Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Today: MIMशी युतीवरून भाजपचा युटर्न; फडणवीसांचा संताप

Breaking Live news in Marathi- हिदायत पटेल हे काल (मंगळवारी) दुपारच्या दोन वाजता मशिदीत नमाज पठण करायला गेले होते. नमाज पठणानंतर मशिदीतून बाहेर पडताच उबेदने हिदायत पटेलांवर हल्ला केला

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 07, 2026 | 06:56 PM
Maharashtra breaking News Marathi

Maharashtra breaking News Marathi

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News :  

 काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर चाकूहल्ला

 अकोल्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हिदायत पटेल यांच्यावर काल (६ जानेवारी) अकोट तालुक्यातील मोहाळा गावात जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यांच्यावर अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर आरोपी संशयित आरोपी उबेद पटेलला रात्री पणज गावातील लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. तर इतर आरोपी फरार आहे. हा हल्ला राजकीय आणि कौटुंबिक वादातून करण्यात आल्याचे म्हंटले जात आहे.

 

 

The liveblog has ended.
  • 07 Jan 2026 06:56 PM (IST)

    07 Jan 2026 06:56 PM (IST)

    Deepak Kesarkar : “निवडणूक आल्यावर त्यांना मराठी माणूस आठवतो…”, दीपक केसरकर यांची उबाठावर टीका

    मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक राहीले आहेत. अशातच शिंदे गटातील दीपक केसरकर यांनी उबाठावर टिका केली आहे. निवडणूक आली की मराठी माणसाची आठवण होते. २५ वर्ष सत्तेत असताना काम केले नाही आणि आता भावनिक मुद्द्यावर सत्ता आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका शिवसेना आमदार व प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उबाठावर केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

  • 07 Jan 2026 06:49 PM (IST)

    07 Jan 2026 06:49 PM (IST)

    Shryas Iyer Fitness Update: श्रेयस अय्यरच्या फिटनेसबद्दल आली मोठी अपडेट, पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळणार की नाही?

    India vs New Zealand ODI Series: टीम इंडियाचा एकदिवसीय उपकर्णधार श्रेयस अय्यरला (Shryas Iyer) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दुखापत झाली. तो काही दिवस रुग्णालयात होता. आता, अय्यर टीम इंडियामध्ये (Team India) परतण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी (IND vs NZ) अय्यरची निवड झाली आहे, परंतु आता त्याच्या फिटनेसबाबत एक मोठी अपडेट आली आहे. ११ जानेवारी रोजी होणाऱ्या सामन्यात अय्यर खेळेल की नाही या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.

  • 07 Jan 2026 06:46 PM (IST)

    07 Jan 2026 06:46 PM (IST)

    Ladki Bahin Yojana : निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणींना 3000 रुपये मिळणार, तेजस्वी घोसाळकर यांचा दावा

    विधानसभा निवडणुकीत बदल घडवून आणणारी “लाडकी बहीण योजना” मुंबई महापालिका निवडणुकीत दाखल झाली आहे. सरकारने अद्याप लाडकी बहिण लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता दिलेला नाही. दहिसर येथील भाजप उमेदवार तेजस्वी यांनी दावा केला आहे की लाडकी बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते १४ जानेवारी रोजी एकत्रित मिळतील.

  • 07 Jan 2026 06:27 PM (IST)

    07 Jan 2026 06:27 PM (IST)

    दौंड–पाटस मार्गावरील हॉटेल जगदंबामध्ये एलपीजी सिलेंडरचा स्फोट

    दौंड: पाटस अष्टविनायक मार्गावरील मांढरे मळा परिसरात असलेल्या हॉटेल जगदंबामध्ये मंगळवारी दुपारी भटारखान्यातील घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत हॉटेलमध्ये काम करणारे एकूण दहा कर्मचारी भाजले असून, त्यापैकी सहा जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
  • 07 Jan 2026 06:14 PM (IST)

    07 Jan 2026 06:14 PM (IST)

    आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून जीवन संपवले; कारण अद्याप गूढ

    तासगाव : पोलीस दलात अधिकारी म्हणून घडण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका होतकरू तरुण अधिकाऱ्याने आपले आयुष्य अकाली संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली असून, संपूर्ण पोलीस दलाला हादरवून टाकणारा हा धक्का आहे. तासगाव पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुरज मराठे यांनी आज सकाळी पुणे येथे विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

  • 07 Jan 2026 06:07 PM (IST)

    07 Jan 2026 06:07 PM (IST)

    ट्रम्पचा व्हेनेझुएलावर दबाव वाढला! ‘या’ देशांसोबत आर्थिक संबंध तोडण्याचा दिला अल्टीमेटम

    US Venezuela Conflict : वॉशिंग्टन : व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे. त्यांच्या अटकेनंचर अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या अंतरिम सरकारसोबत मोठा करार केला आहे. या कारारांतर्गत अमेरिकेला 50 दशलक्ष बॅलर तेल मिळणार आहे. तसेच या तेलाच्या विक्रीच्या कमाईवर देखील अमेरिकेचे नियंत्रण असणार आहे. परंतु यानंतर डोनाल्ड ट्रम्प थांबलेले नाहीत. ट्रम्प यांनी आता आणखी एक मोठी मागणी करत व्हेनेझुएलाला अल्टीमेटम दिला आहे. यामुळे व्हेनेझुएलाच्या अंतरिम सरकारसमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत.

