Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची! 15 ऑगस्टपर्यंत भाषा शिकावीच लागणार अन्यथा…; प्रताप सरनाईकांनी दिले महत्त्वाचे निर्देश

राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा यासाठी अमराठी चालकांना 15 ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा शिकणे सक्तीचे करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 16 ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 22, 2026 | 06:39 PM
रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची! 15 ऑगस्टपर्यंत भाषा शिकावीच लागणार अन्यथा...; प्रताप सरनाईकांनी दिले महत्त्वाचे निर्देश

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची! 15 ऑगस्टपर्यंत भाषा शिकावीच लागणार अन्यथा...; प्रताप सरनाईकांनी दिले महत्त्वाचे निर्देश

Follow Us
Close
Follow Us:
  • रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य!
  • 15 ऑगस्टपर्यंत भाषा शिकावीच लागणार
  • नियम न पाळल्यास कारवाई
मुंबई : राज्यातील प्रवाशांसोबत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीत संवाद साधता यावा, यासाठी त्यांना मराठी भाषा शिकविण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते.

यावेळी सरनाईक म्हणाले की, मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून राज्यभरात मराठी भाषा अभ्यास केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच रिक्षा संघटना आणि शिवसेना शाखांमधील उपलब्ध जागांमध्येही ही केंद्रे १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत.

Matheran News : इतिहास, निसर्ग आणि परंपरेचा उत्सव! माथेरानचा 176 वा वाढदिवस दिमाखात साजरा

रिक्षा-टॅक्सी चालकांनी ऑनलाईन किंवा आपल्या परिसरातील प्रत्यक्ष केंद्रांमध्ये जाऊन मराठी भाषा शिकून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रशिक्षणासाठी सुमारे चार हजार शिक्षक सहभागी होणार असून, प्रत्येक महिन्यातील चार शनिवार आणि रविवार चालकांच्या सोयीप्रमाणे किमान चार तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. काही शिक्षक मानधनाशिवाय प्रशिक्षण देणार असून, काहींना प्रति तास एक हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

मानधनासाठी मराठी भाषा विभागाकडून दोन कोटी रुपयांची तरतूद

मराठी भाषा प्रशिक्षणासाठी आवश्यक मानधनाच्या खर्चासाठी मंत्री सरनाईक यांच्या विनंतीनुसार मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दूरध्वनीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. उर्वरित खर्च परिवहन विभागामार्फत करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणानंतर चालकांना प्रमाणपत्र

रिक्षा-टॅक्सी चालकांनी या उपक्रमात सहभागी होऊन यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्यास त्यांना परिवहन विभागामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी चालकांची मराठी भाषेवरील व्यवहारिक क्षमता तपासण्यासाठी प्रशिक्षण केंद्रांमध्ये तोंडी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहितीही मंत्री सरनाईक यांनी दिली.

परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांनी प्रशिक्षण केंद्रांची अंतिम यादी निश्चित करून ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. रिक्षा-टॅक्सी चालकांची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यांनी विनामूल्य उपलब्ध असलेले ऑनलाईन अथवा ऑफलाईन प्रशिक्षण घेऊन व्यावहारिक मराठी आत्मसात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. चालकांच्या वेळेनुसार प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार असली, तरी १५ ऑगस्टपर्यंत मराठी भाषा शिकली नाही तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा पुनरुच्चार मंत्री सरनाईक यांनी केला.

प्रशिक्षणासाठी करण्यात आलेली तयारी

सचित्र आणि सोप्या भाषेतील पाठ्यक्रम पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

प्रत्येक केंद्रांतर्गत उपकेंद्रे उभारली जाणार आहेत.

रिक्षा-टॅक्सी तसेच ओला, उबेर, रॅपिडो वाहनांवर मराठी संदर्भातील जनजागृती स्टिकर्स लावले जाणार आहेत.

मराठी भाषा प्रचार-प्रसारासाठी विशेष बॅनर्स तयार करण्यात येत आहेत.

‘कोणतीही घोषणा नाही, कोणतीही मदत नाही’; मेट्रो-३ बंद पडल्याने मुंबईकर संतापले; सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

Web Title: Marathi language mandatory for rickshaw taxi drivers maharashtra august deadline

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • maharashtra
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Navbharat Social Impact Summit 2026:  नवभारत समिट 2026 आज; मंत्री, उद्योगपतींसह दिग्गजांचा महाकुंभ रंगणार
1

Navbharat Social Impact Summit 2026: नवभारत समिट 2026 आज; मंत्री, उद्योगपतींसह दिग्गजांचा महाकुंभ रंगणार

Chhatrapati Shivaji Museum : छत्रपती शिवाजी संग्रहालयात दुर्मिळ वीरगळींची उपेक्षा? तळघरात धूळ-ओलाव्यात ऐतिहासिक ठेवा
2

Chhatrapati Shivaji Museum : छत्रपती शिवाजी संग्रहालयात दुर्मिळ वीरगळींची उपेक्षा? तळघरात धूळ-ओलाव्यात ऐतिहासिक ठेवा

Kumbh Mela 2026: ‘धार्मिक की राजकीय अजेंडा?’ कृष्णा नदीकाठी लघु कुंभमेळ्याला विरोध; प्रदूषण आणि कोट्यवधींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
3

Kumbh Mela 2026: ‘धार्मिक की राजकीय अजेंडा?’ कृष्णा नदीकाठी लघु कुंभमेळ्याला विरोध; प्रदूषण आणि कोट्यवधींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

अधिकारी चक्क ‘मटक्याचे आकडे’ पाहण्यात व्यस्त, सावंतवाडीतील ‘तो’ VIDEO व्हायरल; प्रशासकीय वर्तुळात खळबळ
4

अधिकारी चक्क ‘मटक्याचे आकडे’ पाहण्यात व्यस्त, सावंतवाडीतील ‘तो’ VIDEO व्हायरल; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.