फोटो सौजन्य: iStock
सध्या मुंबईच्या रस्त्यावरून जाताना आपल्याला अनेक ठिकाणी मेट्रोचे बांधकाम पाहायला मिळते. कुठे तरी मेट्रोसाठी खडे पाडले जात आहेत तर कुठे रस्ता बंद केला जात आहे. मुंबईतल्या काही भागात तर ही मेट्रो सेवा चालू सुद्धा झाली आहे. एकंदरीत या मेट्रो सेवेमुळे मुंबईतील कनेक्टिव्हिटी वाढली आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) द्वारे आरे JVLR ते वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानकापर्यंत प्रवाशांना नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. मेट्रो-३ चा प्रवास सुखकर बनविण्यासाठी तिकीट खिडक्या तसेच कॉन्कोर्सजवळ ही सेवा प्रवाशांना उपलब्ध असेल. वायफाय सेवेमुळे त्यांना तिकीट खरेदी करणे सुलभ होणार आहे. सध्या ही सेवा तिकीट खिडक्या व कन्कोर्स जवळ उपलब्ध असली तरी भविष्यात प्लॅटफॉर्म आणि भुयारात देखील वायफायचा उपयोग प्रवाशांना करता येणार आहे.
प्रवासी मोबाईल अॅप्लिकेशन, तिकीट काउंटर, तिकीट वेंडिंग मशीन आणि एमएमआरसी वेबसाइटवरून सिंगल आणि रिटर्न प्रवासाची तिकिटे खरेदी करू शकतात. येण्या-जाण्याच्या प्रवासासाठी तिकिटे ३ तास वैध राहतील. स्थानकांमध्ये तिकीट खरेदी करणारे प्रवाशी त्यांचे तिकीट कोणत्याही अडचणीशिवाय बुक करण्यासाठी उपलब्ध मोबाईल आणि वायफाय नेटवर्क वापरू शकतात.
MMRC लवकरच सर्व स्थानकांवर आणि ट्रेनच्या आत वेगवेगळ्या सेवा प्रदात्यांकडून उत्तम 4G आणि 5G मोबाइल नेटवर्क कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणार आहे. तसेच तुम्ही https://play.google.com/store/apps/details?id=com.metroconnect3.app या लिंकवरून मेट्रो ३ चे मोबाइल अॅप MetroConnect3 डाउनलोड करू शकता.
तसेच ज्यांच्याकडे आयफोन असेल त्यांनी https://apps.apple.com/us/app/metroconnect3/id6723876321 या लिंकवरून हे अॅप डाउनलोड करू शकता. तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही https://mmrcl.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.