सौजन्य - सोशल मिडीया
बीड : बीडच्या सावरगाव घाट येथे मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सुरु आहे. पंकजा मुंडे सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टरने मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या. त्यानंतर पंकजा मुंडेंनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले, पूजा व आरती केली. पंकजा मुंडेंच्या या मेळाव्याला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके देखील उपस्थित आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणाले मुंडे?
धनंजय मुंडे म्हणाले की, २५० दिवस माझी वाईट मानसिकता झाली होती. माझी बहीण माझ्या जवळ येऊन तास न् तास बसत होती. ज्या काळात मीडिया ट्रायल सुरू होतं, त्यावेळी माझ्या बहिणीने आधार दिला. माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांनी आधार दिला. माझ्या विरोधात घोटाळा काढला. कोर्टात गेले. कोर्टाने मला क्लीनचिट दिली. जे कोर्टात गेले. त्यांना लाख रुपयाचा दंड ठोठावला. एवढं होऊनही मी आज शिक्षा भोगतोय. हे लक्षात घ्या. आज जे बीड जिल्ह्यात जाती पातीचे, जिगरी दोस्तांची दोस्ती तुटली. हे वातावरण आपल्याला मोडायचं आहे, जाती पातीचा द्वेष आपल्याला काढायचा आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण दिल्यानं आम्हाला आनंद
ज्या ज्या आरक्षणाचा मुद्दा आला की मी प्रत्येकवेळी मी भांडलो. मराठा समाजाला आरक्षण दिलं कारण आम्हाला आनंद आहे, कारण त्या चळवळीत होतो. काही जणांना मराठा आरक्षणाच्या मागून, ओबीसींच आरक्षण घ्यायचं आहे. ओबीसींच कटऑफ 485 आणि स्पेशल विकर सेशनचा कट ऑफ 450 मार्क आहेत. मी जर मराठा समाज म्हणून ईडब्लूसच आरक्षण घेतलं, तर पास झालो असतो. प्रमाणपत्र घेवून 480 मार्क घेऊन सुध्दा नापास, कुणाला फसवताय तुम्ही…काही ठरावीक लोक खुर्ची मिळावी म्हणून, राजकारण करायचं…, असं धनंजय मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडेंच्या शायरीने वेधलं लक्ष
धनंजय मुंडेंनी आजच्या भाषणात एका शायरीन सगळ्यांचं लक्ष वेधलं. यामध्ये आग लगी थी मेरे घर, सब पुछने वाले आये हाल पूछा और चले गये… एक सच्चे मित्र ने पूछा क्या बचा है? मैने कहाँ कुछ नहीं केवल मैं बचा गया हूँ…फिर उसने गले लगा कर कहाँ दोस्त…फिर जला ही क्या हैं?, अशी शायरी धनंजय मुंडेंनी बोलावून दाखवली.