आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन प्रकरणामध्ये क्लीन चीट मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मागील वाद विसरुन एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. चंद्रहार पाटील यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार राऊत म्हणाले की, चंद्रहार पाटील पहलवान असले तरी ते कच्चे मडके आहेत, त्यांना काय कमी केलं? आम्ही त्याच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मला वाईट वाटलं कीं त्याच्यासाठी आम्ही एवढं केलं प्रतिष्ठेची निवडणूक केली आता हे सगळं आर्थिक नावासाठी सुरू आहे, अशी टीका खासदार राऊत यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर राज-उद्धव हे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर खासदार राऊत यांनी सूचक विधान केले आहे. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी आम्ही स्पष्ट भूमिका घेतली ती भूमिका अशी आहे कोणाला काही वाटते कोणी काही म्हणू दे शिवसेना महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या कल्याणासाठी ही मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे या मुंबईवर फक्त मराठी माणसाचा हक्क राहावा यासाठी आपल्याला जे जे करता येईल ते शक्य आहे ते करायला लढायला आणि एक पाऊल पुढे किंवा मागे जायला आम्ही तयार आहोत,” असे सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा देखील समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी कधी बाळासाहेबांचे विचार आत्मसात केले मला माहिती नाही. ते कोणत्या काळात बाळासाहेबांबरोबर होते पहावं लागेल. त्यांनी बाळासाहेबांबरोबर नक्की कधी काम केलं? स्वतः विषयी काही भ्रम निर्माण करत आहेत, तो एक भ्रम आहे की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत, काय विचार तुम्ही मोदी, शहा, फडणवीस यांचे बूट चाटणं करता. जे महाराष्ट्राच्या मुळावर आले आहेत हा बाळासाहेबांचा विचार आहे का? महाराष्ट्र मुंबई संकटात असताना लुटली जात असताना मराठी माणसाच्या स्वाभिमानाला रोज धक्का लावला जात असताना तुम्हीही जे बूट चाटेगिरी करत आहात महाराष्ट्रद्रोही… यांची हा बाळासाहेब यांचा विचार आहे असा जर या लोकांना वाटत असेल तर धन्य आहे,” असे परखड मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.