महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या
1

Top Marathi News Today Live: भिवंडीत 65 वर्षीय महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या

Top Marathi News Today Live: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप
2

Top Marathi News Today Live: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप

Top Marathi News Today: मतदार यादीच्या SIR संदर्भात आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3

Top Marathi News Today: मतदार यादीच्या SIR संदर्भात आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Top Marathi News Today: साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकरला अटक
4

Top Marathi News Today: साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकरला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.