महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा (फोटो -istockphoto)
Unseasonal Rain Alert News: हवामान विभागाने राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंड, दिल्ली, हिमाचल प्रदेश राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान महाराष्ट्रातसुद्धा तापमानात वाढ झाली आहे. येत्या 5 दिवसांत कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात गेले काही दिवस कडक उन्हाळा जाणवत आहे. काही ठिकाणी तपमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेले आहे. प्रचंड उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील 5 दिवस अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा वाढला आहे. तापमान वाढल्याने पुढील 5 दिवस अवकळी पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिक, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर या ठिकाणी अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, धुळे, अहिल्यानगर, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना जोरदार पावसासह गारपीटीचा इशारा
मुंबईमधील तापमानामध्ये वाढ होत आहे. तर तापमानात वाढ होत असतानाच मुंबईत हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने अंदाज दिला आहे. राज्यात सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे. तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे. विदर्भात तर तापमान ४२ अंशाच्या वर गेले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर विदर्भ आणि मराठवड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. भंडार आणि गोंदिया जिल्ह्यांना २८ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान ४४ अंशाच्या यावर पोहोचले आहे. कडक उन्हाळा जाणवत आहे. राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर गरज असल्याच दुपारच्या वलेस घराबाहेर पाडण्याचे आवाहन केले आहे.
विदर्भात गारपीट होण्याचा इशारा
राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. लातूर, धाराशीव, नांदेड, सोलापूर भागात पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील दोन दिवस गारपीट होण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांत देखील पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Pune Weather: पुणे तापलं! शहर आणि परिसरात वाढल्या उन्हाच्या झळा; पुढील दोन दिवसांत…
पुणे तापलं! शहर आणि परिसरात वाढल्या उन्हाच्या झळा
पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्र झळा वाढल्या असून तापमानाचा पारा ४२. १ अंश सेल्सिअसपर्यंत पाेचला आहे. पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियस राहणार आहे. त्यामुळे नागरीकांनी घरातुन बाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे. २२ एप्रिलनंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.