(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )
खान कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. अभिनेता अरबाज खान आणि त्याची दुसरी पत्नी शूरा खान यांच्या घरी काही दिवसांपूर्वीच चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.रविवारी, ५ ऑक्टोबर रोजी शूराने आपल्या पहिल्या मुलीला जन्म दिला, आणि त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अरबाज व शुराच्या लाडक्या लेकीची भेट घेण्यासाठी सलमान खान सुद्धा दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात पोहोचला होता.आता शुराला डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्णालयातून घरी जाताना अरबाजसह त्याच्या चिमुकल्या लेकीची पहिली झलक चाहत्यांना पाहायला मिळाली.
खान कुटुंबात लक्ष्मीच्या पावलांनी आलेली ही गोड पाहुणीचं नावही आता निश्चित करण्यात आलं आहे. या जोडप्याने लेकीच्या जन्मानंतर पहिली सोशल मीडिया पोस्ट देखील शेअर केली आहे.अरबाज आणि शूरा यांनी आपल्या लेकीचं नाव ‘सिपारा खान’ (Sipaara Khan) असं ठेवलं असून, पोस्ट शेअर करत त्यांनी हे नाव अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. या पोस्टवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
गौहर खानच्या करिअरवरून सासऱ्यांचे वक्तव्य, म्हणाले; “गौहर खान एक उत्तम आई आहे, पण मी तिचं काम…”
अरबाजचं पहिलं लग्न अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत १९९८ साली झालं होतं. १९ वर्षांच्या संसारानंतर, २०१७ मध्ये या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला. या संसारातून त्यांना एक मुलगा आहे. अरहान खान, जो सध्या २२ वर्षांचा आहे.यानंतर, डिसेंबर २०२३ मध्ये अरबाज खानने शूरा खान हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. विशेष म्हणजे, या दोघांच्या वयात तब्बल २५ वर्षांचं अंतर आहे. काही दिवसांपूर्वीच शूराने एका गोंडस मुलीला जन्म दिला, आणि त्यामुळे खान कुटुंबात आनंदाचं वातावरण पसरलं आहे.दरम्यान, अरबाज आणि मलायकाचा मुलगा अरहान खानदेखील हॉस्पिटलमध्ये शूराला भेटायला गेला होता.