आरसीबी टीम(फोटो-सोशल, मिडिया)
IPL 2025 : आयपीएल २०२५ चे विजेतेपद आरसीबी संघाने जिंकले आहे. या संघाने पंजाबचा अंतिम सामन्यात 6 धावांनी पराभव केला होता. आयपीएल आटोपून एक आठवडा उलटून गेला तरी देखील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अजूनही चर्चेत आहे. १७ वर्षांचा दुष्काळ संपवून ३ जून रोजी आरसीबीने आयपीएल २०२५ ट्रॉफी जिंकली, याचा आनंद साजरा करणे संघाला महागात पडला आहे. ४ जून रोजी विजयी परेड दरम्यान बेंगळुरूमध्ये एम. चिन्नास्वामीच्या बाहेर चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते. या सगळ्यानंतर, आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. आरसीबी संघाच्या मालकीमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जागतिक आर्थिक, डेटा आणि मीडिया कंपनीने आरसीबीसाठी मोठा दावा ठोकला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालात असे म्हटले आहे की, सध्याची ब्रिटीश स्पिरिट कंपनी डियाजिओ पीएलसी, फ्रँचायझीमधील आपला हिस्सा आरसीबीला विकण्याच्या विचारात आहे. परंतु, आतापर्यंत त्यांनी या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
ब्लूमबर्गच्या अहवालात सुरुवातीच्या काळात आर्थिक सल्लागारांशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या दरम्यान, डियाजिओ फ्रँचायझी विकण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे, असे देखील म्हटले आहे की फ्रँचायझीचा दर २ अब्ज डॉलर्स म्हणजेच १७ हजार कोटी रुपये ठेवण्यात आला आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, पूर्वी युनायटेड स्पिरिट लिमिटेड कंपनी विजय मल्ल्यांच्या मालकीची होती. परंतु नंतर विजय मल्ल्यांनी दिवाळखोरी केल्यानंतर, ती ब्रिटीश कंपनी डियाजिओकडून विकत घेण्यात आली. आता डियाजिओकडे आरसीबीचे मालकी हक्क आहे.
🚨 NEW RCB OWNERS EXPECTED. 🚨
– Current RCB owner Diageo Plc exploring possibilities for a potential sale of RCB, valued at up to $2 billion. (Bloomberg). pic.twitter.com/auOSki08UV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 10, 2025
हेही वाचा : ENG vs IND मालिकेत इरफान पठानला मिळणार काॅमेंट्री बाॅक्समध्ये एंन्ट्री! सिरीजमध्ये हे दिग्गज करणार समालोचन
आरसीबी संघ हा जर १७ हजार कोटी रुपयांना विकला गेला तर हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा करार ठरण्याची शक्यता आहे. आतापर्यंत कोणताही संघाला इतक्या मोठ्या किमतीची किंमत मिळालेली नाही. यापूर्वी आयपीएलमध्ये दोन नवीन संघांचा प्रवेश केला होता. त्यापैकी एक लखनौ सुपर जायंट्स आणि दुसरा गुजरात टायटन्स होता. या काळात आरपीएसजी ग्रुपने एलएसजीला ७,०९० कोटी रुपयांना खरेदी केले होते तर दुसरीकडे, सीव्हीसी कॅपिटलने गुजरात टायटन्सला ५,६२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते.