SIM Swap Scam: फोनमधून अचानक गायब झालं नेटवर्क! सॉफ्टवेअरमधील त्रुटी की सिम हॅकिंगचा संकेत? असं राहा सुरक्षित
सिम स्वॅप स्कॅम हा एक असा सायबर फ्रॉड आहे, ज्यामध्ये सायबर गुन्हेगार तुमच्या मोबाईल कंपनीला फसवून तुमचा मोबाईल नंबर त्यांच्याकडे असलेल्या सिमकार्डवर ट्रांसफर करून घेतात. जेव्हा तुमचा नंबर एखाद्या दुसऱ्या सिम कार्डवर अॅक्टिव्ह होतो, त्यावेळी तुमच्या फोनमधील नेटवर्क बंद होतं आणि कॉल, मेसेज, ओटीपी सर्वकाही सायबर गुन्हेगारांकडे असलेल्या सिमकार्डपर्यंत पोहोचतं. सध्याच्या या डिजीटल काळात बँकिंग, सोशल मीडिया आणि अनेक ऑनलाईन सेवा तुमच्या मोबाईल नंबरला जोडलेल्या असतात आणि मोबाईल नंबरद्वारे व्हेरिफाय केल्या जातात. अशा परिस्थितीत जेव्हा तुमचे सिम कार्ड हॅक केले जाते, तुमचा सर्व डेटा सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचतो. या डेटाचा चुकीचा वापर केला जाण्याची शक्यता देखील असते. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत या स्कॅमबाबत लोकांना सावध राहण्यास सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की, जर तुमच्या फोनमध्ये दिर्घकाळासाठी नेटवर्क येत नसेल तर, तुम्हाला कोणतेही कॉल आणि मेसेज येत नसतील. तर या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. काहीवेळेस नेटवर्कमध्ये व्यत्यय येऊ शकतो, मात्र कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय सेवेमध्ये दीर्घकाळ व्यत्यय येणे हे सिमशी छेडछाड झाल्याचे लक्षण असू शकते.
तुमच्या फोनमधून दिर्घकाळ नेटवर्क गायब झाले असेल आणि तुम्हाला सिम स्वॅप स्कॅमची शंका येत असेल तर सर्वात आधी तुमच्या टेलिकॉम कंपनीच्या कस्टमर केयरला संपर्क करा. त्यांना विचारा की, त्यांनी तुमच्या सिम किंवा मोबाईल नंबरसंबंधित कोणते बदल केले आहेत का. जर तुम्हाला कोणतीही संशयास्पद हालचाल जाणवली तर त्वरित राष्ट्रीय सायबर क्राइम हेल्पलाइन 1930 वर तक्रार नोंदवा.
Free Fire Max: गेममध्ये वारंवार होताय Knock Out? आत्ताच वापरा या खास टिप्स… जाणून घ्या सविस्तर
सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्यासाठी खबरदारी घेणं आवश्यक आहे. तुमच्या मोबाईल नंबरवर अतिरिक्त सुरक्षेसाठी टेलीकॉम कंपनीद्वारे उपलब्ध असलेल्या कॅरियर पिन किंवा आयव्हीआर लॉक यासांरख्या सुविधांचा वापर करा. कोणत्याही व्यक्तिसोबत ओटीपी, बँकिंग डिटेल्स आणि पासवर्ड शेअर करू नका. जर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर अचानक नेटवर्क जाणे, कॉल्स किंवा मेसेजेस थांबणे यासारखी कोणतीही असामान्य गोष्ट आढळल्यास, ताबडतोब तुमच्या सर्विस प्रोवाइडरला संपर्क साधा आणि या प्रकरणाची चौकशी करून घ्या