  • 07 Jan 2026 05:56 PM (IST)

    07 Jan 2026 05:56 PM (IST)

    2026 च्या टी-२० विश्वचषकासाठी नेपाळ संघाची घोषणा!

    २०२६ च्या आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी एक महिना बाकी असताना नेपाळने या मोठ्या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ घोषित केला आहे. रोहित पौडेलकडे नेपाळ संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तर दीपेंद्र सिंग ऐरी उपकर्णधार असणार आहे.

  • 07 Jan 2026 05:28 PM (IST)

    07 Jan 2026 05:28 PM (IST)

    बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण

    बुधवारी भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक व्यापार सत्रात किरकोळ घसरणीसह बंद झाले. दिवसअखेरीस सेन्सेक्स १०२.२० अंकांनी किंवा ०.१२ टक्के घसरणीसह ८४,९६१.१४ वर होता आणि निफ्टी ३७.९५ अंकांनी किंवा ०.१४ टक्के घसरणीसह २६,१४०.७५ वर होता. लार्जकॅप्समध्ये घट झाली, परंतु मिडकॅप्स आणि स्मॉलकॅप्समध्ये वाढ दिसून आली. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक २७६.१५ अंकांनी किंवा ०.४५ टक्के वाढीसह ६१,४२४.७० वर आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक ७०.६५ अंकांनी किंवा ०.४० टक्के वाढीसह १७,९५८.५० वर बंद झाला.

  • 07 Jan 2026 05:09 PM (IST)

    07 Jan 2026 05:09 PM (IST)

    Toyota त्यांची नवीन Electric SUV आणण्याच्या तयारीत!

    भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या टोयोटाकडून विविध सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री केली जाते. आता कंपनी लवकरच भारतीय बाजारात त्यांची नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर करण्याच्या तयारीत आहे. या आगामी एसयूव्हीच्या लाँचपूर्वी कंपनीकडून अधिकृत टीझर जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. यात लाँचची तारीखबद्दलची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, टोयोटाची नवीन एसयूव्ही 19 जानेवारी रोजी भारतात अधिकृतपणे लाँच केली जाऊ शकते.

  • 07 Jan 2026 04:50 PM (IST)

    07 Jan 2026 04:50 PM (IST)

    भाजपसोबतची युती AIMIM ला सुद्धा नाही मान्य; इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली नाराजी

    राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. जोरदार प्रचार सुरु असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. विजयासाठी विरुद्ध विचारधारा असणाऱ्या लोकांसोबत युती केली जात आहे. भाजपमध्ये अंबरनाथमध्ये तर चक्क कॉंग्रेससोबत युती केली आहे. तर भाजपने अकोल्यामध्ये AIMIM पक्षासोबत युती केली आहे. यावरुन जोरदार टीका केली जात आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही युती मान्य नसल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर आता भाजपसोबतची युती AIMIM ला सुद्धा नाही मान्य नसल्याचे म्हणत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली नाराजी व्यक्त केली आहे.

    AIMIM नेते इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

  • 07 Jan 2026 04:40 PM (IST)

    07 Jan 2026 04:40 PM (IST)

    टी-सीरिजच्या पॉप चार्टबस्टर्समधील ‘नाचना’ ठरलं प्रेक्षकांचं आवडतं गाणं, इंडस्ट्रीकडून कौतुक

    गायिका पूर्णिमा पटवर्धन यांचे नवे ओरिजिनल गाणे ‘नाचना’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, टी-सीरिजच्या पॉप चार्टबस्टर्स अंतर्गत प्रदर्शित झालेल्या या गाण्याला चित्रपट व संगीत क्षेत्रातील मान्यवरांकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळत आहे. या गाण्यामुळे पूर्णिमा पटवर्धन यांच्या स्वतंत्र संगीत प्रवासातील एक महत्त्वाचा आणि आशादायक टप्पा अधोरेखित होत आहे.

  • 07 Jan 2026 04:35 PM (IST)

    07 Jan 2026 04:35 PM (IST)

    “दहा वर्ष त्यांच्याशी बोललोही नाही…” आमिर खानला सिनेमासाठी असे केले राजी; निर्मात्याने सांगितला किस्सा

    वीर दासने अलीकडेच नवीन डायरेक्टोरियल डेब्यू फिल्म हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस संदर्भात आमिर खानशी झालेल्या भेटीबद्दल खुलून बोलले. त्याने सांगितले की जेव्हा एखादा सुपरस्टार एखाद्या प्रोजेक्टवर खऱ्या अर्थाने विश्वास ठेवतो, तेव्हा तो पूर्ण मनापासून त्या प्रोजेक्टला साथ देतो. त्या क्षणाला आठवत वीरने सांगितले की , आमिर खान ज्या उंचीवर आहेत, त्यामुळे त्यांच्याशी भेटायला जाणं थोडं धडकी भरवणारं होतं.

