
नागरिकांसाठी मोठा दिलासा! ऑनलाइन जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, गणेश मंडप NOC आणि Pothole ॲपचे लोकार्पण
या सेवेद्वारे नागरिकांना अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, ऑनलाइन शुल्क भरणे आणि प्रमाणपत्र डाउनलोड करणे ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडप परवानगी (NOC) पोर्टलमुळे गणेश मंडळांना परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे कार्यालयीन फेऱ्या कमी होऊन परवानगी प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होणार आहे.
Pothole Reporting & Repair System या मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिक आता रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार संबंधित ठिकाणाचे छायाचित्र आणि GPS लोकेशनसह नोंदवू शकतील. तक्रारीवर झालेल्या कारवाईची स्थितीही ऑनलाइन पाहता येणार असल्याने दुरुस्ती प्रक्रियेवर प्रभावी देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.
या कार्यक्रमाला उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, शहर अभियंता दिपक खांबित, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती हेमा बेलानी, सिस्टम मॅनेजर राज घरत, नगरसेविका दिप्ती भट, हेतल परमार, सुरेखा सोनार, स्नेहा पांडे, रूपाली मोदी, नगरसेवक तरुण शर्मा, विशाल पाटील तसेच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी महापौर डिंपल मेहता यांनी नागरिकांना या सर्व डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले. भविष्यातही मिरा-भाईंदर महानगरपालिका नागरिककेंद्रित, तंत्रज्ञानाधारित आणि कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एसटीतून प्रवास करताना सवलतीचा लाभ घेताय? तर आता तुमचंही होणार सर्वेक्षण