मंत्री पंकजा मुंडे (फोटो -सोशल मिडिया)
जालना: आज जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या जालना जिल्ह्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सभागृहात आढावा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक पाणी व टंचाईच्या विविध मुद्द्यावर विशेष करून ही बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिली आहे व शेतकऱ्यांना कुठल्याही आणि अडचणीला सामोरे जावे नाही लागले पाहिजे अशा सूचना सुद्धा यावेळी त्यांनी दिल्या आहेत.
प्रामुख्याने येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मुबलक दरात बी बियाणे खते उपलब्ध करून द्या तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणीवर विशेष करून लक्ष द्यावे अशा सूचना यावेळी यांनी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार पदाधिकारी कार्यकर्ते हे आवर्जून उपस्थित झाले होते. या बैठकीमध्ये त्यांनी बऱ्याच उद्द्यांवर हात घालत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी लवकरच दूर केल्या जाईल अशी ग्वाही यावेळी दिली आहे.
तसेच जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे 57 कोटी रुपयांचे अनुदान काही अधिकाऱ्यांनी लुटले आहे. त्यांनी परस्पर ते आपल्या खात्यात पळवले आहे हे चुकीच आहे. या संदर्भात माझ्याकडे तक्रारी प्राप्त झाले असून या तक्रारीची चौकशी करण्यासाठी मी बाहेर तालुक्यातून अधिकारी बोलून याची चौकशी करणार आहे. जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर मी योग्य ती कारवाई करणार आहे, असे मुंडे म्हणाल्या. या प्रसंगी जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आमदार नारायण कुचे आमदार संतोष पाटील दानवे आमदार राजेश राठोड आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
‘या’ जिल्ह्यांना अवकाळी झोडपणार
हवामान विभागाने राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंड, दिल्ली, हिमाचल प्रदेश राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान महाराष्ट्रातसुद्धा तापमानात वाढ झाली आहे. येत्या 5 दिवसांत कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात गेले काही दिवस कडक उन्हाळा जाणवत आहे. काही ठिकाणी तपमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेले आहे. प्रचंड उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील 5 दिवस अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
Maharashtra Weather: ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी झोडपणार; कसे असणार राज्याचे वातावरण?
राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा वाढला आहे. तापमान वाढल्याने पुढील 5 दिवस अवकळी पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिक, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर या ठिकाणी अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, धुळे, अहिल्यानगर, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.