  • 07 Jan 2026 04:30 PM (IST)

    07 Jan 2026 04:30 PM (IST)

    अखेर ‘धुरंधर’ ने मोडला KGF 2 चा रेकॉर्ड, 33 व्या दिवशी ‘पुष्पा 2’ आणि RRR ला देखील टाकले मागे

    आदित्य धर यांच्या दिग्दर्शनातील दुसरा चित्रपट “धुरंधर” ने ३३ दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर सर्वांनाच चकित केले आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचे वादात सुस्साट आहे. चित्रपटाच्या प्रचंड कमाईत, आता चित्रपटाने एका मोठया चित्रपटाला टक्कर दिली आहे. चित्रपटाला थिएटरमध्ये येऊन एक महिना झाला आहे. तरीही, इतर नवीन रिलीजच्या तुलनेत तो अजूनही चांगला कामगिरी करत आहे. ३१ दिवसांत त्याने दुहेरी अंकी कमाई केली असली तरी, आता त्याचे कलेक्शन कमी होत चालले आहे, आणि आता तो एक अंकी कमाई करत आहे. परंतु, तो आघाडीवर आहे आणि अगस्त्य नंदाच्या “इक्कीस” ला अडचणीत टाकत आहे.

  • 07 Jan 2026 04:15 PM (IST)

    07 Jan 2026 04:15 PM (IST)

    एसटी बसस्थानकांचा कायापालट होणार! दर १५ दिवसांनी राबवली जाणार स्वच्छता मोहीम; प्रवाशांना मिळणार हायटेक सुविधा

    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या हितासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व बसस्थानके आणि प्रशासकीय इमारतींमध्ये आता दर १५ दिवसांनी ‘सर्वंकष स्वच्छता मोहीम’ राबवली जाणार आहे. एसटीची जनमानसातील प्रतिमा सुधारणे आणि प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी सेवा देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

  • 07 Jan 2026 04:10 PM (IST)

    07 Jan 2026 04:10 PM (IST)

    समुद्राच्या आत सापडला पिवळ्या रंगाचा अनोखा रस्ता, दृष्यांनी विज्ञानालाही घातलं कोड पण खरं सत्य काय?

    शास्त्रज्ञांनी अलिकडेच पॅसिफिक महासागराच्या खोल पाण्यात एक नवा शोध लावला आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित करुन सोडलं. या नव्या शोधात शास्त्रज्ञांना पाण्याचा आत एक अनोखी रचना सापडली आहे जी पिवळ्या विटांनी बनवलेल्या रस्त्यासारखी दिसून येते. हे दृश्य काल्पनिक वाटत असले तरी ते सत्यात घडून आले असून ते कोणत्या तरी रहस्यमय गोष्टीचा भास करुन देते. ओशन एक्सप्लोरेशन ट्रस्टच्या जहाज ई/व्ही नॉटिलसने केलेल्या लाईव्ह-स्ट्रीम मोहिमेदरम्यान हा शोध पाहण्यात आला. हे ठिकाण हवाईयन बेटांजवळ समुद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे ३,००० मीटर खाली होते.

  • 07 Jan 2026 04:05 PM (IST)

    07 Jan 2026 04:05 PM (IST)

    मतदान की खेळ? नवी मुंबईत प्रभागानुसार चार मतदान, मतदार गोंधळात; सामन्यांचं मत नक्की कोणाला

    महानगरपालिका निवडणुकीमुळे आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक घडामोडी पाहायला मिळत आहे. भाजप, शिवसेना आणि काँग्रेससह सर्व पक्षांनी त्यांच्या निवडणुकीच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगानेही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. २२७ वॉर्डांसाठी २५१६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर २०१७ मध्ये २२७ नगरसेवकांपैकी ८४ नगरसेवक शिवसेनेचे, ८२ भारतीय जनता पक्षाचे आणि ३१ काँग्रेसचे होते. सर्व पक्षांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. याचदरम्यान नवी मुंबईत अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे निवडणूक पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बहुसदस्यीत पद्धतीन पार पडणार आहे.

  • 07 Jan 2026 04:00 PM (IST)

    07 Jan 2026 04:00 PM (IST)

    Loktak Lake: तलावावर तरंगणारे गाव! फक्त घर नाही तर जमीनही पाण्यावर उभारली

    मणिपूरमधील लोकटक तलाव हा ईशान्य भारतातील गोड्या पाण्याचा सर्वात मोठा तलाव आहे. याला 'ईशान्येचे रत्न' मानले जाते. या तलावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिथे तरंगणारे 'फुमडी'. फुमडी हे माती, वनस्पती, सेंद्रिय पदार्थ आणि कचरा यांच्यापासून तयार झालेले जाड थर आहेत. हे थर वर्षानुवर्षे एकमेकांत गुंफले गेल्यामुळे इतके मजबूत होतात की त्यावर माणसे सहज चालू शकतात आणि घरेही बांधू शकतात. हे जमिनीचे तुकडे पाण्यावर तरंगत असतात आणि वाऱ्याच्या दिशेनुसार आपली जागाही बदलतात.  या तलावात 'केबुल लामजाओ' (Keibul Lamjao) नावाचे राष्ट्रीय उद्यान आहे. हे जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान 'सांगाई' (Sangai) नावाच्या दुर्मिळ हरणाचे शेवटचे नैसर्गिक निवासस्थान आहे. हे हरीण फुमडीवर चालताना डोलते, म्हणून याला 'डान्सिंग डिअर' असेही म्हणतात.

