Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Masur road accident : गणपतीपुळ्याला निघाल्या कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

मध्यरात्री अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अपघाताची माहिती मिळताच मसूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुधाकर भोसले, हवालदार बाळासाहेब कोळेकर, संजय काटे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 15, 2026 | 12:14 PM
Road Accident, Satara News, Masur Police, Tragic News, Highway Accident,

Road Accident, Satara News, Masur Police, Tragic News, Highway Accident,

Follow Us
Follow Us:
  • पंढरपूर–मल्हारपेठ महामार्गावर कारचा अपघात
  • कारचा चक्काचूर, एक अभियंता गंभीर तर एक किरकोळ जखमी
  • मध्यरात्री अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी
Masur road accident : कोरेगावहून गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी निघालेल्या तीन तरुण अभियंत्यांच्या कारला रविवारी पहाटे पावणे एक वाजण्याच्या सुमारास पंढरपूर–मल्हारपेठ राज्य महामार्गावर भीषण अपघात झाला. वडोली भिकेश्वर हद्दीतील कवठे फाटा वळणावर भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ती अनेक पलट्या खात शेतात जाऊन कोसळली. या दुर्घटनेत कारचालक अभियंता ओंकार अनिल खंडागळे (वय २३, रा. पाटण, मूळ रा. बीड) यांचा मृत्यू झाला. एक जण गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे.

ओंकार खंडागळे, हरिश सुरेश वाघमारे (रा. पडळ, ता. खटाव), प्रतिक रमेश धावणे (रा. चंद्रपूर) हे तिघेही एका खासगी बांधकाम कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत. १४ जून रोजी सुट्टी असल्याने ते शनिवारी रात्री कोरेगावहून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी ओंकार यांच्या मालकीच्या एमएच १४ डीए ६६०० क्रमांकाच्या शेव्हरेलो क्रुज कारने रवाना झाले होते.

Pune Water Supply: पुण्याला सम आणि विषम तारखांनुसार होणार पाणीपुरवठा; नवे वेळापत्रक जाहीर

मध्यरात्री सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास कवठे फाटा वळणावर वाहनाचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या कडेला जाऊन खड्ड्यात घुसली. पलट्या खात अंदाजे ३०० फूट अंतरावर शेतात जाऊन पडली. भीषण अपघातामुळे कारचे मोठे नुकसान झाले.

या दुर्घटनेत ओंकार खंडागळे यांना गंभीर जखमी झाल्याने त्यांना कराडला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रतिक रमेश धावणे यांच्यावर कराडच्या सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरिश वाघमारे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.या अपघाता विषयी हरिश वाघमारे यांनी मसूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

SIM Swap Scam: फोनमधून अचानक गायब झालं नेटवर्क! सॉफ्टवेअरमधील त्रुटी की सिम हॅकिंगचा संकेत

वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. सदर प्रकरणी मसूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुधाकर भोसले पुढील तपास करीत आहेत.

ग्रामस्थांसह पोलिसांची तत्परता

मध्यरात्री अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अपघाताची माहिती मिळताच मसूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुधाकर भोसले, हवालदार बाळासाहेब कोळेकर, संजय काटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांसह पोलिसांनीही तात्काळ तत्पूर्ता दाखवली. पोलिसांनी १०८ रुग्णवाहिकेच्या साहाय्याने सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. अपघातग्रस्तांच्या उपचारांसाठी मसूर पोलीस ठाण्याचे संजय काटे यांचेही प्रयत्न महत्वपूर्ण ठरले.

 

Web Title: Masur road accident june 2026 omkar khandagale engineer death accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • Accident Case
  • Car Accident
  • Karad news
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
1

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती
2

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल
3

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल

Satara News: साताऱ्याला आधुनिक विकासाची जोड देणार! स्वातंत्र्यदिनी नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे नागरिकांना  आवाहन
4

Satara News: साताऱ्याला आधुनिक विकासाची जोड देणार! स्वातंत्र्यदिनी नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे नागरिकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.