Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठवाड्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची अद्याप प्रतिक्षाच; प्रवासाची तिकिटे मिळणेही अवघड

पुणे ते नांदेडदरम्यान धावणाऱ्या नियमित गाड्यांमध्ये वेटिंग लिस्ट लांबली असून, जनरल व स्लीपर डब्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 02, 2026 | 11:15 AM
मराठवाड्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची अद्याप प्रतिक्षाच; प्रवासाची तिकिटे मिळणेही अवघड

मराठवाड्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची अद्याप प्रतिक्षाच; प्रवासाची तिकिटे मिळणेही अवघड

Follow Us
Follow Us:

पुणे : उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाला आहे. असे असतानाही पुणे, मुंबईहून मराठवाड्यातील मार्गावर एकही उन्हाळी विशेष रेल्वे सुरू झाली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मध्य आणि दक्षिण रेल्वेकडून दरवर्षी उन्हाळी हंगामात पुणे-नांदेड, पुणे-लातूर, पुणे-परभणी या मार्गांवर प्रवाशांची मोठी गर्दी होते. मात्र, यंदा अद्याप अतिरिक्त गाड्यांची घोषणा न झाल्याने प्रवासासाठी तिकिटे मिळवणे अवघड झाले आहे.

मुंबई-पुण्यात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक असलेल्या मराठवाड्यातील नागरिकांची संख्या मोठी आहे. उन्हाळी सुट्टीत हे प्रवासी मोठ्या प्रमाणात गावी जातात. तसेच, मराठवाड्यातील नागरिक पर्यटनासाठी सुट्टीत जातात. त्यामुळे पुणे ते नांदेडदरम्यान धावणाऱ्या नियमित गाड्यांमध्ये वेटिंग लिस्ट लांबली असून, जनरल व स्लीपर डब्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून मराठवाड्यासाठी विशेष गाड्या न सोडण्यामागे मार्गावरील ताण, फलाटांची कमतरता आणि क्षमता पूर्ण झाल्याची कारणे दिली जात आहेत. मात्र, उत्तर भारताकडे मोठ्या प्रमाणावर विशेष गाड्या सोडल्या जात असताना पुणे-मराठवाडा मार्गाकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे.

गेल्या वर्षी पुणे-पनवेल-नांदेड तसेच इतर काही विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यंदाही त्याच धर्तीवर पुणे-नांदेड, पुणे-लातूर आणि पुणे-छत्रपती संभाजीनगर या मार्गांवर उन्हाळी विशेष गाड्या तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे.

रेल्वे तिकिटाच्या बुकिंगसाठी विशेष तयारी

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि तिकीट प्रणालीतील गैरवापर रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने महत्त्वाचे निर्णय घेतले असून, लवकरच प्रवाशांना गाडी सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत आपले बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा मिळणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी (ता.२४) या पाच नव्या सुधारणांना मंजुरी दिली. यामुळे २०२६ मधील रेल्वे सुधारणा उपक्रमांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता तिकीट उपलब्ध व्हावे आणि शेवटच्या क्षणी होणारी सट्टेबाजीची बुकिंग थांबवावी, हा या सुधारणांचा मुख्य उद्देश असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.

Web Title: Marathwada still awaits special trains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Indian Railway
  • pune news

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

आनंदाची बातमी ! देशात सात नव्या अमृत भारत एक्स्प्रेस धावणार; रेल्वे कनेक्टिव्हिटीला मिळणार वेग
2

आनंदाची बातमी ! देशात सात नव्या अमृत भारत एक्स्प्रेस धावणार; रेल्वे कनेक्टिव्हिटीला मिळणार वेग

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
3

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
4

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.