    वाचा सविस्तर 

  • 07 Jan 2026 03:45 PM (IST)

    07 Jan 2026 03:45 PM (IST)

    ”एखाद्या महिलेला नग्न दाखवले तर..”, बॉलिवूडमधील भेदभावावर स्मिता पाटीलची स्पष्ट भूमिका

    बॉलीवूड अभिनेत्री स्मिता पाटील नेहमीच त्यांच्या भूमिका आणि स्पष्ट मतांसाठी ओळखल्या जात होत्या. आपल्या दमदार अभिनयाने, आपल्या सौंदर्यांने त्यांनी नेहमीच प्रेक्षकांना भुरळी घातली. सशक्त भूमिका आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर स्मिता पाटील यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. स्मिता पाटील यांनी 80हून अधिक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी हिंदी नाही तर बंगाली, मराठी, गुजराती, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केलं होतं. १९८० आणि १९९० च्या दशकात, जेव्हा भारतीय चित्रपटसृष्टीत महिलांच्या भूमिका पारंपारिक चौकटींपुरत्या मर्यादित आणि मर्यादित होत्या, तेव्हा स्मिता यांनी उघडपणे महिलांवरील भेदभाव आणि अन्याय्य वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

    वाचा सविस्तर 

  • 07 Jan 2026 03:30 PM (IST)

    07 Jan 2026 03:30 PM (IST)

    वातावरणातील बदलांमुळे केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत?

    देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. या दिवसांमध्ये शरीरसोबतच त्वचा आणि केसांची काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. थंडीत केसांच्या बऱ्याच समस्या उद्भवतात. केस कोरडे पडणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे आणि केसांना व्यवस्थित पोषण न मिळाल्यामुळे केस पांढरे सुद्धा होतात. केस कोरडे झाल्यानंतर ते पुन्हा नव्याने चमकदार आणि सुंदर करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या आणि परदेशी ब्रँडच्या हेअर केअर प्रॉडक्टचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण यामुळे काही काळापुरते केस अतिशय सुंदर आणि चमकदार दिसतात. पण कालांतराने पुन्हा एकदा केसांच्या समस्या उद्भवून केसांना हानी पोहचते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर न करता या टिप्स फॉलो करणे आवश्यक आहे.

    वाचा सविस्तर 

  • 07 Jan 2026 03:20 PM (IST)

    07 Jan 2026 03:20 PM (IST)

    जखमी उपकर्णधाराची डरकाळी! श्रेयस अय्यरने केली 82 धावांची खेळी

    Shreyas Iyer’s successful comeback : भारताचा उपकर्णधार श्रेयस अय्यरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकावून आपली तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. तो जयपूरमध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध मुंबईचे नेतृत्व करीत ८२ धावांची दमदार खेळी केली. अय्यरची न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियासाठी निवड झाली आहे, जरी त्याचा सहभाग त्याच्या तंदुरुस्ती सिद्ध करण्यावर अवलंबून आहे. अय्यर व्यतिरिक्त, सूर्यकुमार यादवने २४ धावा, मुशीर खानने ७३ धावा, यशस्वी जयस्वालने १५ धावा आणि सरफराज खानने २१ धावा केल्या.

    वाचा सविस्तर 

  • 07 Jan 2026 03:10 PM (IST)

    07 Jan 2026 03:10 PM (IST)

    लग्नात अनोखा रोमान्स! नवरीच्या इच्छेखातर लग्नात नवऱ्याने...

    Groom Kiss Bride in Spider Man Style : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. भांडण, स्टंट, जुगाड यांसारखे अनेक प्रकारचे रिल्स सतत व्हायरल होत असतात. यामध्ये लग्न समारंभातील अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. आता लग्न म्हटलं की विधी, परंपरा मंगलाष्टकता, फुलांची सजावट आणि कुटुंबीयांचा आनंद आला. परंतु प्रत्येजण वेगवेगळ्या पद्धतीने लग्न करतात. ख्रिश्चन धर्मात फादर नवरा-नवरी कडून आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन घेतो. यानंतर नवरा-नवरी सर्व पाहुणे मंडळींसोमर किस करतात. असाच एक लग्नातील किसिंगचा नवरा-नवरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये नवऱ्याने नवरीला एका अनोख्या स्टाईलमध्ये किस केले आहे.

    वाचा सविस्तर 

  • 07 Jan 2026 03:01 PM (IST)

    07 Jan 2026 03:01 PM (IST)

    राज्यात क्रीडा शिक्षकांची पदे येणार भरण्यात!

