पूर्वीही पुतळा हटवण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर शिवप्रेमींनी जोरदार विरोध केला होता. त्यानंतर प्रशासनाने पुतळ्याभोवतीच मेट्रो आणि उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. शहराची ओळख कायम राहावी यासाठी घोडबंदर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आणि त्याचे लोकार्पणही करण्यात आले होते.दरम्यान, काशिमीरा परिसरात नुकतीच मेट्रो सेवा सुरू झाली असून उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या बांधकामांमुळे मूळ पुतळा पूर्वीसारखा स्पष्ट दिसत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे पुतळ्याच्या दुरुस्तीबाबत आणि पुढील निर्णयासाठी हा विषय महापालिकेच्या महासभेत चर्चेसाठी मांडण्यात आला.
Mira Bhayander : अतिक्रमण झालेल्या झोपड्यांना भीषण आग; निष्काळजीपणामुळे महानगरपालिकेवर टीकेची झोड
मिळालेल्या माहितीनुसार, पुतळ्याच्या दुरुस्तीसाठी तज्ज्ञ सल्लागार आणि मूर्तिकार नेमण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, दुरुस्तीच्या काळात पुतळा हटवल्यानंतर तो पुन्हा मूळ ठिकाणी बसविण्यात येणार की अन्यत्र स्थलांतरित केला जाणार, याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. याच अनिश्चिततेमुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर टीका करत, “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा केवळ शिल्प नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. कोणताही निर्णय घेताना शिवप्रेमींची भावना विचारात घेतली गेली पाहिजे. अन्यथा शहरात तीव्र आंदोलन उभे केले जाईल,” असा इशारा दिला आहे.+या मुद्द्यावरून आता शहरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, पुढील काही दिवसांत शिवप्रेमी संघटना, सामाजिक संस्था आणि विविध पक्षांकडून आंदोलनाची भूमिका अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