    राज्यातील शाळांमध्ये क्रीडा व शारीरिक शिक्षणाला बळकटी देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची ४ हजार ८६० पदे भरण्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे क्रीडा शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये मानधन तत्त्वावर ११ महिन्यांसाठी क्रीडा शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येत होत्या. मात्र, आता केंद्र शाळांच्या स्तरावर नियमित स्वरूपात क्रीडा शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आल्याने हा निर्णय दीर्घकालीन आणि सकारात्मक बदल घडवणारा ठरणार आहे. या निर्णयामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांना नियमित व दर्जेदार शारीरिक शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

    वाचा सविस्तर 

  • 07 Jan 2026 02:40 PM (IST)

    07 Jan 2026 02:40 PM (IST)

    राजकारण तापलं! विकासकामांचे आयते श्रेय घेऊ नका; शिंदे गटाच्या आमदारांचा इशारा

    काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष निवडणूकांपासून रायगड जिल्ह्यात आरोप-प्रत्यारोपांची फैरी अद्याप काही संपण्याचे नाव घेताना दिसून येत नाही. येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी गाव पातळीवर जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. अशातच सुरू असलेल्या विकासकामांच्या श्रेयवादावरून पुन्हा एकदा टिका-टिप्पणीला सुरूवात झाली आहे. चौल हद्दीत विकासकामांचा धडाका सुरू असून विकास कामांचे श्रेय घेऊ नका, असा इशारा शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे.

  • 07 Jan 2026 02:35 PM (IST)

    07 Jan 2026 02:35 PM (IST)

    Ukraine साठी ‘पॅरिस कवच’! रशियाचा पुढचा हल्ला रोखण्यासाठी 35 देश आले एकत्र

    युक्रेन-रशिया युद्धाला(Russia-Ukraine war) आता चार वर्षे पूर्ण होत असताना जगाचे लक्ष पॅरिसमधील ‘इच्छुकांच्या युती’ (Coalition of the Willing) या शिखर परिषदेकडे लागले आहे. ६ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या ऐतिहासिक बैठकीत युक्रेनचे भविष्य आणि सुरक्षा यावर मोठे निर्णय घेण्यात आले. रशियासोबत संभाव्य युद्धविराम (Ceasefire) झाल्यास युक्रेन पुन्हा एकदा रशियन आक्रमणाला बळी पडू नये, यासाठी अमेरिका आणि युरोपीय देशांनी ‘मजबूत सुरक्षा कवच’ देण्याचे मान्य केले आहे.

  • 07 Jan 2026 02:30 PM (IST)

    07 Jan 2026 02:30 PM (IST)

    समर राजवाडेवर प्रेक्षकांचा राग अनावर; प्रोमो पाहून टीकेचा भडिमार

    झी मराठीवरील तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेची मालिका वीण दोघातील ही तुटेना ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. हे दोघं ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. सध्या वीण दोघातील ही तुटेना मालिकेत एकापाठोपाठ एक ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. मालिकेत अनेक ट्विस्ट येत असतात पण आता या मालिकेचा नवीन प्रोमो पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. स्वानंदी आणि समरचं लग्न झाल्यापासून राजवाडेंच्या घरात कारस्थानांची मालिकाच सुरू झाली आहे.

  • 07 Jan 2026 02:25 PM (IST)

    07 Jan 2026 02:25 PM (IST)

    Motorola ची मोठी झेप! पहिल्यांदाच सादर केला फोल्डेबल 5G फोन

    स्मार्टफोन कंपनी मोटोरोला त्यांचा पहिला फोल्ड फोन लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शो म्हणजेच CES 2026 ईव्हेंटमध्ये कंपनीने त्यांच्या पहिल्या फोल्डेबल 5G फोनची झलक सादर केली आहे. कंपनीने बुधवारी या ईव्हेंटमध्ये त्यांच्या पहिल्या फोल्डेबल फोनची पहिली झलक जगासमोर सादर केली. हा आगामी फोल्ड फोन Motorola Razr Fold या नावाने लाँच केला जाणार आहे.

  • 07 Jan 2026 02:17 PM (IST)

    07 Jan 2026 02:17 PM (IST)

    जालन्यात हुंडा छळाचा बळी; 23 वर्षीय विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

    जालन्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या विवाहितेची नाव पूनम धर्मराज पाटील असे आहे. तिने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. अंबड तालुक्यातील रोहलीगड येथे ही घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.या घटनेने पुन्हा हुंडाबळीच्या विषय ऐरणीवर आला आहे.

  • 07 Jan 2026 02:10 PM (IST)

    07 Jan 2026 02:10 PM (IST)

    २४ व्या पुणे इंटरनॅशन फिल्म फेस्टिवलमध्ये ‘माया’ची निवड!

    मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन प्रयोगांची लाट सुरू असताना, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री मुक्ता बर्वे नव्या वर्षाची सुरुवात एका खास भेटीसह करत आहे. नेहमीच आशयघन, दमदार आणि आव्हानात्मक भूमिका निवडणारी मुक्ता बर्वे ‘माया’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स निर्मित ‘माया’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. येत्या २७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 07 Jan 2026 02:00 PM (IST)

    07 Jan 2026 02:00 PM (IST)

    ‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला!

    झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित आगामी मराठी चित्रपट ‘रुबाब’ च्या टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. ‘तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे’ ही हटके टॅगलाईन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून चित्रपटाबद्दलची चर्चा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या रुबाबदार आणि स्टायलिश लव्हस्टोरीतील पहिलं प्रेमगीत ‘कसं तरी होतंया रं’ आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

  • 07 Jan 2026 01:55 PM (IST)

    07 Jan 2026 01:55 PM (IST)

    बीएलएस इंटरनॅशनल आणि रिपब्लिक ऑफ सायप्रस उच्चायुक्तालयाचा ग्लोबल व्हिसा करार!

    जानेवारी २०२६ मध्ये बीएलएस इंटरनॅशनल या सरकार व राजनैतिक मोहिमांसाठी विश्वसनीय जागतिक तंत्रज्ञान-सक्षम सेवा सहयोगीने दक्षिण आफ्रिकेमधील रिपब्लिक ऑफ सायप्रसच्‍या उच्‍चायुक्‍तालयासोबत करारावर स्‍वाक्षरी केली आहे, ज्‍याअंतर्गत सर्वसमावेशक व्हिसा आऊटसोर्सिंग सेवा देण्‍यात येतील. या करारामधील अटींनुसार बीएलएस इंटरनॅशनल दक्षिण आफ्रिका आणि शेजारील १० देश लेसोथो, एस्वाटिनी, मॉरिशस, बोत्सवाना, झिम्बाब्वे, झांबिया, नामिबिया, मादागास्कर, मलावी आणि मोझांबिकमध्ये सायप्रस व्हिसा अर्ज प्रक्रियेच्‍या कामकाजावर देखरेख ठेवेल.

  • 07 Jan 2026 01:45 PM (IST)

    07 Jan 2026 01:45 PM (IST)

    शशांक केतकरच्या व्हिडिओवर अंकिता वालावलकरनेही व्यक्त केली खंत

    अभिनेता शशांक केतकर आणि निर्माते, दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यातील वाद आणखी वाढला आहे. चार वर्ष पाठपुरावा करूनही मंदार यांनी शशांकला त्याच्या मालिकेचे पैसे दिले नाहीत. ‘हे मन बावरे’ या मालिकेचे थकलेले पैसे अद्याप न दिल्यानं शशांकने पोलिसांत दिग्दर्शकाची तक्रार केली आहे. अभिनेता शशांक केतकर अनेक दिवसांपासून त्यांच्याकडे त्याच्या कामाच्या पैसाची मागणी करत आहे. शशांक केतकरने सोशल मीडियावर या सगळ्यांचे माहिती देखील चाहत्यांना दिली आहे.

  • 07 Jan 2026 01:41 PM (IST)

    07 Jan 2026 01:41 PM (IST)

    आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा सर्वसाधारण जागांवर प्रवेश नाही’; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

    सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या पात्रतेबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. राखीव जागेसाठी अर्ज केल्यानंतर आणि त्याचे फायदे घेतले जातात. मात्र, नंतर उमेदवार सामान्य श्रेणीच्या जागेवर दावा करू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. जरी त्यांचे गुण सामान्य श्रेणीच्या विद्यार्थ्याच्या गुणांइतके असले तरी, त्यांचा दावा राखीव जागेवरच राहील, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

  • 07 Jan 2026 01:35 PM (IST)

    07 Jan 2026 01:35 PM (IST)

    पुण्यात भाजपला बसणार धक्का; माजी शहर उपाध्यक्ष अमराळे आज करणार राष्ट्रवादीत प्रवेश

    सध्या महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण आहे. सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने अनेक निष्ठावंताना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे काही जणांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करुन उमेदवारी मिळवली. अशातच आता पुण्यात भाजपला आणखी एक धक्का बसणार आहे. गेली २५ वर्षे भाजपमध्ये विविध पदांवर कार्यरत असलेले व वेगवेगळ्या उपक्रमांमधून स्वतःची ओळख निर्माण करणारे पुणे शहर भाजप माजी उपाध्यक्ष वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अमराळे यांनी फेसबुकवर पोस्ट करून माहिती दिली आहे.

  • 07 Jan 2026 01:25 PM (IST)

    07 Jan 2026 01:25 PM (IST)

    ‘Venezuela कोणत्याही बाह्य शक्तीच्या नियंत्रणाखाली नाही,’ अंतरिम राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज USवर कडाडल्या

    दक्षिण अमेरिकेतील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले आहे. अमेरिकन सैन्याने राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांना अटक केल्यानंतर आता व्हेनेझुएलाच्या नव्या अंतरिम अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज (Delcy Rodriguez) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. ट्रम्प यांनी “आता आम्हीच व्हेनेझुएला चालवत आहोत” असे विधान केल्यानंतर रॉड्रिग्ज यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “व्हेनेझुएला हा एक सार्वभौम देश असून तो कोणत्याही बाह्य शक्तीच्या नियंत्रणाखाली नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

  • 07 Jan 2026 01:19 PM (IST)

    07 Jan 2026 01:19 PM (IST)

    Venezuela-US War Impact: अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या कारवाईचा शेअर बाजारावर होणार गंभीर परिणाम

    Venezuela-US War Impact: २००८ च्या जागतिक आर्थिक संकटाची भविष्यवाणी करणारे मायकेल बरी यांच्या मते, व्हेनेझुएलावर अमेरिकेने केलेल्या अलीकडील कारवाईला शेअर बाजार खूपच हलक्यात घेत आहेत. बरी म्हणतात की गुंतवणूकदारांना तात्काळ परिणाम पाहण्याची सवय आहे, परंतु या चढ-उतार होणाऱ्या बाजारामागे एक गंभीर संकट येऊ पाहत आहे. त्यांच्या मते, ही केवळ एक प्रादेशिक राजकीय घटना नाही तर जागतिक शक्ती, तेल बाजारपेठ आणि भू-राजकारणातील एक मोठा बदल आहे, ज्याचे परिणाम मध्य आणि दीर्घकालीन काळात जाणवतील.  वाचा सविस्तर- 

  • 07 Jan 2026 01:18 PM (IST)

    07 Jan 2026 01:18 PM (IST)

    BJP Alliance MIM And Congress: MIMशी युतीवरून भाजप तोंडावर पडली!

    BJP Alliance MIM And Congress: अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेत भाजपने सत्तेसाठी एमआयएमशी युती केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. तसेच,  अंबरनाथ नगरपालिकेत काँग्रेसशी आघाडी केल्यानंतर, अकोल्यातील अकोट नगरपालिकेत भाजपने थेट एमआयएमसोबत आघाडी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पातळीवर झालेल्या एमआयएम आणि काँग्रेससोबतच्या युतीवर संताप व्यक्त केला आहे. अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम युतीवर करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. स्थानिक पातळीवर जे काही झालं ते चुकीचचं आहे. ज्याने कोणी हे केलं असेल, त्याचावर कारवाई करणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. वाचा सविस्तर- 

  • 07 Jan 2026 01:17 PM (IST)

    07 Jan 2026 01:17 PM (IST)

    MIMशी युतीवरून भाजप तोंडावर पडली! विरोधक आक्रमक

    अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेत भाजपने सत्तेसाठी एमआयएमशी युती केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. भाजपने आपल्या सर्व तत्त्वांना मुरड घातली का, असा प्रश्नही उपस्थित केले जात आहे. अंबरनाथ नगरपालिकेत काँग्रेसशी आघाडी केल्यानंतर, अकोल्यातील अकोट नगरपालिकेत भाजपने थेट एमआयएमसोबत आघाडी केली.

  • 07 Jan 2026 01:10 PM (IST)

    07 Jan 2026 01:10 PM (IST)

    साहेब, रस्ते कुठे आहेत?”, एका प्रश्नाने आमदार प्रशांत बंबांची सभा तापली

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांना एका जाहीर सभेत जनरोषाचा सामना करावा लागला आहे. गंगापूर तालुक्यातील नवाबपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत विकासकामांचा पाढा वाचत असताना एका स्थानिक तरुणाने थेट रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला.“साहेब, रस्ते कुठे आहेत?” या एका प्रश्नामुळे सभेतील वातावरण चांगलेच तापले. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच आमदार प्रशांत बंब यांना सभा अर्धवट सोडून निघून जावे लागले.

  • 07 Jan 2026 01:10 PM (IST)

    07 Jan 2026 01:10 PM (IST)

    स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल

    TCL ने CES 2026 मध्ये Nxtpaper 70 Pro ची घोषणा केली आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन लेटेस्ट एडिशन Nxtpaper 4.0 सह सादर करण्यात आला आहे. यामुळे यूजर्सना एक डेडिकेटेड ‘Nxtpaper Key’ द्वारे वेगवेगळ्या मोड्समध्ये स्विच करण्याची सुविधा मिळते. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन मॉडर्न डिजिटल वापरासाठी तयार करण्यात आला आहे. म्हणजेच यूजर्स हा स्मार्टफोन दिवसभर वापरू शकतात आणि त्याचा डिस्प्ले मोड त्यांच्या हिशोबाने एडजस्ट करू शकतात.

  • 07 Jan 2026 01:00 PM (IST)

    07 Jan 2026 01:00 PM (IST)

    लातूरमधील नवोदय आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; बाथरूमच्या भिंतींवर हृदयाचे…

    लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयात सहावीतील अनुष्का पाटोळे हिचा हॉस्टेलमध्ये गळफास घेत मृत्यू झाला. संशयावरून वॉर्डन व आयाने सर्वांसमोर मारहाण व मानसिक छळ केल्याचे उघड होताच दोघींना अटक करण्यात आली आहे.

  • 07 Jan 2026 12:50 PM (IST)

    07 Jan 2026 12:50 PM (IST)

    अमरावती एमआयडीसीत थिनर फॅक्टरीत भीषण स्फोट; महिला कामगाराचा होरपळून मृत्यू

    अमरावतीच्या राजापेठ एमआयडीसीतील थिनर बनवणाऱ्या केमिकल फॅक्टरीत मंगळवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत मोनाली कोडापे (वय 29) या महिला कामगाराचा भाजून मृत्यू झाला असून तपास सुरू आहे.

  • 07 Jan 2026 12:50 PM (IST)

    07 Jan 2026 12:50 PM (IST)

    आधी गोळीबार, मात्र नेम चुकला; पाठलाग करून धारधार शास्त्राने वार करत मजुराची निर्घृण हत्या

    बीडच्या अंकुश नगरमध्ये भरदिवसा आधी गोळीबार करण्यात आला; नेम चुकल्याने आरोपीने पाठलाग करून धारदार शस्त्राने वार करत मजूर हर्षद उर्फ दादा शिंदे यांची निर्घृण हत्या केली. आरोपी फरार असून तपास सुरू आहे.

  • 07 Jan 2026 12:40 PM (IST)

    07 Jan 2026 12:40 PM (IST)

    आकर्षक व्याजाच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक; रिच टू मनी कंपनीचा संचालक रोशन जैन याला अटक

    बोईसरमधील ‘रिच टू मनी’ कंपनीने आकर्षक व्याजाचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. संचालक रोशन जैनला अटक करण्यात आली असून सुमारे 2.39 कोटींचा आर्थिक गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे.

  • 07 Jan 2026 12:30 PM (IST)

    07 Jan 2026 12:30 PM (IST)

    पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या

    पुण्यात 17 वर्षीय अमनसिंग गच्चड याचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. इन्स्टाग्रामवरून कात्रज येथे बोलावून खेडशिवापूरला नेऊन दगड व कोयत्याने खून करण्यात आला.

  • 07 Jan 2026 12:25 PM (IST)

    07 Jan 2026 12:25 PM (IST)

    भाजप-काँग्रेस युती, शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवलं? अंबरनाथमध्ये राजकीय उलथापालथ

    महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या तोंडावर अंबरनाथ विकास आघाडीच्या नावाने काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. शिंदे यांच्या पक्षाने याला विश्वासघात म्हटले आहे.

  • 07 Jan 2026 12:20 PM (IST)

    07 Jan 2026 12:20 PM (IST)

    राजकीय वर्तुळात खळबळ! काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा मृत्यू

    अकोल्यातील मोहाळा गावात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर नमाजनंतर चाकू हल्ला झाला. गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला असून राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

  • 07 Jan 2026 12:15 PM (IST)

    07 Jan 2026 12:15 PM (IST)

    Philippinesमध्ये त्सुनामीचा इशारा

    फिलीपिन्समध्ये ६.४ तीव्रतेच्या भूकंपाने हाहाकार; मिंडानाओ बेटावर जोरदार धक्के, 'रिंग ऑफ फायर'मुळे जगाची चिंता वाढली. तथापि, अद्याप त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.

  • 07 Jan 2026 12:10 PM (IST)

    07 Jan 2026 12:10 PM (IST)

    पैशाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी सिगारेटचे चटके दिले अन् नंतर गळाच चिरला

    गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मोबाईल फोन व पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून ३० वर्षीय तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

  • 07 Jan 2026 12:02 PM (IST)

    07 Jan 2026 12:02 PM (IST)

    तुर्कमान गेटवर दगडफेक सुरू असतानाही ३० बुलडोझरने कारवाई सुरु

    दिल्लीतील तुर्कमान गेट येथील फैज-ए-इलाही मशिदीजवळ बुधवारी सकाळी एमसीडीने अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली. लग्नाचे हॉल आणि दुकाने पाडण्यासाठी सुमारे ३० बुलडोझरचा वापर करण्यात आला. जमावाने दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर केला. यावेळी दगडफेक देखील झाली आहे.

  • 07 Jan 2026 11:55 AM (IST)

    07 Jan 2026 11:55 AM (IST)

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायतुल्लाह यांची मशिदीत हत्या, हल्लेखोराने चाकूने केले वार

    महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायतुल्ला पटेल यांची हत्या करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील एका मशिदीत त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले होते, त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना वाचवता आले नाही. हल्ल्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी १:३० वाजता जुन्या वैमनस्यातून हल्लेखोराने ६६ वर्षीय हिदायतुल्ला यांच्यावर हल्ला केला. ते अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मोहाळा या गावातील मशिदीत नमाज अदा करण्यासाठी गेले होते. नमाज अदा केल्यानंतर ते बाहेर पडणार असतानाच त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. हिदायतुल्ला यांनी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.

Web Title: Maharashtra india world breaking live news updates politics sports stock market business society crime entertainment stock market breaking news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today: सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
1

Maharashtra Breaking News Today: सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

Maharashtra Breaking LIVE News Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या ब्रेकिंग बातम्या एका क्लिकवर
2

Maharashtra Breaking LIVE News Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या ब्रेकिंग बातम्या एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.